Jan 22, 2021
Love

अनाकलनीय भाग १ ला

Read Later
अनाकलनीय भाग १ ला

अनाकलनीय
                       भाग १ ला

       आज तो खुप खुश होता. लागोपाठ सातव्या आठवड्यानंतरही तो याही आठवड्यात 'मन'या ब्लाँगींग साईटवर ,ब्लाँगर आँफ द विक होता.गेल्या ३ वर्षांपूर्वी तो या आभासी जगात आला.तोवर तो व त्याचं हाँटेल ,ईतकंच त्याचं जग होतं.अनेक नातलग ,मित्र मंडऴी बोलायचे , "अरे..मनोहर ,स्मार्ट फोन घे हो अेक..तू काय तो अफोर्ड करू शकत नाहीस का..?ईतकं कमावतोस...घे की एक आणी कर सोशल मिडिया ला जाँईन." हा सुध्दा ,हो हो ..करायचा.कूठे वेळ होता त्याला..हे सर्व करायला.विकेंड म्हंटलं की याला जेवायला ,झोपायला की श्वास घ्यायला वेळ असा मिळायचाच नाही..काम अेके काम..बस्...काहीतरि सल घेऊन तो जगत होता.पण जगत होता...लोकांनाही वाटायचं अेक गोष्ट सोडली तर हा सूखी आहे..काहीच कमतरता नाहीये..याच्यात.आता ३६ वया पर्यंत लग्न न होणं म्हणजे काही अगदीच वेगळं नव्हतं.करेल..अजूनही वय गेलेलं नाहीये त्याचं.पण मनावरच घेत नव्हता तो.आई बाबा..नातलग..सर्वांनी समजावलं पण लग्नाचं सोडून बोला...ईतकंच तो बोलायचा.
       असाच कालावधी सरत चालला होता.गेल्याच विक मध्ये त्याने ३६ शी पार केली होती.त्यांचचं औचित्य साधून त्याच्याच लहान भावाच्या बायकोने..जीला तो आपली लहान बहीण मानायचा..अेक मस्त ओप्पो चा स्मार्ट फोन गीफ्ट केला होता.हा नको नको म्हणत होता.पण "आता घेतलाय..मला माहीत नाही .तो वापर तू आता दादा..."तीनेही हट्ट धरला..
       मग काय..अशा रितिने मनोहर च्या हातात अेकदाचा स्मार्टफोन येऊन पडला.मग हळू हळू त्यातील फिचर्स..वापरण्याची पध्दती त्याने समजाऊन घेतली.वेळ लागला तसा समजायला..पण अेक सुशिक्षित अभियंत्याला हे शिकायला कितीसा वेळ लागतोय...?फारतर अेक विक..बस..हाँटेल कडे तसच व तितकच लक्ष देत तो आता स्मार्ट फोन हाताळणं शिकला होता.विकेंड झाला की आता स्मार्ट फोन सोबत वेळ घालवणं ,आता नित्याचं झालं त्याला.
     हाँटेल चांगल नावारूपास होतं बरं का त्याचं.शुन्यातून विश्व केलेलं निर्माण त्याने.आता कामाला कूक ,काही बायका...तसेच सर्व्हिंगला व साफसफाईला असे मिळून त्याच्याकडे १०ते १२ लोकांचा स्टाफ होता.बर बीच वरचा बिजनेस म्हंटल्यावर अेक टूमदार काँटेज होत ते वेगळंच.बरं खर्च ही विशेष नव्हता...पैसा अडका चांगला सांभाळीन होता तो.कमी काहीच नव्हती..होती ती अेेकंच...संसार..त्याचा अजून संसार फुलला नव्हता.लग्नच करायला तयार नव्हता.
      तशी जेंव्हा वेळ होती लग्नाची तेंव्हा ती सोडून गेलेली त्याला.कूठे गेली..का गेली..?लग्न केल होत का तीने ?काय झाल तीचं..??
      काहीही माहीत नव्हतं.फक्त काही समोर खरे वाटणारे पुरावे ,मित्रांनी(?) आणून पुढ्यात ठेवले होते त्याच्या.तीचं म्हणे दुसर्यावर प्रेम होतं..तो बाहेर गावी रहातो.पैशासाठी ती तूला सोडून गेलेय.ती नुसता टाईमपास करायची तूझ्या सोबत...अस अनेक रितीने त्याला समजावलं वजा पटवल गेल होत.त्यालाही मित्रांनी समजनून दिलेले..दाखवलेले पुरावे पटले होते.तीचे त्या बाहेर गावी असलेल्या मुलासोबतचे  फोटो ,त्याने पाहीले होते.हां..त्यात अश्लीलता अशी नव्हती काहीच पण सोबत फिरतानाचे..असे फोटो होते त्यात.जवऴच्या काँमन मित्रांनी ,तीच्या व याच्या..सांगीतलेली स्टोरी वजा तीची अपडेट..सर्व हेच सांगत होती की तीने याला फसवल होतं.पैशा साठी...प्रेमाला झूगारलं होतं.त्याने ही शहानीशा करायचा प्रयत्न केला.पण ती भेटलीच नाही.मग तीच्या वरिल आरोपांना पुष्टिच मिळत गेली.हा खचत चालला होता.पण काही वेऴंच..
         नंतर बारा वर्ष त्याने मागे वळूंन पाहील नाही.कामात झोकून दिल.तीची आठवण यायची पण आता त्याने ते वऴंण केंव्हाच मागे सोडले होते...(?)निदान लोकांना तरि असं वाटायचं....

    तो म्हणे जिवंत होता
    असं लोकं बोलत असायचीं
    त्यालाही वाटायची गंमत
    लोकं ईतकं कशी फसायचीं

           तरं..असं चालू होतं...त्याचं..यातच वय ३६ आलं.सर्वांचे प्रयत्न फसले होते.हा लग्नाला तयारच नाही कधी झाला.त्याच्या मते त्याचं मन तीच्याकडेच राहील होत.आता मन नाही जवऴ तर लग्न केल्यावर कूणाशी प्रेम तरी कसा करणार..?आणी प्रेम नाही करु शकलो तर संसार कसा करणार..?मग ते राहीलं.
       नंतरची ३ वर्ष तो बिजनेस तर छान सांभाळतच होता.पण आता मोबाईल त्याच्या आयुष्यातील अेक अविभाज्य घटक बनला होता.त्या मोबाईल मुळे तो आता सोशल मिडीयाशी जूडला होता.त्यातच त्याच्यातील सुप्त गुण ऊभरून समोर यायला लागले होते.
        लवकरच तो अेक नावाजलेला चारोळी कार व रहस्य कथा लेखंक म्हणून नावारूपास येऊ लागला होता.त्याच्या चारोळ्या लोकांना भुरळ पाडू लागल्या होत्या.मार्मीक ,सामाजीक ,प्रेम ,विरह चारोळ्या तो अगदी ताकतीने लिहायचा.नुकतेच त्याचा अेक चारोळी संग्रह ही प्रकाशीत झाला होता.
आणी आता तो रहस्य कथा लिखाणाकडे वळला होता.त्याचे फँन फाँलोवरस् वाढत होते.अनेक लोक त्याला ओळखू लागले होते.
     त्यातंच त्याने आता ही 'मन' नावाची वेबसाईट जाँईन केली होती.ज्यात त्याचे वेगवेगळ्या विषयाचे ब्लाँग्स येऊ लागले होते.अल्पावधीतच तो प्रसिध्द झाला.अेका अेका ब्लाँगला दोन दोन हजार लाईक्स येऊ लागले होते.पाच लाखावर व्ह्यु मिळत होते.
       आयुष्य बदलत चालं होतं.बिजनेस व साहीत्य लेखन हा अेक आता आयुष्याचा घटक बनला होता.अेखाद विकला जर त्याचा लेख आला नाही तर लोकांचे लगेच त्याला मेसेज यायचे.आम्ही वाट पहातोय सर...टाका लवकर...वगैरे वगैरे...
      असं सर्व चालू होतं.आणी आजतर त्याला सलग सात आठवडे मन या वेब साईटवर ब्लाँगर आँफ द विक ,मिळाला होता...तो खुप खुश होता...
       आज तो सकाळीच हाँटल वर आला होता.रूटीन चालू होतं.विकडे असल्याने तो तसा फ्रिच होता. दोन दिवसांपूर्वी विकेंड जा लोड खुप होता.अनेक पर्यटक जेवायला रहायला होते त्याच्याकडे...पण आज तो तसा मोकळा होता.
    तोच मोबाईलवर त्याच्या रिंग वाजली.आता कोण म्हणून पाहील तर त्याचा जूना मित्र होता.त्यानेही लगेच काँल ऊचलला.
"मन्या...अरे आहेस कूठे..कसा आहेस मित्रा..."
"परेश यार मी मस्त रे ..तू कसा..वहिनी मुलं कशी आहेत..?"
अेकमेकांची चौकशी झाली.मग तिकडून परेश बोलू लागला..
"मन्या ..अरे...काल मला गावात 'ती' दिसली होती...अपर्णा...????"
अस काही ऐकायला मिळेल अस बिलकूल वाटलं नव्हतं..त्याला.आपण रात्री जेवल्यावर फिरायला म्हणून बाहेर पडावं आणी अचानक थंडी पडून ती गुलाबी असल्याचा भास होऊन..अेक शिरशिरी ऊरात जावी...असं काहीस त्याला वाटलं...
"पर्या....प्लिज..मी ते वऴण केंव्हाच मागे टाकलंय रे..नको आता परत..."
"ठिक मित्रा ...पण तूझी ईच्छा होती..तीने असं का केल हे समजून घ्यायची व खर खोट शहानिशा करायची...बघ नं ..कर प्रयत्न...खर काय ते तरी समोर येऊदे..."
"हे बघ मन्या..तू माझा जूना निव्वळ मित्र नसून जिवाभावाचा आहेस.मन जाणतो तूझं...काँल कर तीला..मी नंबर मिळवलाय..रे..तुली सेंड करतोय..बघ वाटलं तर काँल कर..नी काही वाटलंच तर मला हाक मार...मी मदतीला तयार असेनं"
पलिकडून फोन ठेवला गेला.
शांत असलेल्या किनार्याने भरती ओसरून गेल्यावर...काहीकाळ समाधान भोगत असावं आणी अचानक वादळ समोर ऊभं ठाकावं..असं त्याच्या बाबतीत होऊ लागलं...
काय करावं...??काँल करावा..??
की नको...??
काय आता ऊपयोग...??तीच ल्गन होऊन अनेक वर्ष झाली असतील..
पोरं बाळं असतील...अशा परिस्थितीत आपण. निव्वऴ आपल्या स्वार्थासाठी तीला डिस्टर्ब करावं...हे त्याला पटत नव्हतं...
पण मनही वेड मानत नव्हंत..
तसा अेकही दिवस आजवर तीच्या आठवणीं वाचून गेला नव्हता.ती नव्हती तरी तो त्या दोघांचं कल्पनेतल विश्व रोज रंगवायचा.आमचं ही जग असतं.दोन गोंडसं मुलं असती.नावही त्याने कल्पलेली..सागर व प्रिया...
किती छान व गोंडस नावं 
तो रोज यातच रमायचा..
पण आज शांत नितळ तऴ्यावर कोणीतरी काठी मारली होती...
ऊगाचंच मन दुभंगलं होतं...
दोन दिवस याच विंवचनेत गेले.
आणी आज अखेर त्याने निर्णय.घेतला.मन व बुध्दि यांच्यात दोन दिवस मोठं भांडणं झालं..
विजय अर्थातच मनाचा झाला.दुपारी काँल करू असं ठरवलं त्याने.
आता तो मन..वरती ब्लाँग लिहत बसला...आज अेक रहस्य तथा टाकायची होती.
तो नेहमीच पोस्ट करताना ,हे सर्व काल्पनिक आहे. व सर्व पात्रही खोटी असून त्यांची नावही तशीच काल्पनिक आहेत..अस आवर्जीन नमूद करायचा.तो त्याचा ठरलेलं पँटर्न असायचा.आजही असंच त्याने केलं...
अपेक्षेप्रमाणे त्याचे लाईक्स चालू झाले.लोकं वेड्यासारखी त्याच्यावर प्रेम करायची.त्याचं साहीत्य वाचायची.
          आता हे सर्व बाजूला सारून त्याने ठरवलेलं करायला घेतलं....
आता तो तीला काँल करणार होता... 
  जवळ जवऴ १७ वर्षांनी तो तीचा आवाज ऐकणार होता.आणी आवाज ऐकल्यावर तो त्यातंच गुंगणार होता.
काय बोलेल ती ओळखेल का मला..?
ओळखलं तरी ...बोलेल का..?
की का फोन केलास अस बोलून कट करेल फोन??
अनेक प्रश्न होते...पण आता त्याने ठरवलेलं..की करायचाच काँल..काही झालं तरी...
हो...करणारचं मी...
तरी ४ वाजलेच..नंबर डायल करायला घ्यायला...
हात थरथरत ,मन अधीर...घामाच वर्चस्व..देहावर..आणी सर्व प्राण कानात गोळा
...त्याने नंबर डायल करायला सूरूवात केली...
८१.........
रिंग आता तिकडे वाजत होती.
     प्रत्येक रिंग सोबत हा..अधीर व अस्थिर होत होता.
आणी अखेरीस तिकडून काँल ऊचलला गेला...
तो गोड आवाज ,ईतक्या वर्षांनी...आजही तसाच...मन गारद करणारा...त्याने अखेरीस ऐकला.
"हँलो...."

      तो अधीर होता जन्माचा
      असे काही शब्द ऐकायला
      हां..थोडा काळ सरला..
     आपण अजून जिवंत आहोत हे कळायला...

       काय होईल...पुढे..अपर्णा बोलेल का त्याच्याशी..की आजही गोष्ट १७ वर्षांपूर्वीसारखी अधुरीच राहीलं..??
      वाचायला विसरू नका...
           अनाकलनीय..भाग २ रा

क्रमश:

मनोज नागांवकर
@ नागांव बीच...

Circle Image

Manoj Nandkumar Nagaonkar

Engineer

Nothing special Abt me