अनामिक मातृत्व

Gost choti Dongarevdi on this subject my article anamik matrtva

'अनामिक मातृत्व' या विषयावर ती बोलत होती. तीचे शब्दन् शब्द प्रेक्षकांची नाडी पकडत होते.

 ज्या समाजाने तिचे कुमारी मातृत्व नाकारले. तोच समाज आज तिची वाहव्वा करत होता.

  आंधळ्या प्रेमापायी अंकुरचा जन्म,त्यातच. सुशांतचा पळपुटेपणा,प्रतिष्ठेपायी आईबापाने झिडकारले.हताश आबलेने अनाथालय गाठले.

  निष्पाप जिवाला जिवदान दिले.समदु:खी सख्यांना एकत्र करून एक संघटना स्थापन केली. 

अनाथ बालकासाठी 'वात्सल्य शाखा' बालगुन्हेगारांसाठी 'सुधारगृह' आश्या छोटेमोठे उपक्रम राबवू लागली. 

 अनेक अनाथ लेकरांची ती माता बनली. समाजसुधारक मदतीचा हात पुढे करत.हि मुले शिकून यशाची शिखरे पार करत होती.

  आज हा तिचाच अंकूर एका नामांकित कंपनीत उच्चपदावर कार्यरत होता मोठ्या साहेबांना बघण्यासाठी गाव जमा झाले होते. 

    गावाला नव्याने तिची ओळख करून देत होता. त्यानेच गावाला दत्तक घेतले त्याचे औचित्य साधून तिने भाषण केले पाच गावाच्या दत्तक विधानाचा विडा उचलून भाषणाचा समारोप केला.

 'अनाथांची माता'हि तीची नवी ओळख तिला अवहेलनाऱ्या समाजाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालून गेली.. ???? ????????