Nov 23, 2020
रहस्य

अनाकलनीय भाग ४

Read Later
अनाकलनीय भाग ४

अनाकलनीय
              भाग ४ था    

         मागी ल भागा ची लिंक कमेंट बाँक्स मधे देत आहे.
    मागील भागावरून पुढे क्रमश:

        कायद्याला सहकार्यच करायचं,हे त्याचं नेहमीचचं मत होत.आणी आज तर आपण ईनडायरैक्टली का होईना..त्यात संबंधीत असल्यासारखे वाटतोय..मग अशा वेळी तो थांबणारंच नव्हता.काही मदत झालीच तर..आपल्या कडून..तो तयारच होता.अपर्णाचही काही वेगळं मत नव्हतं.दोघेही लगेचंच आवरून निघाले होते.
        ईस्टिलो आपल्या आयडियल वेगात आज पुन्हा टेमघर च्या रस्त्याला लागली होती.एरव्ही त्यांनी हा प्रवास एंजाँयच केला असता.हिरवऴ ,ते दोघेच..छान ईस्टिलो..अेसी..मंद व रोमँटिक संगीत..आहाहा..एक पर्वणीच...असते ही..पण..पण आज ती वेळ एजाँय करण्याची नव्हती.
      आज साधारण ११ वाजताच ते दोघे पोलीस स्टेशनला पोहचले.ईं.दिनेश होताच..हजर.
"या ,बसा..मनोहर राव..साँरी तुम्हाला पुन्हा त्रास दिला.पण काय करणार..कामच अस आहे..की ईलाजच नाही"
     "नो प्राँब्लेम ,दिनेश सर..मला तूम्ही सर्व सकाळी सांगीतलतंच.पण हे सर्व अनाकलनीय आहे.आमचे दुश्मन एकेक करून मरतायत..आणी आम्हाला काहीच माहीत नाही..काय चाललय??सर तूम्ही सर्व चौकशी करालंच.काँल लाँग्स..वगैरे वगैरे..मी यात क्लियरच आहे.मला स्वत:ला आश्चर्य वाटतंय..हे काय चाललय."
    अपर्णाच्या चिंतामग्न चेहेर्याकडे धीराची नजर फेकत..मनोहरने तीला रिलँक्स व्हायला सांगीतले.
   " मला माहीते..मनोहर तूमचा रोल सध्या तरी कूठे दिसत नाहीये.पण तूमच्या कडून सहकार्य हवय..तूम्ही कोणाला चूकून काही बोललेत का या दोघांनी आमच्यात दुरी निर्माण केली वगैरे.."
            "नाही हो..अस काहीच नाही.का विषय काढू..अहो..ईतक्या वर्षांनी  आम्ही संसारात पडलोय.एंजाँय करतोय आयुष्य..अस का करू..मागे जे झाल तो प्रारब्धाचा एक भाग समजून विसरलो होतो आम्ही.नव्याने जिवन सूरू केलेलं..अस का करू..?"
 दिनेश काही बोलणार ..तितक्यात मनोहरचा मोबाईल वाजला.दिनेशने डोळ्यांनीच तो घेण्याची त्याला परवानगी दिली.मनोहर ने नंबर पाहीला.
    ."अंजना मँम..मन ब्लाँगिंग..."
या मँम म्हणजे ,तो ज्या ब्लाँग वर लिखाण करायचा..जिथे त्याचे असंख्य चाहते ..वाचक..फाँलोवर्स असायचे..त्या मन नावाच्या ब्लाँगींग च्या सर्व्हे सर्व्हा.पण आता त्यांचा काँल येण्याचं कारण..?तो नाही समजू शकला.
             विचार करू लागला "काय करू..?घेऊ की कट करू..??नंतर करेन..!!"
"अहो..घ्या हो साहेब..काँल करा रिसिव्ह.."दिनेश मन मोकळे पणाचं वातावरण निर्माण व्हावं..यासाठी हसत हसत बोलला.
"हँलो..मँम..अचानक..?"
"सर ,साँरि टू डिस्टर्ब यू..!!पण तूम्ही जी रिसेंट कथा टाकलेलीत ना मन..वर..तीला टेन लँक्स व्ह्युव्ह आलेत.आणी कमेंटस लाईक..तर गणतीच नाही.ही कथा पर्यायने तूम्ही पारितोषीक व सत्करास पात्र झालेत.गिनिज बूक आँफ वर्ल्ड मधे या कथेच्या रिस्पाँस ची नोंद झालेय.तूम्ही मोकळे असाल तेंव्हा काँल करा..आपण डेट ठरवू..कार्यक्रमाची.तूम्हाला छानस बक्षीस व तूमचा सत्कार केला जाईलं."
        हे सर्व आनंददायीचं होतं.पण ही वेळ नव्हती आनंद साजरा करायची.आपण नंतर या बद्दल अर्पू ला बोलू..असा विचार करून ..मनोहर..दिनेश कडे वळला.तो व अपर्णा बोलत होते.
 "काय म्हणता ,कोणाचा काँल..होता..नागवेकर.."दिनेश
"काही नाही ..सर..असाच..जरा"
"अहो ,आम्हालाही सांगा.परके आहोत का आम्ही.शेवटि तूम्ही जावई आमच्या गावचे.बोला बोला...आता अचानक कोणाचा काँल होता..?"
        दिनेश हसत हसत ..माहीती काढण्यात तरबेज होता.त्याला मनोहरला येणारा प्रत्येक काँल..जाणून घ्यायचा होता.
   " अहो सर..मी लिखाण करतो.माझे ब्लाँग्स् व कथा ..मन या ब्लाँगींग साईट वर येत असतात.लग्नागोदर मला लागोपाठ सात वेळा ब्लाँगर आँफ द विक चा पुरस्कार मिळाला होता.अेक छंद मी जपत असतो.लग्नांनतर एक कथा लिहीलेली.तीला गिनीज बूक आँफ वर्ल्ड मधे नोंद मिळालेय.तसा तीला रिस्पाँस आहे.माझा सत्कार ही आहे."
    हे ऐकून पहिले अपर्णा खूश झाली.तीने मुक्यानेच पण नजरेने त्याचे अभिनंदन केले.तीच्या चेहेर्यावरील आनंद लपत नव्हता.
  "अरे.व्वा..सर..तूम्ही तर लेखक निघालात..अभिनंदन...ग्रेट वर्क.असा कोणता विषय होता..त्या कथेचा की तूम्हाला ईतका रिस्पाँस मिळाला..."
     "सर..जावद्या ना आपण आपल्या कामाचं बोलूया.."
     " ओके ओके...लिव्ह ईट.तर मनोहर राव..मला अस सहकार्य करा...की डोक्याला ताण देऊन आठवा.कूठून काही लिक झालय का..?असा कोणी आहे का..?ज्याला तूमच्या पर्सनलमधे ईतका ईंटरेस्ट असेल..?कोणी तूम्हाला त्रास देणार्याचे असे हाल करून मर्डर का करत आहे.."
      मनोहर ब्लँक होता.अपर्णाचीही हालत काही वेगऴी नव्हती.पण तो विचार करत होता.बरं..आणखी कोणाचा नंबर तर नाही ना लागणार...हेही टेंशन होतंच डोक्याला.
     "मनोहर राव..",शांततेचा भंग करून दिनेश म्हणाला..."तूम्ही आता जा ,शांत विचार करा.कूठेतरी पाणी मुरतय नक्कीच.जोर द्या डोक्याला...काही आठवल तर काँल करा मला.आता या तूम्ही."
     पडत्या फळाची आद्न्या घेऊन दोघेही निघाले.पण विचार थांबले नव्हते..असंख्य विचार मनात..आणी काहूर ही तसंच.."मंगल रेस्टाँरंट" लाच लंच करून त्यांनी आता ईस्टिलो बीच रोडला वऴवली.
   "मनोहर,बच्चू..खुप अभिनंदन...यू आर ग्रेट वन.."अपर्णा ऩे त्याही परिस्थितीत त्याच कौतूक केलं."पण काय होती रे कथा...विषय काय होता ईतका की एकदम गिनीज बूक आँफ रेकाँर्ड"
      "अगं ..मी तूला मागे लिहीताना बोललो होतो बघ..समथींग स्पेशल..ती हीच कथा लिहीत होतो.विषय भारीच होता.पण माझे फँन्स ईतके माझे कौतूक करतात ना..की साधंसं लिखाणही नाव काढून जातं.मी काहीच नाही ईतका लिहित .पण माझे फँन्स...मला डोक्यावर बसवतात.खुप प्रेम करतात."
      "तूला गंमत सांगतो..एकदातर एका मुलीने कमेंट केली..सर विल यू मँरि मी..?"
     जोर जोरात हसत मनोहर सांगत होता.अपर्णा जराशी जेलस झाली पण आपल्या नवर्याचं कौतूक चालय व ती शांत कशी बसेल?
    " यु आर बेस्ट.. बच्चू...आय लव यू...तू एक हाडाचा लेखक व चारोऴी कार आहेस.तू डिजर्व्ह करतोस हे सारं.खूप खुप अभिनंदन...बाबू.."
     त्याही परिस्थितीत..मनोहर..खूश झाला.तीचे कौतूकाचे शब्द..ऐकायला तो कधीचा आतूर होता.न जाणो किती तरी वर्षांपासून.आता ते दिवस आले होते तर हे काय घडू लागलं होते.तो विषय चालू असतानाच घर गाठलेलं ईस्टिलो ने...मग दोघे ही ऊतरले..
      ईकडे दिनेश ने तपासाची दिशा बदलायचे ठरवलें.तो लंच नंतर सरकारी डाँक्टरांना भेटणार होता.तशी अगोदरंच त्याने अपाँईंटमेंट घेतली होती त्यांची.
   "या ई.दिनेश..बसा..हाऊ कँन आय हेल्प यू.."एक साधारण साठीकडे झूकलेला..चेहेर्यावर अनुभवाचे तेज असणारा डाँ.,सरकारी डाँ...या नात्याने दिनेश ला बोलावता झाला.
   "सर ,लाजवू नका हो..अहो जाहो काय..?दिनेश बोला...काय तूम्हीपण सर.."
    डाँ.सय्यद रशिद..जवऴजवऴ ३५ वर्ष सेवा.अत्यंत हुशार डाँक्टर.
    जोरात हसून दिनेश कडे पहात अखेरीस म्हणाले,"बरं बाबा दिनेश बोल काय मदत करू.."
     आता ते दोघे सिरयस झाले.दिनेश ला माहीती हवी होती त्या गोऴ्यांची ज्यांच्या ओव्हरडोसमुळे दोन मर्डर झालेत रादर करवून आणलेत.
   "सी..दिनेश..या गोऴ्या ईंडीयात मोजक्याच ठिकाणी मिळतात.महाराष्ट्रात तर जवऴजवऴ बँन आहेत.ईंडीयातही ना के बराबर.आजही स्टाँक चेक केलास तर तूला अेकही गोऴी भारतात सापडणार नाही.कारण तीचा ईंपँक्टच असा असतो.अति डोस झाला तर मरण ठरलेलं."
     "आता या गोळ्यांबद्दल माहीती तशी कोणालाच नसते.अेक डाँक्टर किंव्हा मेडिकल वालाच ही माहीती बाळगून असतो.हां..पण अमेरिकेत या गोळ्यांना बँन नाहीये.पण तिकडे फक्त या गोळ्यांसाठी कोण जाणार रे..?"
     "एक डाँक्टर...जो वरचेवर काँफर्ंस ला जात असेल अमेरिकेत??"दिनेश ने शंका बोलून दाखवली.
    "व्हांट डू यू वाँट टू से..यंग मँन..?यू मीन टू. से..एनी डाँक्टर..?बिहाईंड धीस..?"
     "हा माझा अंदाज आहे..सर.काऱण या गोळ्यांची माहीती सर्व सामान्याला कशी असेल..?हे अेका डाँक्टरलाच माहीती.हां मेडिकल वाला ही असू शकतो पण तो काँफरंस ला जाणार किंव्हा कोण्या कारणासाठी अमेरिकेला जाणार व तिकडून या.टँब्लेटस् आणणार..हे जरा डोक्याला पटत नाही."
    "हां..पण डाँक्टर जर गेला...व त्याने जर तिकडून खरेदी करायचा प्रयत्न केला..तर त्याला ते मुश्किल नाही.."
    "यस्..यू आर राईट.तू असे डाँक्टर शोध की ज्यांनी नुकताच महाराष्ट्र रादर आपल्या जवळच्या विमान तळावरून प्रवास अमेरिकेत केला असेल...नजीकच्या काळात.जे नुकते जाऊन आलेत..कोणते काँफरंस तिकडे अँटेंड केलय ...ती माहीती काढ..त्यांच्या नकळत..मग मला त्या काँफरंस सेंटरचा पत्ता अमेरिकेतला दे..मी माझे काँटँक्ट वापरून त्या टँबलेट्स पैकी कोणत्या डाँक्टरने खरेदी केल्यात..ती बरोबर माहीती काढतो. तू लाग कामाला..लवकरात लवकर माहीती दे.."
      आता जरा दिशा मिळू लागलेय अस दिनेशला वाटू लागलं होतं...तो आता निश्चिंत होता.नविन दिशे प्रमाणे चालण्याचा निग्रह करून त्याने तशी पावलं ऊचलायला सूरूवात केली होती.त्याची जीप आता " साधना" विमानतऴाकडे वळली होती....
      ईकडे लागोपाठच्या टेंशनने मनोहर थकला होता.हाँटलवर जबाबदार व प्रामाणीक लोकं होती म्हणून तो बिऩधास्त होता.आणी अर्पू आल्या पासून त्याला आता आई वडिलांचीही काळजी ऊरली नव्हती.ती त्यांचं सर्व व्यवस्थितंच करत असायची.आई बाबांना कधी आपली मुलगी विणा ची कमी.. ती आल्यापासून जाणवली नव्हती.पण ह्या ज्या घटना घडत होत्या..त्या सर्वा अनाकलनीय होत्या...
       तोच ..परेश.. त्याचा मित्र..त्याच्या बाबांचा काँल याच्या मोबाईलवर वाजू लागला..
   "अरे..काकांचा का काँल..?ते सहसा करत नाहीत.पण ठिके जे घडतय त्यांनी ऐकलं असेल आणी माझी विचारपूस करायला हा काँल केला असेल.."असा विचार करून त्याने काँल ऊचलला.
    "हँलो..काका..कसे आहात..?"
पलिकडून काकांचा घाबरा घूबरा आवाज आला..."मन्या अरे..परेश काही तासांपासून गायब आहे रे..फोनही नाही लागत त्याचा.."
     आता हे असं काही ऐकायला य़ेईल याची अपेक्षाच नव्हती मनोहरला..
  "काय...तो जोरातच ओरडला.काका नीट चेक करा.येईलंच तो.आसपास असेल .मोबाईलची बँटरि ऊतरली असेल.."
   "अरे नाही..रे..परेशची बायको जाऊन आज ३ वर्ष झाली.ती गेल्यापासून तो आमच्या पासून कधीच लांब नाही गेला.अेक तासही नाही.सून बाई आमची काळजी घ्यायची.ती गेली अचानक.तेंव्हा पासून हा आमची काळजी अगदी जिवापाड घ्यायचा.आता ३ तास होत आले.याचा फोनही बंद..काही कळत नाही रे...फोन कधीच बंद नसतो..म्हणून जास्त काळजी...त्यात हे सर्व जे चालू आहे..ते सारं...अनाकलनीय आहे रे.."
    "काळजी करू नका..मी बघतो..लगेचच काँल करतो."
    आता संशयाची पाल चूक चूकायला लागली.
        परेशचा नंबर..?ओह् माय गाँड...मी त्याला काही नाही होऊन देणार..अपर्णाला बोलावून त्याने सारा विषय सांगीतला.ती ही घाबरली .तरी त्यात तीने दिनेश ला फोन करायची आयडीया मनोहर ला दिली.
    दुसर्याच मीनीटाला मनोहरने दिनेश ला काँल केला.ईत्यंभूत सर्व सांगीतलं.आता दिनेश सावध झाला .
     "मनोहर पटकन अंस घर किंव्हा फार्म हाऊस या परेशचे आहे का सांगा..आजू बाजूला..
बहूतेक परेश वर काही प्रसंग आलाय.पण का हो त्याने तर तूमच्याशी काही वाईट केलं नव्हंत...मग त्याच्या बाबतीत असं होऊ शकतं..?"
     पण आता विचार करायला वेऴ नव्हता.जे काय करू ते पटकन्..तशी हालचाली करायच्या होत्या.परेशच्या बाबांना पुन्हा काँल करून त्याने असं एखादं घर त्याचं आहे का विचारल.तर ते असल्याचं कळलं.त्यांनी मनोहरला पत्ता दिला.तो पत्ता त्याने दिनेश ला ट्रांसफर केला..  
      आता दिऩेशची जीप त्या पत्याकडे वळली होती.ईकडून मनोहरही निघाला होता...
    दिनेश ने निघतानाच डाँ.सय्यद यांना काँल करून सर्व सांगीतलं.त्यांनी दिनेश कडून पत्ता घेतला..म्हणाले मी येण गरजेच आहे..तू हो पुढे मागोमाग मी काही घेऊन येतोच...
     आता वेळ नव्हता.तीन गाड्या तीन वेगवेगळ्या वाटेकडून एकाच पत्याचा रोखाने निघाल्या होत्या...
     सर्वात पहिले पोहचला तो दिनेश..... 
      हातात रिव्हाँल्व्हर सांभाळत तो अलगंद पुढे सरकत होता.
          जर तीच थेअरी असेल तर परेश ईथेच असायला हवा होता...आणी तो खूनीही ईथेच..अजून वेळ कदाचित हातात होती.त्याने गेट मधून जीप आत टाकली होती.पाच अेकरची परेशची प्राँपर्टि होती.मध्या वर्धी जागेत बंगलो दिसत होता.तोच दिनेश ला परेशची गाडी दिसली.त्याच्या जीवात जीव आला.मनोहरने मेसेज केलेला गाडी नंबर त्याने टँली केला.
"MH 06 BB 4810
white I 10"
     हीच ती गाडी परेशची.आता सावध व्हावं लागेल कदाचित खूनीही असू शकेल ईथेच...
      दिनेश आत घुसला..दार ओपनच होतं.थेट परेशच्या बेडरूम कडे तो वऴला.
    बेडरूम शोधायला वेऴ नाही लागला त्याला.हाँलच्या डाव्या अंगालाच होती.बेडरूम मधे आत घुसतानाच त्याने काही आवाज ऐकले होते.तो अधिक सावध झाला..आत शिरतोय तर त्याला मनोहरने पिक पाठवलेला ईसंम..परेशच असल्याची खात्री झाली.परेश आतच होता.त्याला नुकताच अँटँक सूरू झाला होता...लक्षणं तर तीच होती.      परेश अन क्वांशस होत चालला होता...काय कराव दिनेश ला कळंत नव्हतं.
          सोबत दोन काँस्टेबल होते.त्यांना याने आजूबाजूचा परिसर शोधायला सांगीतला.सर्व नाक्यांवर बंदोबस्त वाढवायच्या वायरलेस करायच्या सुचना दिल्या.कोणी संशया स्पद व्यक्ती जी डाँ .असू शकते..नजर ठेवायला सांगीतली.
  "आय वाँट अेव्हरी सस्पेक्ट ईन फ्रंट आँफ मी..व्हू ईज डाँक्टर मे बी..."
    अंधारात बाण सोडून दिनेश ने आता परेश कडे मोर्चा वऴवला.तो अधिकचं अनक्वांशस होत होता.तोच मागोमाग दिलेल्या पत्यावर डाँ.सय्यद...अंब्युलंस घेऊन आले.
           त्यांनी वेळ न लावता अँटि बेंझोडियाझेपीन डोस आणला होता...तो परेशच्या ऊजव्या मानेत दिला.आणी अँब्युलंस मधे हलवून त्याला आँक्सिजन मास्क लावला होता...
     तोवर मनोहर ही आला होता.अँब्युलंस निघाली.दिनेश ने झाला प्रकार मनोहरला सांगीतला.तो अर्थातच चकीत झाला होता.
           पण एक वेगळी चमक त्याच्या चेहेर्यावर आता आली होती.त्याला दिनेश ला काही सांगायचे होते...जे त्याने नोंद केले होते..
        पाचव्याच मिनीटाला जीप तिथेच ,काँस्टेबल कडे देऊन..तिथला अेरिया सिल करायला सांगून..दिनेश मनोहरच्या ईस्टिलो मधे बसला होता.आता मनोहर त्याला काही सांगत होता...
       ईकडे खूनी हातून निसटला होता..जरासाठी..पण कितीवेळ..?खुन्याच्या मते परेश मरणार होता.. .           काही तरी क्ल्यु समोर येत होता...मनोहर आता दिनेश ला सर्व सांगणार होता जो त्याचा अंदाज होता.....
        अँब्युलंस मधे परेश ला साधारण शुध्द आली पण आली आणी लगेच गेली...तो पुन्हा बेशुध्द झाला होता.पण मास्क काढायची खुण करून तो..डाँ.रशीद ना काही सांगत होता...
      ती..वाचवा.....ती.. वाचवा......
     काय बोलत असेल परेश ...ती ला वाचवा की तीच्या पासून वाचवा...
     पुन्हा प्रश्न ...पुन्हा...सारं अर्धवट...ऊत्कंठा वाढत चाललेली...
     निर्माण झालेल्या प्रश्नांची ऊत्तरे मिळायला वाचा ...
             अनाकलनीय..
        भाग ..पाचवा व अंतीम
ऊद्या याच वेळेला...

क्रमश:

मनोज नागांवकर
@मनोज नागांवकर

Circle Image

Manoj Nandkumar Nagaonkar

Engineer

Nothing special Abt me