Login

विरहाची सांजवेळ!

प्रेम आणि विरह!
शीर्षक -विरहाची सांजवेळ(बारोळी)

ओल्या सांजवेळी
आपले आठवे क्षण
साठवण नयनांची
व्याकूळ होते मन

शांतता ही न्यारी भासे
नाही होत आता ती भंग
तुझ्या विचारातच सतत
का सख्या असते मी दंग ?

विरहाचा असा काळ
हा का रे संपत नाही
म्हणूनच हे अश्रूचे पाणी
त्यामुळेच सदा वाही

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all