Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग बावीस

Read Later
अलवार प्रेम... भाग बावीस

 

अलवार प्रेम... भाग बावीस
विषय
=प्रेमकथा

मागील भागात आपण पाहिलं...
ऋचा उमाकडे जाऊन वेदला समजाव म्हणून सांगते. उमा ऋचाला लक्षात आणून देते की ती पुरात जाऊनही नॉर्मल आहे. वेद तिला त्याचं प्रेम स्वीकारायला सांगतो.

आता पुढे...


ऋचाने अविश्वासाने त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या डोळ्यात बघताच ती त्यात हरवली. आज पहिल्यांदा ती त्याला असं जवळून बघत होती, त्याच्या डोळ्यातली आर्जव तिला जाणवली आणि तिने पुढला मागचा काहीही विचार न करता त्याला घट्ट मिठी मारली.

एक क्षण तिच्या त्या कृतीने वेदही बावरला पण लगेच सावरत त्याने तिच्या डोक्यावर प्रेमाने थोपटले.
ते बघून बाहेरुन येणाऱ्या मनूला उचलून उमा जोरात ओरडली,
"वेद काका, काकू पसंत आहे बरं का आम्हाला..."
ऋचा घाबरुन बाजूला झाली आणि खाली मान घालून बसली. तिला स्वतःला कुठेतरी लपवावं वाटतं होतं. आज त्याला मिठी मारल्यावर तिला जाणवलं, हेच ते जे जीवनात अधुरं वाटत होतं.
शिव आणि उमाला आता नक्की काय झालं ते कळलं. शिवला वेदवर पूर्ण विश्वास होता त्याने फक्त

"जे करशील ते जरा जपून." म्हणून त्याला मिठी मारली. ते बघून उमानेही आनंदाने ऋचाला लाडू भरवला
आणि शिवकडे बघत हसत म्हणाली,

"कळलं आता, तुमचा मित्र आणि माझी मैत्रीण लग्न का करत नव्हते ते?" त्यावर सगळे खळाळून हसले. वेदने ऋचाकडे बघत डोळा मारला आणि हळूच म्हणाला, "जिसे मैने ढुंढा गली गली, वो मेरे बाजूवाले घरमे मिली."
त्यावर हसत शिव म्हणाला,

"चला दोन मिनिट देतो तुम्हाला एकांताचे." आणि त्या दोघांनाही किचनमध्ये सोडून शिव आणि उमा बाहेर आले.
आता वेदने हक्काने ऋचाला जवळ घेतले आणि समजावत म्हणाला,

"स्वतःला त्रास करुन घेऊ नकोस, सगळं जसं आहे तसंच चालू राहू दे. एक महिन्याचा अवधी दे मला मी सगळं सुरळीत करेल, विश्वास ठेव माझ्यावर."
ऋचाने उत्तर म्हणून फक्त त्याला घट्ट मिठी मारली.
आई गेल्यापासून अशांत असलेलं तिचं मन आज अचानक तिला शांत वाटत होतं, म्हणजे खरंच आई तिला वेदला स्वीकार म्हणून सुचवत होती.
कुणाला शंका येऊ नये म्हणून तो तिथून लगेच निघाला. शिवकडे तो नेहमी येत राहतो म्हणून आजूबाजूच्या लोकांचं तेवढं लक्ष नव्हतं. तेथून आनंदात निघालेला वेद मात्र विचारात पडला होता की आज रात्री नक्की करायचं काय?

तो गेल्यावर उमा आणि शिवने ऋचाला खूप समजावले आणि चिडवलेही. वेदविषयी खूप सारी माहिती सांगितली. त्याने शब्द दिला आहे तर तो नक्की सगळं ठीक करेल म्हणून धीर धरायला सांगितला. ऋचा ही थोडी आश्वासित झाली. जरा आनंदात आणि जरा टेन्शन मध्ये ती घरी पोहोचली. कालपासून उदास असलेली ऋचा वर जाताना आनंदात असलेली बघून मेघा आणि कांताआईला बरं वाटलं.

आज रात्री गावात मोठी दहीहंडी असते आणि अनिल ती फोडतो हे ऋचाला कळलं. आतापर्यंत तिने दहीहंडी फक्त टीव्हीवर बघितली होती. आज आपला भाऊच ती फोडणार याचा तिला आनंद होता. दुपारी अनिल आला, आबासाहेब आणि सुनील फिरत्या प्रचार दौऱ्यावर होते, ते दोघेही आज रात्री येणार होते. संध्याकाळची सगळी तयारी झाली होती.
ऋचा संध्याकाळी तयार व्हायला वर गेली, तेव्हा तिने बिनधास्त पडदा हटवून बघितलं, वेद नव्हता तिथे. काही वेळाने तयार होऊन दहीहंडी फुटते त्या मैदानात जायचं असल्याने ऋचा आनंदातच तयार झाली. तिथे वेद येणार होता आणि आज पहिल्यांदा ती वेदसाठी तयार होत होती. मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. सोबतच घरच्यांची भीती आणि कसं होईल याचं टेंशन होतंच.
तयारी होतंच आली होती तेवढ्यात हॉर्न वाजला. हॉर्न वाजताच ऋचा धावत बाहेर आली आणि तिने पडदा बाजूला केला. वेदने हॉर्न वाजवत सभोवार नजर फिरवत खिडकीवर नजर थांबवली आणि डोळ्यांनीच तिला दाद दिली. तिचा आनंदी चेहरा बघून त्याच्याही चेहऱ्यावर हास्य पसरलं होतं.

गावातल्या मैदानावर यात्रेचे स्वरुप आले होते, ते आकाशपाळणे, ते वेगवेगळे झुले सगळं ऋचा पहिल्यांदाच बघत होती. तिच्या पॅनिक अटॅकच्या भितीमुळे मीराकाकू ती घाबरेल अश्या कुठल्याच ठिकाणी नेत नव्हती. ऋचासोबत मेघा होतीच बालिशपणा करायला आणि यांचा हट्ट पुरवायला होता सुनील दादा. दहीहंडी फोडायला दोन गट होते, दादासाहेबांचा वेगळा आणि आबासाहेबांचा वेगळा. पोलीस बंदोबस्तही होता. ऋचा,मेघा आणि सुनीलसोबत आकाशपाळण्यात बसली पण तिची नजर सगळीकडे वेदलाच शोधत होती.

थोड्या वेळाने तिला वरुन गर्दीत शिव-उमा, वेद आणि मनू दिसले. वेद मनूला घेऊन या पाळण्यावरुन त्या पाळण्यावरच बसवत फिरत होता. ऋचाची नजर राहून राहून त्याच्याकडेच जात होती. मेघा मस्त एन्जॉय करत होती. अनिल तेव्हढा हौशी नव्हता पण तिचा बालिशपणा पूर्ण करायला तिचा दीर सुनील असायचा नेहमी. पाळणा थांबला, ती खाली उतरली आणि उमाशी बोलत होती. तेव्हाच वेद मनूला घेऊन उमाजवळ द्यायला म्हणून आला आणि जाताना ऋचाकडे लक्षही नाही असं भासवत "छान दिसतेयस" म्हणून ऋचाच्या कानात कुजबुजून गेला.
ऋचाला दरदरुन घाम फुटला होता. तो आला तसा सुनील दादा जवळ आला असला तरी रिलॅक्स होता. वेद उगाच कुठल्याही भानगडीत पडत नव्हता त्यामुळे वेदसोबत कुणीही दुश्मनी ठेवत नव्हतं. तो मनूला द्यायला आलाय असं समजून सुनीलने दुर्लक्ष केलं. मनूला दिल्यावर वेद त्या दहीहंडीच्या गर्दीत शिरला. कधी नव्हे तो यावेळची दहीहंडी फोडायला वेद वर चढणार होता. दरवर्षी अशोक चढायचा पण मागच्या वर्षी त्याच्या पायात रॉड टाकावा लागल्यामुळे यावर्षी वेद ही कामगिरी करणार होता. वेद बिनधास्त होता त्यात आजचा ऋचाचा होकार म्हणजे त्याच्यासाठी आनंदी आनंदच होता.


क्रमश:


काय होईल दहीहंडी फोडताना?

 

 

©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//