अनाकलनीय भाग ५

रहस्य

अनाकलनीय
                     भाग ..५ वा व अंतिम

    मागील भागाची लिंक कमेंट बाँक्स मध्ये देत आहे.
    आज पुन्हा एकदा एक कथा पुर्णत्वाच्या मार्गावर आहे.मी हे करूच शकलो नसतो.तूमची आजवरची साथ.माझ्या बोबड्या बोलांना..शब्दांना..दिलेले प्रेम..यामुळेच ,हिंमत आली..वाढत गेली पर्यायाने आज ४ थी रहस्य कथा पूर्ण होत आहे.
     दुहेरि हत्याकांड,न्याय,सूड व आताही अनाकलनीय...पाडव्या पासून संकल्प केला होता.नविन काही प्रयत्न करू.तशी पावलही ऊचलली.नवखा आहे..नवोदित आहे.आपण आजवर माझ्या शुध्द लेखन व तांत्रीक काही असतील तर चूका वजा त्रूटी पोटात घालत,मला साथ व प्रोत्साहन दिलंत..मी आपला शतश: आभारी व रूणी आहे....हे प्रेम आपलं असंच सोबत रहावं..हीच विनंती..????????
      
     मागील भागा वरून क्रमश:

           दिनेशचा काँल आला तेंव्हाच ,डाँ.सय्यद यांनी काय तो अंदाज बांधला होता.अँटि डोस त्यांनी अगोदरच तयार करून ठेवला होता.फोन येताच त्यांनी अँब्युलंस ला तयार व्हायची खूण केली.आत आँक्सिजन व ईतर आवश्यक बाबी आहेत का याची खात्री केली होती.अँटि डोस घेऊन आपल्या हातांतील चालू काम आपल्या ज्युनियरस् वर सोपवून आवश्यक त्या सुचना करून ते निघाले होते.अँब्युलंस वार्याच्या वेगाने पळत होती.ड्रायव्हर कसलेला होता.सय्यद खात्री शीर होते की ते वेळेवर पोहचू शकतील..
     आणी आता ते पेशंट ला जवळ जवऴ वाचवूनच..सोबत घेऊन हाँस्पिटल कडे निघाले होते.त्यांच्या वेळेवर केलेल्या ऊपाय योजनांमुळे आज एकाचा जीव वाचला होता.
     परेशच्या बाजूलाच ते बसले होते..त्याचे मगासचे शब्द.
       ."ती वाचवा..ती...वाचवा.."त्यांच्या कानात घुमत होते.काय असेल हा प्रकार ..?कोण असेल याच्या मागे..?
         अजून तरी काहीच कळत नव्हतं.परेश ला शुध्द आल्यावर बर्याच शा गोष्टि ऊघड होणार होत्या.अँटि डोसची पाँवर अशी होती की परेश ला शुध्दीवर यायला काही तास लागणार होते.पण जीव निश्चितच वाचला होता..
      आता त्यांची अँब्युलंस सिव्हिल कडे वऴत होती..
       ईकडे मनोहरची ईस्टिलो टेमघर पोलीस स्टेशन कडे वळंण घेत होती.
      "बोला ,मनोहर राव ..काही तरी तूंम्हाला सांगायचे होते..म्हणालात मगाशी...काही आठवतयं किंव्हा काही क्ल्यु मिळतोय का...??"
        मनोहर ने एक गोष्ट मार्क केली होती.त्याने कोणालाच राकेश,राजू..यांच्या बद्दल सांगीतले नव्हते.तरीही कोणाला पत्ता कसा लागला की त्यांनी माझ्या सोबत वाईट केलय..?किंव्हा परेश ने तर चांगलंच केलेलं..मग त्याच्या जीवावर का हा प्रसंग..?त्याला काही लिंक लागत होती.तो आता हे सर्व दिनेश ला सांगणार होता.मदत कितपत झाली असती...माहीत नव्हतं..पण तरी तो सांगणार होता.
         दिनेश ही याच विचारात होता..जरा लवकर आलो असतो..तर कदाचित खूनी रंगे हाथ पकडला गेला असता..पण लेट झाला आपल्याला थोडा..असो..एक जीव तर वाचलाय..
    "हां..मनोहर बोला.."
     मनोहर काही बोलायला सूरूवात करणार तोच..दिनेशच्या "अेम् आय"वर एक काँल आला..त्याला थांबायची खूण करत दिनेश ने तो काँल ऊचलला.
   "बोला..ठोसर..काय अपडेटस्??"
   फोन पोलीस स्टेशन वरून होता.सब ईंस्पेक्टर ठोसर ला दिनेशने "साधना " विमान तळा वरील अपडेट आणायला सांगीतले होते..त्या संदर्भातंच काँल असावा..हा अंदाज बांधून दिनेश ने त्याला अपडेटस् विचारले..
    "सर..अपडेटस् आलेत.त्या विमान तळावरून रिसेंटली काही विकस् पुर्वीच आपल्या जिल्ह्यातल्या ३ डाँक्टर्स ने अमेरिकेला ट्रँव्हल केलं होत.तिनहि डाँक्टर्स सायक्रँटिस्ट आहेत.पैकी एक डाँक्टर आपल्या च तालूक्यातील आहेत.ते ईंडियन एअर वेज ने शिकागो विमान तळावर ऊतरले होते."
    "गूड ठोसर..मला डिटेल्स व्हाँट्स् अँप करा लगेच..आणी त्या तिनहि डाँक्टरस् चे पत्ते.. घर व क्लिनीक दोन्हींचे..तेही सेंड करा."
        हो..ऐकायला दिनेश थांबलाच नाही काँलवर.कधीच कट कोलेला त्याने काँल.दुसर्याच क्षणाला त्याने डाँ.सय्यद सरांना काँल केला होता.
    "सर..पेशंट कसा आहे..?पोहचलेत का..?सिव्हिलला.."
    "दिनेश..पेशंट ईज स्टेबल नाऊ..आउट आँफ डेंजर..वूई वील रिच विदीन ट्वेंटि मीनीट्स..अँट हाँस्पिटल..टेल मी अेनी क्ल्यु ..?एनी ट्रेसेस आँफ..मर्डरर..?"
   "सर ,३ सायक्रँटिस्ट ,दोन विक पूर्वी शिकागो ला ईंडियन एअर वेज ने गेले होते.दोनच दिवसात तिघेही एकत्र परत आले.एक आपल्याच तालूक्यातील आहे.दोन नजीकच्या तालूक्यातील.."
    "ओके..यंग मँन गिव्ह मी सम टाईम..आय वील अपडेट यू..सून"
      दिनेश आता मनोहर कडे वऴला होता.
   "साँरि..मनोहर..बोला.."
    दिनेश ने हिरवा कंदिल दिल्यावर मनोहर बोलू लागला.तो जवळ जवऴ वीस मिनिटे बोलत होता.ईस्टिलो टेमघर च्या हद्दीत प्रवेश करत होती.दिनेश शांतपणे ऐकून घेत होता.त्याच्या डोळ्यांत विलक्षण चमक आली होती.त्याला आता काही मार्ग स्पष्ट दिसू लागले होते...
         दुपारी परेशच्या बाबांचा काँल आलेला..साधारण १२ वाजता.त्यानंतर या घडामोडी घडल्या.अपर्णाला घरीच थांबायला सांगीतले होते मनोहरने..तिकडच्या गोष्टिंकडे ; तीला लक्ष द्यायला सांगीतले होते.
       आता कातरवेळ सरून तिन्हि सांज भरून येऊ लागली होती.ईस्टिलो पोलीस स्टेशनच्या पार्किंग लाँट मध्ये आराम करत होती.
      आत केबीन मधे दिनेश ,मनोहर व ठोसर बसले होते.नुकताच सय्यद सरांचा काँल येऊन गेला होता.त्यांच्या म्हणण्या नुसार..शिकागो येथील..सेट अल्फ्रेस्को..येथील एका सप्त तारांकीत हाँटेल मध्ये ते काँफरंस राबवलं गेलं होतं.त्यांनी डेट..वगैरे डिटेल्स व्हाँटस अँप वर दिनेश ला सेंड केले होते.
     "सायक्रँटिक मँन अँड हिज ट्रिटमेंट विथ स्लिपिंग थेरपी.."या विषया वर हे काँफरंस होते.तिन हि डाँक्टर जिल्ह्यातले तेथे ऊपस्थित होते.वादग्रस्त टँब्लेटस्..."टँब्लेट बेन्झोडियाझेपीन"तेथे अव्हेलेबल होत्या.तिथल्या एका फार्मास्युटिक्लस् कंपनीने त्या मार्केटिंग साठी आणल्या होत्या.
        तीन पैकी दोन डाँक्टर्स नी त्या घ्यायला नकार दिला.परंतु अेका डाँक्टरने त्या अँज अ सँपल म्हणून १० स्ट्रिप्स् घेतल्या होत्या.
      आणा बहूतेक दिनेश ला हवा असणारा डाँ.तोच होता.ज्याने दोन खून व अेक खूनाचा प्रयत्न केला होता..
     सय्यद सरांनी सर्व डिटेल्स..दिनेश ला सेंड केल्या होत्या.नाव समोर आलं होतं...काहीतरी दिशा मिळाली होती.क्लिनीकचा पत्ता..घरचा पत्ता..नाव ..मोबाईल नंबर वगैरे डिटेल्स..त्या डाँक्टर चे आता दिनेश कडे होते..
      एकेक कप काँफि घेतल्यावर ईस्टिलो..मधे दिनेश स्वत:  ,मागून जीप ..त्यात ठोसर..व काँस्टेबल्स होते.मनोहर ने आग्रह केला म्हणून त्याला ..'नाही.'म्हंटलं नाही..दिनेशने...
       आता हा लवाजमा...शहराच्या मध्यवर्धी असणार्या.."त्या" डाँक्टरच्या क्लिनिककडे वऴला होता...
     "मनोहर राव ,क्लिनीकला काँल करा..अपाँईंट मिळतेय का बघा..निमित्ताने आपल्याला हवा असलेला माणूस जागेवरच आहे का कळेंल.."
     तसे केले मनोहर ने..त्याने दिनेश ने दिलेल्या क्लिनिकच्या नंबर वर काँल लावला होता..
"..हँलो..संजीवनी..क्लिनीक.."
"नमस्कार ,मी राठोड बोलतोय..(नाव मूद्दाम हून खोट सांगीतलं होतं.)मला अपाँईंट मेंट हवीय आत्ताची..डाँक्टर आहेत का.."
   "सर..डाँ.आहेत परंतु आजची ओपिडि फूल आहे.अँक्च्युअली लागला असता नंबर पण स्टाफ कमी असल्याने मोजकेच नंबर घेतलेत.."
   "ओके..संध्या काळचा लावा.डाँक्टर पण आता कितीवेळ असतील क्लिनिकला.."
    "डाँ...अजून तासभर आहेत..तूम्ही हवतर या..लागला तर लागूही शकतो नंबर..नाहीतर संध्याकाळी कनफर्मच.."
     दिनेश ला सर्व सांगून ..मनोहरने ईस्टिलो..शहरातील ऊच्चभ्रू वस्तीतील.."संजिवनी क्लिनिक "कडे वळवली.
     दोघेही आत आले.दिनेश ने डाँ.आत असल्याची परत खात्री केली.
     पोलीस आल्याचे सांगा..लगेच भेट हवी..असे सांगून ते दारातच...डाँ.च्या केबीनच्या ऊभे राहीले.अँटेंडंट आत गेली होती.
    ते हाँस्पिटल अत्यंत पाँश होते.बसायची व्यवस्था एकदम ऊत्तम.वातानुकुलीत दवाखान्यात सर्व नीट नेटके होते.
     "सर..हा पेशंट बाहेर आल्यावर तूम्ही जाऊ शकता.".    
               डाँ..नुकतेच बाहेर गेले होते काही कामानिमित्त...आणी अगदी काही वेळांपूर्वीच आलेत हाँस्पिटलला..त्यामुळे ऊशीर झाला...अशा तक्रारी वजा कूजबूज बाहेर वेटिंग ला असलेल्या पेशंट कडून ऐकायला येत होती.
      म्हणजे डाँ..कूठेतरि बाहेर गेले होते..?तिकडेच का..?परेश कडे..?
    दिनेशच्या डोक्यात वेगाने चक्र फिरत होते.आपण योग्य ठिकाणी आल्याची त्याला खात्री पटली होती.
   तोच तो पेशंट बाहेर आला.परवानगीची वाट न पहाता दोघे ही आत गेले.केबीन एकदम भारीतलं होतं..
    "यस्..मि.ईंस्पेक्टर..प्लिज सिट डाऊन..आय अेम् डाँ.राखी केळकर..हाऊ कँन आय हेल्प यू..?"
    "मँम..तूम्ही शिकागो येथे काँफरंस ला गेला होतात..?"
  "यस्..दोनच विक पूर्वी गेले होते..देन..व्हाट ईज द प्राँब्लेम. ?"
   "मँम..तिकडून टँ.बेन्छोडियाझेपीन या भारतात न मिळणार्या रादर बँन असणार्या टँब्लेटस् आणल्यात??"
  "यस्..त्या ईथे विकायला मेडीकल वाल्यांना बंदि आहे.पण गरज वाटली तर फिजिशियन त्यांचा योग्य पध्दतीने वापर करू शकतो.."
          "मला अेका केंस मधे गरज होती.अेका पेशंटला स्लिपिंग थेरपीने ट्रिट करायचे होते..सो त्या मी आणल्या..पण म्हणून तूम्ही माझी चौकशी करताय..??"
   "मी काय गुन्हा नाही केला त्या टँब्लेटस  आणून..सर्क्युलर आहे शासनाचं ..फिजिशियन आणू शकतो..वापरू शकतो..व्हाट ईज द प्राँब्लेम..?"
    " मँम..किती आणल्यात..टँब्लेट्स.."
  "टेन स्ट्रिप्स्..ईच कंटेन १० टँब्लेट्स..."
   "म्हणजे १००..?किती संपल्या..वापरल्यात..??"
   "एकाच पेशंट ला दिल्या..तशी गरज च होती..१ स्ट्रिप दिली.."
  "मग आता..९ स्ट्रिप असायला हव्यात..ईफ आय अेम नाँट मिस्टेकिंग..राईट..?"
   "यस्..आँफकोर्स..मे आय शो यू..रिमेनींग..?"
  "यस् प्लिज.."
   डाँ.राखी यांनी स्टाँक मधून त्या.टँब्लेट्स बाहेर काढल्या.मोजून आता ९ स्ट्रिप्स दिनेशच्या समोर ठेवायच्या होत्या त्यांना...
   १..२..३..४..५..६ ..७  ....
  "ओह् माय गाँड...सातच आहेत..."डाँ.राखी आता टेंस झाल्या होत्या.
  "आँफिसर..मला नाही माहीत कसं झाल हे..पण मी अेकच स्ट्रिप वापरली.."
   "मँम..या गोळ्यांनी दोन जीव घेतलेत.अेक्सेस डोस दिला गेलाय.पाणी,साँफ्ट ड्रिंक मधून..तीघांना..पैकी एकच वाचलाय..दोन डेड झालेत.आऴी पाळीने वेगवेगळ्या ठिकाणी हे ईंसिडेंट झालेत...अँड ईन धिस पर्टिक्युलर केस...मी तूम्हाला २ खून व अेका खूनाचा प्रयत्न या साठी अटक करत आहे...प्लिज काँपरेट.."
     आता डाँ.राखींच्या चेहेर्यावर घामाचे साम्राज्य..त्या वातानुकूलीत रूम मधेही जमू लागले होते...त्या शाँक होत्या.टँब्लेटस् कशा मिस होत्या.पोलीसांचं चूकत नव्हंतं..पण ...हे सर्व अनाकलनीय वाटत होत त्यांना...तोच त्यांना काही आठवलं..
    "वेट आँफिसर ...मी हे नक्कीच केलेल नाही.असतं.. तर मी अगोदरच गोळ्यांच्या नसण्यावर ऊत्तर शोधून ठेवल असतं.पण मी हे केलेल नाही.".        "हां पण माझी असिस्टंट..जी अनेक वर्ष माझ्या सोबत आहे..तीलाही माहीत होत..या टँब्लेटस बद्दल..जी माझ्या सोबत कायम असते...
प्रत्येक केस मी तीच्या सोबतच ट्रिट व अटेंड करते..त्या माझ्या नर्स वजा असिस्टंटने हे केलं असावं...हो...नक्कीच..कारण ती सोडून माझ्या ड्राँवरला कोणंच हात लावू शकत नाही."
    "ती जराशी पेशंट सोबत राहून विचित्र बनली आहे स्वभावाने.सतत सायक्रँटिस्ट पेशंट येतात.आम्ही ट्रिट करतो.तीला पहिल्या पासून सोबत ठेवल्याने ...अनुभव व माहीती मिळाली आहे.ती खुप मदत करते मला .लोड असला पेशंटचा..की ती माझा ऊजवा हात असते."
    " शिक्षण फक्त नर्सिंगचं पण तीला आता या क्षेत्रातला खुप अनुभव मिळाला आहे.फक्त तीचा प्राँब्लेम हाच की ती जरा रागीट आहे.पेशंटशी नीट बोलत नाही.कधी कधी विचित्र रियँक्ट होते..पण आजवर कोणाला ईजा नाही केली.तशीही मी सोबत असतेच मग प्राँब्लेम नाही..हा विचार करून मी तीला कधी काढण्याचा विचारच केला नाही."
    "ती ह्या टँब्लेटस् गहाऴ नक्कीच करू शकते.ईतर कोणी हे शक्यच नाही करणं."
    "आज ही ती नसल्याने मी जास्त पेशंट घेतले नाहीत."
    "कूठाय ती..नाव गाव पत्ता...मोबाईल नंबर..क्विक.."दिनेश आता अधीर होत चालला होता.
   "यस्..आँफिसर..शूअर.."
    "नाव...देवयानी शिंत्रे..
       गाव.. सांदोरे..तालूका हाच
       मोबा...९८....."
   "सर..ती कधीच सुट्टि करत नाही.पण गेल्या विक मधे २४ मे व २६ मे ला तीने सुट्टी केली.तारिख का लक्षात तर..ती कधीच या पाच वर्षात गैरहजर राहीली नाही.कामात शार्प..पण रागीट ,विचित्र..व जरा शी सायकिकते कडे वळणारी. "
    "  आज ही सुट्टी हवी..तीने सांगीतलेलं.आज व ऊद्याही...."
    "म्हंटलं ठिक आहे..परवा ये.."
         दिनेश..मनोहर...आता सर्व समजून चूकले होते.आपल्याला हवा असलेली व्यक्ती कोण..हे आता त्यांच्या समोर होते.का..?या प्रश्नाच्या ऊत्तरा बद्दल मगाशीच त्या दोघांनी डिस्कस केल होत.मनोहर ने जे दिनेश ला सांगीतल होत...ते आता दिनेश आठवून सिक्वेंस लावत होता..देवयानी त्याच दिवशी गेरहजर होती जेंव्हा हे दोन मर्डर झाले.
      ताबडतोब..त्या देवयानीचा नंबर ट्रँकिंग वर घेण्यात आला होता.तीचा शोध सूरू झाला होता...वार्याच्या वेगाने...
     ज्या दिवशी सुट्टी घेते त्या दिवशी मर्डर होतो...मग ऊद्याची तीने का सुट्टी टाकली.तीच्या मते परेशचा नंबर आज होता..मग ..?ऊद्या...काय..??.कोणाचा नंबर.."
      "ओह्..माय गाँड...मनोहर..यू आर गेटिंग माय पाँईंट..?"दिनेश जवऴ जवऴ किंचाळलाच...
     तिकडे परेश शुध्दिवर आला होता.डाँ.सय्यद लागलीच त्याच्या अँडमीट रूममधे आले..जसं त्यांना कळल की  परेश ला शुध्द आलायं..
               आता परेश त्यांच्या जवऴ बोलत होता..
   "सर मला मेसेंजर वर अेक मेसेज आला.ती व्यक्ती लेडी होती.माझ्या फ्रेंड लिस्टवरती नव्हती.पण तरिही मेसेज येऊ शकतो..तो आला..मला सांगीतलं गेलं..राकेश व राजू च्या खूनाबद्दल माहीती हवी तर भेटा..मला काही माहीती मिळालेय."
         "मी चारदा विचार केला.म्हंटलं मनोहर किंव्हा पोलीसाऩा सांगूया..पण मग वाटलं की नको..तितका वेऴ नव्हता..ती व्यक्ती जर पोलीसाना पाहून पळूंन गेली असती..तर लिंक मिळालीच नसती...मग भेट ठरली.माझ्याच फार्म हाऊस वर. "
      "ती एक लेडी आहे.ती आली.तीने थंड काही आहे का विचारलं.मी फ्रिज मधून थम्सप् काढलं..ग्लास आणले...तितक्यात तीने मला समोरचा विंडो ऊघडायला सांगीतला...मी गेलो..तेवढ्यातंच बहूतेक तीेने माझ्या ग्लासमधे टँब्लेटस् टाकल्या असाव्यात.आम्ही थंडा प्यायलो..मी गोळ्या युक्त थम्स्प प्यायलो.तीने बोलायला सूरूवात केली.."
    मीच राकेश व राजूला मारले.."मी हे ऐकून शाँक झालो..विश्वास नव्हता बसत.मी खूनीच्या समोर बसलोय."
    परेश तूझ्याही ग्लासात मी गोळ्या टाकल्यात..".हे ऐकून तर मी जागीच गोठलो.मला मरण समोर दिसू लागलं..ईतका मी गाफील कसा राहीलो..मी स्वत:वरंच चिडलो.."
    तोच गोळ्यांचा असर होऊ लागला...ती निघाली होती...जाता जाता बोलली...तिघे गेले...आता....अपर्णा...अपर्णा....
          आणी जोर जोरात हसू लागली...ते हास्य विचित्र होतं.."
     "सर.. अपऱ्णाला वाचवा..तीच्या जीवाला धोका आहे...काय कारण मला माहीत नाही..पण तीला वाचवा..ती आजच रात्री..तीला मारणार आहे..तसंच ती बोलत होती..सर..'तीला वाचवा'..'तीला वाचवा...'...प्लिज सर मनोहर ला काँल करा..."
     सय्यद सरांना क्षणाचाही विलंब न करता दिनेश ला काँल करून सर्व सांगीतलं..
           आता दिनेश समोर खूनी व्यक्ती..तीच नाव गाव पत्ता..नंबर सर्व होत...नव्हंत ते फक्त का..??कारण काय.??याच अुत्तर...व ते ऊत्तर देवयानीच देऊ शकणार होती..
        पण ती आत्ता गायब होती..आणी बहूतेक ..अपर्णाच्या जीवाला ती काही तरी करणार होती...
    मनोहर आता खुप टेंशन मधे होता..त्याने अपर्णाला काँल केला...
   "बाबू... कूठे आहेस..आई बाबा कूठायतं...दादा वहिनी कूठायत..बोल पटकन्.."
    "मनोहर काय झालयं...??सर्व घरि आहोत.आई बाबा..भाऊ व वहिनी झोपलेत..त्यांच्या त्यांच्या बेडरूम मधे..पण काय झालय..?"
   थोडक्यात पण पध्दतशीर मनोहरने तीला सर्व सांगीतलं.परेश वाचला हेही सांगीतल.काय घडलं होत हे सुध्दा..आणी तूज्या जीवाला धोका आहे..हे ही...
     "बाबू..मी पोहचतोय..दिनेश ही आहेत.मी येईतोवर दार ऊघडायच नाही कोणीही आलं तरीही...प्राँमीस कर..मला.."
....ती ने मान डोलावली..'हो...'अस सांगीतलं..ती ही मनातून घाबरली होती.पण मनोहर पाचच मिनीटात पोहचणार होता..
     कोण हि देवयानी ??का मागे लागलेय..??.मला का मारायला...आतूर..??काय चालयं..??सर्व अनाकलनीय होत..
               पण ती आता सावध होती..
    काहीच वेळ काढायचा होता..तो येतच होता..ती सावध होती.तोच तीला मेन गेट ओपन दिसलं..पटकन बंद करून याव..मग कोणच आत येणं शक्य नव्हतं...
         तीने ऊंबरठ्या बाहेर पाय टाकला होता..गेट पर्यंत पोहचणारच होती ..तोच थबकली. ..काहीतरी ऊजव्या बाजूला तीने अऩुभवलं..स्ट्रिट लाईटच्या अंधुकशा येणार्या ऊजेडात तीने अेक चमचमतं सुरीचं पातं आपल्या मानेकडे येताना पाहीलं....कोण तरी बोलत होत...लेडीज आवाज होता.."सा..ले...,ईतकि वर्ष नाही ना आलीस...तूझ्यायला..मग आता का....आलीस...तूला चिरीन..कापीन ..ठार मारेन...."
    तीच्या अंगावर काटा ,शहारा..आला...आपण दाराबाहेर येऊन चूक केली..हे तीला आता समजून चूकलं होतं..पण वेळ गेली होती.....तोच ते पात..अेक मुलगी..साधारण..पंचवीशीच्या दरम्यानची..खुऩशी...नजर...व तोंडात शीव्या....आपल्या मानेजवळ घेऊन येत होती.
      आता वार आणी आपण आपल्या बच्चू पासून आपण पुन्हा कायमची लांब जाणार....याच विचारात तीने हतबल होऊन डोळे मिटले..आता काय होईल ते होईल...मी चालले बच्चू..साँरि ईतकीच साथ...डोळे मिटले..तीला त्याही परिस्थितीत बच्चू दिसला डोळ्यांसमोर...
     ते सुरीचं पातं आता जवऴ आलं...काहीचं सेकंद आता खेळ खल्लास....देवयानी तीचा ऊद्देश पुरा करणार ..
         तोच..ते पात..कशावर तरी फिरलं...कळलंच नाही..पण मान वाचली होती..
       आं..असा बारीकसा आवाज आला..देवयानी थबकली..सुरा तर रक्ताने माखला होता..पण अपऱ्णा सेफ होती..मग..?
     मनोहर च्या पाठीवर अर्धा फूटी वार झाला होता.त्याने प्रसंगावधान राखून प्रसंगी आपला जीव धोक्यात टाकून अपर्णाचा जीव वाचवला होता...आपल्या पाठीवर तो वार झेलला होता.
      देवयानीला दिनेशने ताब्यात घेतली होती.सोबत अगोदरच घेतलेल्या लेडी काँस्टेबलने तीला आता जेरबंद केली होती..
     आता सर्व पोलीस स्टेशनला होते.मनोहरच्या जखमेवर वर टाके पडले होते.पण तरीही तो अपर्णा सोबत पोलीस स्टेशनला आला होता...
     समोर देवयानी ...मागे दोन लेडी काँस्टेबल...पुढ्यात टेबल..टेबलाच्या या बाजूला दिनेश मनोहर व देवयानी...
    "बोल आता सर्व..पटकन.."
ती सांगू लागली..
   "मी मनोहर सरांची फँन आहे.वेडी आहे जाम त्यांच्यासाठी ,प्रेम करते..लग्न करायचं होत मला त्यांच्या सोबत....मी अेकदा त्यांना प्रपोजही केला होता..कमेंट मधून..त्यांचे लेख वाचते..मी पार वेडी आहे त्यांच्यासाठी.सर्व निट चालू होत.पुढे जाऊन मी सरांना सोरासमोर मागणीही घालणार होते.पण सरांनी लग्न केलं...माझ डोक फिरलं होतं."
          "तोच काही दिवसांतच सरांनी अेक कथा टाकली..पोस्ट केली .ती कथा म्हणजे त्यांचं आत्म चरित्र होत.त्यात त्यांनी हा ऊल्लेख केला होता की हे सर्व सत्य आहे..अेरव्ही ते काल्पनिक ईतर कथांना लिहीतात.पण हे सर्व सत्य होत."
              "त्यात मला राकेश व राजू ने केलेला कट दिसला..त्या दोघांनी सरांना त्रास दिला..तो राग होता..त्या कथेत त्यांच नाव गाव सर्व होतं.मी मेंसें जरचा वापर करून त्यांच्याशी संपर्क साधला.मी त्यांना शरिर सुखाची आँफर केली ते फसले.."
            "त्यांच्याच फार्म हाऊस वर भेटणं ठरलं.मग क्लिनिक मधून चोरलेल्या गोळ्यांचा योग्य डोस(एका वेळी पाच गोळ्या) मी ड्रिंक मधे टाकला जेणेकरून त्यांना अँटँक येऊन ते मरतील...तसंच झाल..."
              "परेश ने या दोघांची जोडी परत मिळवून दिली...हे ही मी त्या कथेत वाचलं..परेश मुऴे माझे मनोहर सर कायमचे लांब गेले होते...मी त्याला कसा माफ करू ...मग त्याचाही काटा...काढला.."
     "आता ऊरली होती ही...अपर्णा...का अालीस तू मधी का...??माझे आहेत मनोहर सर माझे...त्यांच्यावर माझाच हक्क आहे..तू निघून जा तूला मारेन कापेन ..."
     ती कंफेस रूम स्तब्ध होती..सर्व आवाक् होऊन एैकत होते..सर्व गोष्टि आता क्लियर झाल्या होत्या.लग्नानंतर जी कथा मनोहर ने लिहीली ती स्वत:ची च आत्मकथा होती.तीत त्याने सर्व खरं...नावा गावा सहीत लिहीले होेते..आणी तीच गोष्ट मघाशी मनोहरने ,दिनेश ला सांगीतली होती कार मध्ये.राहून राहून त्याला आज आपण पोस्ट केलेल्या आत्मकथे मुळे तर हे होत नाही ना...असे वाटू लागले होते.त्याने आपल मन दिनेश समोर मोकळं केलं होतं...
        त्याच कथे नुसार तीने त्यांचे प्रोफाईल फेसबूकवर चेक केले..सर्च केले.देवयानी ने आपले टार्गेट अशा प्रकारे सेट केले होते...
      एक अध्याय संपला होता..मनोहर आता सेफ व स्टेबल होता.अपर्णा वाचली होती.परेश ही सेफ होता..केस संपली होती..
    दिनेश सोबत हस्तांदोलन करून..गरज लागेल तेंव्हा कोर्टात यायचे कबूल करून दोघेही आता त्यांच्या बंगल्यात परतले होते..
   सारं मळंभ दूर झालं होतं..पुन्हा राजा राणी सुखात नांदणार होते.
     शांत शांत...बरेच दिवसांनी ते फिल करत होते...

     मळंभ सरल्यावर ठरवलं
      पुन्हा नव्याने जगायचं
     ऊरल्या स्वप्नांना नव्याने 
 आता पुन्हा आयुष्यभर जपायचं 
    
    दोघे ही खुश होते..मनोहर ने राहीलेला महाबळेश्वरचा बेत परत आखायला घेतला होता.ते ऐकून मनोहरची आई म्हणाली..
     "नाही हां..आता नाही...आता अेक वर्षांनी जायचं..."
      "अगं ,आता काय...जाऊ दे ना आम्हाला.."
    "छे..! मुळींच नाही..आता अपर्णाला अेकटीला नाही..तर अेक वर्षांनी तिघे जा.."आणी ती हसायला लागली..
   "ईश्य "बोलून अपर्णा रूममधे पळाली होती...मनोहर समजून गेला होता.आता त्याच्या आनंदाला पारावार ऊरला नव्हता.तो बाप होणार होता...
   त्याच्या कल्पना विश्वातील...सागर ...किंव्हा प्रिया...काही दिवसांतच येणार होते....
      पुढच्या पाचव्याच मिनीटाला अपर्णा अतिआनंदाने मनोहरच्या कुशीत शिरली होती.....
      आणी तिकडे जिल्हा मध्यावर्धी काराग्रुहात ..देवयानी रागाने लालबुंद डोळ्यांनी ...आजही अपर्णा ला पहात होती......

मनोज नागांवकर
@नागांव बीच...

🎭 Series Post

View all