Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग एकोणतीस

Read Later
अलवार प्रेम... भाग एकोणतीस

 

अलवार प्रेम... भाग एकोणतीस

विषय =प्रेमकथा 

मागील भागात आपण पाहिलं,
वेद सुनिलला वाचवून आल्याचं कळताच दादासाहेब त्याच्यावर चिडतात. वेद घर सोडून जायचं म्हणतो तेव्हा रश्मीही त्याच्यासोबत निघतात त्यामुळे दादासाहेब नरमलेत.
सुनिल हॉस्पिटलमधून घरी आल्यावर सुरेश वेदला चहासाठी बोलावतात.

आता पुढे...


वेद आत आला, अनिल बाहेर जायला निघाला तसं मेघाने त्याला डोळ्यांनीच नको म्हणून सांगितलं. नेमकं त्याचवेळी माधवकाका आले.
सगळे आत बसले.
सोफ्याच्या थ्री सीटरवर आबा, त्यांच्या दोन बाजूला माधव आणि अनिल आणि समोरच्या टू सीटरवर वेद आणि सुरेश.
मेघा सगळ्यांसाठी पाणी घेवून आली. ऋचा पुजा करुन निघाली आणि माधवला बघून "काका तुम्ही कधी आलात? म्हणत सरळ त्यांच्याकडे गेली. तिला बाजूचा टू सीटर दिसलाच नाही. माधवकाकांशी बोलून ती पलटली आणि...

तिचा श्वास घश्यातच अडकला. वेदला बघून ती एकदम... वेद गालात हसत तिचे एक्सप्रेशन टिपत होता.
तिला अस आश्चर्यचकित झालेलं बघून माधवकाका म्हणाले.
"हे डॉक्टर वेद."
"आणि वेद ही आमची ऋचा..." सुरेश ओळख करुन देत म्हणाले.
ऋचा नमस्कार करुन आत पळाली. तिचं हृदय जोरजोरात धडकत होतं.

मेघाने नाश्त्याच्या प्लेट बनवल्या आणि ट्रे दाराजवळ उभ्या ऋचाकडे देत म्हणाली.

"नेताय का?"
ऋचाने ट्रे घेतला आणि त्याच्यासमोर गेली. किती दिवसानंतर ती त्याला असं जवळून बघत होती तेही तिच्या घरीच. ऋचाने प्लेट समोर केली, वेदने प्लेट घेताना हलकी स्माईल देत तिचा हात दाबला आणि तिच्या पायावर पाय ठेवला.
ऋचाच्या शरीरात भयंकर करंट पास झाला, तिची घाबरगुंडी उडाली. कसंबसं सावरत तिने बाकी प्लेट दिल्या आणि आत पळाली.आत जाताच तिने भरभर दोन ग्लास पाणी पिले. मेघा चहा बनवत होती. ऋचाला असं पाणी पिताना बघून तिने ऋचाच्या खांद्यावर हात ठेवला, "काय झालं वन्स, बरं वाटतं नाहीये का?"
"नाही ते घसा जरा सोकल्यासारखा वाटत होता म्हणून."
'ऋचा गडबड नको, सगळ्यांना शंका आली तर त्याच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल... हा सगळ्यांसमोर किती हिम्मत करतो?' तिने किचनच्या दारातून डोकावून बघितलं. बाहेर नॉर्मल चर्चा सुरु होती. अचानक वेद जागेवरुन उठला आणि किचनकडे येऊ लागला. ऋचाची धडधड वाढली.
'देवा! याचं काही खरं नाही, हा सगळ्यांसमोर बोलतो की काय आता?' ऋचा डोळे मिटून देवाचा धावा करत होती,तोच तिच्या कानावर शब्द आले.
"मावशी..."
तिने डोळे उघडून बघितलं, वेद कांताआईच्या पाया पडून त्यांना मिठी मारत होता आणि कांताआई त्याच्या पाठीवरुन हात फेरत रडत होती.
'मावशी?...' ऋचाला आश्चर्य वाटलं.
कांताआई सुनिलला जेवू घालून रुममधून बाहेर आल्या होत्या.
"तुझ्यामुळे माझा सुनिल, नाहीतर..." कांताआईला शब्द सुचत नव्हते. त्याने तिचे डोळे पुसले. "मी असताना असं होऊ देईल का मावशी?"
"हो रे, खरंच तू होतास म्हणून?"
"असं नको बोलूस मावशी, माझ्या आईवर खूप उपकार आहेत तुझे."
अनिल सुनिलसाठी हे खूप वेगळं काही होतं, समजण्याच्या पलीकडे.
कांताने सुरेशकडे बघितलं आणि त्यांनी तिला डोळ्यांनीच बोल म्हणून सांगितलं.
मेघा चहा घेऊन आली, तिने सर्वांना चहा दिला आणि आत गेली.
सगळे कांताआईकडे बघत होते, त्या तिथे बसून सांगायला लागल्या,

"रश्मी अनाथ होती. माझ्या बाबांना एकदा अनाथाश्रमातील एक गोड मुलगी खूप आवडली आणि त्यांनी तिला घरी आणलं तीच होती रश्मी. पुढे बाबा गेले आणि परिस्थिती बिघडली. माझं लग्न कसंबसं पार पडलं आणि आई अंथरुणाला खिळली. रश्मीची जबाबदारी घ्यायला कुणीच नव्हतं. ती आमच्या घरात वाढली तरी ती अनाथ म्हणून तिचं लग्न जुळत नव्हतं. मी लग्न होऊन आले आणि वेदच्या बाबांना बघून मला ते रश्मीसाठी योग्य वाटले. यांच्या पुढाकाराने हे लग्न पार पडलं. आम्हाला मुलं तशी उशीराच झाली. रश्मी नेहमीच माझ्या उपकारात दबल्यासारखी वागायची, त्यामुळे यांना सोडलं तर कुणालाच हे नातं मी कळू दिलं नाही. रेखा आल्यावर रश्मीशी तिचं खूप छान जमायचं. रश्मी मला सख्या बहिणीपेक्षाही जास्त मान द्यायची पण दोन घरात वितुष्ट आलं आणि ती पुन्हा अनाथ झाली.

"पण हे सगळं तुला कसं कळलं?" अनिलने वेदकडे पाहत विचारलं.
"आई नेहमी तिच्या मोठ्या बहिणीविषयी सांगायची.एकदा असंच दोन गटात वाद झाले आणि आई मावशीचा फोटो हातात घेऊन माफी मागत होती, ते मी बघितलं आणि त्यानंतर मला सत्य कळलं. " वेदचं बोलणं ऐकून इतकावेळ शांत बसलेले आबासाहेब उठले.

"तू आमच्या सुनिलला वाचवलं यासाठी आम्ही आभारी आहोत, पण गोष्टी खूप दूर गेल्या आहेत," म्हणत ते आत जायला निघाले.
किचनच्या दारातून ऋचा आणि मेघा सर्व बघत होत्या.
"गोष्टी खुप दूर निघून गेल्या आहेत, माणसं दूर गेली आहेत पण दूर गेलेलं जवळ आणता येत नाही का आबासाहेब?"
वेदच्या बोलण्यावर सगळेच घाबरले पण आबासाहेब काही न बोलता चुपचाप निघून गेले.
ते गेल्यावर सुरेश वेदची चौकशी करु लागले, "कुठे शिकलास, पुढे काय करणार वगैरे वगैरे..."आणि या चर्चेतच माधव काकांनी विचारलं,
"ते सगळं ठीक आहे, पण लग्न कधी करतोयस?"
"करेल की लवकरच, तुमचा सर्वांचा आशीर्वाद असेल तर..."
म्हणत वेदने ऋचाकडे बघितलं आणि गालात हसला.
"चला, निघतो मी, काळजी घ्या सुनिलची." म्हणत तो निघून गेला.
तो गेल्यावर घरात त्याचीच चर्चा सुरु होती.
"हा मुलगा काही वेगळा आहे याचे विचार खूप पोक्त आहेत."अशी काही वेदची तारीफ सुरु होती.
ऋचा लगेच वर गेली आणि तिने पडदा बाजूला केला. वेदही घरात जाताच सरळ टेरेसवर आला. दोघांची नजरानजर झाली.
वेद तिचं बावरलेलं रुप आणि तिचा भांबावलेला चेहरा आठवून हसत होता.
ऋचाही त्याचा स्पर्श आठवून मनातल्या मनात लाजत होती.


क्रमश:

काय वाटतं, येईल का यांची गाडी रुळावर?

 

 

©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//