Nov 29, 2022
// rablogging.com_GGINT //
रहस्य

चकाकते ते सर्व सोने नसते... भाग-५

Read Later
चकाकते ते सर्व सोने नसते... भाग-५


"सारंग, आवर मला उशीर होतोय. माझी फ्लाईट मिस झाली ना तर बघ तुला इथून मी सोडवायला लावेल बर का! अर्जुन थोडा चिडून बोलला."
अरे , थांब आलो बघ .चल पटकन.
आणि दोघेही सर्वांचा निरोप घेऊन निघाले.
"बंगलोर.. वेलकम टु बंगलोर."
शताब्दीची दुसरी शाखा " बंगलोर" ला होती, आणि ही शाखा खूपच भव्य होती आणि पुर्णतः काचेची होती.कुणीही बघतच राहावे अशी होती पण श्रीमंतांनी विचार न करता मध्ये यावे आणि गरिबाने विचार करत बाहेरच बघत रहावे अशी याची रचना होती.
हॉस्पिटल बघून अर्जुन पूर्वीचे सर्व विसरून परत जोमाने इथेही काम करू लागला....आणि लवकरच प्रकाशझोतात सुद्धा आला.
आता जणू अर्जुन शताब्दीचे मूळ झाला होता..जणू त्याच्याशिवाय शताब्दीचे पान सुद्धा हालत नसे.
सर्व काही व्यवस्थित चालू होते... आठवड्यातून एकदा तो आई कडे जाऊन येत असे आणि त्या शाखेला सुद्धा भेट देऊन येत असे.
पण अशातच एक दिवस...
"डॉ. अर्जुन. ताबडतोब तिकडचे सर्व काही आवरून लवकर इकडे परत या." डॉ.सेनचा अर्जुनला निरोप आला.
अर्जुनला काही समझेना कारण शनिवारीच तो जाऊन परत आला होता आणि लगेच सोमवारी त्याला बोलवणे आले.
तरी सर्व काही नीट आवरून अर्जुनने एक महिन्याची सुट्टी टाकून ..लवकरात लवकर नागपूरला प्रस्थान झाला.
आज शताब्दी पहिल्यासारखे दिसत नव्हते...अर्जुन एकदा येऊन जायचा पण खूप वेळ नाही थांबायचा डॉ. सेनला भेटून तो निघून जात असे . त्यामुळे पूर्वीसारखा त्याचा काही खास संबंध राहिला नव्हता.
पण आज हॉस्पिटल मध्ये खूप गंभीर वातावरण होते.
"एक मिनिट थांबा" कोण आहात तुम्ही? आणि कुठे चालले आहेत? एवढ्यात कोणीतरी अर्जुनला मागून कोणीतरी रोखले.
मी" ,\"डॉ. अर्जुन श्रीवास्तव \" या हॉस्पिटल मध्ये काम करतो सध्या बंगलोरला असतो पण डॉ. सेनने बोलावून घेतले."
अर्जुन इन्स्पेक्टर मिरा राजपूत ला उत्तरला.
इन्स्पेक्टर, काय झाले आहे, सर्व पोलीस दल इथे का उपस्थित आहे?
डॉ.अर्जुन मी सध्या काहीही नाही सांगू शकत तुम्ही डॉ. सेनला भेटून घ्या.
अर्जुन घाईतच डॉ. सेनला भेटला आणि जाब विचारू लागला.
अर्जुनला बघून डॉ. सेनला काही सुचलेच नाही आणि ते गळ्यात पडून रडू लागले.
डॉ. सेन काय झाले? मला सांगता का? काय झाले आहे? इथे सर्व पोलिस का उपस्थित आहे? आणि डॉ.अग्निहोत्री कुठे आहेत? डॉ. सेन शांत व्हा आणि मला सांगा.
अर्जुन उत्तरला.
अर्जुन, अरे मला कळत नाही कस सांगू तुला? पण तू इथून काय गेला सर्व काही हातून निसटून गेले रे! अरे,माझा लहान भाऊ शिरीष तीन दिवसांपासून सापडत नाही! मला काही कळत नाही. आम्हीच त्याला हॉस्पिटलच्या कामानिमित्त बाहेर पाठवल होत पण त्याचा फोन लागत नाही . तो परतला पण नाही आणि त्याची गाडी ती तर भेटलीच नाही अजून! मला काहीच कळत नाही अचानक असा कुठे गेला रे तो! म्हणून शेवटी मी सकाळी पोलिसांना कळवल.तर त्यांना पण काहीच समजत नाही .
त्यांनी त्या ठिकाणी जाऊन देखील पाहिले पण तिथले प्रमुख म्हणतात की असे कुणी डॉ.इथे आलेच नव्हते.अर्जुन मला काहीच कळत नाही ...
डॉ.सेन तुम्ही शांत व्हा .सगळं काही ठीक होईल. भेटतील ते लवकरच असा धीर देऊन अर्जुन काही वेळानंतर तिथून निघून गेला.
अर्जुनला सुद्धा समजत नव्हते नक्की झाले काय आहे? असा अचानक एक व्यक्ती कसा काय बेपत्ता होऊ शकतो??
घरी येऊन त्याच्या आई - वडिलांना तो ही सर्व कहाणी सांगत होता.
पण आज पहिल्यांदा त्याने त्याच्या आईचे एक वेगळे रूप पाहिले.
आज जणु त्याची आई खूप शांत होती.ती त्याला काहीही म्हणत नव्हती.तिने सर्व काही ऐकून फक्त एवढेच उत्तर दिले.
" जशास तसे मिळतेच" एवढे बोलून ती खोलीत निघून गेली.
अर्जुनला आईचे हे रूप काही कळेना.पण तो थोडा खुश होता की आईने माझे सर्व काही आता मान्य केले.
रात्रीचे २:३० मिनिट झाले आणि .. अर्जुनचा फोन वाजला.
अर्जुन , लवकर हॉस्पिटल मध्ये ये.
डॉ. सेनने अर्जुनला कळवले.
अर्जुन घाईतच सारंग सोबत प्रस्थान झाला.
अर्जुन तिथले दृश्य पाहून थोडा विचलित झाला.. डॉ. शिरीष सेनची गाडी तिथे बघून तो थोडा सुखावला की अखेरीस डॉ. परतले.
चला भेटून घेऊ.
पण आत जातोच..तर बघतो काय कुठेही डॉ. शिरीष दिसत नव्हते त्याने खूप शोधले पण नाही.
शेवटी डॉ.सेन त्याला भेटुन बोलले.
अर्जुन, शिरीषची फक्त गाडी भेटली पण ती सुद्धा दरिमधून अशा अवस्थेत आणि पोलीस म्हणता की कदाचित दरीत कोसळून त्याच्या मृत्यू झाला.
अरे,असा कसा बोलू शकता ते..चल आपन जाऊन शोधू..असेल तो वाट बघत असेल माझी.
असा कसा शरीर नाही भेटल अरे भेटत रे यांनी नीट शोधल नाही.
डॉ. सेनचे बोल ऐकून अर्जुन पुरता थबकला.त्याला त्याच्या कानावर विश्वास नव्हता होतं.तो पुर्णतः धक्क्यात गेला.कारण याच पद्धतीने त्याच्या भावाचा मृत्यू सुद्धा झाला होता....आणि त्याचा विश्वास बसला की त्याच्या भावाचा मृत्यू असा होऊ शकतो मग डॉ. शिरीषचा का नाहीत. असे मनातच पुटपुटत तो डॉ. सेनला सावरू लागला.
पण डॉ.सेन एक ऐकत नव्हते.
एवढ्यात इन्स्पेक्टर.मिरा राजपूत तिथे आल्या.
आणि उरलेली माहिती देऊन त्यांनी सुद्धा केस बंद केली.
एवढे सगळे झाले पण डॉ.राहुल काही दिसत नव्हते.
म्हणून अर्जुन त्यांना बघायला त्यांच्या खोलीत गेला...पण ते तिथे सुद्धा नव्हते.
अखेरीस परत एकदा इन्स्पेक्टर मिरानेच कळवले.
" डॉ. राहुल फार्म हाऊस वर आहेत काही आठवड्यापासून"
आजच सकाळी भेट घेऊन आलो आम्ही.
एवढे बोलून त्या निघून गेल्या.
अर्जुनला काही कळेना इकडे एवढे सगळे झाले असताना डॉ.राहुल आरामात तिकडे का बसले?? आणि हेच बघण्यासाठी तो फार्म हाऊसकडे निघाला.
क्रमशः
( डॉ. राहुल का हॉस्पिटल पासून दूर आहेत? काय चालू आहे? डॉ.सेन विश्वास का नाही ठेवत? आणि अर्जुनची आई अखेरीस इतकी शांत कशी झाली? बघू पुढच्या भागात.)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Varsha Gite