चकाकते ते सर्व सोने नसते...भाग - ४

All That Glitters Is Not Gold

अरे, "अर्जुन फोन उचल कधीचा वाजतो तो!" बघ तरी..

सारंग चिडूनच बोलला.

"हॅ..लो.. हॅलो... हॅलो.." अर्जुन घाबरतच उत्तरला.

"हॅलो.. डॉ. अर्जुन काय वाटल तुम्हाला तुम्ही सर्व काही निमूटपणे आमच्या नाकाखली करत असणार आणि आम्हला भनक सुद्धा लागणार नाही! ताबडतोब आताच्या आता हॉस्पिटल मध्ये दाखल व्हा. डॉ.थोडे धमकावून बोलले.

त्यांचे बोलणे ऐकून अर्जुनची भीती अधिकच वाढली.

त्याचे हाथ - पाय थरथरत होते..तो बैचेन होत होता..पाय पुढे सरकत नव्हता. मनात भीती भरली होती.. एवढ्यात सारंग तिथे आला..

अर्जुन ,"अरे आवर काहीतरी झालं हॉस्पिटलमध्ये" डॉ. सेनचा फोन होता .

अखेरीस खूप हिम्मत करून दोघं शताब्दी मध्ये दाखल झाले.

आज पूर्ण हॉस्पिटल स्टाफ त्यांच्याकडे रोखून बघत होता.

जणू काही चूक झाल्यासारखे सर्व बघत होते. इतक्यात डॉ.राहुल तिथे आले आणि दोघांना बरोबर हॉस्पिटलच्या मध्यावर घेऊन आले.

तिथे संपूर्ण हॉस्पिटल स्टाफ आणि प्रमुख डॉ. उपस्थित होते.

'डॉ.अर्जुन श्रीवास्तव ' काय समझता स्वतःला? एक डॉ.काय झाले तुम्ही तर स्वतःला देव समझु लागले. आम्हला सर्व समजले आहे..आणि म्हणूनच आम्ही ठरवले की तुम्हाला १ महिन्यासाठी..

"डॉ.सेन मला माफ करा.".मी काहीही चूक नाही केली..पण मला काढून टाकू नका. डॉ. राहुल तुम्ही सांगाना खूप मेहनत करून आलो..या एका गोष्टवरून माझे पूर्ण भविष्य उध्वस्त होईल. डॉ.सेन मला माफ करा.. आपत्कालीन परिस्थिती होती म्हणून मला स्वतः ला हा निर्णय घ्यावा लागला आणि मी ते नसते केले असते तर आपण त्या पेशंटला गमावले असते..मला माफ करा.

"नाही ..नाही ..नाही ".. डॉ. श्रीवास्तव गप बसा..आम्ही काय ठरवले ते होऊनच राहणार अथवा आम्हाला विचार करावा लागेल.आता प्रथम माझे बोलणे पूर्ण होऊ द्या.

अर्जुन अतिशय रडवेला झाला होता..काही समझेना त्याला आणि अगदी नाबोलता झाला तो.

तर, डॉ.श्रीवास्तव तुम्ही केलेल्या कामगिरीमुळे तुम्हाला इथे नाही ठेवू शकत..पण आम्ही तुम्हाला बंगलोर शाखेचे प्रमुख डॉ.म्हणून नियोजित आहे..

अभिनंदन डॉ. श्रीवास्तव... प्रमोशन झाले तुमचे आणि काही नवीन उपचार शिकण्यासाठी आम्ही तुम्हाला १ महिन्यासाठी बंगोलोर शाखेची ऑफर देतो...

तुमच्या एका निर्णयामुळे खूप उपकार कारण तो निर्णय सर्वस्वी तुमचा होता पण एक पेशंटचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही अतिशय शांत डोक्याने निर्णय घेतला... त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार..

डॉ.सेन चे वाक्य ऐकून अर्जुनचा कानावर विश्वास बसेना तो खूप आनंदी झाला. 

 आणि सुखाचा श्वास घेऊन तो घरी जाण्यास निघाला.

आज अर्जुन खूप आनंदी होता. त्याचे प्रमोशन झाले होते..आता पगार पण वाढला होता आणि नवीन ठिकाणी तो काम करण्यास अतिशय उत्साही होता आणि कधी एकदा घरी जाऊन सर्वांना सांगतो असा त्याला झाला होता आणि अशातच तो त्या प्रतिबंधित क्षेत्रात नकळतपणे घुसून गेला.

आत जाताच त्याचे डोळे जणू सर्व काही बघतच राहिले.

अतिशय भव्य अशा खोलीत एक बेड एक कपाट आणि मोठे ड्रॉवर सोडले तर काही नव्हते..अर्जुन ची उत्सुकता आता शिगेला पोहचली होती..आणि याच उत्सुकतेने तो कपाटाच्या दिशेने मार्गस्थ झाला....आणि इतक्यात जोरात सायरन वाजले आणि क्षणात सर्व डॉ. तिथे पोहचले.

आणि घाईतच सर्व डॉ.तिथून अर्जुनला घेऊन जाऊ लागले आणि परत कधीच इकडे फिरण्यास मनाई केली.

अर्जुनला काहीही कळले नाही एवढे मोठे हॉस्पिटल पण कुठेच एवढी सुरक्षितता नाही पण फक्तं तिथेच का??

याच विचारात तो घरी पोहचला.

पण घरी गेल्यावर बघतो तर काय....

सर्व घरात अंधार .कोणीच घरात नव्हते आणि लाईट चालू करणार इतक्यात.. "बूम... अभिनंदन!!! डॉ.अर्जुन 

बंगलोर साठी खूप खूप अभिनंदन..

सर्व घरातले लोक त्याच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित होते त्याचे मन अगदी भरून आले पण त्याची आई तिथे नव्हती..सगळं सोडून तो तिला शोधण्यासाठी आत गेला..

त्याला बघताच ती अगदीच भावूक झाली आणि त्याला समजावू लागली " अर्जुन , बाळा ऐक ना नको ना जाऊ " अरे तुला परत इकडे नाही येऊ देणार ते ..तू आम्हला विसरून जाशील...

पण आईला परत सगळं समजवण्याची अर्जुनमध्ये ताकद नव्हती..

म्हणून फक्त तिचा आशीर्वाद घेऊन तो तिथून चालता झाला आणि खोलीत जाऊन पॅकिंग करू लागला..

सर्व सामान भरून झाल्यानंतर अर्जुनचे विचार आता पण तिथेच अडकले होते..की का त्या खोलीला एवढी सुरक्षितता आहे? एवढं काय आहे त्या खोलीत आणि म्हणून अर्जुन कोणाला सुद्धा न कळवता रात्री हॉस्पिटल मध्ये जाण्यास निघाला पण त्याला माहित होते तिथे काही केले तरी सर्व सतर्क होतील आणि परत मला तिथून काढून देतील म्हणून त्याने हॉस्पिटल मध्ये पोहचताच पाहिले वॉचमनची नजर चुकवून लाईट ऑफ करून टाकली आणि अखेरीस तो त्या खोलीत गेला...

आणि ..आणि ... आणि तिथले सर्व दृश्य त्या कपाटामधले सामान आणि काही कागदपत्रे पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याच्या डोळ्यांवर त्याचा विश्वास बसेना.

एवढ्यात त्याचा फोन वाजला.. सारंगचा फोन होता..आणि आपल्याला बंगलोरसाठी निघायचे आहे हा विचार मनात आला..आणि तो घाईने तिथून बाहेर पडला..

क्रमशः

(कसे असणार बंगलोर? का आणि कधी पर्यंत अर्जुनची आई असा करणार आहे? काय गुपित आहे ? काय दिसले अर्जुनला? काय आहे या खोलीचे रहस्य.. बघू पुढच्या भागात)

🎭 Series Post

View all