फिर भी तुमको चाहुंगा... भाग ३

अजिंक्यने खोलीत येताच दार लावून घेतले. त्याला एकांताची खूप गरज होती. ताराच्या रेशमी आठवणीत जपलेली तिची साडी उद्या प्राजक्ताकडे जाणार होती. तशा कित्येक वस्तू होत्या अजिंक्य जवळ ताराच्या पण ही साडी म्हणजे सगळ्यात विशेष होती. अजिंक्य परत त्याच आराम खुर्चीत जाऊन बसला. ताराची साडी त्याच्या हातात होती. अलगद अगदी प्रेमाने तो त्या साडीवर हात फिरवत होता. आणि तसाच अलगद परत ताराच्या आठवणीत रमला.

मागील भागात आपण बघितले…



रामाताईंनी डोळे पुसले. एकदा परत साडीला कवटाळले.


तितक्यात पारस त्यांना जेवणासाठी बोलवायला आला. तसे दोघे पारस सोबत जेवायला निघून गेले. पण जेवण कोणाला गोड लागत नव्हते. प्राजक्ताची कमी सगळ्यांना जाणवत होती. कसं बसं जेवण करून पाहुण्यांची झोपायची व्यवस्था लावून पारस, अजिंक्य आणि रमाताई आपआपल्या खोलीत निघून गेले. 



आता पुढे…



अजिंक्यने खोलीत येताच दार लावून घेतले. त्याला एकांताची खूप गरज होती. ताराच्या रेशमी आठवणीत जपलेली तिची साडी उद्या प्राजक्ताकडे जाणार होती. तशा कित्येक वस्तू होत्या अजिंक्य जवळ ताराच्या पण ही साडी म्हणजे सगळ्यात विशेष होती. अजिंक्य परत त्याच आराम खुर्चीत जाऊन बसला. ताराची साडी त्याच्या हातात होती. अलगद अगदी प्रेमाने तो त्या साडीवर हात फिरवत होता. आणि तसाच अलगद परत ताराच्या आठवणीत रमला.



" गूड मॉर्निंग." ताराला बघताच अजिंक्य ताराशी बोलायला गेला.


" गूड मॉर्निंग." ताराने त्याच्याकडे न बघताच उत्तर दिलं. आणि सोबत असलेल्या मैत्रिणीशी म्हणजे समीराशी बोलू लागली. तारा, अजिंक्य, चेतन, समीरा आणि संध्या असा ह्यांचा पाच जणांचा ग्रुप होता. 


" तारा बरं झालं आलीस आम्ही तुझीच वाट बघत होतो." अजिंक्यने ताराशी बोलण्याचा प्रयत्न केला.


तारा काहीच बोलली नाही. 


" अगं माझं डोकं खूप दुखतयं. चहा घेतला तर बरं वाटेल. म्हणून कॅन्टीन मध्ये जायला तुझी वाट बघत होतो. म्हटलं तू आलीस की जाऊ सोबत." अजिंक्य पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करत होता.


" का? जायचं ना तुम्ही. माझी वाट कशाला बघायची.? उगाच वेळ घालवला. मला यायचं नाहीये कॅन्टीन मध्ये." तारा अजून सुद्धा अजिंक्यकडे बघणे टाळत होती.


" अगं नेक्स्ट लेक्चर ऑफ आहे. बसू थोडावेळ तिथेच." चेतन ताराला मनवण्याचा प्रयत्न करत होता.


" नाही रे मला लायब्ररीत जायचं आहे. त्यामुळे मी नाही येत. तुम्ही जा नंतरच्या लेक्चरला भेटू." तारा चेतन शी नेहमी प्रमाणे बोलत होती.


" अशी काय गं चल ना. काही खाऊ पण सगळे." अजिंक्य परत बोलला.


" तुला कळत नाहीये का? मला नाही यायचं. तुम्ही जा सगळे. उगाच आग्रह नका करू." तारा जरा रागावून बोलली आणि लगेच तिथून लायब्ररीत निघून गेली.



अजिंक्य, चेतन, समीरा, संध्या सगळे तिला असं जाताना बघत होते. त्यांना कळलंच नाही की तारा अशी एकदम का चिडून निघून गेली. सगळे एकमेकांकडे बघत होते.


" तुम्ही सगळे जा. मी बघते काय झालं आहे ते." असं म्हणत समीरा ताराच्या मागे पळत लायब्ररीत गेली.


" ओय, काय झालं ? घरी काही भांडणं झालं का?" समीरा ताराच्या शेजारी बसत बोलली.



"काही नाही गं. उगाच टाईम पास होतो. म्हणून नाही म्हणाले मी. चल अभ्यास करू." तारा विषय संपवण्याच्या दृष्टीने बोलली.



हल्ली असच होत होतं. तारा अजिंक्य शी बोलणं टाळत होती. त्यात पूजा दुरून दिसली तरी तारा आधीच तिथून निघून जायची. एकटा अजिंक्य सोडला तर इतर सगळ्यांशी तारा नेहमी सारखं वागत होती. सुरुवातीला काही दिवस अजिंक्यने तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं. 'कदाचित पूजा मुळे रागावली असेल. शांता झाली की बोलेल.' असं त्याला वाटलं. पण प्रकरण वाटतं तितकं सोपं नव्हतं. तारा दिवसों दिवस अजिंक्य पासून दूर जात होती. त्याला मुद्दाम अपमानास्पद, चिडून बोलत होती. ह्या सगळ्यांचा आता अजिंक्यला त्रास होत होता. 



एकदा असेच तारा रागात अजिंक्यला बोलली आणि निघून गेली. त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. तो तिच्या मागे गेला तिच्या अशा वागण्याचे कारण त्याला जाणून घ्यायचे होते. ती झपाझप पावलं टाकत जात होती. तितक्यात बेल वाजली आणि सगळे आपआपल्या वर्गात गेले. तारा मात्र बाहेरचं थांबली. त्यांचा वर्ग ज्या मजल्यावर होता त्या मजल्यावर आडोसा बघून एका भिंतीला टेकून उभी राहिली. आजू बाजूला कोणी नाही बघून हळूच डोळे मिटले आणि मनावरचे ओझे हलके केले. डोळ्यातील पाणी गालावरून वाहत होतं. हे सगळं अजिंक्य मागे उभा राहून लपून पाहत होता. त्यावेळी तो काहीही न बोलता आल्या पावली मागे निघून गेला.



ताराला असं बघून एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आली होती की, तारा हे सगळं मुद्दाम करते आहे. पण का? ह्याचं कारण त्याला सापडत नव्हते. 


"तिच्या वागण्याचा आपल्या इतकाच किंवा त्याहून जास्त त्रास तिला होतो आहे. पण का? कशा साठी? ह्याचं साक्षमोक्ष लावलाच पाहिजे." अजिंक्य मनातच बोलत होता.


त्याची ही घालमेल चेतनच्या लक्षात आली. 


" अजिंक्य काय सुरू आहे तुझ्या डोक्यात?" चेतन


" तारा असं का वागते आहे माझ्याशी? ह्याचा विचार करतो आहे." अजिंक्य विचारात गुंतलेला असतानाच बोलत होता.


" अरे तू पूजाशी बोलतोस हे आवडतं नाही तिला." चेतन


" नाही मला वाटतं त्याव्यतिरिक्त अजून काही कारण आहे." अजिंक्य


" मला पण वाटलं ते. पण ते कारण तूच शोधून काढ. तुमच्यातील दुरावा तुलाच दूर करावा लागेल." चेतन


" हो रे त्याचाच विचार करतो आहे. मला खूप त्रास होतो आहे रे तिच्या अशा वागण्याचा. ती दूर जाते आहे हे सहन होत नाहिये मला." अजिंक्य.


" जा मग दे तुझ्या प्रेमाची कबुली तिला." चेतन


अजिंक्यने एकदम दचकून चेतन कडे बघितले.


" तुला कसं समजलं?" अजिंक्य


" मला सगळं माहित आहे. उगाच मित्र नाही तुम्हा दोघांचा." असे बोलून चेतन हसत निघून गेला.


" तारा किती छळलस मला तू त्या काळात. माझा जीव कसा होत होता ह्याची तूला कल्पना पण नव्हती. " अजिंक्य तारा ची साडी. हातात घेऊन बोलत होता.


" मी ठरवलंच होतं की तुझ्याशी ह्या विषयावर बोलायचं. फक्त योग्य संधी ची वाट बघत होतो मी. आणि ती संधी मला एक दिवस मिळालीच.



" तुला आठवतो तो पावसाळा? पाऊस नेहमीचाच होता. पण मनात वादळ उठत होतं. आज बोलूच ह्या विचारात मी होतो. कॉलेज मध्ये तिसऱ्या मजल्यावर लेक्चर सुरू होणार म्हणून मी तुझी वाट बघत होतो. सर सुद्धा आले होते. सगळे लेक्चरला निघून गेले. पण मी सगळ्यांची नजर चुकवून बाहेरचं तुझी वाट बघत होतो. तुला त्या दिवशी पाच मिनिट उशीर झाला होता यायला. 


किती धावत आली होतीस तू. अर्धी भिजलेली. पायऱ्यांवरून वर येताना समोरच दिसलो मी तुला. तू तशीच धावत वर आलीस. त्या वेळेस सगळे वर्गात होते. त्या मजल्यावर बाहेर आपल्याशिवाय कोणीच नव्हतं. तू मला बघून फक्त फॉर्मल हसलीस आणि वर्गाच्या दिशेने जायला निघाली. तोच मी तुझ्या समोर येऊन उभा राहिलो. " जाऊदे मला लेक्चर सुरू झालं आहे." तू बोललीस पण मी तुझ्या बोलण्या कडे दुर्लक्ष केलं. ' अरे चल उशीर झाला आहे आधीच. तू येतो आहेस का? नाहीतर मी जाते.' असं म्हणत होतीस. मी काहीच बोललो नाही. तू जाण्यासाठी वळणार तितक्यात मी तुझा हात घट्ट पकडला. आणि लेक्चर संपे पर्यंत सोडलाच नाही. खरं तर त्या दिवशी सर खूप महत्वाचा धडा शिकवणार होते. पण मला त्यावेळी फक्त तू दिसत होतीस. गुलाबी ड्रेस मध्ये, पावसामुळे भिजलेली तुझी ओढणी हवेने उडत होती, वाऱ्यामुळे उडणारे तुझे रेशमी केस आणि त्या केसांवरून मधूनच गालावर ओघळणारे थेंब, गारव्यामुळे थर थरणारे तुझे गुलाबी ओठ. मला वेड लावत होते. मधूनच जोरदार हवे मुळे पावसाचा फवारा आपल्या अंगावर येत होता. बाहेर मेघ बरसत होते आणि मनात वादळ उठत होते. दोघे ही निःशब्द होतो. तू पडणारा पाऊस न्याहाळत होतीस. पडणारी प्रत्येक सर तुझ्या डोळ्यात ही पाझरत होती. आणि मी तुला बघत होतो. किती प्रयत्न करत होतीस हात सोडवण्याचा आणि न रडण्याचा पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरत होते. 



तितक्यात पूजा तिथे आली. तीने मला आवाज दिला. तिला बघून तू जाणार तितक्यात मी तुझा हात अजूनच घट्ट पकडला. आणि तिला ' नंतर भेटू ' असं सांगून जाण्यास सांगितले.


" जा तू, ती तुझी वाट बघते आहे." तारा अश्रू आवरत बोलत होती.


मी काहीच बोललो नाही. फक्त तुझा हात पकडून ठेवला होता. शेवटी तू पण हात सोडवण्याचा प्रयत्न सोडून दिला. न कळत तू सुद्धा माझा हात घट्ट धरला होता. त्या स्पर्शात एक वेगळाच भाव होता. असं वाटतं होतं की काहीतरी पकडण्याचा तू प्रयत्न करते आहेस.


" तारा बोलशील आता तरी?" थोड्यावेळाने अजिंक्य बोलला.


" काय बोलू? काही नाही माझ्या कडे बोलायला." तारा अजूनही बाहेरचा पाऊस बघत होती.



" ठिक आहे. नको बोलूस. मी पण तुझा हात सोडणार नाही जोपर्यंत तू मनातलं बोलत नाहीस. इतका विश्वास नाही का माझ्यावर?" अजिंक्य ताराच्या अजून जवळ जात बोलला.


त्याला इतकं जवळ बघून ताराच्या अंगावर शहारे आले.

पण ती लगेच मागे झाली. तसं अजिंक्य ने तिला त्याच्या जवळ खेचून घेतले. अर्थात इतक्याच जवळ की तिला किंवा बघणाऱ्याला काही वावगे वाटणार नाही. आपण कॉलेज मध्ये आहोत हे तो विसरला नव्हता.



" काही नाही." तारा


" तुला आवडत नाही का मी पूजा शी बोलतो?" अजिंक्य


खूप प्रयत्न करून पण स्वतः ला रोखू शकत नव्हती. ती काहीच बोलली नाही. तोच अजिंक्य ने तिचा हात दोन्ही हातात पकडला.



पुढील भागात बघू तारा सांगेल का मनातील भावना? अजिंक्य ची प्रतिक्रिया काय असेल? जाणून घेण्या साठी वाचत रहा फिर भी तुमको चाहुंगा.



क्रमशः





🎭 Series Post

View all