अनामिका, सेलिब्रिटी मरण (टीम अमृतवेल)

Marathi katha

हॉस्पिटल समोर खूप गर्दी जमा झाली होती ..टीव्ही रिपोर्टर सज्ज होते. तिच्या तब्बेतीची बातमी कव्हर करण्यासाठी ...तिचे चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत होते .डॉक्टर्स तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.समाजाच्या प्रत्येक थरातून तिच्यासाठी हळहळ व्यक्त होत होती ... खर म्हणजे आज तिची इच्छा पूर्ण झाली होती ,"सेलेब्रिटी मरणाची इच्छा ." 

"कशी वेळ बदलते नाही ? आता तर सगळं ठीक होत ..?" एक व्यक्ती 

"हो न ,कोणाला माहित होत आज ची तिचीहि झलक शेवटची ठरू शकते ..?"-दुसरी व्यक्ती 

"ये अस नको म्हणू ,तिला माझेही आयुष्य लाभो .."-तिसरी व्यक्ती डोळ्यात पाणी आणून ...

"नजर वाईट असते हो नजर लागली पोरीला अजून काय ?'-गर्दीतील एक महिला 

"हो न ,किती मोठा समारंभ ,किती देखणी दिसत  होती नाही .."-दुसरी महिला 

........................................................................................................................................................................

(काही तासांपूर्वी )

आज एक खास समारंभ होता .. ती खास होती ..आज तिचा सत्कार होता ..भव्य स्टेज सजवला होता ..

"अरे आवरा रे लवकर ,कार्यक्रम सुरु होणार आहे .."-मॅनेजर 

"सर सगळं तयार आहे ,फक्त सेलिब्रिटी यायचं अवकाश आहे .."- साहाय्यक लोक 

"काय तयार आहे ... अजून ह्या फुलांच्या माळा लागायच्या बाकी आहेत ...आणि ते त्या समोरच्या खुर्च्यांवर लेबल लावायचं आहे आणि स्टेजवर तो खास सोफा नाही आला अजून "-मॅनेजर 

"सर ,ते अजिंक्य करणार आहे .."-सह्हायक 

"कुठे आहे तो ?अजिंक्य ,हे काय तू अजून इथेच ते समोरच्या खास लोकांच्या खुर्च्यांवर नाव लागली नाहीत अजून "-मॅनेजर 

"लावतो सर,मी पूजा ला सांगतो,मी कार पार्किंग ची व्यवस्था बघतो .."-अजिंक्य 

ह्या खास सोहळ्याला माननीय मंत्र्या पासून ते सिने सृष्टीतले दिग्गज कलाकार उपस्थिती लावणार होते ..त्यामुळे सिक्युरिटी हि अगदी टाईट होती.शहरातल्या मोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला काम दिल होत ... रेड कार्पेट पसरल होत ..सभागृहात मोठमोठे lights ,screen  लावण्यात आले होते भव्य असं स्टेज सजवण्यात आला होता .सूत्र संचलनासाठी एक नावाजलेला अभिनेता हि सज्ज होता ..थोड्याच वेळात कार्यक्रम सुरु होणार होता ...

सगळे पाहुणे येऊ लागले ...हळू हळू सभागृह संपूर्ण भरला ...टीव्ही रिपोर्टर सज्ज झाले ...सूत्रसंचालन सुरु झाले .

"नमस्कार मंडळी,मी आज तुमच्या सर्वांचे इथे स्वागत करतो.आज आपण इथे एका अश्या व्यक्तिमत्वाचा सत्कार करणार आहोत ज्याने खूप हाल अपेष्टा सहन करून हि मजल मारली आहे ..'मूर्ती लहान पण कीर्ती महान' हि म्हण  ह्यांच्या बाबतीत अगदी योग्य आहे.अगदी कमी वयात प्रशाकीय सेवेत रुजू झालेली आणि फार कमी वयातच  समाजाच्या हितासाठी कार्यरत असणारी अशी हि व्यक्ती.आपल्या समाजात एकीकडे जिथे वृद्ध लोकांच्या एकटेपणाची समस्या उभी आहे तिथेच दुसरीकडे अनाथाश्रम ची परिस्थिती हि काही खूपशी चांगली नाहीये.आपल्या आजच्या सेलिब्रिटी ने ह्या दोन्हीचा संगम केला आहे.ह्यांचे कार्य एवढेच सीमित नाही तर अनेक समाज कार्यात ह्यांचाहातभार आहे.एका सामान्य मुलीच्या असामान्य कर्तृत्वाचा सत्कारआज आपल्या राज्यसरकारतर्फे करण्यात येणार आहे.चला तर मग आपण जाणून घेउया तिच्याच कडून तिची खास कहाणी ..मी आमंत्रित करतो त्यांना .."- सूत्रसंचालक 

आणि टाळ्यांच्या कडकडात.स्टेज वर पांढऱ्या कलरची नाजुकशी नक्षी असलेली ज्याला सोनेरी किनार आहे अशी साडी परिधान केलेली तरुणी उपस्थित झाली,चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज,कपाळावर नाजुकशी चॉकलेटी टिकली,डोळ्यात  काळभोर काजळ,ओठावर हलकी गुलाबी लिपस्टिकआणि विनम्र अभिवादन ..एकूणच सगळं मोहून टाकणार होत.जणू काही ती एक मोहिनीच होती .

"तुमचे खूप खूप स्वागत मिस अनामिका ..."-सूत्रसंचालन करणाऱ्या अभिनेत्याने तिला बसण्यास सांगितलं.खास तिच्यासाठी म्हणून एकसोफा ज्यावर कोरीव नक्षीआणि मीनाकाम आहे असा  ठेवण्यातआला होता.सगळेच श्रोते एकटक तिच्याकडे बघत होते आणि तिला ऐकण्यासाठी उत्सुक होते.

"धन्यवाद,मला आज इथे बोलावल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे ."-अनामिक 

"आज इथे असलेल्या प्रत्येकाला तुमच्या बद्दल जाणून घ्यायचे आहे.इतक्या कमी वयात तुम्ही एक आय ये एस अधिकारी कश्या बनलात? तुमच्या कार्याची माहिती तर आहेच पण तुम्ही हे कस आणि का करता हे जाणून घेणं महत्वाचं आहे.ऐन तारुण्यात जेव्हा मुलींना फक्त प्रेम,संसार ह्या गोष्टी महत्वाच्या वाटतात त्याच्या उलट तुम्ही एक वेगळाच मार्ग निवडला ..काय सांगाल ?'-सूत्रसंचालक 

"अहो, मी हिएक सामान्य व्यक्ती आहे"अनामिका हलकेच हसते आणि पुढे बोलू लागते,"मी काही विशेष करत नाही .मला असं वाटत कि आपल्यातील प्रत्येकाने दुसऱ्याला समजून घेऊन एका माणुसकीप्रमाणे जर वागणूक दिली तर सगळ्यांचच भलं होईल.मी एक अनाथाश्रमात वाढले.लहानपणा पासून मला खूप चांगले संस्कार दिले गेले, जसे प्रत्येक आईवडील देतात.त्यांची शिकवण होती कि दुसऱ्याला हि किंमत द्या कधी हि कमी लेखू नका.म्हणून मी माझं कार्य करत गेले.शिक्षण घेऊन समाजासाठी काहीतरी करायचं आणि त्यासाठी प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचं,एवढच मी ठरवलं होत आणि माझ्या नावाचं म्हणाल तर ज्याला माझा जसा अनुभव येतो किंवा ज्याचा जसा माझ्या बाबतीत दृष्टीकोन असतो तस मी त्याला भासते,कधी सखी,तर कधी हितचिंतक .."-अनामिका

"हो पण अनामिका च का? तुमचं खर नाव तुम्ही जगासमोर का नाही आणलं "-सूत्रसंचालन  

"आपल्याकडे आपल्या नावावरून जात ,धर्म आणि मग त्या अनुषंगाने त्या व्यक्तीचे विचार हे सगळं जज केल जात म्हणून अनामिका ..जिचं काहीच नाव नाही आणि फक्त माणुसकी हाच धर्म ...."-अनामिका .

"तुम्ही हा जो उपक्रम सुरु केला आहे वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम ना एकत्र आणण्याचा त्याबद्दल काय सांगाल?- सुत्रसंचालक 

"आपली संस्कृती म्हणजे एकत्र कुटुंबपद्धती अशी आहे ,पण आजकाल ते शक्य होत नाही.आजकाल आपल्याकडे फक्त आई वडील आणि मुलं एवढाच परिवार असतो आणि त्यात हि जेव्हा मुलं मोठ्ठी होतात तेव्हा ती त्यांच्या व्यापात असतात,कधी कधी देशाबाहेर गेलेली पाखरं परतून येत नाहीत ,कधी सासू सुनेचं पटत नाही ..मग त्यात सोप्प मार्ग म्हणजे वृद्धाश्रम.आज काळ बदलला आहे. दोन पिढ्यांमधील वैचारिक अंतर हि वाढल आहे, आज मुलांना वेळच नसतो तेव्हा वडिलधार्यांकडे कोण बघणार आणि हे त्या घरांमध्ये जास्त होत जिथे फक्त आई किंवा वडील ह्यांच्या मधून एक जण जिवंत असतो मग तेव्हा ह्या लोकांनी काय करायचं? कुठे जायचं ?....आपल्या आधीच्या पिढीच्या आपल्याकडून काही अपेक्षा असतात.त्यांना मायेची ,प्रेमाची तितकीच गरज असते जितकी आपल्याला.त्यांना त्यांच्या नातवंडांमध्ये रमायचं असत. पण हे शक्य होतचअसं नाही .प्रत्येकाची कारण वेगवेगळी असतात.आपण नेहमीच दुसर्यांना दोष नाही देऊ शकत .प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते पण आपण त्यातून एखादा मधला मार्ग नक्कीच काढू शकतो,तसच दुसरीकडे असे अनेक लोक आहेत ज्यांना मुलं नको असत किंवा आपल्या कडून एखादी चूक झाली अन मुलं जन्मालाआलं तर त्याच सांभाळ कसा करायचं हा प्रश्न असतो  मग अनाथाश्रमाची भरती सुरु होते ,तिथे हि मुलं प्रेम आणि माया शोधत असतात.आता दोन्हीकडे प्रेम आणि माया हेच हवे आहे तर मग ह्या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी असल्या तर किती बर होईल ह्या उद्देशानं मी हे काम हाती घेतल आहे ..."-अनामिक 

"तुमच्या कामाची रुपरेश कशी असते? तुम्ही कधी पासून ह्या क्षेत्रात काम करत आहात ?-सूत्रसंचालक 

"माझी नोकरी करता करता मला असं जाणवलं कि शहरात अनाथ आश्रम आणि वृधाश्रम हे मोठं मोठ्या जागेत आहेत पण आपण जर त्यानं एकाच छताखाली आणलं तर वेळ आणि पैसे दोन्ही वाचेल ह्या विचाराने मी एका अनाथाश्रमाशी बोलून त्यांची जागा develop करून तिथे एक वृद्धाश्रमची व्यवस्था केली आणि त्याला खऱ्या अर्थाने खूप चांगला प्रतिसाद मिळाला ...आणि मग अश्या पद्धतीने ५ते ६ ठिकाणी ही योजना राबवली ..त्यात होत कायकि दोन जागांच्या बदल्यात एकाच जागेत हे सगळं बांधल्या जात,एकच मॅनेजमेंट ह्याला बघू शकतेआणि महत्वाचं म्हणजे अनाथ मुलांना आजी आजोबांचं प्रेममिळत आणि आजी आजोबाना लहान मुलांमध्ये रमायला मिळत..

"वा,छान ,तुमचे विचार आणि कार्य खरंच कौतुकास्पद आहे,ह्याच गोष्टींसोबत तुम्ही वाळीत टाकलेल्या मुलींसाठी काही विशेष योजना राबवणार आहात,त्या काय आहेत? तुम्हाला ह्या सगळ्यासाठी प्रेरणा कशी मिळते ?"-सूत्रसंचालक 

"खरं म्हणजे वेळ,प्रसंगआणि भोवतालची परिस्तिथी ह्यातूनच मी प्रेरणा घेते ...लहान असल्यापासून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली माणसाकडे जर पैसा असेल तर त्याच्या कडे पॉवर येते आणि त्या पॉवरच्या जोरावर तो काहीही करू शकतो.शाळेत जेव्हा आपल्याला शिकवतात कि कधी खोटं बोलू नये ,कधी चोरी करू नये ,कोणावर अत्याचार होताना बघू नये ,दिन दुबळ्यांना मदत करावी,मोठ्यांचा आदर करावा तेव्हा आपला उर भरून येतो.आपण ठरवतो कि आपण असच करणार पण जस जस आपली कर्तव्ये आपल्या समोर येतात तस तशी शाळेतली शिकवण बदलत जाते,त्यावर धूळ जमा होत जाते ... ,खोटं बोलणं ,आपलं काम करवून घेण्यासाठी लाच देणं ,घेणंहेअगदी रोजचा व्यवहार असल्यासारखं होऊन जात ...तेव्हा मी ठरवलं कि आपण असं नाही जगायचं .. एक दिवस  माझ्या सोबत शिकणाऱ्या एका मैत्रिणीचा बलात्कार झाला,ती खूप जखमी अवस्थेत तिच्या घरात सापडली ..तिच्या डोक्यावर कोणीतरी फरशी फोडली,रक्ताच्या थारोळ्यात तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं होत .आम्ही गेलो होतो बघायला,स्पष्ट पणे कळत होत कि हि एक बलात्काराची घटना आहे पण सगळे मूक गिळून गप्प बसले ..तिच्या घरच्याना तिच्या अत्याचारपेक्षा समाजची भीती होती,त्यांचं नाव बदनाम होण्याची भीती होती त्यांनी एक हि केस रजिस्टर केली नाही.अश्या कितीतरी महिला ,तरुणी आज समाजात वावरत आहे ...किंबहुना कितीतरी जणींचा मृत्यूच झाला आहे ...पण कोणाला काहीच फरक पडत नाही.अशा महिलांसाठी खरंच काही तरी करण गरजेचं आहे.तेव्हा मी ठरवलं कि समजातून वाळीत टाकलेल्या किंवा पीडित महिलांना ह्या वृद्धश्रम आणि अनाथाश्रम मध्ये कामाला रुजू करायचं आणि त्यांना स्वावलंबी बनवायच म्हणजे त्या मानाने परत जगू शकतील.त्यांना हि हक्काचीअशी एक जागा मिळेल,जीव लावणारी माणसं भेटतील आणि त्यांच्या जगण्याला एक दिशा मिळेल."-अनामिका.अनामिका च्या ह्या वक्तव्यावर टाळ्यांचा एकच गडगडाट झाला,ती पुढे बोलू लागली ,"

"समाज कार्य हे असे कार्य आहे ज्यात धोका खूप जास्त असतो आणि स्वतःचा फायदा खूप कमी असतो ...मुलींना भीती असते त्यांच्या सोबत काहीतरी गैर घडण्याची म्हणून आई वडील त्यांना पुढे होऊ देत नाही ..आणि मुलांचं भविष्य धोक्यात येत जर त्यांनी समाजकंटकांचा चेहरा समोर आणण्याचं प्रयत्न केला तर ...पण मी काही मोठे पण केलं नाही ..मला अगदी मनापासून कोणाला तरी मदत करावी वाटते, त्यातच आनंद मिळतो म्हणून मी करते..एवढच.."-अनामिका 

"मग तुम्हाला भीती नाही वाटत?'-सूत्रसंचालक ...

"मरावे परी कीर्ती रुपी उरावे.'अहो मृत्यू हा अटळ आहे.कोणीही इथे कायमचा राहणार नाही पण हो जाताना आपल कर्म कस आहे ह्यावर सगळं खेळ अवलंबून आहे ....जे समाधान दुसऱ्याला हसवण्यात मिळत ते अन्य कशातच नाही,तस पाहिलं तर माणसाच्या गरजा ह्या खूप कमी आहेत म्हणजे बघा न अन्न ,वस्त्र आणि निवारा ह्याआपल्या मूलभूत गरजा आहे.असं नाही कि सोयी सुविधा ह्या गैरआहेत पण त्याचा हव्यास चुकीचा आहेआणि ह्या हव्यासापोटीच तर गुन्हे घडतात"-अनामिक 

"हे कार्य करताना तुम्हाला अडथळे नकीच आले असतील ,त्यावर तुम्ही कशी मात केली?आम्ही ऐकलंय कि तुम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या हि येत असतात,काय सांगाल ?" सूत्र संचालक

"कोणतेही कार्य करताना अडथळे येतातच,पण त्यांना घाबरून न जाता,न डगमगता आपण आपल्या मार्गावर वाटचाल सुरु ठेवावी म्हणजे आपला उद्देश साध्य होतो.आपण फक्त आपले कर्म करावे,त्याच फळ हे नक्कीच मिळत.जेव्हा आपण सरकारी यंत्रणेचा भाग असतो तेव्हा खूप मोठ्ठा धोका हा आजूबाजू वावरत असतो ..जेव्हा तुम्ही एका यंत्रणेत राहून त्या यंत्रणेच्या विरोधात अगदी इमानदारीने काम  करता तेव्हा तुमचा जीव कधी कुठे कसा जाईल हे सांगता येत नाही ."-अनामिका 

"खरं आहे ,खूप हिम्मत लागते ह्यासाठी,एका मुलाखतीत तुम्ही एकदा म्हणाला होता तुम्हाला "सेलेब्रिटी मरण हवं आहे ..म्हणजे नक्की काय ते सांगू शकाल ?"-सूत्र संचालक 

अनामिका हसते ,"तुम्हाला हि गोष्ट कदाचित बालीश वाटेल पण लहानपणा पासून जेव्हा जेव्हा मी एखाद्या सिनेतारकाचा मृत्यू टीव्ही  वर बघते तेव्हा तेव्हा मला त्याच्या सारखं मृत्यू यावा असं वाटत.म्हणजे बघा ना तो अभिनेता हे जग सोडून गेल्यावर सुद्धा जीवन असतो ,मागे काही आठवणी ठेवून जातो ,त्याच्या आठवणीत फक्त त्याचे नातेवाईक नाही तर प्रत्येक तो व्यक्ती ज्याचा त्याच्यासोबत रक्ताचं नातं सुद्धा नसताना हा  हळहळ व्यक्त करतो .. तसच मलाही वाटत असे कि मी ह्या जगाचा निरोप घेतल्यावर माझ्यासाठी  ती हळहळ व्यक्त व्हावी ,माझ्यासारख्या अनाथासाठी हि कोणीतरी दोन अश्रू गाळावे "म्हणजे सेलेब्रिटी मरण यावं . एवढीच माझी इच्छा .."-

"तुम्ही खर तर एक आदर्श आहात आजच्या तरुणांसाठी ..तरीही तुम्ही त्यांना विशेष असा काय सल्ला द्याल ?"-सूत्रसंचालक 

"तुम्ही एक माणूस आहात तसेच दुसऱ्या माणसाचा आदर करा ,सन्मान द्या आणि न्यायासाठी आणिहक्कासाठी लढा ..एक बाई म्हणून मी सगळ्या बायकांना सांगू इच्छिते कि तुम्ही ठरवलं तर अशक्य अस काही नाही ह्या जगात.खचून जाऊ नका,अन्याय सहन करू नकाआणि कोणावरही होऊ देऊ नका,अन्यायाला वाचा फोडा,आपल्या मुलींना सक्षम बनवा,फक्त शैक्षणिक नव्हे तर शस्त्र उचलण्याचेही धडे द्या ..."-अनामिका ..

"खरंच,तुम्ही सन्मानाच्या पात्र आहात.मी माननीय मंत्री साहेबना विनंती करतो कि त्यांनी मंचावर यावे आणि अनामिका मॅडम ला हे सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करावा ..."-सूत्र संचालक .

 मंत्री साहेब स्टेज वर येतात.अनामिका चा गौरव करतात.टाळ्यांचा कडकडाट झालेला असतो.सगळा सोहळा पार पडतो आणि अनामिका आपल्या गाडीत बसून निघणार असते तेवढ्यात तिच्यावर कुठूनतरी गोळी झाडली जाते ..आणि ती त्याक्षणीच कोसळते ..एकच गोंधळ उडतो ,तिला लगेचच हॉस्पिटलला हलवले जाते ..

तो गोळीबार कोणी केला असेल ?काय झालं असेल ? तिचे शत्रू नेमके कोण कोण आहेत ?असं एक नाही अनेक प्रश्न टीव्ही वर रिपोर्टर सारखे विचारात होते आणि तेवढ्यात  ...... तेवढ्यात एक बातमी येते,

"एक अशी व्यक्ती जी समाजासाठी झटत होती,जिने बऱ्याच वृद्धांना,अनाथांना आणि महिलांना आधार दिला होता ती आता आपल्यात नाहीये.तो तारा आज निखळलंयआणि आपल्यामागे ठेवून गेलाय त्याच कर्तृत्व ..आजच्या तरुणांसाठी आदर्श असणाऱ्या आणि आपल्या आठवणीत नेहमीच राहणाऱ्या 'अनामिका' ह्यांना खरोखरच  "सेलेब्रिटी मरण "आलेलं आहे .!

वाचकहो,अश्या बऱ्याच अनामिका आपल्या आजूबाजूला असतात,आपल्यातल्याच एक असतात ज्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन एक चांगला समाज घडवू इच्छितात,समजला दुसऱ्यांसाठी आयुष्य वेचतात अश्या सगळ्या अनामिकाना आणि त्यांच्या कार्याला सलाम ! हि एक काल्पनिक कथा आहे ,हा एक प्रयत्न आहे अनामिका सारख्या समाजात कार्यरत असलेल्या समाजसेवकांना वंदन करण्याचा ..समाप्त !

तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत ..कथा कशी वाटली ते नक्की सांगा ..

©अनुराधा पुष्कर