Login

आमची पाठ सोडा भाग 5 अंतिम

अति तिथे माती
आमची पाठ सोडा भाग 5 अंतिम

©️®️शिल्पा सुतार

दोघ रात्री घरी आले. घरचं वातावरण बदललं होत. नेहा घरी निघून गेली होती. रमा ताईंनी खिचडी करून घेतली होती. त्या खूप चिडल्या होत्या. त्या या दोघांना खूप बोलल्या. सगळा रंगाचा बेरंग झाला. अनघा रूम मधे आली. ती रडत होती. आकाश तिला समजावत होता.

"अहो मला आईकडे जायचं." ती कंटाळली होती.

"अस करता का अनघा."

"मला थोडा बदल हवा आहे. मी थोडे दिवस माहेरी जाते आहे."

" माझ कस होईल?" तो ही कंटाळला होता. आजकाल तिच्या शिवाय त्याला ही करमत नव्हतं.

" मग तुम्ही ही सोबत चला."

" नाही, तू जा. लवकर ये. मनात राग धरू नकोस. बाकीचे सोड मला तू हवी आहेस." आकाशने अस म्हटल्याने तिला बर वाटलं.

ती सकाळी बॅग घेवून बाहेर आली. रमाताई नाही म्हणत होत्या. तिने लक्ष दिलं नाही. ती निघाली. आकाश ही रागात होता. तो रमाताईंशी बोलला नाही. तिला माहेरी सोडून तो ही ऑफिसला गेला. आईला भेटून अनघा खूप रडत होती. सगळं सांगत होती.

" कठिण परिस्थिती आहे. पण यातून मार्ग काढावा लागेल ना बेटा."

"आई मला आता तिकडे जावसं वाटतं नाही."

"अस करुन कस चालेल बेटा. चल जेवून घेऊ मग तू ऑफिसला जा." आज अनघा हाफ डे जाणार होती.

तिचे आई बाबा काळजीत होते.

रात्री ती बराच वेळ आकाश सोबत फोनवर बोलत होती.

" काय म्हटले आकाश राव? " बाबा विचारत होते. ती सांगत होती.

" आकाश राव बरोबर सांगता आहेत. तू हे नीट करू शकते. तुला कायम त्यांच्या सोबत रहायचं आहे. तर ज्याने त्याने स्वतः चे कामे करावी एकावर भर देवू नये." बाबा म्हणाले.

"हो बाबा आता हिम्मत करावी लागेल."

चार पाच दिवस राहून अनघा घरी परत आली. रमाताई तिच्याशी बोलत नव्हत्या. तिने लक्ष दिलं नाही. नेहमी प्रमाणे रूटीन सुरू होतं.

आता मी माझ्या मनाप्रमाणे वागेन. तिने ठरवल. ती सकाळी नाश्त्याला एखादा खास पदार्थ करायची. नेहासाठी ही काढून ठेवायची. ते तिने बंद केलं.

आज तिने इडली चटणी केली होती. तिने उरलेल्या इडल्या डब्यात भरून ऑफिसला नेल्या. आता मी आमच्या चौघांच करणार. नेहा काही लहान नाही. तिला सगळे पदार्थ करुन द्यायचे नाहीत. ती गैरफायदा घेते.

नेहमी प्रमाणे नेहा आली.
"आई आज काय केल होत?"

" इडली चटणी. "

" अरे वाह. " ती किचन मधे गेली. "आई मला इडली ठेवली नाही का? "

" असेल अग."

" बहुतेक अनघाने ठेवली नाही." नेहा चिडून म्हणाली.

" तुला येत ना. तुझ तू करून घेत जा. " बाबा ओरडले.

नेहाचा फोन वाजत होता. ती बोलत होती. तिच्याकडे दुसर्‍या दिवशी पाहुणे येणार होते. तिचे चुलत दीर. "आई ते इकडेच जेवायला येतील. म्हणजे तुमची आणि त्यांची भेट ही होईल."

" हो बेटा तुम्ही सगळे इकडे जेवायला या." रमाताई म्हणाल्या.

तिकडचे पाहुणे संध्याकाळी आले. रमाताईंनी अनघाला फोन केला. ती ऑफिस मधे होती. "आज एक तास लवकर ये."

"आई मला जमणार नाही." तिने स्पष्ट सांगितलं.

नेहाने फोन घेतला. " वहिनी अग घरी पाहुणे आले आहेत. ते जेवायला इकडे आहेत. माझ्या सासरचे काय म्हणतील."

" माझं अजून काम झालं नाही. मुळात तुमच्या पाहुण्यांना इकडे का आणता. तुम्ही तुमच करून घ्या. मला उशीर होईल." तिने स्पष्ट सांगितल. नेहाला शॉक बसला. तिला अनघा अस बोलेल याची अपेक्षा नव्हती.

" आई ही अनघा मुद्दामून करते. आता ग? "

" तू स्वयंपाक कर. " रमाताई म्हणाल्या.

" सामान ही नाहिये. भाजी ही फक्त बटाटे आणि वांगी आहेत. "

" ऑनलाईन मागवून घे. " रमाताई म्हणाल्या.

आज नेहाचा बर्‍यापैकी खर्च झाला. ती चिडलेली होती.

अनघा आरामात आठ वाजता घरी आली. आकाश ही आलेला होता. रमाताई तिच्याकडे रागाने बघत होत्या.

" अनघा स्वयंपाक तर नेहाने केला आता तू ताट तरी वाढ."

" हो थांबा थोड. मी आत्ताच आले. नेहाताई तुम्ही तुमच्या पाहुण्यांकडे बघा." सांगून ती आत गेली.

अनघाने आज जास्त काम केलं नाही. नेहाला करू दिलं. हे रमाताई बघत होत्या. थोड्या वेळाने पाहुणे गेले.

"आकाश दादा तू बघतो ना अनघा कशी वागते." नेहा चिडली होती.

" मुळात तुमच्या कडचे पाहुणे इकडे आणू नको. तुला समजत नाही का नेहा. कोणी सांगे पर्यंत का अशी वागतेस." आकाश तिलाच बोलला.

" थोड केल तर काय होतं." रमाताई चिडून म्हणाल्या.

" हो ना. मग तुम्ही करा ना. अनघाची परीक्षा आहे. यापुढे तिला घरी यायला ही वेळ होईल. तुम्हाला ज्याला बोलवायचे त्याला बोलवा. तुम्ही त्यांच करा. ती लायब्ररी मधे जाईल." आकाश म्हणाला.

" ही माहेरहून शिकून आली इतके दिवस काही बोलत नव्हती. " रमाताई म्हणाल्या.

" ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नका. त्रास द्यायला मर्यादा असते. मी परत सांगतो ज्याने त्याने आप आपलं काम करा. " बाबा म्हणाले.

नेहा रमाताईंकडे बघत होती.

" झालं ना. बोलणे ऐकले ना. जरा स्वतः मधे सुधारणा करा. " आकाश दोघींना ओरडत होता.

नेहा आता हल्ली सुट्टी बघून येत होती. अनघाने ही सगळ्यांचे फालतू लाड बंद केले होते. ती ऐकून घेत नव्हती. त्यामुळे रमाताई ही जरा बोलतांना विचार करत होत्या.

आता आकाश, अनघा एकमेकांना वेळ देत होते. दोघ सोबत बाहेर जात होते.

नेहाला समजल इथून दळण न्यायचं तर गहु मलाच आणावे लागतात. लाडू चिवडा ही करायला रमाताई तिची मदत घेत होत्या. त्यापेक्षा ती आता इथून काही नेत नव्हती.

अस वागायची वेळ का आली? त्याआधी नेहाला समजलं नाही का. वहिनीला ही जीव असतो. रमाताई किती मुलीच्या आहारी गेल्या होत्या. मुलीसाठी सुनेला त्रास देत होत्या. स्वतः कराव लागल की समजतं. बर झालं अनघा हुशार झाली.
अति तिथे माती.

🎭 Series Post

View all