Login

अनघाची तप्तपदी ( भाग 6 )

डिलिव्हरी कधीही होऊ शकणार होती . विनयने फोन करून आई , बाबा आणि अंजूला बोलावून घेतलं .पण टेन्शन मुळे अनघाच बीपी वाढलं , त्यामुळे आता सिझरियन करणं शक्य नव्हतं . डॉक्टर आणि घरचे सगळेच काळजीत होते . आई बाबांना बघून अनुला धीर आला . आता सगळं ठीक होईल अशी तिच्या मनाने ग्वाही दिली . आई , अंजू , विनय , मम्मी , सरिता सगळ्यांच तिच्या जवळ होत्या . तिला धीर देत होत्या . चार दिवस अनघा हॉस्पिटल मध्येच होती . हळुहळु तिचं बीपी नॉर्मल होऊ लागलं होतं .' उद्या सकाळी अनघाची डिलिव्हरी करू ' असं डॉक्टरने सांगितल्यावर मम्मी म्हणाल्या " उद्या नाही आजच झाली पाहिजे डिलिव्हरी . उद्या चांगला दिवस नाही . काहीही करा आणि आजच माझ्या नातवाचा जन्म झाला पाहिजे ."


डॉक्टरने दोघांना बसायला सांगितलं . अनघाची धडधड वाढत चालली होती . तीचं गर्भाशय बाळाला नॉर्मली जन्म देण्यासाठी सक्षम नाहीये असं डॉक्टर ने सांगितलं . बऱ्याच ट्रीटमेंट घ्याव्या लागतील . मुलं होण्याची शक्यता होती पण खूप त्रासदायक ट्रीटमेंटचा सामना अनघाला करावा लागणार होता . खर्चही खूपच होणार होता .

घरी येऊन विनयने मम्मी पप्पाना सगळं सांगितलं . पप्पा काही बोलले नाहीत . मम्मीने नेहेमीप्रमाणेच अकांड तांडव सुरू केलं .
" काय रे देवा माझं नशीब ? एकुलता एक मुलगा आणि सुनेचं हे असं . बघ माझ्या मुलाचा दोष काढत होतीस ना आणि आता बोल की . तुझ्यातला हा इतका मोठा दोष आम्ही का स्वीकारायचा ? ते काही नाही मला नातू हवा . मी त्यासाठी विनयच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुद्धा ठेवलीय . तुझी सगळी थेर चालवून घेतली ती काय हा दिवस बघण्यासाठी ? तिच्या ट्रीटमेंटच्या खर्चापेक्षा दुसर लग्न केलेलं परवडलं . " मम्मीचे बोल अनघाच्या काळजाला खोलवर रुतत होते .

" अग काय बोलतेय तू ? काही कळतंय का तुला ? आधीच दोघं इतक्या टेन्शन मध्ये आहेत आणि हे काय लावलय तू ? गप्प बस . त्यांना ठरवू दे काय ते . आणि पैसा कमवायला ते समर्थ आहेत . अनघा विनयपेक्षा कितीतरी जास्त कमावते हे विसरलीस वाटतं . " पप्पा म्हणाले .

" मम्मी खरंच हे काय बोलते आहेस तू ? तुला धक्का बसला हे मान्य आहे पण म्हणून ही भाषा ? अग करूया आपण ट्रीटमेंट . होईल सगळं नीट . तू शांत हो बघू आधी ." विनयने मम्मीला समजावले .

अनघाला खूप धीर आला . कितीही खर्च झाला , त्रास झाला तरीही ट्रीटमेंट नक्की घ्यायची हे तिने मनोमन ठरवलं .विनय साथीला होताच .

दुसऱ्याच दिवशी तिला प्रमोशन मिळणार असल्याची बातमी मिळाली . ती आता \" हेड ऑफ द डिपार्टमेंट \" होणार होती आणि तिचा पगारही दीडपट होणार होता . या बातमीने सगळेच सुखावले .

अनघाने लगेचच ट्रिटमेंट सुरू केली . डॉक्टरच्या वाऱ्या सुरू झाल्या . प्रमोशन मिळाल्यामुळे अनघाच्या कामाचा बोजा खूप वाढला होता . आणि तिला ट्रीटमेंटचा खूप त्रास होऊ लागला होता . सोबत मम्मीचे टोमणे चालूच असायचे .कधीकधी खूप असह्य व्हायचं पण इलाज नव्हता .

आई , बाबा , अंजुची तिला खूप आठवण यायची पण आता तिला जाणं शक्य नव्हतं .

अनघाचा त्रास दिवसेंदिवस वाढतच होता . नुसती तळमळ व्हायची . आराम करावा तर नोकरीही सोडनं शक्य नव्हतं .
अनघाच्या धावपळीमुळे तिचं विनयकडे थोडं दुर्लक्ष झालं होतं . त्यामुळे त्याची तब्येत बिघडली . त्याचाही दोष मम्मीने अनघालाच दिला .

बिचारी अनघा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होती . आई बाबांना काही सांगणं शक्य नव्हतं . उगीच ते जास्त त्रास करून घेतील म्हणून ती \" सगळं छान सुरू आहे \" असच त्यांना सांगायची .

आई बाबा अनेक उपास तापास करत होते . कितीतरी नवस त्यांनी अनघाला बाळ होऊ दे म्हणून बोलले होते .

सगळं फळाला आलं आणि जवळ जवळ दोन वर्षांच्या अवघड ट्रीटमेंट नंतर अनघाला ती \" गोड बातमी \" मिळाली .अनघा आई होणार होती . सगळीकडे आनंदी आनंद झाला . विनय अनघा तर आनंदाने न्हाऊन निघाले .

अनघाने आता फक्त आनंदी राहायचे ठरवले . मम्मीचे टोमणे सुद्धा आता कमी झाले होते . नातवंडांच्या आगमनाची बातमी त्यांनाही सुखावून गेली होती .

अनघाची धावपळ सुरूच होती पण त्यासोबत ती आता स्वतःची काळजी व्यवस्थित घेत होती . सगळं सुरळीत सुरू होतं .

एक दिवस अचानक अनघा कॉलेजला जाताना चक्कर येऊन पडली . नशीब ती घराजवळच होती . सगळे घाबरले . ताबडतोब डॉक्टरला बोलावण्यात आले .
" अनघाच एक्सरशन खूप होतं आहे म्हणून विकनेस मुळे चक्कर आली तिला . ही औषध सुरू करा . तसं काळजीचं कारण नाही पण ट्रिटमेंट मुळे आधीच तिला खूप त्रास झालाय . आता तिची तब्येत खूप नाजूक झालीय . तिला खूप जपायला हवं . तिने आता पूर्ण बेड रेस्ट घ्यायला हवी . कमीत कमी हालचाली हव्यात सगळ्यांनी काळजी घ्या तिची " डॉक्टर म्हणाल्या .

" अनघा आता नोकरी सोडून दे बरं . तुझी तब्येत महत्त्वाची . तुझ्यामुळे माझ्या नातवाला काही झालं तर याद राख . विनू उद्याच तिच्या कॉलेज मध्ये जाऊन तिचा राजीनामा देऊन ये . " मम्मी म्हणाल्या .

" हो ते तर करावच लागेल . अनु तू काळजी करू नकोस . मस्त आराम कर . आपलं बाळ एकदम हेल्दी झालं पाहिजे ह . घरीही पूर्णवेळ बाई लावून टाकूया का मम्मी ? तुला एकटीला झेपणार नाही सगळं . " विनय म्हणाला .

" त्यापेक्षा मी माहेरी जाऊ का आई बाबांकडे ? तसही जॉब आता सोडावा लागणार . मी विचारले डॉक्टरला , अजून पंधरा दिवसांनी मला तितका प्रवास करायला काही हरकत नाही म्हणाल्या त्या . " अनघाने तोडगा काढला .

" अच्छा म्हणजे आधीपासूनच प्लॅन होता का तुझा तसा ? ते काही नाही तुझी डिलिवरी माझ्या नजरेसमोर व्हायला हवी . तिथे ते लोक तुझी नीट काळजी घेऊ शकले नाहीत तर ? माझ्या नातवाला काही झालं तर ? ते काही नाही . मी समर्थ आहे सगळं करायला . वाटलं तर बाई लावुया . सरुही आहेच की . मी नीट काळजी घेईन तिची . " मम्मी म्हणाल्या . इतक्या वर्षांनी घरात पाळणा हलणार होता त्यामुळे कुठल्याही गोष्टीची रिस्क घ्यायची त्यांची तयारी नव्हती .

आता अनघा पुढे कुठलाच पर्याय नव्हता . नोकरी सोडायची तिला आजिबात इच्छा नव्हती . इतकी चांगली नोकरी पुढे कशी मिळणार ? शेवटी काही झालं तरी तिला तिच्या आत्मसन्मान टिकवायचा होता . तिने कॉलेजमध्ये फोन करून सगळी परिस्थीती सांगितली . डीन मॅडम खूप चांगल्या होत्या . अनघाची जिद्द , तिची हुशारी , कामाप्रती तळमळ त्या ओळखून होत्या . अनघाला सहा महिने मेटर्णीटी लिव्ह मिळणार होती .

डिलिव्हरीला जवळ जवळ सहा महिने बाकी होते . त्यामुळे बाळाला नंतर लगेच सोडून कामावर जाणं अनघाला शक्य नव्हतं . तिने आपली अडचण सांगितल्यावर डीन मॅडमने एक उपाय सांगितला . " हे बघ अनघा , सहा महिने तर तुला मेटर्निटी लिव्ह पूर्ण पगार देऊन मिळेल . नंतर तीन महिने तुला बिना पगारी रजा आम्ही देऊ शकतो . त्यानंतर तू जॉईन हो . पण तू जॉब सोडू नयेस असं खरंच मला वाटतं . सध्यातरी तू ॲप्लिकेशन पाठव आणि रजा घे . पुढचं पुढे बघुया . काळजी घे स्वतःची . काही मदत लागली तर नक्की सांग . "

डीन मॅडमच्या बोलण्याने अनघाला खूप धीर आला . डोळ्यात आनंदाश्रू तरळले . सध्या तरी जॉब सोडायची गरज नव्हती आणि पगारही चालू राहणार होता .

मम्मी अनघाची व्यवस्थित काळजी घेत होत्या . नातवंडांच्या लालसेने त्या सगळं आनंदाने करत होत्या .
पण आता अनघाला वेगळीच काळजी लागून राहिली होती . मम्मीना नातू हवा होता . ते तर तिच्या हातात नव्हतं . पण जर मुलगी झाली तर ? तिला तर छान गोड मुलगीच हवी होती . देवाच्या मनात काय होतं कोणास ठावूक . पण सध्या मात्र ती आनंदात होती . आपल्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी जे जे काही करता येईल ते ती करत होती . डॉक्टरांचे सुद्धा रेगुलर चेकअप सुरू होते .

विनयची तब्येत पुन्हा थोडी थोडी बिघडू लागली होती . अनघा त्याला काळजी घे म्हणून परोपरीने विनवत होती . मम्मीचे पूर्ण लक्ष फक्त अनघाकडे होतं . आता त्यांना नातवांच तोंड बघण्याची घाई लागली होती .

अनघाचे आई बाबा येऊन भेटून गेले होते . अनघाची इतकी काळजी घेणारी सासू बघून आईचं मन निर्धास्त झालं .
अनघाला खूप त्रास व्हायचा . हे बाळंतपण तितकं सोपं आणि सहज नसेल याची कल्पना डॉक्टरनी आधीच दिली होती . सगळेजण डोळ्यात तेल घालून अनघाची काळजी घेत होते . त्यामुळे तिचा त्रास तिला सुसह्य होता .

नक्की मुलगाच व्हावा यासाठी मम्मीने देवाला साकडं घातलं होतं तर बाळ हेल्दी व्हावं आणि अनघाची सुखरूप सुटका व्हावी यासाठी तिच्या आई बाबांनी .

अनघाने आणि विनयने बाळासाठी नावं विचार करायला सुरुवात केली होती . मम्मीने तर \" श्रीपाद , राजवर्धन , सोहम \" अशी नावे निवडून ठेवली होती .

एके दिवशी रात्री अचानक अनघाच्या पोटात खूप दुखायला लागलं . सकाळपर्यंत बरं वाटेना तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिला चेक करून डॉक्टरांनी एडमिट व्हायला सांगितलं .

डिलिव्हरी कधीही होऊ शकणार होती . विनयने फोन करून आई , बाबा आणि अंजूला बोलावून घेतलं .
पण टेन्शन मुळे अनघाच बीपी वाढलं , त्यामुळे आता सिझरियन करणं शक्य नव्हतं . डॉक्टर आणि घरचे सगळेच काळजीत होते . आई बाबांना बघून अनुला धीर आला . आता सगळं ठीक होईल अशी तिच्या मनाने ग्वाही दिली .

आई , अंजू , विनय , मम्मी , सरिता सगळ्यांच तिच्या जवळ होत्या . तिला धीर देत होत्या . चार दिवस अनघा हॉस्पिटल मध्येच होती . हळुहळु तिचं बीपी नॉर्मल होऊ लागलं होतं .
\" उद्या सकाळी अनघाची डिलिव्हरी करू \" असं डॉक्टरने सांगितल्यावर मम्मी म्हणाल्या " उद्या नाही आजच झाली पाहिजे डिलिव्हरी . उद्या चांगला दिवस नाही . काहीही करा आणि आजच माझ्या नातवाचा जन्म झाला पाहिजे ."

मम्मीच्या बोलण्यावर सगळेच चिडले . हा जीवाशी खेळ होता . आधीच अनघाची तब्येत नाजूक होती .

शेवटी डॉक्टरांनी मधला मार्ग निवडला आणि रात्री उशिरा डिलिव्हरी करायची ठरवली .

सगळ्यांचा आशिर्वाद घेऊन अनघा ऑपरेशन थिएटरमध्ये गेली . सगळेजण मनातल्या मनात देवाचा धावा करत होते .
तासाभरातचं जोरात \" ट्याहा \" ऐकू आलं आणि नर्सने बाळ बाळंतीण सुखरूप असल्याचं सांगितलं .
सगळ्यांनी देवाचे आभार मानले , एकच जल्लोष केला ...
पण नक्की काय झालं होतं मुलगा की मुलगी ?
0

🎭 Series Post

View all