आनंदी हे घर सारे

Story Of A Girl Named Anandi
आनंदी हे घर सारे

आनंदी .. तिच्या आई वडिलांनी आनंदी हे नाव ठेवलेलं. आनंदी च्या येण्याने नेहमी सगळीकडे आनंदी आनंद पसरतो असे तिच्या आई वडिलांना वाटायचं .घरात तर एकदम लाडकी लेेक  होती .. तिला सगळे अंदु म्हणायचे .
दोन महिन्यापूर्वी नीराजला या अंदु चे स्थळ चालून आले . घरातल्यांनी आनंदी ला बघितले आणि लगेच होकार कळवला होता .. नीरजला पण ती पाहताच क्षणी आवडली होती .. इकडे नीरजने लग्नाला होकार दिला आणि नीरजच्या आयुष्यात आंनद यायला सुरुवातच झाली होती .. ३ वर्ष तो बाहेरच्या देशांत ऑन साईट पाठवतील म्हणून वाट बघत होता पण काही ना काही घडायचे आणि त्याला ती संधी येत नव्हती .. योगायोगाने इकडे नीरजने मुलगी पसंत केली आणि तिकडे लगेच कंपनीकडून मेल आले कि एक वर्षांसाठी ऑनसाईट जर्मनीला पाठवणार आहेत ..
नीरज इतका खुश होता .. इट्स लाईक ड्रीम कम ट्रू .. त्याला आनंदीच्या वडिलांचे शब्द आठवले .. माझी लेक जिथे जाते तिकडे आनंद घेऊन जाते .. तसेच नीरजच्या घरात आनंदी आनंद झाला होता .. नीरज परदेशात नोकरीला जाणार .. घराण्याचे नाव मोठे करणार .. सगळे खुश होते
नीरजने आनंदीला फोन करून सांगितले " थँक यु .. माझ्या आयुष्यात आनंद घेऊन आल्याबद्दल "
आनंदी " थँक यु ,तू मला होकार दिल्यामूळे आज माझ्या घरात पण आनंद आहे .. बाबा खूप खुश आहेत "
नीरज " एक वर्षाचा पिरियड आहे .. तू येशील ना माझ्या बरोबर तिकडे ? "
आनंदी " मी इकडे राहीन ना .. एकच तर वर्ष आहे ना"
नीरज " मी एकटा तिकडे तेही लग्न झाल्यावर कसा राहू ?"
आंनदी "मला भीती वाटते .. मी कधीच विमानात पण नाही बसले "
नीरज " मी तरी कुठे बसलोय .. मी पण पहिल्यांदाच बसणार आहे "
आनंदी "जमेल का तिकडे ?"
नीरज " आपण दोघे जमवून घेऊ .. तू ये ना प्लिज .. नाही नको म्हणूस "
आनंदी " ठीक आहे "
नीरज " मग तुझा पासपोर्ट बाहेर काढून ठेव .. मी आलो कि मला दे . आणि स्कॅन कॉपीज मला मेल कर "
झाले इकडे लगीन सराई बरोबरच आपल्या मुलीला बाहेरच्या देशांत पाठवण्याची तयारी सुरु झाली .. लगेच पुढच्याच महिन्यात धूम धडाक्यात .. आनंदात .. वाजत गाजत लग्न झाले ..
आनंदी नवीन घरात रुळत होती .. नवीन संसारात रुळत होती तोच जर्मनीला जायची जोरदार तयारी चालू होती ..त्यामुळे हनिमून ला गेले नाहीत कारण तेवढा वेळ नव्हता ..
पुढील १५ दिवसातच दोघे जर्मनीला गेले ..
नवीन देश , नवीन भाषा , नवीन लोक .. सगळेच नवीन होते .. नीरजला थोडी फार जर्मन भाषा येत होती .. कंपनी तर्फ़े मस्त घर , गाडी दिली होती .घर तर इतके टुमदार होते .. छोटेसे प्रायव्हेट गार्डन , पार्किंग .. शिवाय नीरज चे ऑफिस पण फार लांब नव्हते .. आठ एक दिवसात त्यांचे जर्मनी मध्ये रुटीन सेट झाले ..
आनंदी रोज सकाळी त्याला नाश्ता .. डबा बनवून द्यायची .. नीरज कार ने ऑफिस ला जायचा .. आनंदी घरातील काम करायची .. संध्याकाळी तो घरी आला कि दोघे बाहेर मस्त हातात हात घालून फिरायला जायचे .. रोज इंडिया मध्ये कॉल होत होते .इकडे सासू बाईंना सुनेची खूपच काळजी लागली होती.. नवी नवरी लगेच परदेशी पाठवली .. तिकडे आनंदीचे आई वडील पण थोडेसे मनातून टेन्शन मध्ये असायचे ..
आनंदी मात्र नीरज बरोबर खुलत होती .. नीरज तिला छान समजून घेत होता .. एकदा तिने केलेले जेवण तर खाण्या समान नव्हते . त्याला मरणाची भूक लागली होती .. खूप दमून आला होता तो .. भाजी गरम करायला गेली तर तिच्या लक्षात आले कि भाजी सगळी करपलीय .. आता तो चिडेल कि काय म्हणून खूप घाबरली .. आधीच भोकांड पसरले तिने .. ह्याला कळे ना कि हसरी आनंदीच्या डोळ्यांत पाणी का आले ते ..
नीरज " काय झाले ? बरं नाही वाटत आहे का ?"
आनंदी रडतच " ते .. ते .. जेवण तयार नाहीये .. आज तुला थांबावे लागेल?"
नीरज " ठीक आहे .. थांबतो मग .. त्यात रडायचे काय ?"
आनंदी "भाजी आणलेली नाहीये .. आणि मी केलेली भाजी करपली " पुन्हा हुंदका
नीरज ने गॅस टॉप वर असलेल्या भाजी चे झाकण उघडून बघितले तर कोळसा .. पातेल्याचा कोळसा झाला होता .. ते बघून त्याला जे हसायला यायला लागले ..
नीरज " अरे वाह !! आज कोळशाची भाजी केलीस का ?"
तशी आनंदी रडतच हसायला लागली " कोळशाची कोण भाजी करतं ?"
नीरज " आम्ही तर नाही बाबा खाल्ली कधी .. तूच बनवलीस ना " आणि पुन्हा हसला
आनंदी " हसू नको ना .. " आणि असे म्हणे पर्यंत नीरज ने तिला मिठीत घेतले ..
नीरज " एक दिवस भाजी नसली तर चालेल मला .. मी आमटी भात खाऊ शकतो "
आनंदी " नाही ते पोळ्या केल्यात मी .. तुला झुणका करते मी पटकन "
नीरज " नाही नको .. मला साखर पोळी पण चालते .. " म्हणतच त्याने तिला उचलून घेतले
आनंदी एकदम कावरी बावरी झाली ..
आनंदी " हे काय ? भूक लागलीय ना .. प्लिज ठेव ना खाली .. "
नीरज " नाही .. आज मला साखर पोळीच पाहिजे "
आनंदी " मग देते ना .. लगेच "
नीरज " मला पाहिजे असणारी साखर डब्यात नाहीये .. इकडे आहे .." तिच्या ओठांकडे बघत तो म्हणाला
मग काय साखरच साखर होती सगळीकडे .. एकदा साखर गोड लागली कि विरघळतच जाते .. पुढे मग भाजी करपली किंवा नाही करपू दे साखरे शिवाय नीरज रावांना जेवण गोड लागायचं नाही .. आणि अशातच एक दिवस आनंदी ने लवकरच एक गोड बातमी नीरज रावांना दिली ..
बाळाच्या येण्याच्या चाहुलीने दोघे नवरा बायको तर खुश होतेच पण तिकडे इंडिया मध्ये दोन्ही घरच्या आजी आजोबांची मात्र धांदल उडाली होती . पहिले बाळंतपण तिकडे कसे करायचे ? .. नीरज ला एकट्याला जमणार नाही . ते काही नाही वेळ आहे तर आनंदी ला इकडे आणून सोड .. आम्ही तिची काळजी घेऊ .. मग बाळ झाले कि पाहिजे तर पुन्हा घेऊन जा .. असे बोलू लागले.
नीरज आणि आनंदीला आता एकमेकां पासून लांब नव्हते होयचे .. पण घरातले म्हणत होते त्यात तथ्य होते .. बाहेरच्या देशात कोणीच त्यांच्या ओळखीचे नव्हते .जर्मनीत तर सर्रास भाषा पण जर्मन बोलली जाते इंग्लिश पण प्रिफर करत नाहीत .. अशात तिकडे डिलिव्हरी करणे दोघांनाही कठीण गेले असते म्हणून मग नीरज ने एक डिसिजन घेतला कि सातव्या महिन्या पर्यंत ती त्याच्या बरोबर राहील .. आणि मग तो तिला डायरेक्ट फ्लाईट मध्ये बसवून देईल .. तिकडे मुबई एअर पोर्ट कोणीतरी आणायला गेलं कि झाले
आनंदी आधी नाहीच म्हणत होती .. मी एकटीने कशी जाऊ ? मला काही झाले तर ?. त्यात मी अशी .. मला ते इमिग्रेशन च कळेल का ? ते माझ्या शेजारी कोणी चांगला व्यक्ती नाही आला तर ?असे एक ना अनेक प्रश्न तिला पडले होते .. आणि नीरज तितकाच तिला कन्व्हिन्स करत होता ..
तिकडच्या डॉक्टरांची तात्पुरती ट्रीटमेंट सुरु केली होती .. नीरज तिची जमेल तशी काळजी घेत होता .. वेळ आली तर तिला जेवण करून खाऊ घालत होता .. तिच्या औषध गोळ्यांकडे लक्ष देत होता .. एकंदरीत अजून तरी सगळे आनंदात चालले होते ..
बोल बोलता सातवा महिना लागला आणि नीरज ची वेगळीच गडबड सुरु झाली .. त्याला इकडे रिप्लेसमेंट नसल्यामुळे तिला सोडायला जाणे शक्य नव्हते .. एकतर तिकडे डिलिव्हरी नाहीतर मग एकटीने इंडियात जावे लागणार होते .. शेवटी आनंदी एकटीने भारतात यायला तयार झाली ..
भारतातून रोज कॉल येत होते .. तिच्याकडे सामान मोजकेच दे .. तिला हेवी बॅग्स उचलता येणार नाहीत .. अगदी खिडकी तुन हात बाहेर काढू नको पर्यंत च्या सूचना येत होत्या .. प्रेम आणि काळजी दोन्ही भरपूर मिळत होते ..
आठ दिवस राहिले आनंदी च्या प्रवासाला आणि अचानक एक न्यूज आली .. वोलकॅनो फुटल्यामुळे जर्मनीतून जाणाऱ्या सगळ्या फ्लाईट कॅन्सल करण्यात आल्या आहेत .. आणि हे अचानक झाल्यामुळे बरेच प्रवाशी जर्मनी च्या एअरपोर्ट वरच राहिले होते .. लोकांचे खूप हाल होत आहेत .. काही फ्लाईट कनेक्टेड फ्लाईट असतात .. असे प्रवाशी ज्याच्याकडे जर्मनीचा व्हिजा नाहीये ते एअरपोर्ट सोडून बाहेर जाऊ शकत नाहीत त्यामुळे लिटरली एअरपोर्ट वर बेड लावून जर्मन सरकार प्रवाशांची सोय करत होते .. सगळ्या न्यूज चॅनेल वर त्याच न्यूज ..जोपर्यंत वोल्कॅनो शांत होत नाही तोपर्यंत हवा क्लिअर होत नाही .. हवा क्लिअर नसेल तर डोंगरातून निघणाऱ्या काळा धूरातुन फ्लाईट चालवता येत नव्हती .. रिस्की होती .. म्हणूनच सगळ्या फ्लाईट बंद होत्या ..
नीरज आणि आनंदी चांगलेच टेन्शन मध्ये आले होते कारण डॉक्टरांनी सांगितले होते कि मॅक्सिमम प्रेग्नेंसीच्या ३२ साव्या आठवड्या पर्यंत विमान प्रवास करू शकतो ,नंतर नाही .. तिचा आल्रेडी २८ सावा आठवडा संपत आला होता .. जास्तीत जास्त नीरज बरोबर रहायच्या हिशोबाने त्याने जरा लेट पाठवण्याचे प्लॅनिंग केले होते .. आता जर हा इंटरनॅशनल नॅचरल कॅलमीटी चा प्रॉब्लेम १५ दिवसात नाही सॉल्व झाला तर आनंदीला डिलिव्हरी साठी इकडेच रहावे लागेल आणि त्यासाठी दोघेही मनातून प्रिपेअर नव्हते .. दोन चार दिवस व्होल्कॅनो शांत होईल या आशेवर गेले पण सरकारी अंदाजा नुसार पुढील एक महिना विमान सेवा चालू होणार नाहीत अशा गोष्टी कानावर ऐकू येऊ लागल्या ..
नीरज , आनंदी खूप टेन्शन मध्ये आले होते .. कारण तिकडे परदेशात डिलिव्हरी विचार करून घाबरून जायचा ..
आनंदी ला तिच्या बहिणीचा कॉल आला तेव्हा कळले कि बहिणीचे काका सासरे सध्या फ्रँकफर्ट एअर पोर्ट ला आहेत .. ते एका प्रख्यात एअरलाइन मध्ये सिनिअर पोस्ट वर काम करत होते .. आनंदी ने काकांचा नंबर घेतला ..आणि नीरज ला दिला ..
नीरज ने काकांना कॉल करून सगळा प्रॉब्लेम सांगितला.. काकांनी सांगितले " सध्या तरी फ्लाईट बंदच आहेत .. पण येत्या शनिवारी पहिली फ्लाईट सोडायचा प्रयत्न चालू आहे .. तर तिला घेऊन इकडे ये आणि शनिवार चे बुकिंग करून ठेव .. मी तिला तिच्या फ्लाईट मध्ये अगदी तिच्या सीट वर बसवून येईल .. नीरज ला खूप हायसे वाटले .. कारण इमिग्रेशन , बोर्डिंग बऱ्याच गोष्टी आहेत आणि तिला एकटीला जमतील कि नाही .. नाहीतर आतल्या आत एअर पोर्ट ला च फिरत बसेल .. हरवेल .. निदान असले टेन्शन तरी नाही राहणार
नीरज ला काकांचा खूप आधार वाटला आणि त्याने शनिवार च्या फ्लाईट चे बुकिंग करून टाकले .. रोज न्यूज अपडेट बघत होते..
फ्रँकफर्ट ला जाण्याचा दिवस उजाडला तरीही शनिवारची फ्लाईट उडेल कि नाही याची काही ग्यारेंटि नव्हती .. शिवाय आधीच डिक्लेअर केले तर एअर पोर्ट वर प्रवाशी गोंधळ घालतील म्हणून एअर लाईन्स वाले काही ऑफिशिअल डिक्लेअर करत नव्हते .. काका पण बघू .. तू ये तर खरं .. असे बोलत होते ..
आनंदी च्या जाण्यासाठी च्या बॅग्स पॅक करून झाल्या होत्या.. आनंदी ला पण मनातून भीती वाटत होती .. या सगळ्या भानगडीत आपल्या पोटातल्या बाळाला काही नको होयला ... बाळ व्यवस्थित राहू दे अशीच सारखी देवा जवळ धावा करत होती ..
इकडे नीरज ला हि खूप अस्वथपणा आला होता .. मनातून टेन्शन मध्ये होता .. सातवा महिना संपत आलाय आणि तिला एकटीला प्रवास करायला लागतोय त्यातच हे वोल्कॅनो चे प्रकरण .. फ्लाईट बंद केल्या पासून हीच फ्लाईट पहिल्यांदा उडणार होती .जर काही बरे वाईट झाले तर.. अशी एक भीती कुठेतरी खोल मनात रुंजी घालत होती ..
नीरज " आनंदी .. सॉरी तुला एकटीला पाठवतोय .. बिलिव्ह मी .. मी हे मुद्दामून करत नाहीये .. जर शक्य असते तर मी आलोच असतो .. आणि आता यायचच म्हटले तर खूप प्रॉब्लेम होईल ऑनसाईट ला आल्यावर रिपल्समेन्ट नाही देता येत .."
तो बोलतच होता .. एकदम सिरिअस झाला होता ..
आनंदी " नीरज .. काही काळजी करू नकोस .. मी जाईल व्यवस्थित .. "
नीरज ने तिला मिठीत घेतले .. तिच्या पोटावर हात ठेवून एकदा बाळाची हालचाल बघितली .. आणि पोटा जवळ जाऊन बोलला
नीरज " बाळा . प्लिज एवढं सांभाळून घे .. आणि आई ला त्रास नको देउ जास्त " म्हणतच त्याने भरल्या डोळ्याने पोटावर किस केले
आनंदी "नीरज .. मला थोडी भीती वाटतेय .. विमानात मला काही त्रास नाही ना होणार .. आपले बाळ सुरक्षित राहिल ना "
नीरज " हो .. आपण डॉक्टरांना विचारलय ना सगळे .. नाही होत काही प्रॉब्लेम "
आनंदी " तसेच होऊ दे "
--------------------------------
दोघे २ तासांचा ट्रेन प्रवास करून फ्रँकफर्ट आले .. स्टेशन बाहेरच काका घ्यायला आले होते .. त्या रात्री काकांकडे राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून एअरपोर्ट आले ..
बराच वेळ थांबल्यावर प्रोसिजर सुरु झाली .. याचा अर्थ फ्लाईट उडणार होती हे नक्की झाले हे ऐकले आणि हे दोघे आनंदले .. तरीही अशा अनाऊंसमेंट चालू होत्या कि हि फ्लाईट पहिलीच उडणार आहे तर काही मेजर प्रॉब्लेम आला तर मधेच कोणत्या तरी एअरपोर्ट ला फ्लाईट थांबवावे लगेल ..
काका म्हणत होते कि बहुतेक करून काही प्राब्लेम होणार नाही .. काल दुसऱ्या एअर लाईन ची फ्लाईट उडाली आहि आणि ती सुखरूप पोहचली आहे ..
आधी लगेज दिले.. बोर्डिंग पास कलेक्ट होई पर्यत नीरज स्वतः तिच्या बरोबर होता .. मग काकांनी त्यांच्या केबीन मध्ये बसायला नेले .. तिथे बसून तिघांनी एकत्र चहा प्यायला .. गप्पा मारल्या .. आणि मग काकां म्हणाले मी माझे एक दोन मिनिटाचे काम करून येतो .. नीरज इथून पुढे तू आत नाही येऊ शकत .. मी घेऊन जातो तिला ..
हे वाक्य ऐकले आणि नीरज आणि आनंदीच्या हृदयाचा ठोका चुकला .. दोघे एकमेकांकडे बघू लागले .. काका केबिन बाहेर निघून गेले ..
आनंदीच्या डोळ्यांतून घळघळ पाणी येऊ लागले
नीरज पण एकदम शांत झाला होता .हात एकदम गार पडला होता त्याचा .. आनंदी नीरज च्या छातीवर डोके ठेवून रडत होती
आनंदी " नीरज .. जेवण वेळेत कर .. तब्बेतीची काळजी घे .."
नीरज " तू माझी काळजी करू नकोस .. तू आता तुझी आणि बाळाची काळजी घे .. तिकडे पोहचल्यावर मोबाईल मध्ये इंडियातले सिम कार्ड टाक . "
किती तरी वेळ मिठीत घेऊन तिच्या कपाळावर ओठ ठेवून होता तो
फायनली काका आले आणि आनंदी ला घेऊन निघाले .. भरल्या डोळ्यांनी आनंदी त्याला बाय करून निघाली . फार वेळ मागे बघता पण येत नव्हते .. कारण काका कोणा बरोबर तरी पटपट चालत बोलत होते .. ते जर नजरेआड गेले तर ..अशी भीती होती तिच्या मनात .आणि एका क्षणांत नीरज नजरेआड झाला आनंदी गेल्यावर नीरज ने एक कोपरा बघितला .हातात कॉफी घेतली .. आणि मनसोक्त रडून घेतले .. आजची फ्लाईट व्यवस्थित इंडियात पोहचू दे फक्त आता हीच एक इच्छा होती त्याची ..
एकेक करून प्रवाशी बोर्डिंग करू लागले .. आनंदी च्या शेजारी एक मुलगा साधारण नीरज च्याच वयाचा असेल .. काका तिथले सिनिअर पोस्ट वरचे होते म्हणून फ्लाईट च्या आत कॅप्टन वगैरे यांच्याशी त्यांच्या कामाचं बोलत होते .. आणि हि एक नॉर्मल प्रवाशी असल्या सारखी इतर प्रवाशांच्यात बसली होती ..
तिच्या शेजारचा मुलगा तिच्याशी ओळख काढू लागला .. बोर्डिंग पास वरून त्याला कळले होते कि ती त्याच्या शेजारी येईल .आनंदी ला पण वाटले आधीच ओळख झाली तर कदाचित फ्लाईट मध्ये काही गरज लागली तर बोलता येईल .. तिने जुजबी माहिती दिली त्या मुलाला .. ती प्रेंग्नेंट आहे हे हि सांगितले .. ती प्रेग्नन्ट आहे म्हटल्यावर तो तिला जास्तच मदत करू लागला .. अगदी पर्स व्यतिरिक्त हॅन्डबॅग उचलायला मदत करत होता ..
तेवढयात तिला नीरज चा कॉल आला आणि चौकशी केली कि फ्लाईट मध्ये सोडले का ? सीट मिळाली का ? "तर आनंदी ने सांगितले कि असा असा एक मुलगा ओळखी चा झालाय ..
नीरज तिला ओरडला .. उगाच अनोळखी लोकांशी जास्त बोलू नकोस ..काही वेळेला जर तो माणूस क्रिमिनल असला .किंवा काही संशयास्पद असले तर ते मुद्दामून प्रेंग्नंट बायकांचा आधार घेतात .. हे ऐकून आता आनंदी ला भीती वाटू लागली .. कि मी उगाच माझ्या बद्दल या व्यक्तीला माहिती सांगितली .... आता काय करू ? आता वेगळेच टेन्शन आले होते .. बिचारीची गाळण उडाली होती .. जोर जोरात तिथेच रडावे असे वाटत होते .. तिला ..
तेवढयात काका आले आणि तिला म्हणाले " तू मी सांगे पर्यन्त इथेच बस .. आत जाऊ नकोस "
बाकीचे प्रवासी फ्लाईट मध्ये जाऊ लागले ..तो तिच्या शेजारच्या सीट वरचा मुलगा तो हि आत गेला .. पण हि तिथेच बसली होती कारण काकांनी सांगितले होत कि मी सांगे पर्यंत इथून उठू नकोस ..
हळू हळू सगळे प्रवासी आत गेले .. इकडे हि टेन्शन मध्ये आली . नीरज ला रडतच कॉल करून सांगू लागली कि सगळे प्रवासी फ्लाईट मध्ये चढले मी अजून इथेच बसलेय .. काका कुठे गेले माहित नाही .. दिसत नाहीयेत ..
एवढ्यात काका आले आणि तिला बोलावले म्हणून तिने बोलतानाच फोन कट केला ..
काकांनी तीला आतमध्ये फ्लाईट मध्ये नेले .. तिचा बबोर्डिंग पास बघितला आणि तिला तिच्या सीट वर न बसवता डायरेक्ट बिझनेस क्लास मधल्या एका सीट वर बसवले आणि कॅप्टन आणि एअर होस्टेस ला सांगितले " हि माझी रिलेटिव्ह आहे ..सात महिने प्रेग्नन्ट आहे .. जरा लक्ष ठेवा "
काकांनी आनंदीला बाय केले .. आनंदीने नमस्कार केला .. आणि काका निघून गेले ...
आपण इकॉनॉमी क्लास मध्ये नाहीये आणि बिझनेस क्लास मध्ये आहे ह्याचा इतका आनंद काय असेल .. तिने लगेचच नीरज ला कॉल करून सांगितले कि काकांनी तिला बिझनेस क्लास मध्ये बसवलीय .. नीरज ने मनोमन देवाचे आभार मानले ..
मग आनंदीची मज्जाच मज्जा होती .. अगदी राजेशाही थाटात आनंदी १० तास फ्लाईट मध्ये होती .. मध्ये मध्ये टर्ब्युलन्स होता पण लिटरली झोपून आली ती .. इतकी राजेशाही थाटात भारतात पोहचली .. फ्लाईट वेळे पेक्षा २ तास लेट पोहचली .. पण इकडे एअरपोर्ट ला माहेर सासर ची सगळी मंडळी आली होती ..
फ्लाईट मधून एकदम फ्रेश होऊन आनंदी बाहेर आली .. किती तो आनंद .. बॅक टू इंडिया .. ते हि सही सलामत ... सतरांदा आपल्याच पोटावर हात ठेवून बघत होती .. बाळाची हालचाल जाणवतेय ना सारखी चेक करत होती ..
लगेज घ्यायला बेल्ट च्या इथे गेली तर तोच मुलगा जो तिच्या शेजारी बसला असता तो आला .. त्यानेच तिला तिची बॅग चालत्या पट्ट्यावरून उतरवून दिली .. आणि बाय करून निघून गेला ..
भारतातला नंबर सुरु झाल्या झाल्या नीरज चा फोन आला .. ती सुखरूप पोहचली हे कळल्यावर तो हि आनंदला.. त्यानेच एअरपोर्ट बाहेर असलेल्या घरातल्यांना फोन करून सांगितले कि आनंदी येईल बाहेर लवकरच
एअरपोर्ट च्या बाहेर सासर माहेरच्या दोन दोन गाड्या भरून माणसे आली होती .. आई बाबांना बघून डोळ्यांत पाणीच आले तिच्या .. सगळ्यांना गळा भेट करून आनंदात हसत घरी आली ..
मग काय लाडच लाड चालू होते आनंदीचे आणि पोटातल्या बाळाचे ..
सासर कडच्यांनी दणक्यात ओटी भरण केले ..
दोन महिन्यांनी एक गोड परी त्यांच्या घरी आली .. बाळाचे बारसे १२ व्या दिवशी ठेवले होते तर नीरज ने सरप्राईज दिले .. खास त्याच्या परीला भेटायला तो दोन दिवसांच्या सुट्टीवर आला .कधी एकदा आपल्या बाळाला हातात घेतो असे झालेलं त्याला .. मुलीचे नाव ज्येष्ठा ठेवले ..
सगळे त्याला चिडवू लागले " पहिली बेटी धनाची पेटी "
जाताना आनंदीला सांगून लागला .. बाळ २ महिन्याचे झाले कि तू आणि ज्येष्ठा दोघीजणी तिकडे या .. आता तुला एकटीने कसे यायचं माहीतच आहे !!
तसे सगळे जोर जोरात ओरडू आणि हसू लागले .
तर अशा पद्धतीने नीरज चे घर आनंदी हे घर सारे झाले ..

समाप्त !!


सौ . शीतल महेश माने

कथा नक्कीच काल्पनिक आहे पण किस्सा खरा आहे .. कशी वाटली हि हलकी फुलकी कौटूंबिक कथा नक्की सांगा .. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका .