Login

आमची पाठ सोडा भाग 4

अति तिथे माती
आमची पाठ सोडा भाग 4

©️®️शिल्पा सुतार

ते चौघे हॉटेल मधे बसलेले होते. आकाश अनघाकडे बघत होता. तिच्यासाठी ही गोष्ट नवीन नव्हती. नेहमीच अस होत होतं म्हणजे नेहा, सचिन यांच्या सोबत नेहमीच यायचे. इतर वेळी गुपचूप ते दोघच फिरून यायचे. तेव्हा भाऊ वहिनी आठवत नव्हते.

" आई बाबा सोबत नाही कस वाटत आहे ना. आपण हॉटेल मधे आलो. ते घरी जे केल ते जेवता आहेत." नेहा सारखं तेच बोलत होती.

अस तर त्यांनी कधी केल नव्हतं. आज आकाशला अनघाशी त्या दोघांबद्दल बोलायचं होतं म्हणुन त्यानेच ते ठरवलं होत. पण सगळा दोष अनघावर आला. हिला सासू सासरे नको असतात. नेहा तिच्यावर नाराज होती.

यावेळी आकाश बहिणीवर चिडला होता. घरी आल्यावर तो आत निघून गेला. आम्हाला अजिबात प्रायव्हसी नाही. बहीण, जिजाजी सदोदित सोबत असतात. वैताग आला आहे.

अनघा रूम मधे आली. काही न बोलता तिने कपडे बदलले. ती झोपली. सकाळी ती ऑफिसला निघून गेली.

" अनघा आपल्या एनिवर्सरीला काय करायच?" आकाशने विचारल.

"आईंना विचारा. " तिने तुटक उत्तर दिलं.

"काय अस?"

"मला विचारू नका. आपण ठरवतो एक होत एक. त्यापेक्षा घरचे म्हणतील ते करू. " अनघा म्हणाली.

" मला तुझ्या सोबत वेळ घालवायचा आहे. "आकाश म्हणाला.

" तुमच्या घरच्यांना ते आवडत नाही. त्यांनी मुलाच लग्न करायचं नव्हतं. " अनघा म्हणाली ते सत्य होत. आकाशने काहीतरी ठरवलं होतं.

आज एनिवर्सरी होती. सकाळ पासून सगळे शुभेच्छा देत होते. फोन सुरु होता.

आकाश अनघाच्या मागे मागे होता. ती नाराज होती. त्याच्याशी अजून नीट बोलत नव्हती. शेवटी त्याने तिला हात धरून रूम मधे नेलं. मिठीत घेतलं. " हॅप्पी एनिवर्सरी डीयर. आपण आज दोघ बाहेर जाणार आहोत. मी तुझ्या ऑफिस मधे येतो. तिथून फिरायला जावू. कोणाला बोलू नकोस."

ती खुश होती. थोडी लाजली. पण लगेच भानावर आली. " अहो पण याचे परिणाम काय होतील."

" जे होईल ते होईल. मी आहे ना."

दिवसभर अनघा खुश होती. आकाश संध्याकाळी तिला घ्यायला आला. अनघा बाईक वर त्याला चिटकून बसली होती. दोघ बागेत खूप वेळ बसले होते. त्याने तिचा हातात हात घेतला. "अनघा तुला स्वतः साठी स्टँड घ्यावा लागेल."

" म्हणजे? " तिने विचारलं.

" आई, नेहा जे वागतात त्यांच्या विरोधात तूच ठाम पणे उभ रहा. नाहीतर आयुष्यभर हा त्रास कमी होणार नाही."

"अहो पण मी कस बोलणार? मला भीती वाटते. आई लगेच चिडतात."

" माझा सपोर्ट आहे. मला आईला जास्त बोलता येणार नाही. तुला तुझ आयुष्य सुखाने जगायचं असेल तर तुला बोलाव लागेल. "

"ठीक आहे पण मी काही म्हणाली की तुम्ही चिडता." अनघा म्हणाली.

"मी डोळे झाक करणार. मला आता पूर्ण आयडिया आली आहे. घरी काय सुरू आहे ते समजलं. माझ्या बाजूने प्रॉब्लेम येणार नाही. "आकाश म्हणाला.

" हे बेस्ट एनिवर्सरी गिफ्ट आहे. " अनघा खुश होती.

" अहो ऑफिस तर्फे परीक्षा आहे ती देवू का? प्रमोशन साठी आहे. "

" अरे वाह हो दे. तू तुझ तुझ बघ. या घरच्यांच्या नादी लागून उपयोग नाही. "

रमाताई फोन करत होत्या." कुठे आहेस आकाश? अरे घरी केव्हा येणार? "

"आई मी अनघा सोबत आहोत. आमची वाट बघू नका. " त्याने सांगितलं.

" अरे पण आम्ही सगळे घरी वाट बघत आहोत. आपण हॉटेल मधे जेवायला जाणार होतो ना. तुम्ही दोघच कसे निघून गेलात? "

"आमची एनिवर्सरी आहे. आम्हाला सोबत वेळ घालवायचा होता. आम्ही बाहेर आलो. त्यात काय एवढं? नेहाच्या एनिवर्सरीला तू कशी म्हणाली होतीस त्यांच्या एनिवर्सरीत आपल काय काम? ते दोघ फिरतील, बाहेर जेवून येतील. तस आता मी आणि अनघा फिरायला आलो आहोत. आमच्या एनिवर्सरी आहे तुमच काय काम." आकाश स्पष्ट म्हणाला.

" आमच्या जेवणाच काय? "

"नेहा आहे ना तिला सांग ती करेन." त्याने फोन ठेवला.

ते दोघ अनघाच्या आवडत्या हॉटेल मधे आले. ती खूप खुश होती. त्याच्या चेहर्‍यावर आनंद होता. त्याने तिला गिफ्ट दिलं. काय आहे ती बघत होती. वाह मला त्या दिवशी हेच मंगळसूत्र आवडलं होत. ती खुश होती.

" माझ गिफ्ट?" त्याने विचारलं.

" मी काही घेतलं नाही. "

" ठीक आहे मी एक मागू? तू स्वतः साठी स्टँड घे. घाबरून जगू नकोस. स्वतः ला महत्व दे. तिथे रहायचं तर नेहमी अस चालणार नाही."

हो... ती म्हणाली.

तिने त्याला ड्रेस घेतला होता घरी होता. तिने फक्त फोटो दाखवला.

🎭 Series Post

View all