Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग तेवीस

Read Later
अलवार प्रेम... भाग तेवीस

 

अलवार प्रेम ​​​​​​... भाग तेवीस

विषय =प्रेमकथा


मागील भागात आपण पहिले...
ऋचा वेदचं प्रेम स्वीकारते. सगळे दहीहंडी बघायला मैदानावर जातात तिथे वेद सगळ्यांसमोर गुपचूप ऋचाला कॉम्प्लिमेंट देवून जातो आणि ऋचा घाबरते.

आता पुढे...


मागच्या वर्षीच्या दहीहंडीत अशोक वरच्या थरावरुन पडला होता आणि त्याच्या पायाला इजा झाली, परिणामी आबासाहेबांचा गट जिंकला.
टॉस करुन एका गटाला संधी मिळायची तो हरला तर दुसरा गट हंडी फोडायचा. टॉस जिंकून पहिली संधी जर आबासाहेब गटाला मिळाली तर अनिलला वरुन पाडायचा अशोकचा प्लॅन होता. तेच व्हायला नको म्हणून वेद तितक्यातच घुटमळत होता. श्यामाने कालच त्याला ही बातमी दिली होती. दहीहंडी रचली, थरावर थर चढले आणि अनिलने वर जायला सुरुवात केली. तो चढला आणि त्याचा हात दहीहंडीला पोहोचणार तोच खालच्या थरातील दोन लोक मागे सरकले. आधी कळल्यामुळे वेद आणि शिव त्या माणसांच्या मागेच होते. ते दोघे हटले तसंच वेद आणि शिवने मध्ये घुसून तोल सावरला. सगळे थोडेफार डगमगले पण ही दोघे मध्ये घुसल्यामुळे कुणीही पडलं नाही. अनिल दादानी हंडी फोडली आणि दुसऱ्या गटाला संधीच मिळाली नाही.

सगळं झाल्यावर अनिलने मध्ये कोण हललं ते बघितलं.त्याला एक सापडला, भीती दाखवताच त्याने अशोकने पैसे दिल्याचे कबूल केलं. अनिलला पाडायचा प्लॅन पक्का होता हे कळताच अनिल आणि त्याच्या मित्रांनी भराभर काठ्या काढल्या. आता दोन्ही गटात जबरदस्त मारामारी होणार हे बघून वेद मध्ये पडला आणि दरडावून सगळ्यांना गुपचूप परत पाठवले. शिवने कसंबसं अनिलच्या माणसांना समजावून त्यांनाही शांत बसवले.

सगळे घरी पोचल्यावर या गोष्टीची चर्चा सुरु होती. सगळ्यांना वाटलं की,थर कोसळले असते पण शिव मध्ये घुसला म्हणून अनिल वाचला. आबासाहेब उठून रुममध्ये निघून गेले. ही बातमी कळताच ऋचाला खूप अभिमान वाटला. हे सगळं वेदने केलं हे तिला कळलं होतं. ती धावत वर गेली आणि तिने हळूच पडदा सरकवला.
तिच्या अपेक्षेप्रमाणे वेद तिथेच होता. तिने हात जोडले त्याने आजूबाजूला बघत एक फ्लाइंग कीस तिच्या दिशेने फेकला आणि ऋचाने लाजून खिडकी बंद केली.

इकडे वेदच्या घरी जेव्हा कळलं की, वेदने अनिलला वाचवलं तेव्हा हाहाकार माजला. अशोकने दादासाहेबांचे चांगलेच कान भरले होते. दादासाहेबांनी वेदला खाली बोलावलं आणि गरजले.
"तुला तुझं हॉस्पिटल चालवायचं आहे ना, मग गावाच्या राजकारणात तू मध्ये पडू नकोस"
"काय मिळालं तुम्हाला ते राजकारण करुन, लोकांचे जीव स्वस्त वाटतात का तुम्हाला? घरदार, मैत्री वेशीला टांगून तुम्ही राजकारण करताय काय मिळते तुम्हाला त्या राजकारणातून? " वेद चिडून म्हणाला.
वेद आणि दादासाहेब यांचं विचारांच्या बाबतीत कधीच पटत नव्हतं. आता वाद विकोपाला जाणार म्हणून आई मध्ये पडली त्याला शांत हो म्हणायला. त्याने आईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले आणि दादासाहेबांसमोर उभं करत म्हणाला.
" विचारा हिला काय मिळालं तुमच्या राजकारणामुळे तर, तुम्हाला आमदारकीची सीट मिळाली आणि तुम्ही सगळंच विसरलात. सख्ख्या बहिणीला भेटू शकत नाही ती. तुमची चूक कशात आहे, तुमची मुलं काय करताय हे सुद्धा विचारावं वाटलं नाही कधी तुम्हाला. बस आपला स्वार्थ, आपलं नाव यातच तुम्ही खुश होतात. काय नाही केलं आम्ही तुमच्यासाठी, तुमच्या प्रचारासाठी. आज तुम्ही त्यांच्या मुलाला मारायला मागेपुढे पहायला तयार नाही मग उद्या तुमचा मुलगा मेला तर काय करणार आहात तुम्ही? मला गावात आणलं ते गावातल्या लोकांचे जीव वाचवायला, ना की जीव घ्यायला आणि जर तुमचा असाच पवित्रा असेल तर मी हे घर सोडायला कमी करणार नाही, हे लक्षात घ्या." म्हणत वेद रागारागात वर निघून गेला.
दादासाहेबांची मोठी दोन्ही मुलं कर्तुत्ववान नसल्यामुळे दादासाहेबांचं ऐकायचे, कारण त्यांची सगळी शान बापाच्या भरवश्यावर पण वेद असा नव्हता.
वेद रागात निघून गेला हे बघून रश्मी ही चिडल्या आणि दादासाहेबांना म्हणाल्या,
"खूप चूप बसले आणि खूप ऐकलं तुमचं पण आता या म्हातारपणात माझ्याने मुलगा दूर गेल्याचे दुःख नाही सहन होणार."
त्या वेदच्या मागेच वर आल्या.
वेद अस्वस्थपणे टेरेसवर फेर्‍या मारत होता. ऋचा खिडकीतून बघत असूनही त्याचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. त्याच्या आईने मागून येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या
" काय झालंय मला सांगशील?"
"आज अशोक दादाने अनिलचा जीव घेतला असता."
"काय?" त्या जोरात ओरडल्या, शेजारी असून आमच्या मुलांना आम्ही बहिणी आहोत कळत नाही. कांताताईचं ठीक आहे रे, तिची मुलं तिच्या शब्दाबाहेर नाहीत पण माझं... ना मुलं, ना सुना सगळंच हाताबाहेर, त्यात तू ही गेलास तर... माझी शेवटच्या सुनेची आस ही संपेल." रश्मी रडवेल्या होत आरामाखुर्चीवर बसल्या.

वेदने त्यांच्या बाजूला बघत समोरच्या खिडकीकडे बोट दाखवलं.
ऋचाने घाबरुन पडदा बंद केला.
"काय आहे त्या खिडकीत?" रश्मीने अधीरतेने विचारलं, त्यांना वाटलं त्यांची मोठी बहिण असेल तिथे पण...
"तुझी सून." वेदच्या शब्दाने त्या चमकल्याच.
"काय?sss..."
रश्मीताई केवढ्याने तरी ओरडत ऊठल्या.
तसं त्यांच्या तोंडावर हात ठेवत वेदने त्यांना पुन्हा आरामखुर्चीत बसवलं आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे आतापर्यंत जे काय झालं ते सगळं आईला सांगितलं.
"अरे पण बाळा, हे कसं शक्य आहे?" त्या काळजीने म्हणाल्या.
"माहित नाही पण अशक्य काही नसतं, मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार मी शब्द दिला आहे तिला." वेद जाड आवाजात म्हणाला.
"मला तरी कठीण वाटतंय रे खूप, तुझी आवड आहे तर छानच असणार. लहान होती तेव्हा बघितलं होतं. तिची आई गेल्यानंतर घरातल्या वादामुळे भेटता आलं नाही रे कधी, कसं वाटलं असेल तिला त्या वयात पुरात नजरेसमोरुन तिची आई वाहून जाताना बघतांना."
वेद चमकला, "कायsss...कशी गेली होती तिची आई?"
वेदच्या आईने त्याला काय झालं तो सगळा घटनाक्रम सांगितला. वेद आईच्या मांडीवर डोकं ठेवून ऐकत होता.
आता त्याला ऋचाच्या पाण्याला भिण्याचं कारण कळलं होतं, ऋचा चिडण्याचं कारण कळलं होतं.
"खरंच ना, किती घाबरली असेल ती मला पाण्यात पाहून?" त्याला तिची माफी मागावी वाटत होती, पण कशी मागणार?


दुरदूर सखे तू अशी
भेट कधी घडेना
मिलनाला आतुर मन
बघून मन भरेना...

क्रमश:

काय होणार पुढे, कसं जुळवतील दोन्ही घरं?

©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//