Sep 23, 2023
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग नऊ

Read Later
अलवार प्रेम... भाग नऊ

अलवार प्रेम... भाग नऊ

विषय -प्रेमकथा

मागील भागात आपण बघितलं...

माधव काका ऋचाला काही सांगू बघताहेत...

आता पुढे...


"खूपदा विचार केला बोलायचा पण मीरा मला चूप बसवायची. तिचं मन राखायला मी बोलत नव्हतो पण दादाकडे बघवत नव्हतं. ऋचा, तुला कधीच वाटलं नाही का ग, की ज्या व्यक्तीने आपल्या आईला मारलं त्या व्यक्तीने दुसरं लग्न का नाही केलं मग, मुलींची तर रांग होती ना त्याच्यामागे?"
माधवकाकाच्या बोलण्यावर ऋचा खरंच विचारात पडली.
तोच अनिल वर आला, काकांना भेटायला काही लोक आले म्हणून बोलवायला.
माधवकाका लगेच गेले पण रूममधलं वातावरण बघून अनिलने सहज विचारलं,

"अनोळखी वाटतंय का तुला सगळं?"
"नाही रे दादा, जरा काकांशी बोलत होते."

ऋचाने सावरलं.
"काही लागलं तरं सांग मेघाला, मी आणि सुनील जरा बाहेर जातोय आणि हॊ, आराम कर गं जरा."
"ह्म्म्म... बाकी सगळे?"
"अगं उद्या सगळे पाहूणे येणार ना, परवाची तयारी करायचीय. आणि मीराकाकू येतेय परवा."

अनिल जाताजाता म्हणाला.
काका बोलले ते तिच्या डोक्यात कधी आलंच नाही. तिला चांगल आठवायचं जेव्हा तिची आई गेली त्यादिवशी ऋचा बाबांना सोबत चालायचा आग्रह करत होती, हट्ट होता तिचा तो पण तिच्या बाबांना एक महत्वाची मिटिंग होती त्यामुळे ते नव्हते आले आणि तिच्या आईलाही लवकर ये म्हणून सांगितले होते. जेव्हा गाडीवाल्याने सांगितलं थांबूया तेव्हा आई म्हणाली होती,
की, "नाही, मला जावेच लागेल नाहीतर आबासाहेब रागावतील."
आणि त्यानंतर गाडी पाण्यात गेली. जेव्हा आई त्यांना साडीने झाडाला बांधत होती तेव्हा ते आईला वाचवू शकत होते कारण मुली झाडाला बांधल्या होत्या तरीही त्यांनी तिच्या आईला वाहू दिलं होतं... आबासाहेब रागावणार नसते तर तिची आई त्या पाण्यात गेलीच नसती असंच तिला वाटायचं, त्यांनी मुद्दाम तिला वाहू दिलं असं आणि आई गेल्यावर ती तो प्रसंग विसरूच शकली नाही.

आता माधव काका निघून गेले परंतु ऋचाच्या डोक्यात किडा वळवळत होता. उमा सगळं सांगू शकते मला पण आता तिच्याकडे दोन दिवस जाताच येणार नाही. ती पून्हा रूमचं निरीक्षण करत बेडवर बसली. तिचं लक्ष पुढल्या खिडकीकडे गेलं. पून्हा वेद आठवला.

'यार, माझ्या डोक्याला कमी ताप आहे का त्यात हा का कलमडतोय मध्येच माझ्या डोक्यात? गेला असेल खाली आता, मूर्ख पावसात भिजतोय आणि म्हणे डॉक्टर आहे. आजारी पडल्यावर समजेल. किती तुसडा होता ना तो, पण मदत केली त्याने नाहीतर कसं आले असते मी एकटी एवढा रस्ता?'

ती पून्हा उठली, इकडे तिकडे बघितलं आणि पडदा उघडला, तो अजूनही तिथेच होता. शर्ट काढून फक्त्त लोवरवर पावसात बसलेला, काहीतरी लाल रंगाचं होतं त्याच्याकडे. तिने हिमतीने खिडकी उघडली. त्याने तिची ओढणी दाखवत गोड स्माईल दिली. तिने पटकन खिडकी लावली आणि आत येऊन मघाचे ओले कपडे बघितले आणि तिला आठवलं मेघाने ते खाली धुवायला नेले होते.

ती भरभर खाली गेली. आणि बाथरूनसमोरच्या लॉंड्री बास्केटमध्ये शोधू लागली. तिचे कपडे नव्हते, तिने मशीनकडे बघितलं, मशीन चालू होती. तिने बटन बंद केलं आणि मशीनमध्ये शोधू लागली. तिची ओढणी नव्हती त्यात. मेघाला किचनमधून ही बाथरूमकडे जाताना दिसली पण परत येतांना नाही त्यामुळे ती बघायला आली. हिला असं कपडे बघताना बघून आश्चर्यात पडली.

"काय झालं वन्स, काय शोधताय?"
तिच्या आवाजाने ऋचा दचकली आता हिला काय सांगावं?
"अगं काही नाही माझी लाल ओढणी पाण्यात गेली बहुतेक, दिसतंच नाहीये कुठे?"
"अहो एवढंच ना, माझ्याकडे आहे आणि नाहीच आवडली तर यांच्यासोबत जाऊन घेवून याल दुसरी."
"हॊ... नको...तुझ्याकडचीच घेईल." म्हणत ऋचा वर आली.
"किती मुर्ख आहे हा, माझी ओढणी घेवून बसलाय, तिने पडदा उघडून बघितलं, तो नव्हता. 'गेला वाटतं आत?' मनातच सुटकेचा श्वास घेत ती निरीक्षण करू लागली. बहुतेक तो उभा होता ते टेरेस होतं, बाजूला रूम होती. त्याची रूम असेल का असा विचार डोक्यात यायला आणि तो पून्हा बाहेर यायला एकच गाठ पडली. तिने पून्हा पडदा नीट केला आणि रूममध्ये पळाली.

'हे घर दादासाहेबांचं होतं तर मग हा कोण? भाडेकरू की त्यांचा मुलगा?' तिने डोक्याला जोर देऊन बघितलं तिला आठवलं, त्यांना तीन मुलं होती बहुतेक...

*************


            सगळे गेल्यावर वेद हॉस्पिटलमध्ये बसला होता. त्याच्या डोळ्यासमोरून तिचा चेहरा काही हटत नव्हता. पेशन्ट नव्हतेच, कंटाळून, "कुणी आलं तर मला निरोप दे." असं चौकीदाराला सांगून तो घरी आला. घरी येतांना त्याला वाटलं ती पून्हा दिसावी पण दोन्ही घरातलं एकमेकांना दिसायचं नाही अशी कपाउंडची भिंत घातलेली.

        एक शेवटचा चान्स म्हणून त्याने जोरजोरात हॉर्न वाजवले गेट उघडून मागायला आणि स्वतः सभोवार बघत होता, तोच वरच्या खिडकीत ती झळकली आणि त्याचा दिल अगदी गार्डन गार्डन झाला.
तो खुशीत आत गेला आणि "जरा आराम करतो." म्हणून सांगत खोलीत पळाला. त्याला पाऊस आणि ती आठवत होती. तो टेरेसवर आला तिथून ती खिडकी सरळ दिसत होती. तो पावसात भिजत उभा राहिला, अचानक त्याला वाटलं जणू ती त्याला बघतेय, पून्हा नजरानजर झाली तिच्याशी पण ती लगेच गायब झाली.

        त्याने चहा मागवला आणि पावसात चहाच्या आस्वाद घेत बसला. शर्ट काढून ठेवला, बॅगमधली तिची ओढणी काढली आणि तिचा सुगंध मनात भरला. तोच पून्हा नजरानजर झाली. त्या खिडक्या कधीच उघडल्या जात नाही तरी ती बघतेय म्हणजे...
त्याने तिला हाय करावं म्हणून हात हलवला आणि ओढणी दाखवली, तिने पून्हा खिडकी लावली म्हणून तो आत आला.
वेडेपणा होता हा, चुकून हात हलवताना खालून कुणाला दिसलं तर दोन घरात हंगामा झाला असता. त्याला तर कुणी काही म्हणू शकत नव्हतं पण तिला त्याचा खूप त्रास झाला असता. तो आत गेला तरी मन मानत नव्हतं, पून्हा बाहेर आला त्याची नजर त्या खिडकीतच अडकून पडली होती जणू.


*********

माधव काका परत आले आणि तिला विचारात पडलेलं बघून अस्वस्थ होत खोलीत फेऱ्या मारत म्हणाले,
"आज मी जें सांगतोय ते तुला शांततेने ऐकावंच लागेल ऋचा."
ऋचाने गोधळून त्यांच्याकडे बघितलं ती आपल्याच विचारात (म्हणजे वेद च्या हॊ...) हरवली होती.
"हॊ बोला ना." म्हणत तिने मान डोलावली.




क्रमश:


कशी वाटतेय मेरे सामनेवाली खिडकी?




©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help