Feb 25, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

अनपेक्षित सोबत

Read Later
अनपेक्षित सोबत

१२ -१३ घरांचा तो पाडा. जे सरकारी नोकरीला होते त्यांची परिस्थिती जरा चांगली होती. बाकी जे शेतावर अवलंबुन होते, त्यांची जरा बिकट होती.

त्या घरां पैकी एक घर प्रियांकाच. ती  घरात सर्वात लहान. तिला दोन मोठे भाउ होते. दोघांची लाडकी. शेतात पिकणा-या पिकावर त्यांच गुजराण चालत होती. 

तिला चित्रकलेची खुप आवड होती. ती रांगोळी ही खुप छान काढायची. जसजशी ती मोठी होत होती, तस तशी तिची कला उठुन दिसायला लागली होती. तशी ती जेमतेम दहावीपर्यंतच शिकलेली.

लहानपणापासून तिला गावात एकच वाक्य ऐकायला यायच. खासकरुन गावातल्या त्या पाटलीणबाईकडुन. ते चित्र काढून, रांगोळ्या काढुन काय फायदा नाही, शेवटी तु गरीबाच्याच घरी जाशील न.

जोवर लहान होती तोवर तिला कळायच नाही. पण तिच्या आईला आणि भावाला त्या बोलण्याच वाईट वाटत होत. पण त्या पाटलीणबाईच्या उपकाराखाली दबलेले असल्याने त्यांना काही बोलता येत नव्हते.

पण कधी कोणाकडे पाहुणे यायचे राहीले किंवा सणासुदीच्या दिवसात, काही कार्यक्रम असल्यास प्रियांका ला हमखास रांगोळी काढण्यासाठी बोलावले जात होत.

शाळेत असताना तर ति हक्काने शाळेत रांगोळी काढतात असे. चित्रकलेतही तिचा नंबर पहीला येत होता. त्या शाळेतल्या शिक्षकांनाही तिला चित्रकलेत पुढे जाण्यासाठी सुचवले होते. पण घरच्या परिस्थितीमुळे तिला ते करता येत नव्हते.

आता ति वयात आली होती. तिची कला त्या पुर्ण तालुक्यात पसरलेली होती. पण ती घरापुढे रांगोळी काढण्यापुरतीच मर्यादीत होती. तिच्या लग्नाच टेन्शन आता तिच्या घरच्यांना आल होत.

प्रियांकाची खुप इच्छा होती. या कलेत पुढे जाव. तिच्या मैत्रीणींनी तिला शहरात जायचा सल्ला पण दिला होता की "शहरात तिच्या कलेला नक्कीच दाद मिळेल."

पण तिची एक आत्या सोडली तर दुसर कोणीच शहरात त्यांच्या ओळखीच नव्हते.

“हे बघ रखमे, तिच्या लग्नाच विचार आमच्यावर सोड, आम्ही बघु” प्रियांकाची मावशी प्रियांका च्या आईला सांगत होती.

तशी तिची मुलगी पण लग्नाची होती. एखाद चांगल श्रीमंत स्थळ आल की तिची मावशी तिची मुलगी पुढे करत होती. एखाद साध गरीब स्थळ आल की, प्रियांकाला पुढे करत होती.

त्या गावातल्या काही बायकाही असच करत होत्या. पण प्रियांका च्या भावांमुळे तिच्या मावशीचा आणि गावातल्यांचा कावा चालला  नव्हता.

शेवटी प्रियांकाने सगळ नियतीच्या हातात सोडुन ति तिच्या कलेत रमली होती.

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रियांकाची आत्या गावाला आलेली होती. तिचाही मुलगा लग्नाचा होता हे प्रियांकाच्या मावशीला माहीती होत. शहरातील नामवंत सोनाराची दुकान होती त्यांची.

प्रियांका च्या मावशीने लगेचच त्यांना त्यांच्या घरी बोलावून घेतले होते. तशी त्यांची मुलगी रंगाने गोरी होती. दिसायलाही छान होती. त्यामुळे तिला त्याचा गर्व होता.

प्रियांकाच्या मावशीने नेहमीप्रमाणे प्रियांकाला मदतीला बोलावल. प्रियांकाने मन लावून सर्व कामे केली. दाराबाहेर नेहमी प्रमाणे रांगोळी ही काढली होती.

“खुप छान रांगोळी काढली आहे. कोणी काढलीये??” आत्या

“कोणी काय, आपल्या नंदितानेच” मावशी.

आत्या सोबत तिचा मुलगा प्रकाश पण आला होता. मावशीचे बोलणे ऐकून तो गोंधळला, कारण सेम रांगोळी त्याने त्याच्या मामाच्या घरी पण पाहीली होती. ज्वेलरी डिझाईनचा कोर्स केला असल्याने, एकाच माणसाने काढलेली डिजाईन त्याला लगेच कळुन जात होती.

पण त्या रांगोळीची डिजाईन पाहुन तो मनोमन सुखावला. त्याने आत घुसताच प्रियांकाला पाहीले. त्याला कळुन गेल की ची रांगोळी प्रियांकाने काढली आहे. तसा तो गावात फिरताना त्याने त्याबद्दल ऐकल देखील होत.

प्रियांकाच्या मावशीने गोड गोड बोलत तिच्या मुलीचा म्हणजेच नंदीताचा दाखवण्याचा कार्यक्रम करत होती.

“थोड त्याला त्याच्या बिझनेस मध्ये स्थिर होऊ द्या मग बघु लग्नाच” बोलुन आत्याने तो विषय तिथेच टाळता होता.

इकडे प्रकाशच्या डोक्यात वेगळच शिजत होत. तो तसाच उठुन त्याच्या मामाच्या घरी आला.

“मामा प्रियांकाच्या वह्या दाखवला का मला” प्रकाश

त्याच्या मामाला टेन्शन आल, याला का बघायच्या आहेत म्हणून. त्यांनी दोन तीन वह्या दाखवल्या. प्रकाशाची शंका खरी ठरली होती. तिने खुप सुंदर सुंदर डिजाईन्स काढलेल्या होत्या.

“मामा, मी प्रियांकाला आमच्याकडे घेउन जाउ का??” प्रकाश

“का रे, अस का अचानक??” मामा

“तिच्या हातच जेवण भारी लागत न म्हणून” प्रकाश

मामा गोंधळले होते.

“अहो का काय विचारता, तिची हे चित्र बघा, किती सुंदर आहेत. तिकडे आमच्याकडे आली न, तर याची किंमत ति लाखो मध्ये मोजले” प्रकाश

“काहीही काय चेष्टा करता गरीबांची” मामा

“मामा मी खर बोलतोय” प्रकाश

तेवढ्यात प्रियांका तिच्या आत्या सोबत घरी आली.

“आक्के, तुझा पोर बघ काय बोलतोय” मामा

“काय झाल रे??” आत्या

प्रकाशने प्रियांकाच्या वह्या त्याच्या आई समोर धरल्या. प्रियांकाला तर कळतच नव्हते काय चालु होत.

आत्याच्याही लक्षात आल, प्रकाशला त्याच्या ज्वेलरी डिजाईन्स साठी ति हवी होती. तस आत्यानेही तिच्या भावाला सांगीतल. येऊ देत तिला म्हणुन.

साध्या चिखल विटांची घर ती. त्या भिंतीचे कान खुप शार्प असतात. बघता बघता पुर्ण पाड्यावर ती बातमी पोहोचली.

प्रियांकाच्या आई वडिलांवर दबाव टाकून जाऊ लागला होता. आपल्यापेक्षा गरीबांची मुलगी शहरात जाणार म्हणून ब-याच जणांचे जेवण त्या दिवशी जळाले होते.

प्रियांकाच्या घरच्यांना उलट सुलट सांगुन त्यांचे कान भरवण्यात येत होते. तिची मावशी तर रोज त्यांच्याकडे येउन तिच्या आत्याशी जवळीक साधायला बघत होती.

प्रियांकाला तिच स्वप्न परत मातीत मिसळताना दिसत होती. येणारा नवीन आशेचा किरण पुसट होत जाताना दिसत होता.

गावातल्या काही बायकांनी तर एक दोन स्थळ पण आणली होती. आणि त्या स्थळांना होकार दर्शविण्यासाठी पाटलीणबाईपर्यंत वशिला लावला जात होता.

तिच्यामुळे तिच्या आई वडिलां ना होणारा त्रास बघुन तिही आतल्या आत तुटत होती. तिला एकवेळ वाटेल पण होत की, जे स्थळ आलय त्याला होकार द्यावा.

त्या रात्री ति रडत बसली होती. प्रकाशला ते दिसल होत. तो तिच्या जवळ गेला.

“मी नाही येणार तुमच्यासोबत” प्रियांका

“मी काही खाणार नाही तुला, तुझ्याकडची कला दाखवायला घेऊन चाललो आहे” प्रकाश

प्रियांकाने प्रकाशला सगळ सविस्तर सांगीतले. प्रकाशला त्या गावातल्या बायकांचा आणि प्रियांकाच्या मावशीचा राग आला.

“त्यांच टेन्शन तु नको घेउस” प्रकाशने तिला आश्वस्त केल. त्याने मनाशी काहीतरी ठरवल.

प्रकाश पुढे निघणार तेच त्याचा पाय मुरघळला, त्याच्या सोबत त्याचा महागडा मोबाइल ही पडला.

प्रियांकाने प्रकाशला पटकन पकडल. त्याला निट बसवुन पाणी प्यायला दिल. नंतर मग त्याचा मोबाईल उचलुन त्याला दिला. प्रकाशच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याने प्रियांकाच्या मावशीच्या मुलीसोबत पण असच केल होत, पण तिने पटकन मोबाईल आधी उचलुन मग प्रकाशला धरल होत.

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे प्रियांकाची मावशी प्रियांका साठी एक स्थळ घेउन आली होती.

“तिच लग्न ठरलय” प्रियांकाचा भाउ.

“ठरल?? कधी?? कोणासोबत?? मावशी

“मी करतोय” प्रकाश “तिची काळजी करण्याची गरज नाही, आता ते मी बघेल.”

तिला तसच घेउन जाण्यापेक्षा, मानाने घेउन जाण्याच प्रकाश ने ठरवल होत. जेणेकरुन तिला सोबत पण नेता येईल आण बाकीच्यांची तोंड पण बंद होतील.

प्रियांकाला शॉक बसला होता. तसा तिला प्रकाश आवडत होता. पण तिने कधी तसा विचारच केला नव्हता.

प्रियांका प्रकाश आणि तिच्या आत्या सोबत शहरात आली. प्रकाशने तिला पण ज्वेलरी डिझाईनचा कोर्स लावुन दिला.

प्रियांकाला तिला आवडणा-या कलेत पुढे जायची संधी प्रकाशने दिली होती. तसा त्याचाही स्वार्थ होता त्यात. त्या संधीच तिने सोन केल.

चित्रकले पुरत मर्यादीत असलेल तिच स्वप्न, आता तिच्या स्वप्नाला नवीन दिशा मिळाली होती.

प्रकाशच्या जुन्या होत चाललेल्या डिझाईन्स ला आता प्रियांकाच्या रुपाने नवीन आशा मिळाली होती. प्रियांकाच्या नवनवीन डिजाईन्स ने प्रकाशच्या ज्वेलरीचा बिझनेस दुप्पट वाढला होता.

प्रकाशने तिच्या नावानेच नवीन कलेक्शन सुरू केल होत. न्युजपेपरला तिचे डिझाईन्स सर्वांना भुरळ घालत होत्या. प्रियांकाला कल्पनाही नव्हती की तिच्यात एवढे स्किल्स होते याची.

त्या ज्वेलरी कलेक्शन च्या उद्घाटनावेळी प्रियांकाचा साधेपणा पाहुन सर्वांना तिचा हेवा वाटला होता. तसा तिला कधीच कोणत्याही गोष्टीचा गर्व नव्हता.

प्रकाशने प्रियांकाला तिथुन बाहेर काढण्यासाठी लग्नाच बोलला होता. पण इतके दिवस तिचा साधेपणा पाहुन, तिच्या हाताची चव  चाखुन तो कधी तिच्या प्रेमात पडला त्यालाच कळल नाही. जेव्हा तिला तिच्या पायावर उभ केल. तेव्हा सर्वांसमोर त्याने प्रियांकाला लग्नासाठी मागणी घातली. प्रियांकानेही जास्त आढेवेढे न घेता होकार दर्शवला.

गावाला असताना कधी कधी अनवाणी फिरणारी ती आज महागड्या गाडीत फिरत होती. पण एवढया उंचीवर जाऊन सुध्दा तीचे पाय मात्र जमीनीवरच रोवून होती.

समाप्त

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Adv. Mahesh Gaikwad

Advocate

Life is so beautiful, live it, don't leave it

//