अनघाची तप्तपदी ( अंतिम भाग )

ऑपरेशनची तारीख ठरली . विनयच्या टेस्ट सुरू होत्या . आता अनघालासुद्धा टेस्टसाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागणार होतं . पण तिला वेगळीच शंका येऊ लागली होती . अनघा डॉक्टरकडे गेली आणि तिची शंका खरी ठरली . अनघाला दिवस गेले होते . हा खरंतर चमत्कारच होता . पण याचा आनंद होण्याऐवजी तिला खूप दुःख झालं . ती ओक्साबोक्षी रडू लागली . आता तिला विनयला किडनी देता येणार नव्हती . सगळं जुळून आलं होतं पण आता काहीच इलाज नव्हता . आता लवकरात लवकर दुसरा डोनर शोधावा लागणार होता . नाहीतर अनघाला अबोर्शन करून घ्यावं लागणार होतं . इकडे आड तिकडे विहीर अशी अनघाची अवस्था झाली होती . अनघा देवाचा धावा करत होती . चिमुकली परीसुद्धा बाप्पाला विनवत होती . विनयच ऑपरेशन लवकरात लवकर करावं लागणार होतं . डोनर मिळत नव्हता . शेवटी अनघाने काळजावर दगड ठेवून अबोर्शन करण्याचा निर्णय घेतला . आणि तितक्यात हॉस्पिटल मधून फोन आला . अनघाला ताबडतोब बोलावण्यात आलं . आता अजून नवीन काय उद्भवल म्हणून घाबरतच अनघा हॉस्पिटलमध्ये पोचली.
अनघा तडक विनयच्या घरी निघाली . दारात पाय ठेवते तो मम्मीच्या जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला .
" इतकी मोठी घोडी झालीस तरी अक्कल नाही तुला . आईवर गेलीस पूर्ण एकही काम जमत नाही ? इतका महागडा फ्लॉवर पॉट तोडलास ? नीट पुसायला येत नाही ? ते काही नाही . फार लाडावंलं आहे तुझ्या मम्माने . आता सरळ करते तुला ." असे म्हणून मम्मीने उगारलेला हात वरच्यावर कोणीतरी पकडला .

" मम्मी हे काय चालवलं आहेस तू ? लाज वाटत नाही का तुला ? एवढीशी पोर ती , तिला काम सांगतेस ? आणि आता तर हात उगारलास ? हे चालणार नाही . शांत हो बाळा . तुला कोणी काही करणार नाही . डॅडी आहे ना " विनयने मम्मीला सुनावले आणि घाबरलेल्या परीला जवळ घेतले .

अनघा घरात आली . घडलेला प्रकार बघून तिचा संताप झाला . विनयचे वागणे बघून तिला समाधान वाटले . मम्मीकडून तर तिने चांगले वागण्याची आशाच सोडली होती . अनघा काही बोलणार इतक्यात विनय म्हणाला , " अनु , मला सकाळपासून खूप त्रास होतोय . तुला फोन करणारच होतो . डॉक्टरकडे जाऊया लगेच ."

अनघा तडक विनयला घेऊन डॉक्टरकडे आली .

" हे बघा , मी तुम्हाला आधीच कल्पना दिल्याप्रमाणे लवकरच विनयची किडनी ट्रान्सप्लांट करावी लागणार आहे . तुमच्या फॅमिलीमधून कोणी किडनी द्यायला तयार असेल तर काही प्रॉब्लेम नाही . फक्त त्या व्यक्तीला डायेबेटिस नको . बाकी टेस्ट करूच आपण . नाहीतर बाहेरचा डोनर शोधावा लागेल . तुम्ही तयारी करा आम्हीपण आमच्याकडून डोनर शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करू . तोपर्यंत डायलिसिस सुरू करावं लागेल . " डॉक्टरने सांगितल्यावर अनघाने लगेच सगळ्या फॉर्मलिटीज पूर्ण केल्या . डॉक्टरांनी डायलिसिस ची तयारी सुरू केली .

विनय खूप घाबरला होता . अनघा त्याला धीर देत होती . पण खरंतर तिचाही धीर सुटत चालला होता . मम्मी पप्पा दोघेही डायेबेटिसचे पेशंट होते . सरिताची मुलंही लहान होती त्यामुळे त्या तिघांनी किडनी देण्याचा प्रश्नच नव्हता . आता काय करावे ते कळत नव्हते. अनघाने स्वतःची किडनी द्यायची तयारी ठेवली होती . फक्त ती मॅच होण्याचा प्रश्न होता . आई बाबांना इतक्यात काही न सांगण्याचा तिने निर्णय घेतला . ते दोघेही हार्ट पेशंट असल्यामुळे त्यांना कुठलेही टेंशन देणे योग्य नव्हते . मनातल्या मनात ती देवाचा धावा करत होती. तिची सेविंग आणि फ्लॅट विकून आलेली रक्कम पुरेशी नव्हती म्हणून तिने लोन साठी ॲप्लिकेशन करून ठेवले होते . काहीही झालं तरी विनय बरा व्हायला हवा हा एकच ध्यास तिने घेतला होता .

विनयच डायलिसिस सुरू होतं . अनघाच्या टेस्ट झाल्या आणि देवाच्या कृपेने तिची किडनी मॅच झाली . लवकरच ऑपरेशन करायचं ठरलं . विनयला काही कळू न द्यायचं वचन अनघाने डॉक्टरकडून घेतलं . कोणीतरी दुसरा डोनर भेटलाय इतकंच त्याला सांगण्यात आलं होतं .

ऑपरेशन नंतर आणि आधीही खूप काळजी घ्यावी लागणार होती . महिनाभर हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं . अनघाला आता परीची काळजी लागून राहिली होती .काय करावे ह्याचा विचार करत असताना अचानक त्यांच्याकडे काम करणाऱ्या सीताबाई म्हणजे राधाची आई आल्या.त्या अगदी अनघाला मुलगीच मानायच्या. पण मम्मीच्या वागण्यामुळे अनघा दुसऱ्या शहरात गेल्यापासून त्यांनी घरी यायचं बंद केलं होतं . अनघाने राधाचं सगळं आयुष्य मार्गी लावल्याचे उपकार त्या विसरल्या नव्हत्या .

" हे काय अनुताई इतका मोठा प्रोब्लेम आहे आणि तुम्ही मला हक्काने बोलवायचे सोडून परके करून टाकले ? काल शाळेतून येताना परी भेटली आणि साहेबांचं सांगितलं मला . मी लगेच आले बघा . आता तुम्ही घराची आणि परीची अजिबात काळजीच करू नका बघा . तुम्ही आता फक्त साहेबांची काळजी घ्या . माझा मुलगाही आहे मदतीला . बाहेरची कामे करेल तो . आणि दवाखान्यात पण थांबेल . मी डब्बा करून पाठवत जाईल . " सीताबाई म्हणाल्या .

अनघाच्या डोक्यावरचा ताण आता कमी झाला होता . सीताबाई देवासारख्या मदतीला धावून आल्या होत्या .शिवाय पप्पा आणि तिचे मित्र मैत्रीणी , कलीग्ज होतेच . परीला मम्मीसोबत ठेवण्याची तिला आजिबात इच्छा नव्हती.

अनघा विनयला किडनी देणार यांचं खरंतर मम्मीला खूप कौतुक होतं . आपण अनाघाशी इतकं वाईट वागलो याचं खूप मोठं ओझं त्यांच्या मनावर होतं .

" अहो , तुम्ही परीला इकडे घेऊन या . अनघा इतकं करतेय आपल्या मुलासाठी याचं कौतुक आणि अभिमान आहे हो मलाही . काही पैशाची मदत लागली तर माझे दागिने घ्या खुशाल . आपल्या मुलासाठी इतकं तर करू शकतो ना आपण ." मम्मी म्हणाल्या .

" त्याची काही गरज नाहीये . मी तिकडे जातोय राहायला . तिकडे सीताबाई आहेत मदतीला . आम्ही सांभाळू सगळं . तुझी काही गरज नाही . आणि नंतरही मी अनघा विनयसोबतच राहणार आहे कायमचा . तू रहा मस्त मजेत एकटी . आतापर्यंत इतक्यांदा संधी दिली तुला , पण तू मात्र दरवेळी सगळ्यांना त्रासच दिलास . आता शक्य नाही . इतकी वर्ष तुला सहन केलं तेच चुकलं माझं . " पप्पा निर्वाणीच बोलले . आपल्या बायकोचं वागणं आता त्यांना सहन होणारं नव्हतं . मम्मी हवालदिल झाल्या . आपल्या नवऱ्याचे वागणे बघून त्या खूप घाबरल्या . त्यांनी पप्पांचे पाय धरले पण आता पप्पांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही . आपल्या बायकोची नाटकं त्यांना अचूक माहिती होती .

ऑपरेशनची तारीख ठरली . विनयच्या टेस्ट सुरू होत्या . आता अनघालासुद्धा टेस्टसाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागणार होतं . पण तिला वेगळीच शंका येऊ लागली होती . अनघा डॉक्टरकडे गेली आणि तिची शंका खरी ठरली . अनघाला दिवस गेले होते . हा खरंतर चमत्कारच होता . पण याचा आनंद होण्याऐवजी तिला खूप दुःख झालं . ती ओक्साबोक्षी रडू लागली . आता तिला विनयला किडनी देता येणार नव्हती . सगळं जुळून आलं होतं पण आता काहीच इलाज नव्हता . आता लवकरात लवकर दुसरा डोनर शोधावा लागणार होता . नाहीतर अनघाला अबोर्शन करून घ्यावं लागणार होतं . इकडे आड तिकडे विहीर अशी अनघाची अवस्था झाली होती .

अनघा देवाचा धावा करत होती . चिमुकली परीसुद्धा बाप्पाला विनवत होती . विनयच ऑपरेशन लवकरात लवकर करावं लागणार होतं . डोनर मिळत नव्हता . शेवटी अनघाने काळजावर दगड ठेवून अबोर्शन करण्याचा निर्णय घेतला . आणि तितक्यात हॉस्पिटल मधून फोन आला . अनघाला ताबडतोब बोलावण्यात आलं . आता अजून नवीन काय उद्भवल म्हणून घाबरतच अनघा हॉस्पिटलमध्ये पोचली.

एक सैनिक मरणासन्न अवस्थेत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता . त्याची किडनी मॅच होत होती . त्याची वाचण्याची काहीच शक्यता नव्हती . त्या सैनिकाची किडनी विनयला देता येणार होती .पण त्याचे घरचे मात्र या सगळ्याला तयार नव्हते . अनघाने त्यांना परोपरीने विनवले . हात जोडले , देवाचा हवाला दिला . पण काहीच उपयोग झाला नाही . छोटी परीसुद्धा त्यांना विनवत होती . शेवटी दोघींच्या अश्रुमुळे त्यांना पाझर फुटला आणि विनयला किडनी मिळाली .

ऑपरेशन सक्सेसफुल झाले . अनघाने त्या कुटुंबाचा सगळा खर्च उचलला . आयुष्यभर त्या सैनिकाच्या मुलांची जबाबदारी घेतली . सगळ्यांचे तिने खूप आभार मानले . देव आज डॉक्टर आणि सैनिकाच्या रूपात अनघाच्या मदतीला आला होता . पप्पा , सीताबाई , अनघाची प्रेमाची माणसं या सगळयांच्या मदतीमुळे सगळं सुसह्य झालं . मम्मीसुद्धा अगदी नीट वागू लागल्या होत्या . परीला त्यांनी अगदी छान सांभाळलं .

विनयला डिस्चार्ज मिळाला . अनघाने साश्रू नयनांनी डॉक्टरांचे आणि सगळ्या स्टाफचे आभार मानले . पप्पांनी सगळ्या स्टाफला पेढे वाटले . बक्षीस दिले . काय करू आणि काय नाही असं त्यांना झालं होतं . मम्मी पप्पा आणि परीने मिळून घर मस्तपैकी सजवल होतं . विनयला आणि अनघाला मम्मीने दारातच ओवाळून दृष्ट काढूनच घरात घेतलं . मस्तपैकी वेलकम केलं .

अनघाने विनयला ती गोड बातमी दिली . विनयला आभाळ ठेंगणं झालं . आता आपण अनघाची पूर्ण काळजी घ्यायची , तिला आजिबात दुःख होऊ द्यायचं नाही असं वचन त्याने मनोमन स्वतःला दिलं .घरात खूप आनंदाचं वातावरण होतं . मम्मी खूप बदलल्या होत्या . त्यांना स्वतःची लाज वाटत होती .

" बाळा , मला माफ कर असं कुठल्या तोंडाने म्हणू मी ? खरंच स्वतःची लाज वाटतेय मला . एक आई असूनही मी इतकी वाईट वागले . माझ्या इतक्या गोड नातीला त्रास दिला , तुझ्याबद्दल कायम कौतुक वाटत असूनही मी तुला सतत दुःखच देत राहिले . विनयसाठी तू इतकं केलंस खरंच सावित्री बनून त्याचे प्राण वाचवलेस . माफ करशील ना मला ? मी देवाची शपथ घेते आता पुन्हा कधीही अशी वागणार नाही मी . " मम्मीला अश्रू अनावर झाले होते . अनघाची हात जोडून त्यांनी माफी मागितली .

" अहो हे काय करताय मम्मी ? मी नेहेमी तुम्हाला आईच्या जागीच पाहत आलेय . आता सगळं विसरून जाऊया . " अनघा भावनाविवश झाली होती . तिला आई बाबांची खूप आठवण येत होती .

तितक्यात " सरप्राइज " म्हणून आई , बाबा , अंजू बाहेर आले . अनघा आनंदाने त्यांना बिलगली . मयलेकिंचे अश्रू अनावर होऊन गेले होते .

" विनयराव आता थांबवा हे अश्रू . नाहीतर पूर येईल बरं . आपल्याला काही पोहता येत नाही . आणि ते येणारं बाळ बिचारं कन्फ्युज होऊन जाईल . प्रसंग आनंदाचा पण घरात पूर कसा आला म्हणून " पप्पा म्हणाले आणि सगळेच हसले .

" हो खरंच . अनु कसं वाटलं सरप्राइज ? चल सगळ्यांच तोंड गोड कर बरं . आणि संध्याकाळी पूजा ठेवली आहे . आता देवाच्या कृपेने सगळं छान झालं आहे आणि पुढेही छानच व्हावं म्हणून देवाचे आभार मानायला हवेतच . आणि तू आता फक्त आराम करायचा . खूप सोसलं आहेस बेटा तू . खूप अभिमान वाटतो तुझा . आमची दुसरी नात सुद्धा अगदी मस्त गुटगुटीत व्हायला हवी बरं ." पप्पा म्हणाले .

दुसरी नात म्हटल्याबरोबर अनघा विनयने मम्मीकडे बघितलं . मम्मी परीला कुशीत घेऊन बसल्या होत्या .

" अग हो . आम्हाला दुसरी नातच हवी कारण परीला बहीण हवी आहे . मलाही माझ्या नातीच कोडकौतुक करायचं आहेच .आणि तुझं डोहाळजेवण सुद्धा धडाक्यात करायचं आहे . तुझ्या आई बाबांनाही इथेच ठेवून घेणार आहोत आम्ही आता . तू आणि विनय तुमच्या कामाचं बघा . आम्ही आज्जी आजोबा आहोतच नातवंडं सांभाळायला " मम्मीने अनघाला जवळ घेतलं .

दिवस पूर्ण भरले आणि अनघाने एका गोंडस बाळाला जन्म दिला . \" आनंदी \" च्या जन्माने घरात आनंदी आनंद झाला आणि तो नेहेमीच घरात भरून राहिला .

🎭 Series Post

View all