मागील भागात आपण पाहिले की लग्नाच्या दिवशीच अनिरुद्धला बाहेर जावे लागते. सानवी त्याची वाट बघत असते. आता बघू पुढे काय होते ते.
" जावईबापू तुम्ही तुळशीपत्र वहा. आणि सानवी तू त्यांच्या हाताला हात लाव." गुरूजींनी सांगितले. सानवीने नजरेनेच परवानगी घेतली. त्याने होकार दिला.
सानवी पहिल्यांदाच त्याला स्पर्श करणार होती. तिच्या पोटात फुलपाखरे उडू लागली. तिने अनिरुद्धकडे बघितले. अगदी निर्विकारपणे तो बसला होता. तिने त्याला स्पर्श करताच त्याचा हात ताठरला. पण चेहरा तसाच. सानवी हिरमुसली. त्यानंतरची पूजा तिने यांत्रिकपणेच केली.
सगळे जेवायला बसले. अनिरुद्धने केलेल्या स्वयंपाकाची तारीफ सुरू होती. सानवीचे मात्र त्यात लक्ष नव्हते.
सानवी पहिल्यांदाच त्याला स्पर्श करणार होती. तिच्या पोटात फुलपाखरे उडू लागली. तिने अनिरुद्धकडे बघितले. अगदी निर्विकारपणे तो बसला होता. तिने त्याला स्पर्श करताच त्याचा हात ताठरला. पण चेहरा तसाच. सानवी हिरमुसली. त्यानंतरची पूजा तिने यांत्रिकपणेच केली.
सगळे जेवायला बसले. अनिरुद्धने केलेल्या स्वयंपाकाची तारीफ सुरू होती. सानवीचे मात्र त्यात लक्ष नव्हते.
" जिजू, तुम्ही कसा एवढा टेस्टी स्वयंपाक करू शकता?" पार्थने बोटं चाटत विचारले.
" अरे, आधी हॉस्टेल आणि नंतर एकटं राहणं. किती दिवस बाहेरचे खाणार? मग शिकलो."
" छान झाला आहे रे स्वयंपाक." बाबा म्हणाले.
पूजेला पृथा आली होती. ती सानवीच्या कानात पुटपुटली.
" मजा आहे तुझी. तुझा नवरा तर सगळ्याच बाबतीत एक्स्पर्ट आहे." यावर सानवीने तिच्याकडे बघून डोळे वटारले.
" अशी डोळे फाडून बघू नकोस. मनात लाडू तर फुटत आहेत." पृथा सानवीची खेचत होती.
" काही नाही.. बघतही नाही तो माझ्याकडे." सानवी उदास स्वरात बोलली.
" काहिही.. आल्यापासून बघते आहे, फक्त तुझ्याकडेच त्याचे लक्ष आहे. आताही बघतो आहे बघ तुझ्याकडेच." सानवीने पटकन मान फिरवली. अनिरुद्धची वळलेली नजर तिला जाणवली.
" जाऊ दे.. असंही या सगळ्याचा काही फायदा नाहीये. उगाच आशा लावण्यात काय अर्थ आहे. वर्षानंतर तो त्याचा आणि मी माझी." सानवी सुस्कारा सोडत बोलली. जेवणं झाल्यावर पार्थने फोटोची टूम काढली. त्याने सानवी आणि अनिरुद्धला वेगवेगळ्या पोझ द्यायला सांगितले. त्याने अनिरुद्धचा हात सानवीच्या खांद्यावर ठेवला. सानवीने स्वतःशीच हसली. फोटो काढून झाल्यावर पार्थ आणि अनिरुद्ध बुद्धिबळ खेळत बसले. तर आईबाबा आराम करायला गेले. पृथा आणि सानवी संध्याकाळची तयारी करू लागल्या. सानवीच्या ऑफिसमधले कर्मचारी येणार होते.
" तू जास्त कोणाला नाही बोलावलंस?" पृथाने विचारले.
" कशाला कोणाला बोलवायचं? फक्त आपली जवळची माणसं. जी दुःखातही साथ देतात आणि सुखातही." सानवी कडवटपणे बोलली.
संध्याकाळी सानवी आलेल्या पाहुण्यांशी अनिरुद्धची ओळख करून देत होती. तोपर्यंत शोभाताईंच्या सांगण्यावरून पृथा आणि पार्थने मिळून सानवीची खोली सजवली.
" चल, निघते मी. एन्जॉय युवर नाईट." हसत पृथा म्हणाली.
" काय बोलते आहेस?" सानवीने आश्चर्याने विचारले.
" मजा बघ.. आता मला निघू दे." पृथा म्हणाली. सगळे गेल्यावर सानवी थकली होती.
" चला, मी जाते झोपायला."
" सानवी.. हे दूध घेऊन जा. काल अनिरुद्धला पार्थच्या खोलीत झोपू दे सांगायचं लक्षातच राहिलं नाही." शोभाताई बोलत होत्या.
" आई, काय बोलते आहेस?"
" वय झालं आहे माझं.. जाऊ दे. अनिरुद्ध तू ही जा खोलीत आता."
" पार्थसोबतचा दुपारचा गेम संपवतो आणि मग जातो." अनिरुद्ध अडखळत बोलला.
" ही वेळ आहे का गेम खेळायची?" शोभाताईंचा आवाज ऐकून अनिरुद्ध निमूटपणे उठला.
" आईसमोर बाबांचे काही चालत नाही. तुझे काय चालणार?" पार्थ पुटपुटला. अनिरुद्धला हसू आले.
" काय बोलला पार्थ?" शोभाताईंनी विचारले.
" काही नाही.. गुड नाईट म्हणाला." अनिरुद्धने पार्थला सावरून घेतले. " काकू द्या तो ग्लास इकडे. मी नेतो."
" अरे पण.."
शोभाताईंचे काहीच न ऐकता अनिरुद्धने ग्लास हातात घेतला आणि तो बेडरूममध्ये गेला. सानवी भारावल्यासारखी त्याच्यापाठी गेली. आत जाताच तिने आधी दरवाजा लावला आणि ती तिथेच उभी राहिली.
शोभाताईंचे काहीच न ऐकता अनिरुद्धने ग्लास हातात घेतला आणि तो बेडरूममध्ये गेला. सानवी भारावल्यासारखी त्याच्यापाठी गेली. आत जाताच तिने आधी दरवाजा लावला आणि ती तिथेच उभी राहिली.
" आता काय तो दुधाचा पेला घेऊन मी पलंगावर बसू का? नाही म्हणजे आपलं वेगळं आहे ना, लग्न.." त्याने कुत्सितपणे विचारले.
" काही गरज नाही. जेवढं केलंत तेवढेच भरपूर आहे." सानवीच्या नाकाचा शेंडा लाल झाला.
" नक्की?" त्याने विचारले.
" हो.."
" मग या दुधाचे काय करू?"
" ओता माझ्या डोक्यावर.." सानवी चिडली होती. तो दुधाचा पेला घेऊन पुढे येऊ लागला. आता हा खरंच ओततो की काय असे वाटून सानवीने डोळे बंद केले. अनिरुद्ध जवळ आलेला तिला जाणवत होता.. पण काहीच झाले नाही.
" तुम्ही पिऊन घ्या हे दूध."
" दोघांनी प्यायचे असते." तिच्या तोंडून निघून गेले. तो तिच्याकडे बघतच राहिला.
" तुम्ही प्या. उरलेलं मी पितो."
" माझं उष्ट चालेल?"
" मला सवय आहे उष्ट्याची.." तो खिन्नपणे बोलला. सानवीने अर्धे दूध पिऊन पेला अनिरुद्धसमोर ठेवला.
" तुम्हाला कपडे बदलायचे असतील तर मी बाहेर.." तो बोलता बोलता थांबला.
" आज सगळ्यांचेच लक्ष असणार. त्यांना संशय येईल."
"मग?"
" मीच बाहेर जाते. आईने तशाही कितीतरी पिना लावून ठेवल्या आहेत."
" तुमची हरकत नसेल तर मी काढून देऊ का?"
" सवय असेल ना?" सानवीच्या तोंडातून निघून गेले आणि तिने जीभ चावली. "सॉरी."
" इट्स ओके. मी तिथे डोळे बंद करून बसतो. तुमचे झाले की आवाज द्या किंवा लाईट बंद करू का?"
" नाही.. अंधारात मला दिसत नाही. मला चष्मा आहे."
" तुम्ही लपवलेत हे माझ्यापासून. " अनिरुद्ध सानवीकडे बघत होता.
" तुम्ही विचारले नाही. आणि तसंही बाहेर जाताना मी चष्मा लावत नाही."
" कठीण आहे."
" कोणाचं?"
" ज्याचं आयुष्य तुमच्यासोबत जाईल त्याचे.."
" सध्यातरी सोबत तुम्ही आहात. माझे कायदेशीर पती."
" आपल्याला आज जागरण करायचे आहे हे मान्य. पण ते असे उभे राहून करायचे की बसून?"
" म्हणजे?"
" तुमच्या आईबाबांच्या मते ही आपली पहिली रात्र आहे. झोप पूर्ण झालेली दिसली तर त्यांना संशय येईल ना?"
" मग रात्रभर असंच भुतासारखं बसून रहायचं." सानवीच्या पोटात गोळा आला.
" तुम्हाला भुतांबद्दल फार प्रेम आहे का?"
" का??"
" येता जाता बोलत असता म्हणून.."
" अटीत हे लिहिलं होतं का?"
" काय?"
" फक्त एकतर्फी मस्करी चालेल."
" सॉरी.." अनिरुद्ध बोलला.
" इट्स ओके. पण आधी या पिना काढून द्या. कंटाळा आला या साडीचा." सानवी वैतागली होती. अनिरुद्ध तिच्याजवळ आला. त्याचा स्पर्श होईल या कल्पनेने सानवी मोहरली. पण त्याने आपला स्पर्शही होणार नाही या पद्धतीने पिना काढून दिल्या.
" मी आहे तिथे कोपर्यात.." अनिरुद्ध वळला. सानवीने त्याला परत वेडावून दाखवले. तिने पटापट साडी बदलली.
" झाले माझे." तिने त्याला आवाज दिला. तो मोबाईलवर काहीतरी करत होता.
" आता काय?"
" काही नाही.. गप्पा मारू." अनिरुद्ध म्हणाला.
" तुम्ही माझ्याशी बोलणार? मला वाटलं तुम्हाला मी आवडत नाही."
" आता सध्या दुसरा काही उपाय नाही ना.."
" फ्रेंड्स?" सानवीने हात पुढे केला.
अनिरुद्ध स्वीकारेल सानवीचा मैत्रीचा हात की राखेल अंतर.. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा