अनाकलनीय भाग ३

रहस्यकथा

अनाकलनीय
                भाग ३ रा

      मागील भागाची लिंक कमेंट बाँक्स मधे देत आहे.
       मागील भागावरून क्रमश:

       मनोहरने मोबाईल खाली ठेवला त्याच्या दुसर्याच क्षणाला अपर्णा म्हणाली...
    "बच्चू,आपण पोस्ट पाँड करूया..ट्रिप..आपली महाबळेश्वरची..??"
     त्यानेही आढेवेढे घेतले नाहीत.ऱाकेश जरी मित्र नसला तरी अखेरीस अेक माणूस म्हणून आणी अस काही विचित्र त्याच्या बाबतीत घडल्यावर ,आपण बाहेर फिरायला जाणे...जरासं त्याला विचित्र वाटलं.कारण परेश ने त्याला जे नंतर सांगीतल होत ; ते अतिशय भयानक होतं..
    परेश म्हणाला होता..की मन्या अरे खून म्हणजे तस कऴलंच नाही की खून आहे ते.अेक सिव्हियर अँटँक आला अचानक.तेंव्हा तो त्याच्या फार्म हाऊस मधे होता.मुख्य म्हणजे कामासाठी अेक जोडपं आहे..त्यांनाही याने अगेदरच अेक दिवसाची सुट्टी दिलेली.बरं ,सि सि टिव्हि तर हल्ली असतोच..पण नेमका त्याच वेळे च्या दरम्यान तो हि बंद केला होता.पर्यायाने सोबत त्याच्या कोण होत..हे कळायलाच मार्ग नाही.पण नक्की कोणतरी होतं..
    जेंव्हा मनोहरने त्याला विचारल तूला असं का वाटतय मग की खूनच आहे..कूणीतरी सोबत होताच त्यावेळी..?
    त्यांनतर जे परेश ने ऊत्तर दिले ते ऐकून खरतर मनोहर टेंस झाला होता.तो आता हे सर्व संभाषण अपर्णा ला सांगत होता.
   "अर्पे..अगं..त्याच्या बाँडिचा जेंव्हा पि.एम्.केला..तेंव्हा त्यात डाँ.ना काही टँब्लेटस् चे ट्रेसेस मिळाले."
    "बेन्झोडियाझेपीन"..नावाची अेक टँब्लेट असते.ती शक्यतो झोपेवर किंव्हा सायकाँलाजिकल ट्रिटमेंट मध्ये वापरली जाते.तर त्या टँब्लेटस् चे अेक्सेस डोस अेकावेळी घेतल्याचे..डाँ.ना लक्षात आले."
     "आणी मूळ म्हणजे..तो ह्या टँब्लेटस् कधीच घेत नसे.म या आल्या कूठून..?त्या टँब्लेट्स..त्याला त्यावेळी दिल्या गेलेल्या थम्स अप्..मधून दिल्या गेल्या.व अेक ग्लास साँफ्ट ड्रिंक मधे म्हणजेच त्या थम्स अप् मधे दहा टँब्लेट्स टाकल्या गेल्या असाव्यात ,असा प्राथमिक अंदाज आहे."
    "त्या गोळ्या पोटात गेल्या..अति प्रमाणात की..सिव्हियर अँटँक येतो.अशा वेळी माणसाचे वाचायचे चांसेस..काहीच नसतात.आणी तेच झाल याच्या बाबतीत.."
    "अेक्सेस डोस काँजेस ईन ईनक्रिजींग द हार्ट बीट्स..अँड अ सिव्हियर अँटँक आँकर्स विच हँड बीन रिजल्टेड ईन हार्ट फेल्युअर"
     "हि सर्व माहिती परेशला तपासाला असलेल्या पैकी अेका पोलीसाने दिली होती.
         हे सर्व परवा घडलं.पोलीस तपास करतायत.पण अजून धागे दोरे नाहीत काहीच.फोन काँल्स नाही की मेसेज नाही काही नाही.सर्व रेकाँर्ड तपासले जातायत.."
    " परेश जवऴच रहातोना..त्याच्या पर्ंयत बातमी यायला वेळ लागला नाही.पोलीसाची ओळख काढून त्याने ही माहीती मिळवली..."
     हे सर्व हाँरिबल होत.कोण का करेल त्याचा खून .असेल काही त्याची आपसी रंजीश...पण राहून राहून मनोहरला, काहीतरी वेगळ घडू लागलयं..असे वाटू लागल होतं.तो जरा डिस्टर्ब वाटू लागला.
   "अर्पे..तू बोलत असशील तर जाऊया..ठरल्या प्रमाणे महाबळेश्वरला..मला काहीच प्राब्लेम नाही.."
      " नको..नको..तीही जोर देऊन बोलली.अरे नंतर जाऊ..हे ऐकून मनच ऊडालं..ती फोन करून कँसल करून टाक बुकिंगं.आता काँल नको ,मेसेजच कर.."
    त्यानेही मान डोलावली.घड्याळाने दोन चे टोल दिले तेंव्हा यांच्या विचाराची लिंक तूटली.आता ते अेकमेकांच्या कुशीत जाऊन झोपायचा प्रयत्न करू लागले...होते..
        आजचा दिवस नाँर्मल नाही वाटला त्याला.वेऴेवरच तो ऊठला तसा पण डोळे झोंबत होत..रात्री दोन सव्वा दोन वाजले झोपायला...काय चार पाच ला ऊठणार..?वाँशरूमला जाऊन आल्यावर तो लगेचच परत झोपला.आज नको काही..आरामच करतो.अपर्णाही झोपेच्याच भरात होती.
     आता सहा वाजले मग ऊठायला पाहीजे..असा विचार करून ते दोघोही ऊठले.आवराआवर सूरू झाली.नास्टा टेबलवर मांडला गेला...झालाही खाऊन..पण विचार तेच चालू होते.राकेश तसा अपर्णाच्या गावातलाच.विद्यालयीन शिक्षण अेकाच काँलेजातून घेतलं आणी तंत्र शिक्षण ही..फक्त तो..मनोहर च्या वेळेला..चूकीच वागला होता..त्याने दोघांची दिशा भूल केली होती. .पण आज.. तो या जगात नव्हता..
        मनोहर हाँटेल कडे निघाला तेंव्हा त्याच्या मोबाईलवर काँल आला.सेव्ह नव्हता नंबर पण ट्रू काँलरवर काही नाव ईंडिकेट होत होतं..ऊचलला तर तिकडून आवाज आला..
  " ईज धिस अपर्णाज हँजबंडस् नंबर..?"
"यस्..मि.नागवेकर धिस ईंड..टेल मी ..व्हू ईज धीस...?"
   " मी ईन्स्पेक्टर दिनेश म्हात्रे बोलतोय..टेमघर पोलीस स्टेशन मधून..मे आय टाँक विथ अपर्णा  नागवेकर...?"
   त्याने विचारांच्या तंद्रितच फोन अपर्णाकडे दिला.पोलीसांचा फोन आपल्याला का..?आमचा काय संबंध...?
          ती पाच मीनीटे बोलत होती.थोडि टेंस वाटायला लागली होती.फोन ठेवल्यावर मनोहरने प्रश्नार्थक मुद्रेने तीच्या कडे पाहीले..ती बोलू लागली..
      " मनोहर ,मला जस्ट चौकशी साठी बोलावलेय..तिकडे...त्यांच म्हणण आहे..की गावातलाच..माणूस मयत झालाय...काही माहीती हवी होती येऊन जा.."
    "चल मग..जाऊया आपण..मी हाँटेलवर फोन करतो.आज येत नाही.तिकडे काकी वगैरे आहेतच बघून घेतील.चल..जाऊन येऊ.."
    तीने ही होकारार्थी मान डोलावली.
    आता त्यांची ईस्टिलो ,टेमघर ..सासूरवाडी वजा पोलीस स्टेशनच्या दिशेने लागली होती...
     "दिड वाजलाय...पहिले लंच घेऊया की डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊया..?"त्याने विचारले.
   "नको ,मला तर भूकच नाही..तू जेवतोस का..तर मीही..नाहीतर पहिले काम करूऩ घेऊ"
     त्याने तडक गाडी पोलीस स्टेशन कडे वळवली.
     पुढच्या पाचव्याच मिनीटाला ते पो.नि.दिनेश म्हात्रे..यांच्या केबीन मधे होते.ओळख सांगीतली गेली.
     काय करतो ,कूठे असतो..वगैरे वगैरे झालं.दिनेशने काँफी आँफर केली.दिनेश यंग ईंस्पेक्टर होता.बोलायलाही चोख व मूद्देसूद होता.
" काँफि चालेल पण विदाऊट शूगर..व अेकच कप..बसं.."
"ओके.."दिनेशने आँर्डर दिली बाहेरच्या काँस्टेबलला.
तो बोलू लागला..."बघा..मनोहर राव..मला हैच विचारायच होत.अपर्णा मँम च व तूंमच लग्न ईतक्या वर्षांनी झालं...मी माहीती काढली.का लेट झाला.?? काय कारण ??आणी कोण कारणीभूत होता या मागे.??मला सगळं माहाते.
कसं कळलं विचारू नका..??मी पोलीस आहे.आमचं खबर्यांच नेटवर्क मजबूत असतं.आतल्या आतली बातमीही आम्ही बाहेर काढू शकतो."
   "तर मला सांगा..खुप राग असेल ना या राकेश वर तूमचा..ईतकि वर्ष याच्या मुळे खराब झाली.मी असतो ना ,नागवेकर..तर या राकेशला विष घालून ठार मारला असता..म्हणजे..मी तरी असंच केल असतं..
     तूम्हाला काय वाटतं...??"
       या अनपेक्षीत हल्ल्याला मनोहर तयार नव्हता.तो व अपर्णा अेकमेकांकडे पाहू लागले.
"सर काय म्हणायचय आपल्याला..?"
दिनेश हसला.."मला अजून तरी काहीच नाही म्हणायचयं...पण मला तूम्ही परवा संध्याकाळी सहा ते आठ परंयत कूठे होतात..याचे सर्व डिटेल्स द्या.."
   तोच काँफी आली होती..
"घ्या घ्या..काँफि..घ्या..नागवेकर"
दिनेश आता पोलीसी भूमीकेत आला होता.मगासचा मैत्रीपणा कूठे गायब झाल्यासारखा वाटू लागला.
...मनोहर ने काँफि घेतली.अपर्णा नकोच म्हणाली होती.
   "सर..मी परवा या वेऴेला माझ्या हाँटेलवर होतो.माझा मोबाईल नंबर आहेच.तूम्ही लोकेशन मिळवालंच.आणी गरज वाटल्यास मी त्या वेळेस ,मीच काय माझी पत्नीही.. त्या वेळेस तिकडेच होतो..याचाही मी पुरावा देऊ शकतो.."
   "मनोहर राव,रागाऊ नका आम्हाला आमचं काम करावं लागतं.तूम्ही दोघांचाही नंबर ईथे लिहून द्या..गरज पडली तर मी तूमच्या हाँटेलवर य़ेईन...जेवायला????????..चालेल ना??"
      " आणी हो..सर..हे प्रकरण संपेतोवर प्लिज कूठे जाऊ नका."
    मनोहर ला मान डोलावल्या शिवाय पर्यायच नव्हता.
  " सर तूम्ही माझ्या वर संशय घेताय?अहो..अनेक वर्षांनी आलयं सूख..का मी नको ते ऊपद्व्याप करत बसू..त्याच्या मुळे आम्ही विभक्त झालो मान्य पण हे ईतकही मजबूत कारण नाहीये हो..की आम्ही त्याचा मर्डर करू.."
   '"असो ,,कायद्याला आम्ही नेहमीच सहकार्य करू...काही वाटल काँल करा.कूठेच जाणार नाही आहोत आम्ही..."
  दिनेश...ऐकत होता..अेकेक बोलणं त्याच्या कुशाग्र नजरेने टिपत होता..
 "या सर तूम्ही..गरज लागली तर काँल करू.."
      पुढच्या पाचव्याच मिनीटाला दोघेही घरी निघाले होते.त्यांच्या ईस्टिलोने आता कूठेच न थांबता डायरेक्ट घरिच जाऊन जेवायचं असं ठरवल होतं..
       दोघेही खूप थकले होते.तो दिवस तसाच गेला होता..लंच लेट घेतला होता मग रात्रीचे डायेट फूड आज स्किप करून दोघेही लवकर आवरून झोपायच्या तयारीत होते....डोळा लागला तेंव्हा भिंतिवरिल घड्याळाच्या दहाच्या टोलकडेही त्यांचं लक्ष नव्हतं...
     ईकडे पो नि.दिनेश म्हात्रे..जोराने तपासाला लागला होता .राकेश चे काँल डिटेल्स खंगाळले गेले.कूठे काय लिंक मिळतेय का पाहीली गेली.ईतर दुश्मनी चा अँगल पाहीला गेला..घरगूती वाद किंव्हा अन्य काही..पण लीड काहीच मिळत नव्हती...
    मग त्याने मोर्चा मेडीकल कडे वऴवला...
     शहरात दहा बारा मेडीकलस् होते."बेन्झोडियाझेपीन "या टँब्लेटस् ची कूणी नजिकच्याकाळात विक्रि केलेय का..?कोण्या डाँक्टरांनी प्रिस्क्राईब केलेली का...?याची चौकशी केली गेली.
   सर्व प्रयत्न निष्फळ होत होते.झालाय तर खूनच..! व तोही या टँब्लेटस् नेच केलाय.. हे ही नक्की होतं.
      मेडिकल मधे चौकशी दरम्यान दिनेश ला कळलं होत की या गोळ्यांना तर भारतात काही ठिकाणी बँन आहे.मग या कशा अव्हेलेबल झाल्या.शहरातील डाँक्टरांची भेट घेतली गेली.काही लिड मिळतोय का..प्रयत्न केले गेले.नंतर सिसि टिविच्या फुटेजचा किस पाडण्यात आला.अगोदर च्या कित्येक तासांचे फुटेज पहाण्यात आले..खून झाला होता परवा.. म्हणजे १७ मे च्या संध्याकाळी सातच्या दरम्यान.कोल्ड्रिंक ची बाँटल व अेक ग्लास..त्यावरही ठसे नाहीत .फक्त व्हिक्टिमचेच(मयताचे) ठसे होते.खून्याने त्याचे लिलया पुसले होते.
      काँल डिटेल्स हि काहीच दाखवत नव्हते खास.मनोहर ,अर्पणा ..दोघांचेही काँल डिटेल्स व लोकेशन तपासली गेली.पण हताशते व्यतिरिक्त काहीच येच नव्हते हातात.मनोहर व अपर्णा दोघेही खरच बोलत होते..हे आता दिनेश ला पटू लागलं होतं.
      कदाचित वेगळा अंँगल असेल मर्डरचा.काहीतरी सुटतय आपल्या हातून.पण काय..डोक बधीर होऊ लागलं होत दिनेशचं..
   तोच त्याची ड्युटी आजपुरती संपायची वेळ झाली होती.
         आता घरी जाऊन बधीर झालेल्या डोक्या साठी छान सोडा टाकून ईंपेरीयल ब्ल्यूचे दोन मोठे नाईंटीचे पेग रिचवूया...असे ठरवून..तो आज पुरता ड्युटी आँफ झाला होता....
         मनोहर, अपर्णा..अजूनही विचारात होते.कोण करेल..?का करेल ?हे..राकेशचे काही अन्य वाद असतील..नी त्यातूनच हे सारं घडलंय..अशी त्यांची आता खात्री पटू लागली होती.कारण आपला अँगल असता..तर खूनी आपणच असतो..नी आपण तर काहीच केल नाहीये...मग विषयच संपला...
        अनेक गुंतागुंतीचे विचार त्याच्या मनात येऊ लागले.ईतक्या वर्षांनी सूख दारी आलय आणी हे काय चालू झालयं..?दोन दिवस यातच गेले.
     आता हळू हळू ते नाँर्मल होऊ लागले होते...
       पण २६ मे.ची पहाट आज त्याची फोन काँलने वाजली.तशी वेळ झालीच होती ऊठायची..पण तोच फोन वाजला...पहातो..
    तर ...ईं.दिनेश म्हात्रे...
चेहेर्यावर अनेक प्रश्न घेऊन मनोहरने काँल अुचलला.."हँलो...?सर ..या वेळेला..?"
"आय अेम साँरि...नागवेकर..ही वेऴ चूकीची आहे.पण काही घडून गेलयं व काही नव्याने घडतयं ..हे सारंच मला चूकीच वाटतय.."
   "काय झालय..सर..?"
" नागवेकर..आज पुन्हा तसदी देतोय..पोलीस स्टेशनला या..जितकं लवकर तितकं..."
"पुन्हा..?काय झालय सर..?"
"नागवेकर...राजू आगाशे...आठवतोय..??तूमचा दोघांचा काँमन मित्र..."
"हां..त्याचं काय..?"
" त्याची डेड बाँडी त्याच्या शहरा बाहेरील घरात काल रात्री..ऊशीरा मिळालेय.सिव्हियर हार्ट अँटँक.."
ईकडे मनोहर ताडकन् ऊडाला होता...तोंड वासलं होत.. अन् डोळे मोठे झाले होते...
"काय..."तो जवऴजवऴ किंचाळलाच..."राजू चाही खून.."
"हो..तोच राजू..ज्याने तूम्हा दोघांची,राकेश प्रमाणेच...दिशाभूल केली.दोघांना लांब केलं.. खोट बोलून...राकेश पेक्षा यानेच जास्त अडचणी त्यावेळेला निर्माण केल्या तूमच्यात...ज्या च्या मुळे तूम्ही ईतकि वर्ष विभक्त झालात..तोच..राजू आगाशे..."
    मनोहर स्तब्ध होता.अपर्णालाही झाल्या प्रकाराची माहीती त्याच्याकडून मिळाली होती तीची ही मानसिक अवस्था वेगळी नव्हती...
      राकेश पाटिल ...राजू आगाशे...दोघेही कारणीभूत आपल्यातील विरहाला..आणी आज ते दोघेही चार दिवसांच्या फरकाने...ठार मारले गेले होतेे..ते ही ....सेम पँटर्न ने...सेम माँडस आप्रेंडी...तीच पध्दत...कदाचीत खूनाचं कारण ही सेमच असावं...पण हे असं घडलं मात्र होतं.
     "अेक्सेस डोस आँफ टँब्लेट बेन्झोडियाझेपीन..काँजेस सिव्हियर अँटँक विच रिजल्ट ईन.....ईनक्रिजमेंट आँफ हार्ट बीट्स्...रिजल्टेड ईन हार्ट फेल्युअर....."
      अेक प्रेम कथा...फुलते नाही तोच दोन मर्डर...कोणी..?का..??.कसे..?
     काहीच समजंत नव्हतं..अनेक प्रश्न अनुत्तरीत ...
        ऊत्तरंही मिळतीलं.... विसरू नका वाचायला....
अनाकलनीय...अनाकलनीय....
      अनाकलनीय..भाग ४ था...
लवकरच.....

क्रमश :

मनोज नागांवकर
@ नागांव बीच..

🎭 Series Post

View all