चकाकते ते सर्व सोने नसते... भाग -३

All That Glitters Is Not Gold
बराच वेळ झाला आज अर्जुन अजून घरी आला नव्हता. आईला धाकधूक होतच होती.. मनात चित्रविचित्र विचार येत होते भीतीने आईने जेवण सुद्धा केले नव्हते..
अखेरीस दाराची बेल वाजली. घाईतच ती बघायला गेली..आणि समोर अर्जुनला बघून तिच्या जीवात जीव आला.
एवढ्यात सारंग खोलीतून बाहेर आला आणि अर्जुनला विचारपूस करू लागला.
"अरे एक महत्वाची केस होती त्यामुळे वेळ झाला " असे सांगत अर्जुनने वेळ मारली.
जेवण वगेरे झाल्यावर अर्जुन खोलीत गेला आणि त्याच्या भावाची सर्व कागदपत्रे शोधू लागला. त्यात त्याला नकुलचे सर्व कागदपत्रे सापडली.शाळेपासून ते अगदी कॉलेज पर्यंत पण एक कागदपत्र..
मृत्यूचे प्रमाणपत्र मात्र भेटले नाही.
घाईतच तो सर्व तसेच टाकून सारंग कडे गेला आणि त्याला विचारू लागला.
"सारंग ,अरे दादाचे मृत्युपत्र कुठे आहे"?
"अर्जुन, त्याची काही कागदपत्रे आणि मृत्युपत्र सुद्धा शताब्दी मध्ये जमा आहे "
"का पण? आपल्याकडे का नाही"अर्जुन अगदी त्वरित उत्तरला.
"अरे,त्यांनी मागितले होते आणि नंतर कुणी घेतले पण नाही कारण..." सारंग थांबतच उत्तरला.
कारण काय रे..? अर्जुन उत्तरला.
अर्जुन,रात्र खूप झाली झोप बघू उद्या सकाळी परत हॉस्पिटल मध्ये जायचे आहे.उद्या बोलू असे बोलून सारंग निघून गेला.
(अर्जुन मात्र रात्रभर झोपलाच नाही.)
सकाळी लवकर आवरून अर्जुन शताब्दीसाठी निघाला.
आज त्याला अतिशय घाई झाली होती आणि अशातच तो न विचारता अचानक डॉ.सेन यांच्या वैयक्तिक ऑफिस मध्ये घुसला आणि एकदम शांतता पसरली.
अर्जुन, अरे काय? कुठे चालला? काही विचारायची पद्धत आहे की नाही? धर्मशाळा नाही ही? अतिशय रागात डॉ. राहुल उत्तरले.
दोन मिनिट थांब.. राहुल.अर्जुन काय झाले काही महत्त्वाचे बोलणे चालू होते काही काम होतं का तुला? डॉ.सेन उत्तरले.
थोडासा कावराबावरा झालेला अर्जुन काही न बोलता तिथून चालता झाला.
पण त्याला ही परिस्थीती काही कळेना.
त्याच्यावर पहिल्यांदा कोणीतरी इतके चिडले होते! आणि असे काय महत्वाचे बोलणे होते की तो येताच ते अगदी शांत झाले.
पण सर्व शंकाकुशंका बाजूला सारत तो हॉस्पिटलच्या स्टोर रूम कडे गेला काही जुने रेकॉर्डस बघण्यासाठी.
तिथे उपस्थीत वॉर्डबॉयला त्याने सांगितले.
वॉर्ड बॉय त्याला मध्ये तर घेऊन गेला आणि विचारू लागला की कोणते रेकॉर्डस हवे आहे?
"डॉ.नकुल श्रीवास्तव" अर्जुन उत्तरला.
"नाही ..नाही ..ते रेकॉर्डस नाही इथे ..आणि तुम्ही या बर आता..मला घाई होते". वार्ड बॉय अचानक जणू अर्जुनला तिथून काढून देण्याच्या मागे लागला.
अर्जुनला काही समजले नाही त्याने खूप विनंती केली पण शेवटी खाली हातच त्याला निघावे लागले .
आता मात्र डॉ.सेन च एकमेव पर्याय होते.
एवढ्यात अर्जुनच्या फोन ची घंटी वाजली.
आणि अर्जुन अचानक हॉस्पिटल मधून काही न सांगता चालता झाला.
"डॉ.अर्जुन तुम्हाला एवढ्या घाईत बोलवण्याचे एकच कारण..
तुम्ही काल रात्री इथे आले होते आपण बराच वेळ चर्चा पण केली आणि तुमच्या सांगण्यावरून मी परत विचार सुद्धा केला की "डॉ.नकुल श्रीवास्तव" केस रिओपन करावी..पण तुम्हाला त्यावेळीची एक गोष्ट कदाचित कुणी सांगितली नसावी.."
इन्स्पेक्टर.मिरा ठाकरे उत्तरल्या.
कोणती? आणि काय? थोडा स्पष्ट बोलता का? अर्जुन उत्तरला.
अर्जुन, या रेकॉर्डस नुसार १७ ऑक्टो.२०१२ या दिवशी डॉ.सेन यांनी एका आंतरराष्ट्रीय क्लाएंटला आणण्यासाठी नकुलला विमानतळावर पाठवले आणि तिकडून परततना त्यांचा अपघात झाला आणि गाडी दरीत कोसळली आणि परत कधीच भेटली नाही खूप शोध घेतला होता तेव्हा आणि खरंच खाली जंगलं असल्यामुळे त्या शरीराचा अवशेष आजही भेटला नाही एवढी साधी केस होती..
आणि तू म्हणतोस की शरीर नाही भेटले! कसे भेटणार दरीत गेली ना गाडी!
ऐक ,अर्जुन मला समजते तू खूप जवळ होता तुझ्या भावला पण गेला तो आणि परत कधीच नाही येणार!
जा आता ये तू.
असे बोलून त्या चालत्या झाल्या.
शेवटी अर्जुन सुद्धा मनाची समजूत काढून तिथून निघाला.
"डॉ.अर्जुन कुठे होते तुम्ही ? तुमचे पैशेंट तुमची वाट बघत आहेत."वॉर्ड बॉय उत्तरला.
अर्जुन घाईतच कॅबिन मध्ये पोहचला.
हळू हळू.. पेशंट पण संपले आणि वेळ सुद्धा झाली आणि अर्जुन आवरून निघाला.
निघता निघता एकदा डॉ. सेनला भेटून नकुल विषयी विचारावे म्हणून तो डॉ. सेनच्या केबिन कडे गेला.
पण तिथे ते उपस्थित नव्हते..म्हणून मुख्य विभागाकडे तो प्रस्थान झाला.
आत जाणार इतक्यात त्याने पाऊल मागे घेतले.. कारण त्याच्या कानावर काही बोल पडले ज्यामुळे तो थोडा बीचकलाच..!
"डॉ. राहुल...थोडे हळू बोला भिंतीना सुद्धा कान असता..."
डॉ. महेश्वरी उत्तरले.
बर चला त्या हुशार नकुलचा भाऊ आला आणि खूप लवकरच पुढे देखील येत आहे. डॉ. महेश्वरी थोडे द्वेषानेच उत्तरले.
"जाऊद्या डॉ. महेश्वरी.फायदा हॉस्पिटलचा आहे ना..पैसा मिळतोय ना ..खिसा भरतोय ना! आणि मी काय म्हणतो त्याची प्रगती कव्हर म्हणून छान आहे की आत काय ठेवल आहे हे तर आपणच जाणून आहोत ना!"
डॉ.सेन एक अतिशय रहस्यमयी स्मितहास्य करून बोलले.
अर्जुन हे सर्व ऐकत होता पण ऐकून तो एवढा चकित झाला की काही क्षणात तो तिथून निघून गेला.. आणि घरी पोहचला.
आणि तोच त्याचा फोन वाजला...आणि फोन वरचे नाव बघून तो अतिशय घाबरला जणू त्याने कोणत्या राक्षसाचे रुप बघितले... जणू...
क्रमशः
( काय होणार पुढे? काय परिस्थिती आहे ही? अर्जुन कधी छडा लावेल का? का एक साधारण गोष्टीला उगीच एक असाधारण मार्गातून तो बघत आहे? बघू पुढच्या भागात)




🎭 Series Post

View all