Jan 26, 2022
नारीवादी

Am I Next......?

Read Later
Am I Next......?
Am I next......?

"आ sss.. आsss.. सोडा मला plz ..मी हात जोडते तुमच्या पुढे ...भीक मागत आहे..जाऊद्या मला ...माझी चिमुकली माझी वाट पाहत असेल...तिला गरज आहे माझी ...नका हो करू असं... मी पदर पसरते तुमच्यापुढे जाऊद्या मला ........का करताय अस... अहो मी शॉर्ट कपडे घातले नाहीत .... कोणतंच अंगप्रदर्शन केलं नाही....मग का माझ्या अस्तित्वाशी खेळतय.....माझी पोर पोरकी होईल हो मला जाऊद्या .......मी तुमच्या आई बहिणीपैकी च आहे ना हो... ओ दादा नका ना ओ असं करू......अहो काका मला जाऊद्या हो ......."

म्हणतात ना हवस जेंव्हा मनावर हावी होते ना तेंव्हा त्या नीच दरिंद्याला कोणतेच नाते दिसत नाही.

"ओ दादा अहो तुमच्या बहिणीने तुम्हाला राखी बांधली ना हो ....मग तिच्यासारखी च मी पण आहे ना ......नका हो करू अस माझा संसार उध्वस्त होईल.....माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो हो ...तो जगू शकणार नाही हो....नाही...नाही....वाचवा sss.....वाचवा sss......" 

परिणाम च होत नव्हता त्या भडव्यांवर एकाने तिच्या पदराला हात घातला तर एकाने तिच्या मिऱ्या उपसल्या,एकाने तिचे हात पकडले तर एकाने तिचे पाय .तिचा आक्रोश तिची विनंती तिची तडफड त्या नामर्द ना दिसतच नव्हती. 

पाय झटकत होती हात मारत होती , पण त्या कमनशिबी माऊली ला सांगणार तरी कोण ....अग नाही ग वाचवू शकणार स्वतःला त्या बलाढ्य श्र्वापदा पासून ...त्यांनी जखडलय तुला ..तुझी किंकाळी ..थोड्या वेळाने हवेत विरून जाईल ..कुणी नाही येणार तुझी मदत करायला ....कुणी नाही येणार ....???

त्या दरिंद्याना तिची कसलीच दया येत न्हवती जंगली श्वापद सारखे तुटून पडले ते तिच्यावर एकाने तिचे कपडे फाडले ,तर एकटा तिच्या शरीरावर अधश्यासारखा तुटून पडला ,तर एकटा तिचे आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत होता , बारी- बारी ते नराधम तिच्या शरीराचे लचके तोडत होते , ती गयावया करत होती.पण तिची दया नाही आली त्यांना.

त्या भडव्यांची नख तिच्या शरीरात खोलवर रुतत होती , त्या बापडीला तिच्यावर कुठून कुठून हल्ला होतोय तेच कळतं न्हवता,त्या पूर्ण रक्ताने भरली होती ती . ?

हद्द तर तेंव्हा पार झाली जेंव्हा त्या लांडग्यांनी लोखंडी हत्यार तिच्या योनीत घुसवले .. स्स sss.. ??काय अवस्था झाली असेल तिची ......इथे लिहिताना च मला कल्पना होत नाही तर तिने हे सहन कस केलं .......

संपलं होतं सगळ ....तीच अस्तित्व मिटवल होत त्या लांडग्यांनी .....तिचा भरलेला संसार उध्वस्त झाला होता.....तिची चिमुकली आईसाठी पोरकी झाली......तिचा नवरा तिच्या जीवापाड प्रेम करणाऱ्या बायकोला मुकला होता ......तशीच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती ती......आणि शेवटचं हसू तिच्या चेहऱ्यावर आल....

ती हसली होती माणसातल्या माणुसकी वर...ती हसली होती भेकड पुरुष प्रधान संस्कृतीवर आणि त्याच्या पुरुषार्थ वर ......ती हसली तिच्या स्त्रित्वावर .......तशीच निवस्त्र निपचित पडली होती ती .....शांत झाली ती.

पण तिची शांतता ....प्रत्येक त्या स्त्री ,मुलींचं काळीज चिरून जाणारी होती कारण तिच्या शांततेत ....खूप भयानक असा प्रश्न होता ....ज्याचा नुसता विचार करून थरकाप होत आहे.......

" आज पुन्हा मी विस्कळीत झाले......आज पुन्हा मी बरबटले गेले.....कुणी मला जाळले तर कुणी माझे तुकडे केले ....कुणी माझ्यावर सूड उगवला तर कुणी मला हवस मिटवण्यासाठी उपभोगली.......कुणी माझे प्रायव्हेट पार्ट कट केले,तर कुणी माझ्या प्रायव्हेट पार्ट मध्ये हत्यार घुसवली ......हे सर्व कशासाठी ..? कुणासाठी ...? एका मासाळ अवयवासाठी ....जे कदाचित तुमच्या आईकडे ,बहिणीकडे,बायकोकडे पण आहे......हो ना...? आहे ना ...? मग माझ्यात अस काय वेगळं होत जे तुमच्या आई बहिणीकडे न्हवत.....? 
           तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे कोण बोलतंय ......तर ऐका मी बोलतेय .....हो मीच जिच्या पोटी जन्म घेता ती आई मी ....जिच्या हाताने हक्काने राखी बांधून घेता ती बहीण मी ......जिच्या गळ्यात तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालून आयुष्यभर तिची साथ द्यायची वचन देता ती पत्नी मी...... जिच्यावर अख्ख्या घराची जबाबदारी विचार न करता टाकता ती मुलगी मी ........आणि जिच्यावर आपली एका क्षणाची हवस मिटवण्यासाठी आपली किळसवाणी नजर टाकून तिला ओरबडाता ती उपभोगाची वस्तू मी ....हो मीच ती....तुमच्या तल्या पुरुषार्थ च्या आगीला शांत करणारी मादी मी .....हो मीच ती स्त्री..........
      मी श्वास घेतेय शेवटचा पुन्हा कधीच न श्वास घेण्यासाठी ....जातेय मी इथून कायमची पुन्हा कधीच न परतून येण्यासाठी.........आणि नाहीच येणार मी पुन्हा परतून ......कारण मी पुन्हा आले तर अशीच निर्वस्त्र होणार .....पुन्हा त्याच यातना होणार .......नको मला हा स्त्रीचा जन्म पुन्हा ..........मी गेल्यानंतर तुम्ही लाख मेणबत्या पेटवाल आणि जेंव्हा ते मेणबत्ती च मेण वितळेल तिथेच संपेल मी तशीच तडफडत .....नको मला तुमचा न्याय ...नको तुमची ही दिखाव्याची सहानुभूती ......नको तुमचे दिखव्याचे अश्रू मला .......नको तुमचा justice मला.......आज मी आहे उद्या आणखी कुणी असेल ........
     काय चूक होती माझी ...? सांगा ना ...? काय चूक होती...? मी अंगभर कपडे घातले होते......मी कोणत्याच बाजूने अंगप्रदर्शन केलं नाही ......तुम्ही म्हटला मी जीन्स घालते म्हणून तुम्ही माझ्याकडे खेचले जाता....म्हणून मी जीन्स घालने कमी केले....तुम्ही म्हटला लेट नाइट बाहेर राहते ....म्हणून मी घरी लवकर येऊ लागले ......तुम्ही म्हटला चेहरा दाखवून atract करते मी चेहरा झाकून घेतला......तुम्ही म्हटला अंगभर कपडे घाल मी अंगभर कपडे घातले ....मग त्या ही कपड्यातून तुम्हाला माझं शरीर कसे नजरेस पडले ..............तुम्ही एका बहुलिशी खेळावं तसे माझ्या शरीराशी खेळला ...तेंव्हा एकदाही तुमच्या त्या नीच,किळसवाण्या,क्रूर ,पाषाणी रूदयात तुमच्या आई बहिणीचे विचार आले नाहीत का ...? 

आज मी जातेय कायमची कधीही न परतून येण्यासाठी ...पण उद्या माझ्यानंतर हे स्त्री पुन्हा तुझा नंबर आहे ......" Yes you are next" ..... तयार रहा पुन्हा निर्वस्त्र होण्याकरता ......त्या पेटत्या मेणबत्तीच्या मेनात विरघळण्याकर्ता ,........चार दिवस सोशल मीडिया चा तडका बाण्याकर्ता तयार रहा...... माझ्या सोन्या घरातून बाहेर पडताना एकदा स्वतः च्या मनाला नक्की एक प्रश्न विचारून बाहेर ...,.am I next ..?................"
???
*******************************************

सुचत नव्हतं काय लिहावं लिहिताना ही हात थरथरत होते . पण हे लीहण गरजेचं होतं ...कारण मला ही हा प्रश्न पडलाय आता ....??????

"स्वलिखित............ gaytri.*******
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Gaytri Kamble