अन् हास्य परतले ओठी भाग २ –
पार्कमध्ये संध्याकाळच्या वेळेस हलकसं गार वारे वहात होतं. सूर्य कलताना आकाशाला सोनेरीसर छटा चढली होती. ते दृश्य खूप सुंदर दिसत होतं. सागराची नजर नकळत त्या संधी प्रकाशाकडे टक लावून बघू लागला.
सागर नेहमीप्रमाणे आपल्या ठरलेल्या बाकावर बसला होता, पण आज त्याच्या मनात काहीतरी चाललं होतं… विचारांचं काहूर, आणि त्या हास्य मूर्तीची वाट पाहणं.
जणू त्याच्या काळजाने हेरलं होतं—तिचं येणं त्याला आवडतं आहे. तिच्या प्रसन्न हा हास्यासाठी तो नकळत बागेमध्ये रोज संध्याकाळी येऊन ठरलेल्या बाकावर बसतो.
आज ती आली पांढऱ्या शालीत, पूर्वीप्रमाणेच चेहऱ्यावर हसू. नेहमीप्रमाणे हास्याची एक लकेर त्याच्या कडे फेकून ती निघून गेली.
****
एक दिवस, ती आली, त्याच्या कडे बघून हसली तसं तो सहजच बोलून गेला,
“तुम्ही रोज येता, आणि मला बघून हसता… का?”
ती क्षणभर थांबली, तिच्या डोळ्यांत आणि ओठांवर गोड हसू आणून ती म्हणाली,
“कारण तुमचं हसणं कुठेतरी हरवलं आहे हे माझ्या लक्षात आलं आहे.जोपर्यंत तुमच्या ओठांवर हास्य मोहोर फुलणार नाही तोपर्यंत मी माझं हसू तुम्हाला उधार देण्याचा प्रयत्न करणार.”

“तिने असं म्हणताच आणि तिच्याशी नजरानजर होताच, तो थोडा सरळ बसला आणि धीटपणे म्हणाला,
"एक मिनिट... इथे बसाल का थोडा वेळ?"
ती थोडी संकोचली. तिने एकदा आपली नजर इथे-तिथे वळवली. पण त्याच्या चेहऱ्यावरचे सौम्य आणि प्रामाणिक भाव पाहून, ती हळूच बाकावर येऊन त्याच्याजवळ बसली. दोघांत काही क्षण शांतते गेले. दोघेही अवघडले होते.
थोड्यावेळाने सागर म्हणाला,
सागर: "तुम्ही रोज इथे येता… आणि मला बघून हसता. मी रोज वाट पाहतो तुमच्या त्या हास्याची. पण आज विचारावंसं वाटलं—का?"
ती थोडा वेळ गप्प बसली. मग हसत म्हणाली,
ती: "तुमचं चेहरा रोज शांत, पण थोडासा कुठेतरी हरवलेला वाटतो. तुम्ही हसणं विसरलात असं वाटतं. म्हणून रोज मी तुम्हाला माझं एक हसू ऊधार देऊन जाते."
तो (हळू आवाजात): "हो.तुमचं निरीक्षण खरय. माझं हसणं हरवलंय खरंच. आयुष्याच्या या वावटळीत मी माझं हास्य गमाऊन बसलो. कधी नोकरीमधील ताणाने, कधी नात्यांमधील गैरसमजांमुळे, कधी अपेक्षा भंगातील दु:खामुळे. आता हसावं, असंही वाटत नाही."
ती: "म्हणून तर… मी माझं हसू तुम्हाला उधार देते. रोज थोडं थोडं. जोवर तुमचं स्वतःचं हसू परत येत नाही."
सागर क्षणभर गप्प राहिला. मग स्वतःशीच पुटपुटला,

"एवढ्या काळानंतर कुणीतरी मला समजून घेतलं. ..."
त्याच्या चेहऱ्यावर एक क्षीण, पण खऱ्याखुऱ्या हास्याची लकेर उमटली.
ती कधी उठून गेली हे सागरला कळलच नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा