Login

अन् हास्य परतले ओठी भाग ३ अंतिम भाग

, एक कथा
अन् हास्य परतले ओठी भाग ३ अंतिम भाग –
त्या दिवशी तो बराच वेळ त्या बाकावर बसून राहिला. तिच्या त्या एका वाक्यानं त्याच्या मनाच्या खोल कप्प्यात काहीसं हललं होतं. एवढ्या काळानंतर, त्याच्या ओठांवर नकळत एक प्रसन्न हसू उमटलं होतं.
पहिल्यांदाच त्याला वाटलं की कोणी तरी त्याचं दुखः न पाहताही ओळखलं आहे… आणि त्यासाठी तिने कुठलेही प्रश्न विचारले नाही,सल्ले दिले नाही किंवा सहानुभूतीही दाखवली नाही. या सगळ्याची गरजच भासली नव्हती. फक्त तिचं एक साधं हास्य… जे त्याच्या मनाला आधार देत होतं.
तेव्हापासून, दोघांमध्ये संवाद वाढू लागला. कधी चार शब्द, कधी फक्त हास्य, पण दोघांनाही संध्याकाळ आता वेगळी भासत होती. तिच्याशी बोलल्याने,तिचं हसणं बघीतल्याने त्याच्या आयुष्यात जणू पुन्हा एकदा रंग भरायला सुरवात झाली होती.
कधी कधी, कुणाच्या चेहऱ्यावरचं एक साधं हसूही दुसऱ्याच्या आयुष्यात हरवलेली उब परत आणू शकतं… हे त्या दिवशी सागरला मनापासून जाणवलं.
****
एकदा दोघे ही बोलत असताना सागर ने तिला विचारलं,
“ एवढे दिवस आपण भेटतो. तुम्ही माझं हरवलेलं हसू परत मिळवून दिले त्यासाठी मी तुमचं ऋण कधीच फेडू शकणार नाही. मला माझं हसू परत मिळाल्यानंतर मला कळलं जीवन जगताना माणसाला हसण्याने दु:खाचे डोंगर पार करायला मदत होते.
मला अजूनही तुमचं नाव कळलं नाही. आपली ओळख नसताना तुम्ही माझ्या साठी एवढे प्रयत्न का केले? ‘
ती नेहमीसारखी हसली आणि म्हणाली,
“माझंही हसू मी काही वर्षांपूर्वी हरवलं होत. माझ्या वागण्याने घरचे सगळे चिंतेत पडले. त्यांना काही सुचत नव्हतं. मी कोणाशीही बोलत नव्हते ना घरी ना ऑफिसमध्ये.
एक दिवस मी बसस्टॉपवर बसची वाट बघत होते तेव्हा एकजण आला माझ्या मागे रांगेत उभा राहिला. मी वळून बघताच खू प्रसन्न हसला. मला जाणवलं मला त्याच्या हसण्याने खूप छान वाटलं. नंतर तो रोजच बरोबर माझ्या मागे येऊन ऊभा राह्यला.

हळूहळू मीही त्याच्या कडे बघन हसू लागले. एक दिवस आम्ही मुद्दाम नेहमीची बस सोडून स्टाॅपवरच्या बाकावर बसलो. मीही त्याला तुझ्या सारखेच प्रश्न विचारले. त्याने जे ऊत्तर दिलं तेच मी तुला दिलं. मी त्याला धन्यवाद देताच तो म्हणाला,
“ धन्यवाद नको म्हणून तुझा आयुष्यातील रंग उडाल्याचे लक्षात आले ते मी तुला परत आणून दिले त्यासाठी मला कोणतीही आणि कोणाचीही मदतीची गरज पडली नाही कारण माझ्या जवळ हास्यासारखे भावनिक शस्त्र होतं
तुलाही कधी कोणी आपल्या आयुष्यातील हास्य विसरला असेल तर त्याला ते परत मिळवून दे. “
बस्स .. मी तेच केलं.”
तिच्या मदतीमागचं कारण ऐकताच सागरच्या मनात तिच्या बद्दल चा आदर जास्त वाढला.
पुढे दोघांची गाढ मैत्री झाली. फक्त निरपेक्ष मैत्री.
©®मीनाक्षी वैद्य.

🎭 Series Post

View all