आमची पाठ सोडा भाग 3
©️®️शिल्पा सुतार
थोड्या दिवसांनी आकाश अनघाची पहिली एनिवर्सरी होती. अनघा विचार करत होती तो दिवस आकाश सोबत घालवायला मिळेल तर बर होईल. सगळ्यां सोबत कंटाळा आला आहे. बघू हे काय म्हणतात.
जेवण झालं. अनघा, आकाश बाहेर फेर्या मारत होते.
" उद्या सुट्टी आहे काही काम असेल तर सांगून दे." आकाश विचारत होता.
"हो किराणा आणायचा आहे." अनघा सांगत होती.
"आत्ता तर आणला होता ना. सध्या बजेट बाहेर खर्च होतो आहे." तो म्हणाला.
" पाहुणे किती सुरू असतात. आपले तर ठीक आहे पण नेहाताईंच्या घरचे पाहुणे ही इकडे येतात. दोन घरांचा खर्च आपण करतो. नेहाताई सगळं इकडून नेतात. आउट ऑफ बजेट होणारच. आपण दोघ दिवसभर मेहेनत करतो. बाकीच्यांना काय घेणं आहे. त्यांच नीट होत ना. " अनघा चिडली होती.
नेहमी प्रमाणे आकाश गप्प होता. नुसत ऐकत होता. त्याला अनघाच म्हणणं पटत होत. तरी पण घरच्यांना काय बोलणार.
दुसर्या दिवशी सकाळी नेहा आली.
" अनघा अग स्वयंपाक वाढवं. गेली का प्रिया? " रमाताई चौकशी करत होत्या.
" हो गेली. फक्त चहा केला होता. " नेहाने सांगितलं.
" नाश्त्याला नाही केल का? " आकाशने विचारलं.
" कोण करत बसेल. मी दमायचं आणि ते आयत खातील का." नेहा म्हणाली.
आकाश तिच्याकडे बघत होता. बापरे ही कशी वागते. हिला घरकामाचा लगेच कंटाळा येतो. इथे अनघा दिवसरात्र कामात असते. तीच मन जाणत नाही.
जेवण झालं. थोड्या वेळाने ते शॉपिंगला जाणार होते. अनघा आवरत होती. एकच दिवस मिळतो त्यामुळे तिचं काम अजून सुरू होतं.
" अनघा आटोप ना." आकाश म्हणाला.
"हो थांबा पाच मिनिट."
"उशीर होतो आहे." सगळे तिला बोलत होते.
"तुम्हाला काय नुसत आवरून बसायचं. मला त्या सोबत घर काम ही असत." अनघा जोरात म्हणाली.
"एवढं आहे तर भराभर हात चालवायचे. ते नको. पाच मिनिटाच्या कामाला पंधरा मिनिट लागतात. अस दाखवते की खूप काहीतरी करते." रमाताई म्हणाल्या.
आकाश गप्प होता. अनघा नाराज होती. ती त्यांच्या सोबत शॉपिंग साठी गेली पण आकाशशी बोलत नव्हती. त्याला ते समजलं. तो तिच्या मागे मागे होता.
"अनघा काय झालं आहे? तू नाराज आहेस का? "
" माझ्या सोबत काय होत ते तुम्हाला दिसत नाही ना? आई दिवस रात्र मला बोलतात, अपमान करतात. तुम्ही नुसते बघत बसतात म्हणजे तुमची याला संमती आहे. तुमच्या बायकोला काहीही बोला तुम्हाला चालत. असच आहे ना. म्हणुन बाकीच्यांना फावत. ठीक आहे आता यापुढे मी माझी राहील. " अनघा त्याला खूप बोलली.
"काय अस? तू ही ना. आई सगळ्यांना बोलते. सोडून द्यायचं. "
" नाही, त्या मलाच बोलतात तुमच्या सगळ्यांवर माया करतात. " अनघा म्हणाली.
" राग सोड. चल तुला ड्रेस घेवू. " आकाश म्हणाला.
" मला काही नको त्यापेक्षा थोड प्रेम आणि सन्मान द्या. मी खुश होईल. " ती पुढे निघून गेली. आकाश विचार करत होता ही बरोबर म्हणते आहे. घरी आल्यावर ही ती त्याच्याशी बोलली नाही.
दुसर्या दिवशी ती आवरून ऑफिसला गेली. आकाशच कामात लक्ष नव्हतं. तो विचार करत होता अनघा चिडली आहे. त्याने तिला फोन केला तिने उचलला नाही
लंच ब्रेक पर्यंत त्याचे तीन चार वेळा फोन येवून गेले.
" अनघा कुठे आहेस?" त्याने मेसेज केला.
"ऑफिस मधे मीटिंग होती." तिने उत्तर दिले.
"हे बघ अनघा अस चिडायचं नाही. मला तुझ्याशी बोलायचं आहे. आज आपण बाहेर जावू या का?"
तिला आनंद झाला होता. पण सत्य माहिती होतं.
"तुम्ही आधी घरी विचारा." ती म्हणाली.
" त्यांना काय विचारायचं." आकाश म्हणाला.
" तुम्ही अजून घरच्यांना ओळखलं नाही का? आई शंभर टक्के परवानगी देणार नाहीत. "
"अनघा पुरे. मी तुझ्या कलाने घेतो म्हणून काहीही बोलायचं नाही. आज आपण बाहेर जावू. आपल्याला ही वेळ मिळायला हवा." आकाशने सांगितलं.
" सॉरी." तिने माफी मागितली.
ती घरी आली. नेहमी प्रमाणे तिने स्वयंपाक केला. आकाश आला.
"चल झाल का? " त्याने मोठ्याने विचारल.
झालं आता आई काही सोडणार नाहीत. तिला समजलं.
" हो पाच मिनिट. " ती कपडे बदलत होती.
" कुठे जाताय?" रमाताई विचारत होत्या.
" थोड काम होतं." आकाश म्हणाला.
" आता कुठे जावू नका. समजल ना अनघा. ताट वाढ." त्या म्हणाल्या.
अनघा किचन मधे गेली. तिने दोन ताट वाढून आणले.
"आई आमचा स्वयंपाक केला नाहिये. आम्ही बाहेर जातो आहोत. जेवून येवू. " आकाश सांगत होता.
तेवढ्यात नेहा, सचिन आले. "अरे कुठे जाताय?" तिने विचारलं.
" ते बाहेर जेवायला जात आहेत. नेहाला सोबत ने. "रमा ताई म्हणाल्या.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा