आणि तिची घालमेल अंतिम भाग

And her emotions last part As sapana came late today at home so her mother in law asked her the reason why she is late? Sapna told her that she mate her friend neha after long time so while talking how time passed I don't know and I got late t

आणि तिची घालमेल अंतिम भाग

नेहा कडे गेल्याने सपनाला घरी यायला उशीर होतो.... 

संजयची आई--- सपना आज वेळ का झाला?? 

सपना-- अहो आई माझी मैत्रीण भेटली होती . बरेच दिवसांनी भेटल्याने गप्पा मारत बसलो आणि वेळ कसा गेला कळले नाही. 

संजय ची आई-- संजय पण येईल एवढ्यात तू स्वयंपाकासाठी जा मी पण येते मदतीला तूला... 

सपना ला आश्चर्य वाटले, परंतु आज नेहाला भेटुन सपना आनंदी होती. सपना जेवण बनवायला सुरुवात करते. तोपर्यंत संजय देखील घरी आलेला असतो. 

सगळे जेवण करून झोपायला जातात. सपना देखील सगळे आवरून रुममध्ये जाते. 
आता सपना ला संजयच्या मोबाईल वरून नंबर मिळवायचा असतो. संजय फोनवर कोणाला तरी बोलत होता. सपना झोपेचे नाटक करते, संजय फोन वर बोलून परत येतो व  झोपी जातो.  

सपना संजयचा मोबाईल मिळवते तो गाढ झोपेत असल्याने त्याचे फिंगर वापरून मोबाईल चे लॉक काढून घेते. 
आता त्या मुलीचे नाव माहिती नसल्याने तीला सुरवात कशी करावी समजत नसल्याने फोटो गॅलरी चेक करते.  तिथे तिला त्या मुलीचे फोटो सापडतात ते ती स्वतः ला पाठवून ठेवते. तिथेच तिला वॉटसअप वर तिचे नाव व नंबर मिळतो. ती तो घेते व फोन बंद करून ठेवून देते.. संजयला कळणार नाही त्याकरिता ती स्वतःला शेअर केलेले फोटो त्याच्या चॅट मधून डिलीट करते.. व झोपी जाते. 


दूसरा दिवस 

सपना आज लवकर उठून घरची सगळे कामे आवरून घेते. संजय देखील कामावर जातो.  सपना पण सासूबाईनां सांगून बाहेर पडते व नेहाला भेटते व नंबर देते .. 

नेहा त्या नंबरवर कॉल करून त्या मुलीला भेटायला बोलावते. आता खरे काय ते कळणार असल्याने सपनाची घालमेल चालूच असते. 

तिसरा दिवस

ठरल्याप्रमाणे जाई ( म्हणजे ती मुलगी)  नेहा ला भेटायला येते. कॉफी ऑर्डर करून मी नेहा तूला मीच बोलावले आहे-- नेहा म्हणते.. 

जाई-- तू मला का बोलावले आणि तू मला कशी ओळखते??? 

नेहा-- सांगते. पण त्या आधी मी तुला काही विचारले तर खरी उत्तर देशील?? 

जाई-- गोंधळून हो  पण.... 

नेहा-- तुला सगळे काही कळेल.. मला सांग  तू संजयला कशी ओळखते?? 

जाई-- ( आता आणखी गोंधळून)  संजयला , हो ओळखते मित्र आहे तो माझा पण तु हे का विचारत आहेस.

नेहा--कळेल! तु कधीपासून त्याला ओळखते आणि एक personal  तुम्ही दोघे फक्त मित्र आहात का अजून.... 

हे सगळे सपना बाजूच्या टेबलावर बसून ऐकत असते. 

जाई-- ३ वर्षांपासून ओळखतो आणि मित्र म्हणजे हो आम्ही प्रेम करतो एकमेकांवर.. 

सपनाला हे ऐकून धक्का बसतो. नेहाला देखील धक्का बसतो. 

नेहा--  (शांत स्वरात) तुला अजून काय माहिती आहे संजय बदल... 

जाई-- तो इंजिनिअर आहे, त्याचे घर आहे. आणि त्याचे आईवडील आहेत जे इथेच राहतात.. 

नेहा-- बस ऐवढी माहिती आहे तुला!! आता मी तुला का बोलावले ते सांगते. 
नेहा  बाजुच्या टेबलावरील सपना ला  आवाज देते..  

नेहा-- जाई ही सपना, संजयची पत्नी हिने तुम्हाला मॉल मध्ये पाहिले आणि आम्हाला ते योग्य नाही वाटल्याने आम्हीच तुझी माहिती काढून बोलावले.. 

जाईला धक्का बसल्याने तीला काहीच सुचत नसते. आपण ३वर्ष ज्याला ओळखतो त्यानेच धोका दिल्याने ती सुन्न असते. 

सपना-- जाई मी समजू शकते तुझी अवस्था पण तुलाच माझी मदत करावी लागेल. आणि संजयचे खरे रूप त्याच्या व माझ्या घरच्यांच्या समोर आणण्यासाठी... 

जाई-- संजयने तिला ही धोका दिल्याने
ति मदत करायला तयार होते.. 

नेहा-- प्लान ह्या दोघींना सांगते.. 

तो दिवस ज्या दिवशी सत्य बाहेर पडते...... 

सपनाने आईवडिलांना भेटण्यासाठी बोलावलं होते.. संजय त्याचे आईवडिल घरीच असतात. 

नेहा जाईला घेऊन घरी येते मग मात्र जाईला इथे पाहून संजयचा चेहरा पडतो. 

जाई सर्वांसमोर सगळे सांगते. सर्वांना धक्का बसतो. त्याचे आईवडिल खूप बोलतात संजय ला. सपना चे आईवडिल मात्र स्वतःला दोषी समजतात सपना च्या ह्या अवस्थेसाठी.. तो मात्र त्याचा काही गुन्हा नसल्याचे दर्शवतो. 


नंतर सपना संजय पासून काडीमोड घेते व नोकरीवर रुजू होते... आणि आनंदी होते.... 

अशा अनेक सपना आपल्या देशात आसतील . अशा सपना देखील लवकरच बाहेर पडू शकतात जर त्यांनी संयमाने घेतले तर....... 

आवडल्यास लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका..धन्यवाद????????

**सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
©®Tanuja Ghodekar

🎭 Series Post

View all