
सावता माळी पुण्यतिथी निमित्त,
माळीयाची जात आपुली,
बागेत फुलांच्या फुलली,
रानात स्वत:ला भुलली,
ईश्वराच्या चरणी वाहिली,
श्रमाची श्रद्धांजली,
सावता माळयाने नाही पहिली,
पंढरपूरी विठ्ठल माऊली,
ऋद्यात मात्र छबी लपविली,
धन्य तो सावतामाळी ज्याने भक्तीने बाग फुलविली,
श्रमाची फुले ईश्वर चरणी वाहिली,
विठ्ठलाने त्याची परिक्षा घेतली,
भक्ताच्या भेटीसाठी पंढरी सोडली,
विठ्ठलाच्या दर्शनाने सावता माळयाची तृप्ती झाली,
आणि कर्म हाच देव ही शिकवण दिली.
रुपाली थोरात