Jan 19, 2022
नारीवादी

अन मी आई झाले

Read Later
अन मी आई झाले

अग किती हा पसारा......पटकन आवर ग बाई!! अस आईने रीनाला सांगितले.....कधी मोठी होणार ही मुलगी!! कस होणार हिच....... असे अनेक प्रश्न आईला पडले?? हो आई अस म्हणून रीना तयारी करायला निघून गेली......

परवा रिनाचा साखरपुडा आहे...अग शालू तू जा बघू रीना ताई सोबत आणि काय हवं नको ते बाजारात जाऊन घेऊन या. मग रीना आणि शालू बाजारात जाऊन मेहंदी काढून आली, त्यावर हिरवा चुडा भरला रिनाने........दोघी मग लगोलग घरी आपल्या.......अग आई आम्ही आलोय, पाणी देतेस का? आई ने मग बाहेर जाऊन दोघीना पाणी दिले, हिरवा चुडा आणि मेहंदीने भरलेला रिनाचा हात पाहुन आई जरा हळवी झाली, बाबा सुद्धा हळवे झाले....आपली लाडकी लेक बघता बघता इतकी मोठी कधी झाली कळलेच नाही..अस म्हणून आईने रिनाची नजर काढली आणि बोटे मोडली.???????? त्या दोघांना असे पाहून रियाला सुद्धा रडू आले......शालू ने मग त्यांना आवरले.अस म्हणून सगळे जेवायला बसले......हसत खेळत जेवत होते, आजचा सगळा बेत रिनाच्या आवडीचा होता.............

त्या सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला आणि गप्पा मारून झोपी गेले, पहाटे लवकर आई उठली सारी कामे आवरली..... रीना, शालू आणि बाबा तयार झाले, घरात इतर पाहुणे आले होते. रिनाला आईने मस्त साडी नेसवली, साजेसा शृंगार नाकात नथ....केसात गजरा..... रिनाला असे बघून आई बाबा भावूक झाले, मग आत्या ने येऊन तिची नजर काढली, सगळे मग एकत्र हॉल वर गेले.

तिथे अनिल आणि त्याची घरची मंडळी आधीच आले होते, हो अनिल प्रधान हा रिनाचा होणारा नवरा....हे स्थळ तिला तिच्या लाडक्या मधू आत्याने आणले होते. सगळयांना आणि खास करून रिनाला तो खूप आवडला होता.
अनिल हा एक उत्तम इंजिनिअर होता, बाबा त्यांचे श्री. रमाकांत प्रधान एका बँक मध्ये कामाला आणि आई सौ. वैशाली एक गृहिणी होती, लहान बहीण त्याची वेदिका कॉलेज मध्ये वाणिज्य शाखेत शिकत होती. असे त्यांचे पण चौकोनी कुटुंब होते, रीना हॉल मध्ये आल्यावर अनिल तिला बघतच बसला.......रीना मग जरा लाजली????.

अखेर सर्व घरातील मंडळी आणि मित्र परिवांच्या समक्ष त्या दोघांचा साखरपुड्याचा सोहळा पार पडला... आणि अश्या प्रकारे  झाली रीना अनिलची........रीना आणि तिच्या घरचे, तसेच अनिल च्या घरातील सगळे खुश झाले.... मग महिन्याभरात  अगदी साध्या पद्धतीने त्यांचे लग्न झाले....मोजकी माणसे, घरच्यांची उपस्थिती, या साऱ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळाले..........

सौ.रीना अनिल प्रधान किती वेगळी ओळख आपली म्हणून रीना भारावून गेली. प्रधानांची सून.... म्हणून सासरी पण ती खूप आवडली, तिचे सगळ्यांनी खूप कौतुक केले,रीना भारावली, नवे घर, नवे सारे, नवा संसार यात ती रमली, सुरवातीचा काळ रिनाला स्वप्नाप्रमाणे भासला, नव्या घरी ती रुळली, आई बाबा, शालू तिला पाहून खुश होते.सासरी ती खुशीत होती, तिने परत ऑफिस जॉईन केले, ती स्वतःला कामात रमवले कारण तिला तिचे प्रोफेशन आवडत होते.........

एक दिवस अनिल ला प्रमोशन मिळाले, सासू म्हणाली सुनेचा पायगुण......तिला वाटल सासू किती लाड करते तिचे. सुरवातीचा काळ खूप सुखावणारा होता पण म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस, सासूने तिच्या मागे कुणकुण लावली, आई कधी होणार, नणंद आईला म्हणायची आग आई जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा होईल, आता तर कुठे  वर्ष झाल आहे, होईल सगळं नीट, पण सासू कुठे तीच ऐकणार होती ती कश्या ना कश्यावरून रिनाला टोचून बोलत होती, कुस्केपणाने वागत होती, रीना न मनात विचार केला आई न होणे हा खरच मोठा गुन्हा आहे का??  स्त्रीचे अस्तित्व आई झाल्यावरच सिध्द होते का???

 

बघू लवकरच पुढच्या भागात रिनाच काय होते?

 

©®श्रावणी देशपांडे

गोष्टी मनातल्या♥️

लेख आवडल्यास अभिप्राय व मत कळवा!!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Hemant Deshpande

Service

मी श्रावणी, मला कविता, लेखन करायला खूप आवडतात, गोष्टी मनातल्या♥️मनापर्यंत पोचवायला आवडतात!!