Login

आमची पाठ सोडा भाग 2

अति तिथे माती
आमची पाठ सोडा भाग 2

©️®️शिल्पा सुतार

"घर खूप छान ठेवल आहे." प्रिया म्हणाली.

"हो ना अनघा घरी नसते. मीच करते हळूहळू." रमाताईंनी क्रेडिट घेतलं.

बापरे या आई किती खोट बोलत आहेत. काहीही करत नाही उलट काम वाढवून ठेवतात. अनघा किचन मधून ऐकत होती.

"माझी दिवस भर साफसफाई वगैरे चालते. या मुलींना सपोर्ट करायला हवा ना. " रमाताई काहीही सांगत होत्या.

" मावशी तुम्ही किती चांगल्या आहात." प्रिया म्हणाली.

थोड्या वेळाने पाहुणे गेले.

"बाई मी दमली." नेहा कॉटवर बसून तिचे पाय दाबत होती.

ऑफिसहून आल्यावर यांच्या घरच्या पाहुण्यांच मी केलं. तरी या काय थकल्या. अनघा भांडी किचन मधे ठेवत होती.

" रात्री साठी काय करते ग अनघा? जास्त काही करू नकोस. मसाले भात कर. नेहा डबा नेईल आटोप. माझी मुलगी किती दमते. काय बाई सारखे पाहुणे येतात." रमाताई प्रिया बद्दल बोलत होत्या.

" थांबा जरा मी सकाळपासून पाच मिनिट बसली नाही." अनघा चिडली होती.

जावई बापू सात वाजता येतात. त्या आधी नेहाला जाव लागेल म्हणून रमाताई घाई करत होत्या.

"वहिनी थोडा चिवडा ही बांधुन दे ग आणि यावेळी चिवडा असा काय झाला आहे? मागच्या वेळी सारखा कुरकुरीत नाही." नेहा नाव ठेवत होती.

"थोडा मायक्रोव्हेव मधे टाका ना." यांना एवढे ही कष्ट नको. त्यांचा काय दोष. इथे माहेरच्या लोकांनी त्यांना डोक्यावर बसुन ठेवलं आहे.

" आई मी निघते. मी आमच्याकडे मसाले भात करेन उगीच माझी जाऊ सगळीकडे सांगत फिरेन. " नेहा म्हणाली.

" जा बाई हळू हळू आवर. "

अनघा खोलीत आली. ती जरा वेळ मोबाईल मधे मेसेज बघत होती.

आकाशचा फोन आला." काही आणायचं आहे का?"

" काही नाही. वाटलं तर दही एक दोन भाज्या आणा." तिने सांगितलं.

"काय करते आहेस? मी घरी येतो आपण दोघ तुला हवी ती भाजी घेवून येवू. "आकाश म्हणाला.

" नको हो तुम्ही येतांना आणा. मी खूप थकली आहे. काय करणार. इथे डोक खाजवायला वेळ नाही. एक झालं की एक सुरू आहे. अजून स्वयंपाक बाकी आहे. "अनघा म्हणाली.

" अशी का वैतागली आहेस?"

" आता एवढ्यात पाहुणे गेले. आता डिनरची तयारी करावी लागेल. "

" कोण आल होत? " त्याने विचारलं.

" नेहाताईंची जाऊबाई प्रियाताई. "

" मग ती इकडे का आली? आई बाबांना भेटायला का? "

" तिकडे तीच कोण करेल? मी बरी आहे ना कामाला. म्हणून आल्या होत्या. " अनघा रागाने म्हणाली.

आकाश काही म्हणाला नाही.

अनघाचा स्वयंपाक झाला. आवरून झालं.

" आम्हाला जेवायला वाढ ग अनघा. किती हा वेळ. " रमाताई आवाज देत होत्या.

" हे येतीलच. आता बरोबर बसू." अनघा म्हणाली.

आकाश आला. तो पुढे बसलेला होता.

" बघितल का आकाश. अनघा कशी वागते. आले गेलेल्यांच करायला नको. चेहर्‍यावर नापासंती घेवून ती घरात शिरते. काहीही मागितलं तरी देत नाही. आज नेहा न जेवता गेली. आता घरी जावून काय करेल समजत नाही." रमाताई काळजीत होत्या.

" आई नेहाच लग्न झालं आहे. तिला तिची जबाबदारी घेवू देत जा. तशी ही ती अनघा पेक्षा मोठी आहे. "

अनघा पाणी घेवून आली. तिने ते ऐकलं काही न बोलता ती आत गेली.

" अनघा अटोपलं की नाही. " रमाताईंनी परत आवाज दिला.

" आता पाहुणे गेले ना. त्यांच्या सोबत चहा पोहे झाले ना. तुला एवढी भूक लागली का रमा? माझ अजून पोट भरलेलं वाटत आहे. " बाबा ओरडले.

आकाश आत रूम मधे आला. .

"तुम्ही आकाश समोर अस काहीही का बोलता." रमाताई बाबांवर चिडल्या.

"बरोबर आहे. तू उगीच अनघाला बोलतेस. आणि जेवायची इतकी का घाई करतेस. " बाबा बडबड करत होते.

अनघा तोंड उतरवून बसली होती. आकाश तिच्याकडे बघत होता. ती किती दमते त्याला समजत होत. तो घरच्यांना काही म्हणू शकत नव्हता. लगेच रमाताई म्हणायच्या तू आधी अस करत नव्हता आकाश. आता बायकोची बाजू घेतो.

त्याला अस ही वाटत होतं की मीच आईला बोललो तर अनघा तसच शिकेल म्हणून तो काही म्हणत नव्हता. पण त्यामुळे अनघा त्रासात होती.

🎭 Series Post

View all