आनंदाचे तरंग

Anandache tarang

 आनंदाचे तरंग.. 
        सावरीने वेळात वेळ काढून ऑफिसमधल्या पंकजा साठी तिळव्याचे हलव्याचे दागिने तयार केले. मंगळसुत्र, बांगड्या, नथ, कानातल्या कुड्या, नेकलेस आणि काय काय? सरप्राईज म्हणत सावरीने सगळे दागिने पंकजाच्या सुपूर्द केले. 

कित्ती सुंदर गं! दागिने बघून पंकजाच्या चेह-यावर आनंद झळकला. पैसे किती आली मोठी पैसे देणारी.. कसले गं पैसे? माझ्याकडून गिफ्ट तुला. Enjoy कर, छान आहेत तुझ्या सासुबाई कौतुक करतात. सासूसुनेमधल्या या नात्याला जपायला हवं तू. त्यातच आलं सगळं. सावरी बोलून गेली. 

        कौतुक करायलाही मोठ मन लागतं, म्हणताना सावरीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. सावरीच्या सासूबाईंकडून सावरीचं कुठल्याचं पहिल्यावहिल्या सनांचं कोडकौतुक झालं नव्हतं. 
--------
        तसं पाहिलं तर पंकजा आणि सावरी दोघींचही love marriage. आपापल्या संसारात तशा सुखीचं! प्रेम करणारा मनासारखा जोडीदार, घर-दार सुखसंपन्नता असलेला. लग्न करुन आलेली पंकजा, तिच्या सासूबाईंची लाडकी सून झाली. त्याउलट सावरीच्या सासूबाईंना मात्र सावरीसोबत जमवून घ्यायला काही केल्या जमेना किंबहूना त्यांच्याकडून तसा प्रयत्नचं होत नव्हता.

-----------

      स्वभावाने जरा तापट असलेल्या सावरीच्या सासूबाई परंपरेच्या नावावर, हे चालत नाही ते चालत नाही, आपल्याकडे ही पद्धत नाही? म्हणत सावरीच्या उत्साहाचा हिरमोड करायच्या, जूने उखारेपाखारे काढायच्या. आत्ता तिळसंक्रांतीच्या बाबतीतही तसचं काहीसं होणार. संक्रांत सनाची सावरीला त्यांच्याकडून कुठलीच अपेक्षा नव्हती. 

--------

     पहिलीच मकरसंक्रांत, सावरीने हळदीकुंकू ठरवलं. सुंदर काळी साडी नेसायचं ठरवलं. सुंदर काळी साडी नेसून तयार झालेल्या सावरीला बघून त्यांनी नाकमुरडा मारला. हळदिकूंकवाला काळ का घालावं हळदीकुंकू पवित्र. शुभ-अशुभाचे दाखले देत. सावरीला दूसरी साडी नेसण्यासाठी भाग पाडल.

        इतरांच्या घरी हळदिकूंकवाला काळी साडी नेसून मिरवणाऱ्या सावरीच्या सासूबाईंनी आयत्या वेळी सावरीचा हिरमोड केला. डोळ्यातली आसवं डोळ्यात राखून ठेवत, छोटेखानी, हळदिकूंकवाचा साधेपणाने कार्यक्रम पार पडला.

        पंकजाही सावरीकडे, मोठ्या उत्साहाने, तिच्या सासूबाईंना घेवून आली. साधीसुधी सावरी आणि तिच्याशी जराही जमवून घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या तिच्या सासूबाईंना बघून पंकजाच्या सासूबाईंना कससचं झालं. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्या सावरीला टोमणे मारणं चालूच होतं.. 

------------
       एकीकडे, सावरीने बनविलेले दागिने पंकजाचा सासूबाईंना फार आवडले. गुणाची पोरं. कलेची आवडं  तरी तिनेच बनवलेले दागिने तिलाच घालून मिरवता येत नसल्याचं शल्य पंकजा आणि तिच्या सासूबाईंच्या चेह-यावर झळकलं.


      तिच्या कलागुणांचं तिच्या घरात जराही कौतुक नाही. बघून पंकजाच्या सासूबाईंना वाईटही वाटलं. गुणाची आहे हो पोर, पण सासूबाईंना नाही तिच्यातला चांगूलपणा दिसतं. तिच्या कोणत्याचं गोष्टींचं कौतुक नाही त्यांना. स्वभावाने चांगल्या आहेत पण सावरी सून म्हणून पसंत नाही त्यांना. छळ म्हणून नाही पण अक्षरश: कोंडीत पकडतात तिला. घरी परतत असताना पंकजा आणि सासूबाईंमध्ये सावरीवरुनचं बोलणं सूरु होता.

-------------

     आई तुम्ही खूप छान आहात, मला तुमच्यात मोठे मनाने सामावून घेतलं. पंकजा सासूबाईंशी बोलत होती. त्या फक्त, ऐकून घेत होत्या, 'फारसं नाही काही करावं लागतं गं'. नविन आलेल्या सुनेच्या कलाकलाने घेवून तिच्या मताचा आदर करावा लागतो, एवढचं तर केलयं मी. गोड संवाद आणि दोघी घरापर्यंत पोहचल्या देखिल.

--------

      हळदिकूंकवाच्या दिवशी, पंकजाने काळी साडी नेसली. सुंदर हलव्याचे दागिने घालून नटली, सजली. गो-या पान पंकजावर सोनेरी जकीकाठाची काळी साडी अजूनच उठून दिसत होती. काळ्या कुरत्यात पंकजाचे नवरोबा चहापाणी, जेवणाचं बघण्यात, तर सासूबाई पंकजाच्या कौतुक सोहळ्यात व्यस्त होत्या. हळदिकूंकू, वाण, नाश्ता, सगळचं छान जुळवून आणलेलं होतं.


      सावरीही सासूबाईंबरोबर सुंदर काळी साडी नेसून आलेेली बघून पंकजाच्या सासूबाईंना सावरीला बघून आनंद झाला. दोघीही सासवा-सूना काळ्या साडीत छान दिसताय, त्यांनी दोघांचं तोंडभरुन कौतुक केलं. कुठल्याही कार्यक्रमाला साजेसा पेहराव कित्ती उठून दिसतो हे सांगायला त्या मुळीच मागे नव्हत्या.

      पंकजाच्या सासूबाईंनी सावरीच्या कपाळावर सौभाग्याचं लेणं हळदिकूंकू लावलं आणि वाण म्हणून तिने बनवलेल्या दागिण्यासारखेचं, बघून बनवलेले हलव्याचे दागिने त्यांनी सावरीच्या ओटीत दिले.  'काढ हो छान फोटो!! हलव्याचे दागिने घालून'. त्यांचे ते शब्द, आणि सावरीचा चेहरा क्षणभर का होईना पण आनंदाने खुलला. 

काकू आमच्याकडे पद्धत नाही हो. आमच्या घरी मुलीचा करतात तिळवा, सुनेचा करीत नाही, हो ना हो आई, सावरी सासूबाईंकडे बघत, क्षणभर दूसरीकडे नजर फिरवली. बोलताना तिचे डोळे पाण्याने डबडबले.


       परंपरा वगैरे, काही नसतं गं. हौस असते, कौतुक असतं. मग ते सुनेचं असो की लेकीचं. पंकजाच्या सासूबाई स्पष्ट शब्दातचं बोलल्या. आपण नाही का!
मेहंदिच्या कार्यक्रमात गेलो की छोटीशी मेहंदी हातावर काढून घेतं, हल्ली आमच्यासारख्या म्हाता-या कोता-या सगळ्याच आवर्जून काढतात. हळदिला मोत्याचे दागिने घालून नातेवाईक, फोटोशुट कित्ती ते फॅड आलयं आजकालं. वाढदिवसाच्या फंक्शनमध्ये कोप-यात बसलेल्या टॅटूवाला कित्ती छोट्या-मोठ्यांच्या हातावर टॅटू काढतो.  छोट्या मोठ्या कार्यक्रमात केक कापून आनंद साजरा केला जातो. ते चालतं तर मग हे नको का चालायला.


     परंपरा नसतात गं!!त्यात कौतुक असतं. पंकजाच्या  सासूबाई शब्दांवर भर देत बोलत्या झाल्या. काढून घे बरं का फोटो, आठवणीत जगलेले क्षण आपल्या आयुष्याचा अनमोल हिस्सा असतात, आईच्या मायेला पारखी असलेल्या सावरीच्या डोक्यावरुन त्यांनी प्रेमाने हात फिरवला. मागेच बसलेल्या सावरीच्या सासूबाईं सगळं बघत आणि ऐकत होत्या. 


      पंकजाच्या सासूबाईंनी अनेक लेकी-सूनांना. हलव्याचे दागिने वानात लूटले. कोप-यात हलव्याचे दागिने घालून, हळदिकूंकवासाठी आलेल्या सगळ्या
बायका आनंदाने फोटोशुट करण्यात मग्न झाल्या होत्या, तर कुणी सेल्फी काढण्यात रंगून गेल्या होत्या. मुद्दाम फोटो काढण्यासाठी चारपाच गरजू मुलींना त्यांनी फोटोशुट करायला नेमले होतं. 


      लेकीसुनां सोबत उतारवयाला जवळ केलेल्या वयाने मोठ्या अनेक सासवा, चूलत, मावस सासवाही मागे नव्हत्या. राहून गेलेल्या कौतुकात सहभागी होत होत्या तर स्वत:चं कौतुकही करवून घेत होत्या. पंकजाच्या सासूबाईंनी हळदिकूंकवाच्या निमित्ताने जणू आनंदचं लुटला होता.

       गप्पा टप्पासोबत बाया समाधान घेवून, हलव्याचा दागिन्यांना न्याहाळत, आनंदाने हलव्याचे घालून मिरवत होत्या, फोटो काढून घेत होत्या. आणि वानात लुटलेले दागिने घरी घेवून जात होत्या. पंकजाच्या सासूबाईंचं भरभरुन कौतुक करत होत्या. पंकजाच्या चेह-यावर आनंद दिलखुलासपणे झळकला. 


     सावरीनेही दागिने घालून फोटो, सेल्फीचा आनंद लूटला, भरजरी काळ्या साडीवर मोत्यासारखे दिसणारे पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने सावरीच्या चेह-यावर अधिकचं उठत होते. पंकजाच्या सासूबाई थोडीचं काही मागे राहाणार होत्या, स्वत:च्या अंगावर दागिने चढवत, सावरीच्या सासूबाईंना दागिने घालण्याचा आग्रह करत बोलल्या.

      प्रथा, परंपरांना जपायला हवंचं. हो पण छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद लुटता येत असेल तर लुटावा. जगावा, आठवणींच्या रुपात जपावा. नविन जमाण्यातल्या या पोरांच्या कलाकलाने घेतलं ना की, या ही आपल्या संसारात दुधात साखरच मिसळावी तशा मिसळून जातात. 


     कोण्या एका गोष्टीचं, मनात अढी ठेवून आपण सावरीचं कोणतंच कौतुक न करताही सावरीच्या चेह-यावर समाधान झळकतं. मग तिचा सन्मान आपल्या संसाराला किती सन्मानित करेल. आता त्यांना स्वत:लाचं स्वत:ची लाज वाटू लागली..    


       खरचं आनंद दिल्याने, वाटल्याने द्विगुणीत होतो म्हणतात तेच खरं! आनंद पेरला तर घरही आनंदात दरवळून उठेल. जर का थोडा चवीने कडवट असलेला तिळ गुळासोबत मिसळून गोडाचा गुणधर्म सहज आत्मसात करु शकतो. तर संसारातील माधुर्य टिकवण्यासाठी, मी माझ्या तत्वांना जरासं बाजूला सारून, घरातलं वातावरण खेळीमेळीचं ठेवण्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे! खूप ताणलं तर तुटणारच. नात्याचंही असचं तर असतं.. 


     तिळगुळ खा गोड गोड बोला!! म्हणत सासूबाईंनी सावरीच्या हातावर तिळगुळाचा लाडू ठेवला. दाटलेल्या अश्रुंबरोबर सावरीच्या मनात अगणित आनंदाचे तरंग उसळायला लागले. सासूबाईंनी हातात हात देत जणू नव्या नात्याची सुरुवात करण्याचं आश्वासनचं सावरीला जणू त्या देत होत्या
     
कथा आवडल्यास.. लाईक, कमेंट आणि शेअर करायची झाल्यास नावासह शेअर करा. 
फोटो गुगल साभार.. 
-©शुभांगी मस्के...