Nov 23, 2020
रहस्य

अनाकलनीय भाग २

Read Later
अनाकलनीय भाग २

अनाकलनीय
                         भाग २ रा

      मागील भागाची लिंक कमेंट बाँक्स मधे देत आहे.
      मागील भागावरून क्रमश:

      पलिकडून दोनदा 'हँलो' म्हंटल्यावर ,मनोहरला भानावर यायला झालं.ईतका तो पूर्वी कधीच कशातच हरवला नव्हता.आज मनाची तयारी करून तीला काँल लावला तेंव्हाही तो जरा घाबरतच होता.ती ने काँल वर नाव ऐकल्यावर काँल कट केला तर..?
नंतर नंबरच ब्लाँक केला तर..?
वगैरे वगैरे..पण आता बाण सुटला होता....
"हँलो...कोण बोलतयं.."
तिकडून पुन्हा तोच गोड व ओळखीचा आवाज आला.
आता मात्र काही बोलाव लागणारच होतं.
"ह..ह..हँलो....अपर्णा ना...?"
"हो..अपर्णाच बोलतीये..आपण कोण..?"
"म..मी..मनोहर नागवेकर.."
तिकडे क्षणभर शांतता पसरली.निर्वात पोकळी म्हणजे काय..हे त्यावेळी दोघांनाही कळलं असेलं.
एखाद नाव अनेक वर्ष आपण विसरलोत आणी तेच अचानक अनपेक्षीत अस त्याच माणसाच्या तोंडून ऐकू यावं...हे सारं..माणसाला फ्रीज करण्यासारख असतं.
"..मनोहर...तू....?ईतक्या वर्षांनी...???कसं शक्य आहे..तूला माझा नंबर कसा मिळाला..?"
"कशी आहेस..अपर्णा..?"
आता तिकडचा आवाच भरून यायला लागला होता.सर्व काही अनपेक्षीत होत तीला...
"मी ठिक आहे रे...तू कसा आहेस..काय करतोस..आज ईतक्या वर्षांनी..?मला विश्वासंच बसत नाहीये..तूझा काँल आलाय मला..."
वाक्य संपतना ती तिकडे आसवं गाळू लागलेली याला समजायला वेळ लागला नाही.
"अपर्णा..खुश आहेस ना.."
"हं...तू कसा आहेसं...? मूलं किती आहेत तूला..?जाँब करतोस की बिजनेस..?"
हा प्रश्न अनपेक्षीत होता..त्याला..
"हा च प्रश्न मी तूला विचारायला हवा,अपर्णा..तूला किती मूलं आहेत.कसा चालाय तूझा संसार..?"
पलिकडून खिन्नतेन हसण्याचा आवाज आला...
"माझा संसार तेंव्हाच मोडला रे...जेंव्हा तू निघून गेलास..."
हे सर्व चकित करणारं चालू होतं..
त्याला रहावलं नाही..
"अपर्णा...मी का सोडून जाऊ तूला..?ऊलट..."
आता नको काँलवर तो विषय म्हणून त्याने तिथेच स्वत:ला सावरलं.
"ऊलट काय...स्पष्ट बोल..मनोहर.."
"अपर्णा त्या दिवशी मला सर्व कळल होत तूझ्या बद्दल.तूझ ठरलेलं लग्न..साखरपूड्याची तारीख...ते फोटो तूम्हा दोघांचे सोबतचे.सर्व मला माहीत आहे.."
"मनोहर..वेट काही तरी गडबड होतेय.हे बघ..मी गावी आलेय.माझी आई वारली काही दिवसांपूर्वी...आपण तसे फार लांब रहात नाही.तूला हरकत नसेल तर आपण भेटू शकतो..पण हा गैरसमज नकोय मला.."
त्याला ही ही भेट हवीच होती.वाटच पहात होता तो.
"नक्की भेटेन..पण तूझ्या नवर्याला विचारून ये.."तो जरा रागातच बोलून गेला..
    "तू ये ऊद्या आपल्या नेहमीच्या काँफी शाँप मधे..आता त्याचं नाव बदलय..पाँश ही झालेय ते..'मंगल काँफी शाँप'नाव आहे.तूला यायला तरी तासभरच वागेल माझ्या मते..मी पंधरा मीनीटांत येऊ शकेन.बोल..चालत असेल तर ऊद्या सकाळी १० पर्यंत ये..मी वाट पाहीन.."
       भेटीचा निष्कर्ष काहीही असो..आता तशीही वेळ गेलेय.तीचा संसार असेल मुल बाळ असतील.पण निदान ईतक्या वर्षांनी ती दिसेल तरी..तो आनंद माझ्यासाठी कशाहूनही जास्तच..
    त्याला 'हो'बोलायला वेळ नाही लागला.भेट ठरली होती.तो आता आतुर होता.
     सकाळ झाली.सकाऴ कसली त्याची नेहमी पहाटच होत असते.साडेचार पावणे पाच हि त्याची ऊठायची वेळ.मग फ्रेश .. ब्रश..वगैरे आटोपलं की दिड तास जीम..हे अगदी नो अेक्सक्युज सारख ठरलेलं असायचं.पण आज त्याला झोपच आली नाही.कधी अेकदा पहाट होतेय नी मी वाटे कडे लागतोय..अस झाल होतं.आता कसा बसा जीम ऊरतयकला होता.अंघोऴ दिवा बत्ती करून निघाला तो.तोच आईने हाक मारली.
"किती वाजेतोवर येशील..?"
"आई ..येतो...तूम्ही वाट नका पाहू..आज जरा लेट होईल.."
पहिल्यांदाच खोट बोलला होता तो आज घरी.पण ईलाजही नव्हता..
    आणी फायनली आठवाजताच त्याची ईस्टिलो ,हायवेच्या दिशेला लागली होती.लाईट ब्ल्यु कलरचा शर्ट ,त्यावर ब्लँक जीन्स..नेहनीचा ड्युओ...ठेवणीतला गाँगल..आणी आवडीच गाणं...त्याची ईस्टिलो..भरधाव वेगाने काँफि शाँप कडे धावत होती..
 ' हि वाट दूर जाते..स्वप्नांमधील गावी..माझ्या मनातला का..तेथे मिळेल रावा...हि वाट....'
   हे ठेवणीतलं गाणं ,बरं का..त्याचं..तो अेकटा असला की हेच गाण वाजवतो.आजतर या गाण्याला निमित्तच मिळालं होतं.
    कचकचीत ब्रेक दाबत त्याने राईट टर्न घेतला..पार्किंग लाँट मधे कार निनासायास ऊभी झाली.तो वेळे अगोदरच आला होता.अेकदा आरशात पाहीलं..केस सावरले...गाँकल चढवून तो गाडीतून ऊतरला.कारच दार बंद होताच ..टाँक टाँक..दोनदा आवाज आला.आता कार लाँक झाली होती..
       "मंगल रेस्टाँरंट.."कीती बदल झालाय.मी काँलेजला होतो १७ वर्षांपूर्वी तेंव्हा अेक छोटीशी टपरी होती.पण तरि निट नेटकी.अपर्णा सोबत काँफि..दिवसांतून दोनदा व्हायची.अेकच कप ते दोघांत प्यायचे..परत अेक कप मागवायचे..परत अेकातच दोघे..वेटरही त्यावेळी. पहिल्यांदा बावरायचा...
   "अरे घ्या ना अेकदम दोन कप..सारख का मला फेर्या मारायला लावताय.."अस अनेकदा बोलायचा...मनात.
          आज ते हाँटेल रेस्टाँरंट झाल होत.ईथून जवऴच विद्यपिठ होत.ईतक्या वर्षांत तो आज पहिल्यांदाच आला होता.ती गेली सोडून..काँलेजही संपलं होत.परत त्या आठवणी नकोत..म्हणून तो पुन्हा कधीच आला नाही ईथे.पण आज तो आला होता....पण ती कूठे होती..अजून..
      मनोहरने आत जाऊन बेताचं अेकांतातलं टेबल रिजर्व्ह केलं.आता नऊ झाले होते.तासभर..?अजून तास भर वाट पहावी लागेल..?ईलाज नाही..टायमींग तर १० चंच ठरलं होतं.आपणंच लवकर आलो..तोच तीचा फोन आला...
"मनोहर..निघालास का..?मी केंव्हाच निघालेय पोहचेन आता पाचच मिनीटांत..जरा लवकरच आले...."
आता बाकी तो अेकदम..खुशच झाला.वाट नको पहायला.ती ही माझ्या सराखीच लवकर आली.पाचच मीनीटातं येतेय....
मग मी बाहेरच थांबू का...?
की आतच वाट पाहू..?
चलबीचल चलबीचल...
तोच त्याने लांबून अँक्टिव्हा पाहीली..आणी ....तीला..ही...
अजूनही तेच सौंदर्य..तोच निरागसपणा..डोळ्यांवर गाँगल..अंगात ब्लँक व्हाईट ड्रेस...आज किती तरी वर्षांनी तो तीला पहात होता..आणी हरवत होता...

      धडधड वाढली त्याची
      तीला दुरवर येताना पाहून
      पण आता काहीही होऊदे
      तो आज होता पक्कं ठरवून..

       तो पुढे झाला..दोघे समोरा समोर आले..सारं जग क्षणभर जागच्या जागी थीजलं होत त्याचं..आज ईतके वर्षांनी....पुन्हा ते दोघं अेकमेकांना पहात होते....
    दोन मिनीटं पहाण्यातचं गेली.मग कूठेतरि हायवेवर कोणीतरी कचकचून ब्रेक मारल्याच्या आवाजाने ते भानावर आले.
"हाय..मनोहर.."ती भरले डोळे लपवू शकली नाही..की हा नाही..
"हाय..अर्पू..."

 ईतक्या दिवसांनी पहायची तूला
 तर अेकट्या डोळ्यांचं काम नाही
 अशी डोळे भरून पहाताना तूला
 मी नखशिखांत अुरायचो नाही..

      दोघेही हरवले होते....अेकमेकांत.आता जर दोघांचेही बीट्स मोजले असते..तर बियाँड लिमिट असते...
     अखेर दोघेही सावरले..नाईलाजाने...
"बस.."तो तीला खूण करत म्हणाला.."काय घेशील..?"
"काँफी...?"
"यस्...आणी विदाऊट शुगर..राईट..??"
तीने मान डोलावली..
काँफि आली...पण दोन कप..
आता बोलायला सूरूवात केली त्याने.
"अर्पू. .त्या दिवशी मला मारायला आपल्या विद्यापिठात मुलं आलेली..तूझ्या गावातली.."
"काय....."तीला हे सारं अनपेक्षीत होतं..."काय बोलतोयस तू..?कोण व का आलेलं...तूला का मारायला.."
तो सांगू लागला...काँफी पीत पीत..आज तो सारा भूतकाळ तीच्या समोर मांडणार होता..
   "तो..राकेश पाटिल का कोण आला होता..मला म्हणाला...तूला समजत नाही??अपर्णाचं माझ्या अेका नातलगा सोबत लग्न ठरलय.तू का तीच्यावर प्रेम केलंस.त्यांचा साखरपुडा ठरलाय...तूझी हिंमत कशी झाली...तीच्या सोबत प्रेम करायची..अस बोलून त्याने हात ऊचलला..माझ्या कानाखाली मारणार..तोच माझ्या मित्राने तो हात तिथेच पकडला..बसून बोलूया..म्हणाला.."
     ती स्तब्ध होऊन ऐकत होती.आज मनोहर सारं मन तीच्यासमोर मोकळं करणार होता.
        "अपर्णा.."तो मला म्हणाला.."तू माज्या सोबत टाईमपास करतेयस.तूज लग्न ठरलय.मुलगा दुबईस रहातो.तिकडे कामाला असतो."
         मी हे ऐकून गार पडलो होतो.माझ्या अपर्णाने मला फसवलं..?मी ब्लँक झालो होतो.तोच त्याने तूमचे पिक्स दाखवलें.तू तूझ्या होणार्या नवर्याच्या बाजूला ऊभी होतीस.हे बघ म्हणाला..
"तीचं लग्न आता दिवाळीत आहे.साखरपुडा पंधरा दिवसांत आहे.आता दोन दिवसांत तूझं काँलेज संपतेय .अेकदा परवा गेलास की पुन्हा यायच नाही .तीला सुखाने जगू दे.तू तीला काय सूख देणार .ती बघ आता किती श्रीमंतीत जाणार आहे.तीच्या लेखी तूझी किंमत शून्य आहे.तू पुन्हा तीच्या वाटेला येऊ नकोस.हे फोटो बघ नी काय ते समजून जा.."
"त्याने तूझ्या साखर पूड्यासाठी छापलेली अेक छोटिशी पत्रिकाही दाखवली.
     पंधराच दिवसांनी तूझा साखर पूडा होता.राकेश ने मला सर्व सांगीतल ..अन तो निघून गेला...
     मग मी काहीकाळ शांतच होतो.पण ठरवलं अेकदा तूला भेटायचं.समोरासमोर विचारायचं.गेले दोन महिने आपलं होते ते काय होतं..प्रेम की टाईम पास..?
    मग मी माझा मित्र राजूला पाठवलं तूज्याकडे माझ पत्र घेऊन.मोबाईल आता आले.तेंव्हा कसले मोबाईल नी कसल काय..
तो आला काहीवेळाने व म्हणाला "मन्या तीला तूला भेटायच नाही.तो राकेश खर बोलत होता.सर्व ठरलय तीच.."
  आता मी  खचलो होतो.तूला भेटायचच नाही.माझ पत्रही तू झिडकारल होतस..मग मी परतीचा मार्ग धरला..तो आजवर चालतोय ...
   हे सारं ऐकून..ती स्तब्ध् झाली होती.
"  मन्या..हो सार खोट आहे.लग्न व साखरपूडा ठरलेला...पण तो माझ्या मनाविरूध्द..मला तूला सार सांगायच होत.पण मला तोच राजू ...आपला काँमन मित्र..म्हणाला..
        "मन्या तूज्या सोबत टाईम पास करतोय.त्याच लग्न तिकडे ठरलय.तो तूला खेळवतोय."
दोघांचेही डोळे भरू लागले होते.
पण ती बोलतच होती..
         "माझ्या घरावर त्या मुलाचे काही ऊपकार होते.मला फोर्स झाला.कर्तव्याची जाणीव केली गेली.की मला त्याच्याशी लग्न करावच लागेल..वगैरे.त्यात तू ही नव्हतास.राजू च्या म्हणण्या प्रमाणे तूला मला आता भेटायच नव्हतं.तूझ लग्न ठरलं होतं..मला काहीच संधी ऊरली नव्हती .लग्न करणं भाग बनल होत .तरीही अेक दिवशी मी डेरींग करून तूज्या रूम कडे वळले.समोरा समोर भेटू .तरच मला विश्वास बसेल नाहीतर नाही..मी वळले तर राजू न जाणो कूठून आला.मला म्हणाला.
        "..मन्या..रिजल्ट घेऊन गेला कधीच गावी.तूला सांगीतलाय निरोप..मूव्ह आँन..माझ करियर व लग्न ठरलय.."
आता मी खचले..मागे फिरले..घरि आले.लग्नाला नाईलाजाने होकार दिलाच होता..पण तोच माझा मामा आला.त्याने सर्व ओळखलं मनातलं...म्हणाला काळजी करू नको पोरी...
त्याने ,त्या मुलाने जी काही आर्थीक मदत केलेली..ती स्वत:च्या खिशातून परतवली.रक्कम मोठी होती पण मामा खमका होता.त्याने मला वेळेवर येऊन नको असलेल्या लग्नातून सोडवली होती.तो मूलगाही सर्व ऐकून व समजून घेऊन बाजूला झाला होता.."
      "त्यानंतर तू ही नव्हतास.तू तूझ्या आयुष्यात सुखी..मग मी का ढवळाढवऴ करू..हा विचार करून मी पुण्यास गेले.तिथे ईंजिनियरींग काँलेजला लेक्चरर म्हणून लागले.आज १७ वर्ष मी जाँब करते..रोज तूला आठवते..."दोघांचे डोळे आता न थांबण्यासाठी वाहत होते.
"पण..मनोहर..मी तशींच राहीले रे..तूझ्या शिवाय माझ्यावर कूणाचाच हक्क नाही.मी आजवर लग्न नाही रे केलं..."
आता मनोहर...असल्या ठिकाणी थिजला होता..काय बोलाव कळत नव्हतं त्याला..अपर्णाने लग्न केले नाही...नी मी काय काय विचार करत होतो..हीच्या बद्दल..ईतकं तीने फेस केल..नी मी तीच्या वर आरोप करत राहीलो...स्वत:चीच आता त्याला लाज वाटू लागली होती..
    तीने बळेच हूंदके आवरले.."असो मनोहर..जे झाल तेंव्हा ते आज क्लियर झाल.माज्या बद्दल मनात गैरसमज ठेऊ नको रे..मी फक्त तूझीच होते आणखी कोणाचीच नाही..तू आता जा..तूझा संसार आहे..सूखी रहा..जमल तर कधी आठवण काढ माझी.."ईतक बोलून तीने बोलणं बंद केल आपलं.
   आता मनोहरची पाळी होती.
"काय.गं तो राजू आगाशे व राकेश पाटील..तूझ्याच गावतला ना..?काय करतात आता कूठे असतात..?"
"कशाला आता...झाल आता संपल सार..नको ते जूनं परत..तू जा सुखी रहा.जा.."
"असा कसा राहू सूखी..?या दोघांनी आपल्या आयुष्याची वाट लावली.अुगाचंच तूझ्या होणार्या नवर्याच्या सांगण्यावरून आपल्यात दुरावा व गैरसमज निर्माण केले..आपण दुर झालो..आयुष्याची वाट लागली आपल्या..नी मी यांऩा सोडू..?म्हणतेस..?"
"मग काय करणारेस..आता.
पण तरी ऐक राजू तिथेच कंस्ट्रक्शन चा बिजनेस करतो.आणी राकेशची मोठी शेती आहे.दोघेही गावातच रहातात..आणी यांना फितवणारा तो मुलगा बाहेर गावी असतो."
      "...पण काय खोट बोलला तो राजू..तूझ लग्न ठरलय हे फक्त सांगीतल त्याने काय चूकला तो.."
"खुप चूकले ते दोघेही.तू रूम कडे आलीस तेंव्हा तरी मी कूठूच गेलो नव्हतो..मी रूममधेच होतो.याने बाहेरच्या बाहेर तूला अडवली..आणी हो..माझ लग्न वगैरे काहीही ठरलं नव्हतं...नी आजही मी अलोनच आहे...तूझ्या सारखा.."
आता अपर्णाची शाँक व्हायची पाळी होती.
".म्हणजे. मनोहर...तू...?तू..लग्न नाही केलस अजून..???"
"नाही बाबू.. तूझ्या शिवाय..मी ही कोणाचाच नाही गं.."
     आपण वाळवंटातून चालत असाव आणी अचानक समोर रस्ता दिसावा..तिथे गार पाण्याची विहीर दिसावी..अन लागूनच आपल्या घराकडे जाणारी बसही असावी..अस झाल्यावर जस वाटेल तस आज या दोघांनाही झालं होते...
डोळे दोघांचेही आसवांना चींब होते.विश्वास बसत नव्हता...जे होतय त्याच्यावर...
    पण हे खरच होत होत..आज सतरा वर्षांनी गैरसमज पर्यायाने मळंभ दूर झालं होतं...दोघेही अेकमेकांना सर्वस्व मानून अेकमेकांसाठी तसेच राहीले होते......आणी आज ते पूर्वीचे कपल पुन्हा अेकमेकांसमोर ऊभे ठाकले होते...
       काही वेळ गेली.आता ते सावरले होते..अपर्णाने अचानक विषय काढला.."मन्या...लग्न करशील..?"
ओह् हो हो.....काय बोलू नी काय नको...की आहे तिथे ऊभा राहून नाचू...असा त्याला प्रश्न पडला होता...नाही बोलायला चांसच नव्हता...
    "हो.....हो....हो .हो...हो....बास..हो.....यस् आय विल मँरि यू..डू यू...बाबू.."

        अितकी वर्ष लोटली
        तो अध्याय संपून 
        पण त्याचा हट्टंच असां 
       की तीला यावं लागलं परतून

    बस ...आता काय हव होत..दोघेही थांबलेले अेकमेकांसाठी व पर्यायाने त्यांचो नातलगही.अपर्णाचे आई बाबा वारले होते.मामाच काय तो तीला वडील होता..आणी मनोहरचे आई बाबा तर काय...कधीचेच वाट पहात होते...
       पुढच्या हालचालींना वेळ असा लागवाच नाही.पुढिल पंधरा दिवसांत मनोहर व अपर्णा यांचा शुभ विवाह..वैदिक पध्दतीने पार पडला होता....
     अपर्णा ने त्यांच्याच काँलेजात लेक्चरर साठी अप्लाय केल होत.तीला सासरहून ते जवऴही पडणार होत...अनुभव तर १७ वर्षांचा होताच..तीला नकार आला नसताच...
     आता सर्व काही सेट होत.दोघेही स्वर्ग सुखात होते.मनोहरच्या मित्रामुळे हे दिवस परत आले होते.तो त्याला कधीच विसरू शकणार नव्हता..
     गेला आठवडा भर मनोहर काहीच लिहू शकला नव्हता..लग्नाची गडबड..अपर्णाचं येण...हे त्याला स्वर्गासमान होत्..दोघेही खुप खुश होते.आजवर जगलेलं कल्पना विश्व आता त्यांना प्रत्यक्षात जगायला मिळत होतं..अपर्णा अेक आदर्श स्त्री,पत्नी व सखी तसेच अन्नपूऱ्णा सिध्द होत होती..
    आता अेक आठवड्या नंतर मनोहर ने काही लिहायला घेतलं होतं..अपर्णाने हाक मारली.."बच्चू..ये ना रे झोपायला..वाजले पहा किती..मला झोप नाही यायची तूझ्या शिवाय..."
"आलो..बबे...होतच आल..अग मी ब्लाँग्स व कथा लिहीतो..मन..वर..आज काही दिवस लिहीलच नाही गडबडीत..दुपारी घेतलेल लिहायला..समथींग स्पेशल..बरेच दिवसांनी...ते होतच आलय..मला पाचच मिनीटे.दे..आलोच.."
"अोके..बच्चू .ये लवकर.."
आता अेकमेकांना बबे..नी बच्चू...शिवाय हाक मारण..त्यांना कठीण जाऊ लागलं...
मनोहरला हातातल लिखाण पूर्ण व पोस्ट करून..लँप्टाँप ठेऊन अपर्णाजवळ जायला...तरि मोजून दहा मीनीटे लागली होती.          
       आता दोघेही अेकमेकांच्या मिठित होती...प्रणयाच्या धुंदित...त्यांना अकरा वाजल्याचे भान नव्हते..आणी ती धुंदि ऊतरायला दोन ..तीन ..कीती वाजणार होते....याचेही भान असणार नव्हते...
       अशा अनेक गोड रात्री त्यांच्या रंगू लागल्या होत्या.सार काही स्वर्गासमान चालल होत..कसलीच काहीही कमा नव्हती..
आदर्श पती पत्नी आपलं आदर्श आयुष्य जगू लागले होते..
    त्या दिवशी सकाळी मनोहर म्हणाला..."बबे..चल..महाबळेश्वरला जायच..?फिरायला...हानिमून...?"
"आपला ईथे सध्या काय हनिमून कमी चालाय..????????" ती हसत म्हणाली..
पण याने ठरवलच होतं.जायचच..तीलाही नको कूठे होतं...??
"चल..की बच्चू..पण अिकडे आई बाबा..व बिजनेस..यांच्याकडे दुर्लक्ष होणार नसेल.. तर चल.. मी रेडी..."
     ठरल तर मग .सर्व सेट केल याने .आई बाबांची परमीशन लगेच मिऴाली..म्हणाले परमीशन देतोय पण वर्षात पाळणा हलला पाहीजे...
"ईश्य...म्हणून...अपर्णा लाजतच रुमकडे पळाली..."
लग्नांनतर जवऴजवऴ महिना भराने ते ऊद्या महाबळेश्वरला निघणार होते...
बुकिंग कनफर्मेशन झाली..मनोहर आँनलाईन अँडव्हांस पाठवत होता...तिकडच्या हाँटेलला..पण नेमक नेटवर्क गेलेलं...मग त्याने काँल लावला..म्हणाला..
   "नेट नाहीये..गूगल पे होत नाही..पण ऊद्या येतोय..आँन दे वे पैसे पाठवतो सकाळी.."
"चालतय की..सर..या.तूम्ही..मी मस्त डिलक्स रूम रेडी ठेवतो."
     आता सर्व सेट होतं..दोघेही ऊद्या सकाऴी हनीमूनला निघणार होते..
      आजची काय ती रात्र मधे...मग चार दिवस ...मस्त मनसोक्त.....फिरणार होते..ते...डोळे मीटायला लागले..होते आता..नाही म्हणाला रात्रीचे बारा झालेच..सर्व आवरायला त्यांना...आणी पँकिंग करायला...
     बेडवर पडणार तोच..मनोहरचा काँल...वाजला...
   आता..?यावेळेला..?
दोघेही आश्चर्यचकीत होते..आता कोणाचा फोन...??
    त्याने अधिरतेने फोन पाहीला तर परेशचा काँल होता..तोच मित्र ज्याच्या मुळे आज हे पुन्हा भेटले होते.....
"हँलो..पर्या...काय...रे..ईतक्या लेट..सर्व ठिक आहे ना..??
पलिकडून परेश गंभीर आवाजात बोलत होता...
"मन्या...तूला राकेश पाटील आठवतोय??ज्याने तूमच्यात पहिला खो घातला..??"
"हो..त्याचं काय आत्ता..अरे.."
"मन्या...त्याचा खून झालाय...!!!"
     क्षणभर सर्व शांत होतं...
अनाकलनीय.....घडल होत...हे..
    का..कोणी..कसा..??
अनेक प्रश्न ऊभे राहीले होते...
ऊत्तर कोणाकडेच नव्हते..
मनोहर व अपर्णा स्तबध होते..
      खून...खून...खून...
 अुत्तर नक्कीच मिळतील सर्व प्रश्नांची...फक्त थोडं थांबावं लागेल...
      अनपेक्षीत आलेल्या सुखात..हा अनाकलनीय विषय कसा आला...व यात कोण गुंतेल का..?की संसार तसाच बहरत राहील..?की काही वेगळ घडेल..?
      वाचत रहा..पुढिलभाग लवकरच...
    अनाकलनीय....भाग ३रा..

क्रमश:

मनोज नागांवकर
@नागांव बीच

Circle Image

Manoj Nandkumar Nagaonkar

Engineer

Nothing special Abt me