चकाकते ते सर्व सोने नसते...भाग -२

All That Glitters Is Not Gold

डॉ.अर्जुन श्रीवास्तव.

आपल्या नावाची केबिन आणि त्यावर लावलेला तो फलक बघून अर्जुन अगदी भावूक झाला...जणू उघड्या डोळ्यांनी बघितलेले स्वप्न..त्या असंख्य रात्री..तो अमाप अभ्यास आणि तो प्रत्येक दिवसाचा खडतर प्रवास तो आठवतं होता ..

"डॉ. श्रीवास्तव".. वार्डबोय अलगद केबिन चा दरवाजा खोलून मध्ये आला.

आणि अचानक डोळ्यात तरळणारे ते अमाप अश्रू सावरत अर्जुन उत्तरला..

"बोला, काय मदत करू."

डॉ. सेन ने बोलवले आहे मीटिंग हॉल मध्ये, वार्डबॉय उत्तरला.

काही क्षणात अर्जुन मीटिंग हॉल मध्ये पोहचला...

तो हॉल बघून त्याचे डोळे जणू दोनाचे चार झाले. त्याच्या घरापेक्षा मोठा तर तो हॉल होता,आणि खूप नवीन नवीन चेहरे त्याला दिसत होते.मोठे मोठे वयस्कर ,तरुण अतिशय अनुभवी डॉ .तिथे उपस्थित होते,आणि जो तो काही ना काही कुजबुजत होता, एवढ्यात डॉ. सेन आले आणि एकदम शांतता पसरली.

डॉ. सेन ने हळू हळू सर्व डॉ. ची ओळख करून दिली.

यामध्ये त्यांचा मुलगा.. डॉ. राहुल सेन

त्यांचा भाऊ डॉ. शिरीष सेन.

आणि त्यांचा एक खूप जुना मित्र डॉ. अग्निहोत्री.

सुद्धा होते.

जणू एका परिवरासारखे गुण्यागोविंदाने सर्व राहत होते.

प्रत्येकाचे वेगवेगळे विभाग होते.सर्व काही अगदी विलक्षण होते.सर्व विभाग त्याचे प्रमुख डॉ. सर्वांची ओळख करून दिल्यावर सर्व आपापल्या विभागात गेले.

असाच अर्जुन त्याच्या विभागाकडे जात असताना अर्जुन परत त्या "प्रतिबंधित क्षेत्राला "धडकला पण स्वतः ला सावरत आणि फक्त एक तिरपा कटाक्ष टाकून तो त्याच्या विभागाकडे वळला...

"डॉ... डॉ.... माझ्या भावाला वाचवा डॉ. "

कोणीतरी दुरून किंचाळत अगदी वेगात डॉक्टर.अर्जुन कडे धाव घेत होतं...

अर्जुनने अगदी घाईतच त्याच्या विभागात प्रवेश केला,आणि बघून स्वतः ला सावरत त्याने उपचारास सुरवात केली...

साधारण दोन तासानंतर बाहेर येऊन त्याने सांगितले...

"कोण आहे तिकडे? पेशंट आता सुखरूप आहे ,भेट घेऊ शकता"

एवढ्यात एक लहान मुलगा तिथे आला "डॉ. धन्यवाद खूप खूप आभारी तुम्ही माझ्या भावाचा जीव वाचवला" असा म्हणत तो १६ वर्षांचा मुलगा अतिदक्षता विभागाकडे धावला..

पण इकडे अर्जुन मात्र दुसरीकडेच गुंग झाला...

"दादा , ऐक मी पण तुझ्यासारखा डॉ. होणार आणि आपण दोघेही एकाच रुग्णालयात काम करू बर का! दादा,मला सांग ना करशील तू माझ्या सोबत काम! "

"डॉक्टर... डॉक्टर... अर्जुन...कसा माझा मुलगा आता..?"

कोणीतरी स्त्री अर्जुनला हेलकावे देत विचारत होती..

"सांग ना दादा" सांग ना! 

डॉ. अर्जुन अहो काय बोलता तुम्ही ? अहो कसा माझा मुलगा?

 एकदम अर्जुनने स्वतः ला सावरले.

हो ..हो तुम्ही भेटू शकता घाबरतच अर्जुन उत्तरला.

"डॉ. नकुल श्रीवास्तव"

अर्जुन चा भाऊ याच रुग्णालयात काम करायचा..

खूप मोलाचे सहकार्य केले त्याने नेहमी..पण कुणास ठाउक एक दिवस एक अपघात झाला आणि बिचारा स्वर्गवासी झाला रे! खूप चांगला आणि हुशार डॉ.होता बर का !

एक वेगळीच चमक होती त्याच्या त्या भुऱ्या डोळ्यांमध्ये! 

दोन अगदी वयस्कर कर्मचारी कुजबुजत होते...

त्यांना मधेच थांबवून अर्जुन उत्तरला

हो माझा भाऊ होता...पण काय करणार देवाची करणी अजून काय!

कुणास ठाऊक देवाची की माणसाची?

असा कोड्यात बोलून ते दोघे चालते झाले.

अर्जुनला थोडा वेगळं वाटल पण त्याला उशीर होता असल्यामुळे त्याने काही विचार नाही केला. 

बघता बघता सकाळच्या ९ चे रात्रीचे ९ झाले..

ते म्हणता ना आवडते काम भेटले की भान राहत नाही तसे झाले होते अर्जुन चे ...सकाळपासून तो त्या रुग्णालयात इतका रमला होता की त्याला भानच नव्हते राहिले की घर सुद्धा वाट बघत आहे.

इतक्यात डॉ.सेन तिथे आले 

"डॉ.अर्जुन अहो आजच सगळ केलं तर उद्या काय करणार ..."हसतच ते उत्तरले.

"हो हो डॉ. निघतोच आहे ..हसतच अर्जुन उत्तरला"

तुझ्याकडे बघून ना मला एकदम नकुल आठवतो ..अगदी तुझ्यासारखाच कामाशी एकनिष्ठ...माझा आवडता जणू कित्येक पेशंट होते जे आजही त्याला विचारतात....खूप कमी वेळात त्याने इथे जागा कमावली होती...आणि तू ही मला त्याच मार्गावर दिसतो आहेस..

चल मी येतो भेटू उद्या... .असा बोलत डॉ.सेन निघून गेले.

पण त्यांचे वाक्य जणू अर्जुन ला वेगळेच स्फूर्ती देऊन गेले..."की त्याचा भाऊ सर्वात उत्कृष्ट डॉ.होता आणि तू सुद्धा त्याच मार्गावर आहेस".

"दादा..तू आज हे ऐकल असता ना खूप आनंदी झाला असतास रे! "

मनातल्या मनात अर्जुन स्वतः शी पुटपुटला.

अखेरीस सर्व झाल्यावर अर्जुन पण चालता झाला...पण जणू त्याच्या डोक्यात एक प्रश्न उत्पन्न झाला होता..

आज अर्जुनने पहिली केस पहिली आणि त्या पेशंट सोबत संवाद साधताना त्याला एक छोटीशी गोष्ट लक्षात आली की अपघात त्याच्या भावाचा सुध्दा झाला होता..ज्यामुळे एक दिवसात त्याच्या आयुष्यात खूप वादळे आली होती..आई नाबोलती झाली होती...बाबा अंथरुणात खिळले होते..आणि सर्वांच्या विरोधात जाऊन तो आज डॉ.झाला होता पण नकुल चे शरीर ते काही भेटलेच नव्हते...! 

आणि कधी त्याच्या अपघाताचा कुणी आढावा पण नाही घेतला...जणू कोणीतरी गाढ झोपेतून जाग करावं असा झाला होता त्याचं आता...मन अगदी अस्वस्थ झाले होते..

एवढ्यात जोरात हॉर्न वाजला आणि रस्त्याच्या त्या बाजूला तो ढकलला गेला...

"अरे जरा पुढे तर बघ आता गेला आता की? थोडा दटवूनच अर्जुन ला तो व्यक्ती बोलला...

कसातरी सावरत अर्जुन घरी पोहचला..

क्रमशः

(अर्जुनची शंका योग्य आहे का? खरंच कहाणी सरळ आहे की काही गुपिते अजून वाट बघता आहेत. बघू पुढच्या भागात)


🎭 Series Post

View all