Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग सव्वीस

Read Later
अलवार प्रेम... भाग सव्वीस

अलवार प्रेम... भाग सव्वीस

विषय =प्रेमकथा 

मागील भागात बघितलं...
ऋचा स्वतःला का त्रास करवून घेतेय हे वेदला कळलं. उमा तिला घरी आणून वेदशी भेट घडवून देते. ऋचाने त्याच्यावर विश्वास न ठेवता दुसऱ्यांवर ठेवला हे बघून वेद रागावून निघून जातो.

आता पुढे...

वेद सहसा असा चिडत नव्हता, पण यावेळी तो जास्त दुखावला गेला होता. मनातून तो नाराज झाला होता. उमा आणि शिव त्याला आधीपासून ओळखत होते, समजून घेत होते.

ते आताही ऋचाला समजावत होते,
"होईल त्याचा राग शांत. तू टेन्शन नको घेऊस, तू स्वतःला त्रास करुन घेतला, त्यामुळे त्याच्या मनाला लागलं ग." म्हणत उमाने शिवकडे बघितलं तसं शिवही म्हणाला,
"त्या तनुजाचं नावही काढलं तर चिडतो तो आणि तू तिचं ऐकून त्याच्यावर अविश्वास दाखवलास हे लागलं असेल त्याच्या मनाला."

ऋचा फक्त रडत होती.
"त्याचा राग होईल शांत पण ही स्वतः ची स्थिती सुधार, असं तू स्वतःला त्रास करुन घेतलास तर त्याचा राग कधीच शांत होणार नाही." उमा दरडावत म्हणाली.
"ऋचा चूक तुझी आहे, तू असं अर्धवट कुणाचं ऐकून त्याच्यावर शंका घ्यायला नको होती. अगं कमीतकमी आम्हाला तर विचारायचं होतं ना." शिव काकूळतीने म्हणाला. तसं उमा तिचे डोळे पुसत म्हणाली,
"बरं जाऊ दे, तू रिलॅक्स राहा, होईल तो शांत... नाहीतर मी बोलेल आरामात त्याच्याशी."
काही वेळात ऋचा सावरली.
खरंच तर होतं, चूक तिचीच होती, तिने उगाच काही-बाही ऐकून त्याच्यावर शंका घेतली.
काही वेळाने उमाने तिला घरी सोडलं. ती आपल्या रुममध्ये गेली आणि आसपास कुणी नाही बघून खिडकीतून बघितलं.
वेद नव्हता तिथे, तिला वाटलं हॉस्पिटलमध्ये असेल, परत आला की हॉर्न वाजवेल.
ती रुममध्ये बसून कान देऊन गाडीचे आवाज ऐकू लागली.
दोन-तीन पासून रात्रीचे दहा वाजत आले तरीही हॉर्न वाजलाच नाही. तिने कितीदातरी बघितलं तो दिसलाच नाही.

ऋचा आपल्याच मनाला समजावत होती.
'बरोबर आहे त्याचं चिडणं, चिडणारच ना. मी उगाचच कुणावर विश्वास ठेवला. उगाच मी स्वतःला त्रास करुन घेतला. त्याला किती त्रास झाला असेल माझ्या वागण्याने? ते काही नाही मी आता स्वतःला त्रास करुन घेणार नाही, खुश राहणार मस्त, मग मी बघतेच याचा राग किती दिवस टिकतो ते...माझ्या वागण्याने घरच्यांनाही खूप त्रास झालाय.' विचारात ऋचा झोपली.
सकाळी उठल्यावर मस्त आवरुन तयार होऊन खाली आली.
कौशीला पाठवून तिने मनूला घरी बोलावून घेतलं आणि अंगणात मस्त मनूसोबत खेळत होती.
तिची भाबडी आशा होती की, वेद सकाळी आला असेल आणि टेरेसवरच असेल. तिला असं आनंदात बागडतांना बघून त्याचा राग निवळेल.

*********


वेद शिवच्या घरुन निघाला आणि गावातल्या टेकडीवर जाऊन बसला. आईनंतर पहिल्यांदा त्याला कुणी आवडलं होतं. तिचा बालिश स्वभाव, घाबरट रुप याच्या प्रेमात पडला होता तो, पण तिने असा दुसऱ्यावर का विश्वास ठेवला?
त्याचं चिडणं स्वाभाविक होतं. दोन दिवस त्याला तिचं नखही दिसलं नव्हतं आणि आज ती दिसली ते मलूल, चेहऱ्यावर तेज नसलेली ऋचा. त्यामुळेच तो अस्वस्थ झाला होता. तिलाही विरह काय कळायलाच हवा आता ठरवून तो हॉस्पिटलमध्ये गेला.
शिव आणि उमाला तो विषय नको म्हणून बजावून टाकलं. ते दोघेही चांगले मित्र असले तरी मैत्रीच्या मर्यादेत होते. शिवने त्याला त्याचा वेळ द्यायचे ठरवले.

**********

आज सकाळपासून त्याला न बघितल्यामुळे ऋचा अस्वस्थ झाली होती. काल तर तो तिच्यावर चिडलाच होता. आता ती विचार करत होती की, तो बिचारा दोन दिवस किती वेड्यासारखी तिची वाट पाहत असेल.
'ऋचा मॅडम त्याला वाट बघायला लावलीत, तर आता तुम्ही पण सहन करा थोडं.' तिने आपल्याच मनाला बजावले.
तिला खात्री होती की त्याचा राग नक्की निवळेल.
काल बाहेर जाऊन आल्यामुळे तिला बरं वाटतंय हे बघून घरचे सगळे खूश झाले.
सगळं नेहमीसारखं सुरु झालं, उलट आधीपेक्षा जास्त. खोडकर, खेळकर आणि मोकळी वागत होती ती घरात.
अनिल सुनील आधीसारखे तिच्या खोड्या काढत होते.
अनिलने खोड्या काढल्या की ती मेघाकडे जायची आणि मेघा मध्ये पडून अनिलला ओरडायची, अनिलचा पोपट झालाय की सुनील आणि ऋचा मस्त खळखळून हसायचे.
घरात एक वेगळंच चैतन्य आलं होतं जणू, पण त्यात कोणी तरी मनातून एकटं होतं.

या सगळ्यात ऋचाचं आवर्जून लक्ष असायचं ते वेदच्या येण्या-जाण्यावर.
वेद एकदाही वर बघत नव्हता, तरी दिवसातून एकदा तरी तिला तो दिसून जायचा. त्याने टेरेसवर येणं बंदच केलं होतं जणू.
खिडकीतून त्याच्या रुममधलं काही दिसत नव्हतं पण रात्रीच्या वेळी एक सावली फेर्‍या मारताना नक्की दिसायची.
तो वेदच आहे हे ऋचाला चांगलंच माहिती होतं.
तो तळमळतोय पण राग सोडत नाहीये हा विचार करुन तिला कधी कधी हसायला यायचं.
वेदने स्वतःला कामात बुडवून घेतलं होतं. असेच तीन दिवस गेले.
ऋचा उमाकडे गेली तर तो मागेच येतो हा आतापर्यंतचा तिचा अनुभव होता, म्हणून आज ती उमाकडे जायला निघाली. जाताना तो घरी आहे, याची खात्री करुन घेतली होती तिने आणि जाताना गेटपण जरा जोरातच वाजवलं.
तो तिच्या मागे आला नाही.
ऋचा उमाकडे गेली आणि तिच्या किचनमध्ये बसून धुसफुस करत होती.
"असा कसा ग तुझा दिर,बघ ना, किती चिडतो. आता तरी राग सोड ना म्हणा त्याला, जरा समजावून सांग ना तुझ्या लाडक्या दिराला."
"नमुने आहात तुम्ही दोघे, तुमचं तुम्ही बघा बाबा. तो जिद्दी तू बिनडोक." उमा तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली.
उमच्या उत्तरावर ऋचा हॉलमध्ये आली.
"शिव मी चुकले मान्य केलं ना पण तुमचा मित्र, तो राग सोडायला तयारच नाहीय, तुम्ही समजावा ना त्याला प्लिज..."
तिची अवस्था बघून शिवने, "आज दुपारी बोलतो मी त्याच्याशी." असं आश्वासन दिलं.


क्रमश:


बघू वेदचा राग जातो की नाही ते ....

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//