अमर्याद:- भाग 29

Rajasthan Was Becoming Good Place For Naina As She Was Getting To Know Many Things
अमर्याद:- भाग 29

तिच्या त्या राजस्थानी लूक कडे पाहून तो फारच खुष झाला. त्याने सुद्धा बाजूला असलेल्या कपाटात जाऊन एक साफा काढला. सरसर करत त्याने डोक्यावर बांधला.
"व्वा..छान दिसत आहे..याला काय म्हणतात?" नैना चमकत्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली.

तसा तो हसत म्हणाला, "जसे आपल्याकडे फेटा म्हणतात ना तसे इथे साफा म्हणतात..."

"तुम्ही तर अगदी सफाईने साफा बांधलात की.." हाताच्या बोटानी उत्तम अशी खूण करत ती म्हणाली.

"बघू जरा मला सुद्धा..." असे म्हणत त्याने त्याच्या मोबाईल कॅमेरा चा सेल्फी मोड मध्ये मिरर व्ह्यू बघितला..

"खरंच बरा बांधला आहे की मी..." त्या कॅमेरा मध्ये पाहत तो म्हणाला.
तशी मागून ती पण आली बघायला की राज त्या मोबाईल कॅमेरा मध्ये कसा दिसत आहे...

त्या फ्रेम मध्ये ते दोघेही दिसायला लागले तसे त्याने आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि त्या दोघांचा एक सेल्फी फोटो काढला.

तिला त्याची ही ट्रिक खूप आवडली... त्याने नैनाला तो फोटो कसा आला आहे ते दाखवले.

"खूप मस्त आला आहे फोटो... हा आपला पहिला एकत्र फोटो आहे ना राज..?" नैना प्रचंड उत्स्फूर्तपणे म्हणाली.

तशी त्याने मान डोलावली. "तुला ही पाठवून ठेवतो तुझ्या मोबाईल वर म्हणजे तुझ्याकडे पण आठवण राहील.."

ती काहीच बोलली नाही तसे त्याला लक्षात आले की, नैना कडे मोबाईल कुठे आहे.

विषय बदलत तो म्हणाला, " नैना, माझी मीटिंग आहे जैसलमेर मध्ये ..मी रात्री उशिरा येईन .तू जेवून झोपून जा. इथे कायमस्वरूपी एक खानसामा आहे, त्यांचे नाव बिंदीया दिदी. तू त्यांच्या सोबत जाऊन गप्पा मारू शकतेस. त्यांना मराठी येत नाही पण हिंदी चांगले बोलतात त्या..खूप विश्वासू आहेत त्या. त्यांच्या भरवश्यावर आपण ह्या बंकरचे किचन ठेवलेले आहे. "

नैना ऐकत होती. राज ने जैसलमेर ला जायचे नाव घेतले तसे तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. काही क्षणापूर्वी आनंदाने चमकणारा तिचा चेहरा एकदम काळवंडून गेला. तिचे ते भाव राज ने टिपले पण तो शांत राहिला.
"राज तुम्ही कसे जाणार? कोण कोण असेल सोबत? मला खूप भीती वाटते आहे राज?" न थांबता ती बोलत होती.

" नैना मी काय काय सांगितले आहे ते नीट आठव... या आपल्या बंकर मधून जैसलमेर ला जायला एक 15 किलोमीटर चे भुयार आहे. ते थेट तिथेच उघडते आणि माझ्यासोबत सुखी आहे त्यामुळे काळजी नको. बिंदीया दीदी आपल्या खूप जवळची आहे तू तिच्या सोबतच इथे असणार आहेस"

"राज मी येते ना तुमच्या सोबत! मी काहीही बोलणार नाही किंवा काहीही विचारणार नाही" अजीजीने तिने विचारले.

"नाही!" ठामपणे राज बोलला.
ती हिरमुसली पण राज चा निर्णय बदलला नाही.

एवढ्यात सुखी आळोखे पिळोखे देत उठला. त्याला उठलेले पाहून ती सुखी जवळ आली तसे तिला बघून तो हसला. तिच्या मनाची चलबिचल त्याला कळत होती पण तो खूप निर्धास्त होता.

"कैसे हो नैना दीदी!" तो म्हणाला
"सुखी भैय्या, आप मुझे सिर्फ नैना बोलीये मै आपकी छोटी बहन हूँ ना"

तसे तो हसला आणि आपुलकीने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला " नैना, बटाईये क्या हुआ?"

"राज साब जैसलमेर जा रहें हैं | मुझे बहोत चिंता हो रही है |"

"बहेन, आज का जाना बहुत जरुरी है।
आज वहां जाके राज साब पीयर प्लॅनिंग बतायेंगे के आगे जाके क्या क्या करना हैं| देखो हमे राज भैय्या को जिंदगी मे जिताना है | उनके लिये हमारी जान भी हाजीर है" तसे तिने पटकन हात दाखवत त्याला थांबवले.

"भैय्या आप हो तो राज सुरक्षित है, आप और राज दोनो हमे हमारे अपने है और सुरक्षित चाहीयें। कभी ऐसें बोलना मत की आपकी जान किंमती नही, उलटा आप हो इसी लिये हम निश्चिन्त है |"

"नैना बहेन, हम है राज भैय्या के साथ चिंता ना करो, और वहा और भी लोग होंगे जो हमारे अपने है। उनके चाचा जी को हराना इतना आसान भी नही हैं।ये छोटी छोटी जंग जीत के ही आगे बडी जंग जीत पाएंगे। सच के साथ भगवान भी होता है, हम उनका पुरा ख्याल रखेंगे। पर आप हमार खयाल रोको ना" पोटावर हात ठेवत तो मोठ्याने हसत म्हणाला तसे तिला आठवले की राज ने सांगितले की तो किती आणि कसा खादाड पण आहे.
तसे ती सुद्धा हसत "आप हात धो लो मै खाना लगाने के लिये बोलती हूँ " म्हणत आत गेली.

सुखी शी बोलून ती थोडी नॉर्मल झाली होती. तिच्याही नकळत तिचा सुखीवर खूप विश्वास निर्माण झाला होता. तिला तो राज साठीचा मोठा आधार वाटत होतं.

"बिंदीया दीदी" आवाज देत ती आत गेली तसे पूर्ण राजस्थानी अवतारातील एक मध्यमवयाची स्त्री बाहेर आली. तिला नैनाबद्दल कळले होते त्यामुळे तिने हसत नैना ला प्रतिसाद दिला.

"दीदी..कल का दाल बाटी चुरमा बहोत बढिया था| " तसे हसून बिंदीया दीदी ने तिचा हात हातात घेतला आणि मायेने हात फिरवला. नंतर तिला घेऊन सगळे किचन आणि त्यात असलेली तयारी दाखवली... सुखी बद्दल नैना ने सांगितले तसे त्या दोघींनी मिळून सुखीच्या जेवणाची तयारी केली.

राज आज खूप शांतपणे वावरत होता. धीरगंभीर बनलेला तो आपल्याच विचारात होता. त्याचे जेवणात पण लक्ष नव्हते पण बिंदीया दिदीने त्याला आग्रहाने जेवायला घातले. नैना ला ती खूप प्रेमळ वाटली.

जेवण होताच राज आपल्या रूम मध्ये गेला आणि दरवाजा लावून घेतला. नैना ला जायचे होते पण ती बाहेरच थांबून राहिली. थोड्या वेळात तो दरवाजा उघडला तसे ती राज चे कपडे आणि त्याचा नवीन
अवतार नैना बघतच राहिली.

फिट ब्लॅक पॅन्ट,त्यावर ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक जॅकेट! जॅकेट ला दोन्ही बाजूने आत काहीतरी खोचले होते. त्याच्या पॅन्ट चा ब्लॅक बेल्ट ही वेगळाच भासला तिला. त्यात त्याने घातलेले हंटर शूज तेही ब्लॅक आणि त्यावर राजची आजची वेगळीच भासणारी करारी नजर! सगळंच वेगळं, जणू या राजला ती आजच पहिल्यांदा बघत होती.

तो फक्त नैना कडे बघून अर्थपूर्ण हसला आणि त्याने सुखीला आवाज दिला.
सुखी सुद्धा आज आला तो वेगळ्याच अवतारात होता जणू राज चा कमांडो!

दोघेही काहीतरी बोलले आणि काही आणायला सुखी आत गेला तोवर त्याने बिंदीया दिदीला सांगितले की, नैना ला सोबत कर आणि नीट सांभाळ.

तिने मान डोलावली. जसा सुखी परत आला तसे बिंदीया दीदी ने त्या दोघांना हातावर दहीसाखर दिले आणि काहीतरी धागा राज च्या हातावर बांधला तसे राज ने वाकून तिला नमस्कार केला.

नैना चे डोळे पाणावले होते , राज ने तिला जवळ घेत, " मी लवकरच येतो" म्हणाला. यावेळी त्याचेही पाऊल जड भासले त्याला पण जाणे गरजेचे होते.

मागे वळून राज ने भिंतीवरील एक हुक खेचले तसे ती भिंत बाजूला सारली गेली आणि राज सुखीसोबत आत चालता झाला.

नैना ने डोळे मिटून मनापासून आपल्या देवाला काही मागितले, डोळे उघडून बघते तर भिंत पूर्ववत झाली होती. तिने चकित होऊन बिंदीया दीदी कडे पाहिले तर ती म्हणाली, "नैना, हे भुयार खूप मोठे आहे..यांना नेण्यासाठी 100 फुटांवर आतमध्ये एक जीप गाडी असेल ती त्यांना घेऊन जाईल. त्या जीपचे लाईट्स इतके पॉवरफुल आहेत की भुयार सगळे प्रकाशित होईल...राज साहेब आधी पण या रोड ने गेले आहेत..तू काळजी करू नकोस.."

सुखीने पण सांगितले, बिंदीया दीदी ने पण सांगितले तरी नैना काळजी करणार होतीच..तिचा स्वभाव होता तो आणि राज च्या बाबतीत तर तिची काळजी ही पराकोटीची होती!

क्रमशः

©® अमित मेढेकर

🎭 Series Post

View all