आनंदिता 1

कथा आत्मसन्मानाची

आनंदिता!

नमस्कार फ्रेंड्स…

आतापर्यंत आपण सगळ्यांनी माझ्या तिन्ही नंदिनी, तुहिरे, दुर्गा, love..sky is not the limit कथांना खूप प्रेम दिलेत त्यासाठी धन्यवाद. 

मी घेऊन येत आहे माझी नवीन कथा आनंदीता…गोष्ट आत्मसन्मानाची… आशा करते ही कथा सुद्धा आपल्या सगळ्यांना आवडेल… 

(सदर कथा काल्पनिक कथा आहे, त्याचा कुठल्याच गोष्टींशी काहीही संबंध नाही…. असे काही आढळल्यास केवळ योगायोग समजावा. कथेचा उद्देश कुठलीही चुकीची माहिती पोहचवणे नाही …. कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिण्यात आली आहे. धन्यवाद! ) 

भाग 1

           तिने आपली महागडी कार ऑफिस बिल्डिंगच्या पार्किंग एरियामध्ये पार्क केली. 

"परफेक्ट!"..... तिने स्वतःला आरश्यात बघितले, थोडेफार केस नीट केले आणि स्वतःचं कौतुक केले. डोळ्यांवर मोठ्या काचांचा काळा गॉगल चढवला, एका खांद्याला लॅपटॉपची बॅग अडकवली आणि हातात पर्स घेतली, कार लॉक करत, टिकटॉक टिकटॉक हिल्स आवाज करत ऑफिस मेन एंट्रन्सकडे जाऊ लागली. 

"नमस्कार मॅडम "...क्लिनर, जो मेन एंट्रन्सच्या अलीकडील जागा स्वच्छ करत पुसत होता. 

"काका, गूड मॉर्निंग म्हणायचं."..... ती त्याला एक छोटीशी गोड स्माईल देत म्हणाली. 

"लक्षात राहत नाही मॅडम, पण दोन्ही सारखंच असते की हो."..... क्लिनर. 

"तुम्ही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करता ना?मग एवढं यायला हव की हो."..... ती. 

"ते काय मॅडम, अहो ते तुमच्या मोठ्या लोकांसाठी, आम्हाला कोण बघताय.".... क्लिनर.

"आपल्या शिक्षण आणि अनुभवानुसार इथे ऑफिसमध्ये कामाची पोस्ट ठरते. बाकी आपण सगळेच इथले कामगार आहोत, सगळे सारखे. काय कळले ना मग? गूड मॉर्निंग म्हणायची प्रॅक्टिस करा, होईल सवय."..... ती.

      तसे ते हसले आणि होकारार्थी मान हलवली. 

          रोज ती त्यांना गूड मॉर्निंग म्हणायला लावायची, पण ते क्लिनर काका नेहमीच विसरायचे. आणि मग त्या दोघांमध्ये अशी गोड नोक झोक व्हायची. 

             तेवढयात एक एम्प्लॉइ कानात हेडफोन घालून आपल्याच तालात आपल्या बॅग मधून बिनकामाची कागदं, काही रॅपर्सचा कचरा काढत चुर्गळत खाली जमिनीवर फेकत पुढे पुढे जात होता. चालता चालता त्याचा क्लिनर काकांना धक्का लागला, तसे ते खाल्ली पडले. ते पोच्छा मारत असलेली बकेट मधलं पाणी सुद्धा सांडले.  

"ए तुला दिसत नाही का? नीट कामं करायला नको, टाईमपास करतात. गंदी नाली के किडे कहिके, सारी गंदगी फैला कर रखी हैं.".... तो एम्प्लॉई त्या क्लिनरला मनात येईल असे अपशब्द ओरडत बोलला आणि पुढे जायला लागला. 

ते बघून तिची चांगलीच सटकली . 

"Excuse me! चूक तुमची आहे, त्यांना सॉरी म्हणा.".... ती l. 

       क्लिनर काकांनी तिला डोळ्यांनीच जाऊ दे म्हणून खुणावले. पण तिला ते अजिबात आवडले नव्हते. 

"ओ मॅडम, यांची लायकी तरी आहे काय सॉरी ऐकायची? ही लोकं मुद्दाम असे वागतात. मेरे सब शूज गंदे कर दिया."....तो हातातला पेपरचा बोळा करत बाजूला उडवत म्हणाला. 

"ओ मिस्टर, इथं तुम्हाला डस्टबिन दिसत आहे ना? त्यात टाका तो तुमचा कचरा. हे ऑफिस आहे तुमचं घर नाही."..... ती कराऱ्या आवाजात म्हणाली. 

"मग हे तुमचं घर आहे?".... तो.

"नाही.".... ती.

"मग? लक्ष नका देऊ, तो स्विपर आहे, करेल क्लीन, तेच त्याचं काम आहे.".... तो. 

"त्यांचं काम ते नीट करतच आहेत, पण तुम्ही तुमचं काम विसरलात. तुम्हाला शिकवायला लागेल कचरा कुठे टाकतात ते."..... ती.

"तुम्ही इथल्या हेड आहात?"... तो.

"नाही, एम्प्लॉई आहे.".... ती.

"ओ मॅडम, मग सकाळी सकाळी डोकं का खात आहात? आपलं काम करा, जावा."..... तो. 

"हो तेच करायला चालले आहे, हेड ऑफिसला तुमची कंप्लेंट.".... ती.  

ते ऐकून तो हसायला लागला …"ओ, काय लहान मुलांसारखी कंप्लेंट करत आहात? आणि तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? काय CCTV फुटेज वगैरे दाखवणार काय?".... तो तिच्यावर हसत म्हणाला.  

"नाही. हे... " म्हणत तिने तिचा मोबाईल काढला आणि त्याला दाखवला. त्यात तो कचरा फेकत फेकत जातांना दिसत होता आणि त्याचा क्लिनरला लागलेला धक्का, वरतून क्लिनरला काय काय शब्दात बोलत होता ते सगळं त्यात रेकॉर्ड झाले होते.  

"हे मी इथल्या कॉमन टीव्हीला लावते, मग ते पूर्ण ऑफिसला दिसेल. इथला जबाबदार स्टाफ कसा काम करतो ते आणि खऱ्या अर्थाने गंदगी कोण पसरवते ते पण कळेलच. तुमचं प्रमोशन पण होईल लवकरच."...... ती.

"ओह मॅडम, सकाळी सकाळी का वाद घालायला बसला आहात? जावा, आपलं काम करा.".... तो.

"ठीक आहे, बघा तो टीव्ही दिसताय तुम्हाला? त्यात पुढल्या पाच मिनिटात हे सगळं रेकॉर्डिंग सुरू होईल.".... एक जळजळीत कटाक्ष त्याचावर टाकत ती तिथून पुढे जायला निघाली. 

         तिला खरंच जातांना बघून आता तो घाबरला. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास ती जे बोलली ते करून दाखवेलच असा होता. जरी हा मोठा प्रोब्लेम नव्हता तरी आपल्या बद्दल निगेटिव्हिटी पसरेल हे त्याला कळले होते.

"ओह मॅडम, सकाळी सकाळी कशाला गरिबाला छळता? तुमचं काय म्हणणं आहे?"... तो. 

"तुमचा फेकलेला कचरा उचलायचा आणि इथे डस्टबिनमध्ये टाकायचा. आणि काकांची माफी मागायची."...... ती. 

"कचरा तर मी उचलतो, पण हे माफीचे अती होतंय. ते खालच्या दर्जाचे, त्यांचे हे कामच आहे. असे माफी कोणी मागत नसते."...... तो.

"ओऽऽऽ दर्जा कुणाचा ठरवता हो तुम्ही? तुम्हाला कोणी अधिकार दिला कोणाचा दर्जा ठरवायचा? स्वतःकडे बघा शिक्षित असून अशिक्षितासारखे वागणं आहे तुमचं. ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत आहेत. त्यांचं ते काम आहे म्हणजे तुम्ही त्यांना गृहीत धराल काय? आणि वाटेल तसे वागावे काय?"....ती. 

"अहो मॅडम, जाऊ द्या. मी करतो हे स्वच्छ.".... क्लिनर काका. 

"नाही काका, तुम्ही स्वकष्टाने आणि प्रामाणिकपणे काम करत आहात, तुमचा पण आत्मसन्मान आहे. येता जाता कोणीही असे मनाला येईल ते बोलू शकत नाही. आपल्या आत्मसन्मान सोबत कोणाला असे खेळू द्यायचे नाही. नाहीतर मग यांना अशीच सवय पडते. ".... ती.

"माफी मागा त्यांची. "... ती त्या माणसाला म्हणाली. 

           तिच्या बोलण्याने त्याला त्याची चूक कळली आणि प्रकरण आटोपते घेत त्याने त्याचा फेकलेला कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाकला आणि काकांना सॉरी बोलून निघून गेला. 

"अहो मॅडम, आम्हाला एवढा मानपान नसतो मिळत. सुखी राहा."....काकांच्या डोळ्यात थोडंसं पाणी तरळले होते. 

"सुखी नाही, खुश रहा म्हणा काका.".... ती हसत म्हणाली. तसे काका पण हसले.

"जशी तुमची इच्छा मॅडम."... काका. 

दोघेही हसत आपापल्या कामाला निघून गेले. 

           तो एम्प्लॉई सुद्धा तणतण करत आतमध्ये गेला. झालेला प्रकार त्याने त्याचा सहकाऱ्यांना सांगितला. 

"खूप डेंजर मुलगी होती यार ती."... तो. 

"हा हा हा, सो तिच्या सोबत तुझं इंट्रॉडक्शन झाले वाटते."... दुसरा मित्र हसत म्हणाला. 

"म्हणजे? तुम्हाला माहिती कोण आहे ती? स्वतःला ऑफिसची मालकीण समजत होती.".... तो. 

"आनंदिता!".... मित्र.

"हां?"..... तो.

"तिचे नाव आनंदिता आहे, इथे मॅनेजर आहे."... मित्र.

"तू इथे नवीन आहेस म्हणून तुला माहिती नाही, कळेल सगळं हळूहळू.".... दुसरा मित्र. 

आनंदीता तिच्या केबिनकडे जायला निघाली… 

"हे अँडी..".... लकी.

"इट्स आनंदीता डियर."....आनंदीता.

"किती लांबलचक नाव आहे यार, आजकाल कोण वापरते असे नाव? "..... लकी.

"असेल. but I love my name."....आनंदीता.

"माहिती आहे, पण अँडी कसे मस्त कूल वाटते."....लकी.

"हो, जसे तुझं लक्ष्मी आहे तर लकी ना?"... आनंदीता थोडीशी हसत म्हणाली. 

"मग काय! बरं चल ते जाऊ दे, किती दिवसांनी तू ऑफिसमध्ये आली, किती मिस केले यार मी तुला."..... लकी  

"काय कांड केले?"..... आनंदीता.

"मी काय नेहमी कांडच करत असते काय ?"... लकी.

"नाही काय?"… आनंदीता एक भुवई उंचावत तिच्याकडे बघत म्हणाली. 

 "शी यार, मी तुझी आठवण नाही करू शकत काय?"... लकी.

"हो येते ना तुला माझी आठवण, जेव्हा तू काहीतरी गडबड करून ठेवत असते. मग ती निस्तरायला, तुला मी हवे असते ना.".... आनंदीता.

तिचं बोलणं ऐकून लेकीने तोंड वाकडं केले.  

"सोड ते, कशी झाली तुझी ट्रीप?"....लकी. 

"इट वॉज ऑसम."..... आनंदीता. 

"यावेळी व्याकेशनसाठी कुठे गेली होती?"....लकी. 

"गोवा!".....आनंदीता.

"तू पण ना एक अजब रसायन आहे.".... लकी.

"म्हणजे?".....आनंदीता.

"अग तिथे कपल जातं ना."..... लकी.

"हा…. मग जाऊ दे ना.".....आनंदीता.

"तू पण ग्रेट आहे. गोवाला कोण एकटे जाते? मित्रांसोबत तरी जायचं? एकट्याने कोण एन्जॉय करतं? ..... लकी. 

"मी! मीच स्वतःची बेस्ट पार्टनर आहे, love my company."..... आनंदिता.

         आनंदिताचे बोलणे ऐकून लकीने डोक्यावर हात मारून घेतला.

"मला ही कशी आहे माहिती असूनही मी तिच्यासोबत का उलझते माहिती नाही? हिच्यासोबत बोलण्यात कधी कोण जिंकले आहे.. ".... लकी मनातच बोलत असते. 

"एनिवेज, मी एकटी नव्हत.".... आनंदिता.

"काय? कोण होत सोबत.. हा?"....… लकी आनंदिताला चिडवत होती. 'मी एकटी नव्हते' ऐकून तिला खूपच जोश आला होता. 

"माझा कॅमेरा आणि माझे बुक्स, my all time favourite company. तसे तर कलर्स आणि कॅनव्हास पण होते सोबत, पण पेंटिंग करायला तसा वेळ मिळाला नाही. तिथलं काय अप्रतिम सौंदर्य आहे! मी अन् माझा कॅमेराने भयंकर सौंदर्य एन्जॉय केले."..... आनंदिता.

"हे भगवान! काय करावं तुझं?". ... लकी. 

"काही नको करू. मी जशी आहे एकदम परफेक्ट आहे.".... आनंदिता.

"यार, तुझं बर असते, इकडे काही होऊ देत, तू तुझे वर्षातून दोनदा वेकेशन्स सोडत नाही."..... लकी. 

"माझी ती गरज आहे. मला काही वेळ फक्त स्वतःसोबत घालवायला आवडतो, कोणी डिस्टर्ब करणारे नकोत. मग वर्षभर काम करण्याची ऊर्मी मिळते "..... आनंदिता.

"इकडे आम्ही दोन दिवसही लिव्ह टाकायच्या म्हटल्या, की सॅंक्शन होत नाही. तुझ्या बऱ्या आठवड्याच्या सॅंक्शन होतात, ते पण वर्षातून दोनदा.."..... लकी. 

"Aww …. Baby!! त्यासाठी कामात परफेक्ट आणि पंक्च्युअल राहावं लागतं. बर नंतर बोलूया. मी माझ्या कॅबिनमध्ये जाते, कामं रिझ्युम करावी लागणार आहेत"..... आनंदीता.

"अगं ऐक ना, तुला एक हॉट न्यूज द्यायचीच राहिली." …. लकी. 

"काय झालं? भूकंप येऊन गेला की काय?".... आनंदिता.

"भूकंप आला तरी तुला काय फरक पडतो? तू आपल्यातच असणार आहेस".... लकी.

"हा, ते तर आहे. चल मग बाय."...... आनंदिता.

"अरे यार तुला पण ना कामाची फारच घाई, ऐक तर…".... लकी.

"बोल ..".... आनंदिता.

"नवीन बॉस आला आहे, यार तो damn hot आहे." ……. लकी. 

"ओके! आजकाल बॉस लोकं हॉटच असतात. टीवी सीरियल मधून त्यांना इंस्पिरेशन मिळते, मुलींना हेट करतात, मग एखादी निरागस, भोळीभाबडी मुलगी ऑफिसमध्ये येणार आणि तिचा चांगुलपणावर हा फिदा होणार.."..... आनंदिता.

"तुझ्यासमोर ना बोलणंच बेकार असतं. बरं ते जाऊ दे, तू एवढी हॉट आहेस, मग त्याची काय स्टोरी आहे? तू पण तर मॅनेजर आहेस, अँड येस तुला पण मुलं आवडत नाही. सो टीव्ही सीरियल नुसार तुझा वायीस व्हर्सा स्टोरी प्लॅन आहे तर? ….."....लकी तिला एक डोळा मारत म्हणाली. 

"बकवास! मला काहीही एक इंटरेस्ट नाही अशा कुठल्या स्टोरीजमध्ये. "..... आनंदिता.

"मी गंमत करत होते. ते सोड,पुढे ऐक..ऑफिस मधल्या मुली त्याचा जाम मागे लागल्या आहेत. मुली स्वतःहून गेल्या तर तो त्यांना एक भाव देत नाही, त्याची इच्छा असणार तेव्हाच तो flirt करणार…."......लकी.

"गुड!"..... आनंदिता.

"तो तुझ्या मागे लागणार ….पक्का."..... लकी. 

"Baby, I already told you, I am not interested."..... आनंदिता.

"शी यार तु पण ना..".... लकी. 

"तुला माझ्या बद्दल सगळं माहिती आहे."..... आनंदिता.

"हम्म, तुझं प्रेम आहे त्याच्यावर ….. अजूनही ".... लकीने तोंड वाकडं केले ..

"येस, मग का सांगत असतेस मला? मला काही फरक पडत नाही, कुठलाही मुलगा ...कसाही असू देत."...... आनंदिता.

"प्रेम आहे तरी सोडलेस ना त्याला …."....लकी. 

"हो प्रेम आहेच, पण फक्त प्रेम आहे म्हणून एकत्र नाही राहू शकत. माझ्यासाठी सन्मान आणि आत्मसन्मान पण महत्वाचा आहे.".... आनंदिता.

"तू आणि तुझी फिलॉसॉफी, दोन्हीही ग्रेट!".....लकी तिच्या पुढे हात जोडत म्हणाली. 

"ह्मम!"...... आनंदिता.

"अगं पण, आता त्या गोष्टीला दोन तीन वर्ष होत आली. तू आता फक्त 30ची आहेस. तुझं अख्खं लाईफ पडले आहे, अशी एकट्यानेच घालवणार आहेस काय? कुणीतरी लागतं यार सोबत."..... लकी. 

"मला नकोय कोणी.".... आनंदिता.

"ह्मम, आम्ही तयार आहोत तर इकडे आमच्याकडे कोणी बघत नाही, आणि तुझ्याकडे बघतात तर तू भाव देत नाहीस."..... लकी. 

"Chill baby!! काम करूया थोडं?"..... आनंदिता.

"या ... फाईन …!"..... लकी. 

    आनंदिता तिच्या कॅबिनकडे जायला वळली तर परत लकीने आवाज दिला ..

"आता काय?"..... आनंदिता.

"मला तरी थोड्या टिप्स दे, तुझ्या सारखं हॉट कसे दिसायचे अन् बॉसला कसे इंप्रेस करायचे ते…?.".... लकी.  

"Lakshmi, not again..."..... आनंदिता.

"लकी…. कॉल मी लकी.".... लकी. 

"आता जर तू माझं या टॉपिक वरून डोकं खाल्ले तर मी तुला लक्ष्मीच म्हणणार…. ते पण अख्ख्या स्टाफ समोर "..... आनंदिता.

"बाय. आपलं काम कर….".... लकी.

      आनंदिताला तिचा चेहरा बघून हसू आले. दोघीही आपापल्या जागेवर जाऊन बसल्या. 

         आनंदिताला हे ऑफिस जॉईन करून जवळपास दीड दोन वर्ष होत आले होते. तिचा स्वभाव कडक, तिची चूक नसेल तर ती कोणासमोर वाकणार नाही आणि दुसऱ्याला सुद्धा वाकू देणार नाही. तिच्यासाठी आत्मसन्मान खूप महत्वाचा आहे मग तो कोणाचाही असू देत, त्यासाठी ती आवाज उठवणारी व्यक्ती आहे. ऑफिस मधील लोकं बॉसला तेवढे घाबरत नाही, जेवढे आनंदिताला घाबरतात. पण तिचं perfect काम आणि प्रामाणिकपणा यामुळे तिच्या विरोधात कोणाची बोलायची हिम्मत होत नव्हती. 

_____________________________

क्रमशः 

काय आहे आनंदिताचा भूतकाळ ? 

आनंदिता आपले भूतकाळ विसरून पुढे जाईल काय? …. 

जाणून घेण्यासाठी वाचत राहा आनंदिता . 

_____________________________

🎭 Series Post

View all