Jan 22, 2021
नारीवादी

अन मी आई झाले भाग-२(अंतिम)

Read Later
अन मी आई झाले भाग-२(अंतिम)

 

मागच्या भागात आपण पाहिले रीनाचे लग्न, अनिल व सासू यांच्या मधील असलेली कहाणी..... आता पुढे..!!

 

अनिल ला प्रमोशन मिळाले होते खरे पण तो ऑफिसच्या कामात व्यस्त होत गेला, पण या मुळे त्या दोघांत दुरावा मात्र वाढत गेला, असेच दिवस सरत होते, हसरी, बोलकी रीना गप्प राहू लागली, तिला मातृत्व हवे परत हवे होते, पण अनिल कामात व्यस्त असल्याने तो रीनाला वेळ देऊ शकत नव्हता. त्यांच्या लग्नाला पाहता पाहता चार वर्ष झाली, सासू जी प्रेमळ आई होती तिने खरे रूप दाखवायला सुरू केले, सासरे उठता बसता तिला बोलू लागले,तिचे सुखी संसाराचे स्वप्न भंगले होते, नणंद फक्त तिला साथ देत होती, ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला तिची प्रकृती खालावली....तिचे आई बाबा तिला असे पाहून दुःखी झाले, त्यांना वाटले आपली मुलगी सुखी होती म्हणून निर्धास्त होते पण आता त्यांना तिला असे पाहून यातना होत होत्या......

कारण दोन्ही वेळेला तिला गर्भपात झाला होता, या कारणामुळे सासू तिला सतत घालून पडून, टोचून बोलत असे, बिचारी रीना हताश झाली होती, या सगळ्यामुळे अनिल आणि ती दुरावत चालले होते, ती एकदम डिप्रेशनमध्ये चालली होती, सासूने तर एकदा एका कार्यक्रमात सगळ्या समक्ष तिचा पाणउतारा केला, तिच्या मातृत्वा वरून नको नको ते बोलली. अनिलला या सगळ्याची कल्पना नव्हती कारण त्याची आई त्याच्या समोर खोटेपणाचा आव आणून रिंनाची किती काळजी मी करते, किती प्रेम करते सुनेवर असे भासवत असे......बिच्चारी रीना????कोणाला हे दुःख कोणाला जाऊन सांगेल, तिने हे दुःख आई व बाबांना सांगितले, तिची नणंद हुशार होती पण आई पुढे कोनाचे काही चालत नसे????.....

शेवटी बाबांनी अनिल ला एकदा विश्वासात घेऊन त्यांच्या लेकी साठी जरा समजावले, अखेर अनिलने सुट्टी घेतली आणि रिनाला काही दिवसांसाठी बाहेर घेऊन आला, मग त्या दोघांच्या मधील दुरावा तर मिटला, नात्यांची गाडी नीट रुळावर आली होती, रिनाला नैराश्यातून अनिलच्या प्रेमानेच बाहेर काढले होते, याचा परिणाम म्हणजे रीना पूर्वी सारखी खुश राहू लागली..........म्हणून कि काय लवकरच तिला आईपणाची चाहूल लागली????

रीना तू आई होणार .......... हे एक डॉक्टरांनी वाक्य सांगितले. तिला पुन्हा जगण्याचे जसे बळ मिळाले, ती बाळाचे स्वप्न पाहू लागली ती, मी आई होणार आणि अनिल बाबा हा आनंद तिला सुखावत होता, आईपण काय असत हा अनुभव खूप सुखद आणि हर्षित करणारा असतो. अनिल तर आता तो बाबा होणार ह्या विचाराने जणू सुखावत होता, आता घरातील वातावरण बदलेल अशी खोटी आशा रिनाला होती, पण या पण अवस्थेत ती ऑफिस मध्ये जात होती, कारण घरी बसून नैराश्य येणार, त्यात अनिल पण कामाला जात होता, सासरे आणि सासू तिला तिच्या प्रेग्नेंसी वरून खुप काही सल्ला देत होते, असा सल्ला जो चांगला कमी आणि स्वार्थ पण असलेला जास्त, म्हणून रिनाला वाटायचे घरी राहण्यापेक्षा  ऑफिसमध्ये जावे किमान मन तरी रमेल.

असेच दिवस जात होते रिनाला सातवा महिना लागला, डोहाळे जेवण केले तिच्या आईने, रीना च्या चेहऱ्यावर खूप तेज आले होते, सगळ्या तिच्या आत्या, मावशी आणि चुलत सासू यांनी तिचे कौतुक केले, भरभरून आशीर्वाद दिले.........कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.
गर्भात होणारी बाळाची वाढ, हळूच मारलेली लाथ, रात्रीचे जागरण,पोटातील बाळाची लहान मोठी हालचाल रीना आणि अनिल अनुभवत होते????, आई होणे सोप्प नसते रीना स्वतः ला समजावत होती........ देवाने स्त्रीला आईपण ही सर्वात सुंदर देणगी आहे, तिचे मानणे होते..

रिना डोहाळे जेवणानंतर आई कडे राहायला आली, अनिल ला ती नसले की करमत नसे, तो काहींना काही बहाण्याने रिनाच्या माहेरी जाऊ लागला, त्याचे तिच्यावर असलेले प्रेम तिथे त्याला कायम तिच्या जवळ ओढत होते,आधीच दोन वेळा त्याच्या रिनाला गर्भपात झाला होता पण या वेळेला मात्र तो तिची काळजी अधिक घेत होता.......

एक दिवस रीना टेरेस वर होती झाडाला पानी घालत, आणि तिचा पाय पाण्यावरून घसरला व ती पडली, आई.....ग!! जोरात ओरडली, तिच्या आवाजाने बाबा व आई, बहीण धावत आले, तिला जमिनीवर पडलेले पाहून आई घाबरली, तिला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेले, अनिलला बाबांनी फोन करून परिस्थिती सांगितली, रीना खूप घाबरली होती, डॉक्टरांनी तिला ऍडमिट केले,  तिला डॉक्टरांनी तपासले,तिचे बी पी वाढले होते, बाळ सुखरूप होते, असे घरच्यांना सांगितले, अनिल ऐकून रडू आलं, बाबांनी त्याला धीर दिला, दोन दिवसांनी ती शुद्धीवर आली,डॉक्टर अनिलला म्हणाले येत्या 1/2 तिचे c- Section करावे लागेल नाहीतर बाळ आम्ही वाचवू शकत नाही, तिचे बी पी पण कमी होत नाहीय, मग ऐकून अनिल घाबरला........त्याने त्याची आई- बाबांना हॉस्पिटलमध्ये बोलावले, त्यांना सगळी परिस्थिती सांगितली,
आई म्हणाली  अरे सिझेरियन करून आईपणाच्या कळा काय कळणार रिनाला...............रिनाने व तिच्या आईने हे सगळे ऐकले, तिला सासूच्या विचारांची कीव आली व वाईट वाटले, एक स्त्री असून ती दुसऱ्या स्त्री विषयी कसे काय अस वाक्य बोलू शकते,  ती पण एक आई आहे, मग असा बुद्धीहीन विचार शेवटी रिनाचे C- section केल, तिने गोड, गोंडस मुलीला जन्म दिला..........अनिल तर वेडाच झाला, त्याला बाबा अस म्हणारी आता त्याची लेक त्याला मिळाली, त्याने देवाचे आभार मानले, रिनाला व बाळाला या कठीण मार्गातून बाहेर काढले म्हणून????????.

रिनाच बाळ व्यवस्थित होत पण रीना जिचे बी पी वाढले होते, ती अजूनही शुद्धीत नव्हती, तिला दोन दिवस डॉक्टरांनी योग्य प्रकारची औषधे देऊन, शुद्धीत आणले, तिला सुखरूप बघून अनिलला, आई बाबांना आनंद झाला, सासू व सासरे थोडे नाराज झाले, त्यांना मुलगी नको मुलगा हवा होता.....परत नकोते विचार, अडाणीपणाचा कळस, सासूने तर नातीला हात नाही लावला व रीना समोर पटकन बोलून गेली एक मुलगा दिला असता तर काय झाले असते, रिनाला हे ऐकून फार वाईट वाटले????. एक स्त्री च एका स्त्रीची शत्रू असते...इतके वाईट विचार मी आई का नाही होत? बर आई झाले तर मुलगी झाली म्हणून तोंड वाकडे?

अरे मुलगी काय किंवा मुलगा.....वाढतो तो आपल्या गर्भातच ना? नऊ महिने जो गर्भ आपल्या शरीरात असतो, ज्याची नाळ बाळ आणि आपल्याला जोडली जाते,जगातील सगळ्यात मोठं सुख म्हणजे आई होणं मग ते मूलाची असो किंवा मुलीची, जर देवाच्या या वरदानाचा आपण आदर नाही करू शकत नसू तर आपण माणूस म्हणायच्या योग्य नाही, गर्भ म्हणजे आपल्या शरीराचा एक अंश असतो, आईपण ही निसर्गाने स्त्रीला दिलेली एक देणगी आहे, मग प्रत्येक स्त्रीने ह्याचा आदर केला पाहिजे ना!!! असे रीना आईला व अनिल ला सांगत होती......

रिनाचे सारे म्हणणे व सासूचे विचार तिथल्या मावशी ने ऐकले, त्या सासूला म्हणाल्या अग पोरी तू पण एक स्त्री आहेस, मुलगी म्हणून जेव्हा तू जन्मली तेव्हा तुझ्या आई बाबांनी तुला टाकून दिले का? तस असत तर आज इथे तू नसती!! जरा विचार कर ........तू पण आई झाली ना, तुला पण मुलगी झाली ना? तू टाकले का तिला?आणि सिझेरियन होऊन आई झाली काय नॉर्मल डीलिव्हरी.......असते तर ती आईच ना......गर्भ वाढतो तिच्याच पोटात ना!! नऊ महिने नऊ दिवस ........प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हे नऊ महिने आणि मग येणारे सगळे दिवस बाळासाठी असतात, स्त्री प्रत्येक भूमिका बजावते पण आईपण कधीच संपत नाही.......असे हॉस्पिटलमधील मावशींनी सासूला सांगितल्या वर तिच्या डोळ्यात पाणी आले व तिला तिची चूक कळली, तिने रीना व तिच्या आईची माफी मागितली.......आणि त्वरित जाऊन आपल्या लाडक्या नातीला मायेने कवटाळले....... म्हणाली खरच बाळा माझे चुकले, मला माफ कर अस म्हणून तिची नजर काढली.......तिचे पटापटा मुके घेतले व तिच्या डोळ्यातून आनंदाअश्रू वाहू लागले......☺️

असे हे आईपण रिनाच्या कायम लक्षात राहिले.......

आपल्या समाजात अश्या अनेक रीना व तिच्या सासू सारख्या असंख्य स्त्रीया असतील ज्यांना अश्या परिस्थिला सामोरे जावे लागत असेल ना?????म्हणूनच आपले विचार बदला..... समाज आपोआप बदलेल..... मुलगा काय किंवा मुलगी असते आपलीच ना??  मग फरक करणे सोडा????????
रिनाने आपल्या लेकीला जवळ घेतले, तेव्हा तिला या कोणाच्या तरी कवितेच्या ओळी आठवल्या.........

!! आईपण !!

आई, आज मी सुद्धा आई झाली,
आणि नव्याने पुन्हा तुझी आठवण आली.

९ महिने ९ दिवसाने आजचा हा दिवस आला,
किती यातना, त्रास सोसूनी आज हा स्वर्गसुख लाभला.

आई होणे किती कठीण असते हे आज मला कळले,
तुझी माझ्यावरची माया आणि प्रेम हे मज आज उमगले.

आई मला तुझ्यासारखीच आई बनायची आहे,
तू केलेले संस्कार माझ्यावर, तेच आता माझ्या लेकरावर करायचे आहे.

आई, आज मी सुद्धा आई झाली,
तुझ्या मायेचा वारसा निरंतर चालू ठेवण्यास सुरवात झाली.

( लेकीकडून आईसाठी केलेली सुंदर कविता )

कसा वाटला माझा लेख?
जरूर कळवा,तुमचा अभिप्राय द्या!!

@श्रावणी देशपांडे
गोष्टी मनातल्या♥️

Circle Image

Shravani Hemant Deshpande

Service

मी श्रावणी, मला कविता, लेखन करायला खूप आवडतात, गोष्टी मनातल्या♥️मनापर्यंत पोचवायला आवडतात!!