अन् ती हसली

अनोखी प्रेम कहाणी
अन ती हसली
राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा.
विषय- आणि ती हसली.

मेघाच्या चेहऱ्यावर आज एक विलक्षण तेज दिसत होते.
मी आजूबाजूला पहिले आणि मला उत्तर मिळाले.
मी : अग काय झाले? अशी का हसते आहेस?
मेघा : तो बघ कित्येक दिवसांनी आज उगवला.
मी : कोण मिहीर?
मेघा : हो आणि कोण?
मी : जाऊ दे ना. तो आता इथे नसतो गं.
मेघा : जाऊ दे कसं? मी किती वाट पहिली याची? याला काहीच कसं वाटत नाही.
आई : पोरींनु जरा लवकर लवकर आवरा बाई भटजी काका येतील आता.
मेघा : आई गेली का?
मी : हॊ गेली.
मी : मेघा आता खूप उशीर झालाय सगळ्याला.
मेघा : हो मला माहिती आहे.
मी : मग विसर ते सगळं.
मेघा : \"इतके सोपे आहे का? ते कविता.
मी : चूक तुझीच आहे. तू कधी बोललीस का त्याला? तुझं प्रेम आहे ते. नाही ना? मग तो तरी काय करेल?
मेघा : मी आई वडिलांचं मन दुखवायला नको म्हणून बोलले नाही. पण याने तरी माझे मन वाचायला नको होते का गं कविता?
सांग ना कसं जगू आता याच्याशिवाय? याच्याशिवाय मी कधी कोणाचा विचारच केला नाही.
मी : मग आता काय करणार आहेस? वेळ निघून गेली आहे. मेघा,आता त्याचा विचार सोड. ते बघ मुलाकडची मंडळी आली आहेत. भटजी काका अक्षताची मांडणी करत आहेत. "मेघा तू हसू नको गं"! मला भीती वाटते तुझी. तू रडून घे शेवटचे. कारण तुझ्या नव्या आयुष्याची सुरवात होतेय"
मेघा : मिहीरला कोणी सांगितले आज माझे लग्न आहे ते?
मी : कॉलेजच्या ग्रुपसोबत आला असेल.
मेघा : कविता कितीतरी वेळा हा मला हृदयावर दस्तक देऊन गेलाय गं.
मी : मग तेव्हाच विचारायचे ना?
मेघा : मी याला गृहीत धरत गेले आणि हा फक्त माझ्याकडे पहातच राहिला.
मी याने पुढाकार घ्यावा म्हणून वाट पाहत राहिले.
आणि हातातून वाळू सटकावी तशी वेळ निघून गेली.
मी : मेघा त्याची अवस्था काही वेगळी नाही गं!!
तोही आ वासून पाहतच आहे. त्याला काय करावे? समजतच नाही.
मी मगाशी त्याला बोलवण्याचा प्रयत्न केला तर तो सैर-भैर वाटला.
मेघा बघ, अजून वेळ गेली नाही. विचार करू शकतेस.
मी तुला तुझ्या प्रेमाची आहुती दे असं कधीच म्हणणार नाही.
मेघाचे बाबा : काय रं सगळं येवस्तीत हाय नव्हं काय पाहिजे हाय काय?
सजलेल्या लेकीला कौतुकाने पाहून, डोळे लपवून पुसतच बाबांनी विचारले.
मेघा : मी काही मागितले तर द्याल बाबा.
बाबा : काय पाहिजे मागुन तर बघ.
आणि दोन तोळं सोनं पाहिजे काय?
तुझा बाबा तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे.
हं .म...$ ... $
हेच!! बाबा मला काय हवं हे तुम्हाला कधी समजलेच नाही.
मेघा : बाबा तुम्ही कधी तरी कोणावर प्रेम केला असता तर आज माझ्या मनातील गुपीत सुध्दा तुम्ही ओळखला असता.
दोष तुमचि नाही दोष आहे काळाचा

बाबा मला मिहीर हवा आहे हो.
द्याल का ?...
आई -बाबा मुलींसाठी कांहीही करू शकतात.
पण तिचे प्रेम तिला नाही देणार. कारण ते त्यांना शरमेची बाब वाटते.
मुलीने स्वता:साठी मुलगा निवडने आज ही सामान्य समाजाला मान्य नाही.
मेघाचे बाबा: काय गं लेकी काय विचार करतीस?
मेघा : काही नाही बाबा असंच बोलले.
बाबा :बरं बरं आवरा बाई .
कवू काय लागल तर सांग मी हितचं हाय.
बर" काका सांगते.
मेघा :कविता बघ गं या वेड्या बापाकडे.
निर्णय बदलून कसा पाय देऊ याच्या छाताडावर.
कसा संसार मांडू याच्या भावनेच्या कफनावर.
आई- बापाच्या इभ्रतीसाठी तर गळा घोटत आहे.
मी माझ्या प्रेमाचा.
ज्यांनी मला वाढवताना खस्ता खाल्या.
माझ्या सुखासाठी तर सरकारी नोकरीचा नवरा शोधालाय.
आणि त्यांना चुकीचं ठरवून
मी निर्लजपणे मिहीरचा हात कसा पकडू.
हे कसं शक्य आहे.
मी : मेघा तुला आयुष्य काढायचे आहे.
नंतर कुढत बसण्यापेक्षा आताच विचार कर.
मेघा : कविता प्रेम म्हणजे काय असते गं?
लग्नाआधीचे शारीरिक आकर्षण?
की एकमेकांचा ऊबदार स्पर्श..... की झाडा-पेढाच्या आडोशाला मारलेल्या मिठ्या...
की नीर्लज्जपणे तोंडात तोंड घालून घोटलेली लाळ.
मी याला वासना म्हणते.
प्रेम म्हणजे एक सुंदर भावना... एक उमलती फुलबाग,
गुलाबाचे शुभ्र दवबिंदू...
प्रभातीचे पक्ष्यांचे गीत गुंजन,
सायंकाळचे मिनमिनते काजवे... माझे प्रेम ही असेच निर्मळ ... एकमेकांच्या हृदयावर उमटवलेली मोहर...
ती का पुसली जाते कधी?
नाही ना!!.
एवढंच की आता त्या सुंदर भावना.
एका कुपीत बंद करून ,
ती कुपी खोल अंतरंगात गाढून टाकायची.
जुन्या प्रेमाची कवाडे गच्च कडी कोयंड्यानी बंदिस्त करायची. पुन्हा नव्या प्रेमाची नवी दालने उघडायची. हा.. हा..हा हं....
हे आहे स्त्री जीवन....
अन् हे असे उसने हसू चेहऱ्यावर आणून जगाला विशेषतः मिहीरला सामोरे जायचे .
चल,मी तयार आहे.
आणि जेणेकरून मिहीर मला समोर दिसेल अशी व्यवस्था कर. मला त्याला हसत हसत निरोप द्यायचा आहे.
त्याला मी शेवटची हसत सासरी जाताना बघू दे.
म्हणजे तो तरी सुखात राहील. सुरूवातीला वाटेल त्याला हिने बेवफाई केली.
पण त्याला जेव्हा इतिहास समजेल.
तेव्हा तो मला माफ करेल. त्यालाही मंजूर नाही.
आई-वडीलांशी बेईमानी...
प्रेम हे फक्त राडा करून एकत्र येण्यासाठी नसते.
तर प्रेमाची आहुती देऊन जगलेल्या क्षणाना सुवर्ण तारेत गुंफण्यात जी मजा आहे.
ती एकत्र जगण्यात नाही. कित्येक वर्षांनी भेटल्यावर थरथरत्या हातानी एकत्र घेतलेला चहा सुद्धा भरून काढेल इतक्या वर्षाची उणीव.
कित्येक प्रेम विवाह करून पश्चाताप करत आहेत.
जेंव्हा जेंव्हा माझ्या प्रेमाचे दिवस आठवतील.
तेंव्हां तेंव्हा ते सुवर्णापरी झळाळतील.
आणि मिहीरकडे पाहून मोठ्याने मेघा रडली...
अन् रडता रडता समजुतीने पुन्हा हसली.
अन् त्या हसूत कित्येक येणारी वादळे गुंडाळून सोबत घेऊन गेली.
मिहीर..
उभी असेन कधी तरी
त्या समुद्रकिनारी ...
मारीन रेघोट्या मऊ सार वाळूत. लिहीन नाव तुझे....
ते फक्त लाटेलाच समजेल....
हा हा.. हं म... हं....

© सौ वैशाली शिवाजी चौगुले.
रा. बहिरेवाडी ता. आजरा जी. कोल्हापूर.