चकाकते ते सर्व सोने नसते .... भाग -१

All That Glitters Is Not Gold


चला वेळ झाली यावर्षीचा सर्वाधिक आतुरतेचा पुरस्कार.
"डॉक्टर ऑफ द यीअर" या पुरस्काराची ... आणि
यावर्षीचा सर्वोत्कृष्ट डॉ. आणि हा पुरस्कार जातो,
"डॉ.अर्जुन श्रीवास्तव. "
आणि एकदम टाळ्यांचा कडकडाट झाला.
"धन्यवाद....मी तर फक्त एक डॉक्टर आहे माझे कर्म मी मनापासून करतो आणि म्हणून आज हा सोन्याचा दिवस मी बघत आहे. "
"अर्जुन ...ए अर्जुन अरे काय बोलतोस?" अरे उठ आज तुझा पहिला दिवस ना उठ लवकर ! सारंग हसतच अर्जुनला उठवत होता.
२० सप्टेंबर २०१९ सकाळचे ९:३० मिनिट झाले होते . अलार्म अखेरीस बंद पडला आणि तयारी करून अर्जुन खोलीच्या बाहेर आला. घरात खूपच कलकल होती. कारण अर्जुन आज नवीन रुग्णालयामध्ये रुजू होणार होता. " अर्जुन, चल लवकर तुझ्या स्वप्नातल्या रुग्णालयात आज तुझा पहिला दिवस आहे ." आवर अरे मला पण जायचं आहे ! सारंग घाईतच बोलला.
( सारंग -अर्जुनचा चुलत भाऊ तो ही नेटकाच प्राण्यांच्या रुग्णालयात रुजू झाला होता.)पण अर्जुन अजून निघत नव्हता तो कोणाच्या तरी आवाजाची प्रतीक्षा करत होता पण ...
"नाही,एवढ्या वर्षात जे घडले नाही ते आता काय घडणार ."स्वतः शीच पुटपुटत अर्जुन बोलला.
असो,चल सारंग उशीर होतोय!
काचेची ती उंच इमारत आणि त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेले नाव "शताब्दी रुग्णालय" . कोणत्याही वैद्यकीय विद्यार्थ्याला काम करावस वाटेल असा भव्य , देखण रुग्णालय.
आज या रुग्णालयाच्या बाहेर त्या सफेद कोट मध्ये.. त्यावर उठून दिसणारे नाव डॉ. ए. श्रीवास्तव, गळ्यात स्टेथॉस्कोप, डोळ्यांवर चष्मा पण डोळ्यांमध्ये अश्रू आणि चेहऱ्यावर एक स्मितहास्य करून सफेद कार मधून अर्जुन बाहेर निघाला आणि एक दीर्घ श्वास घेत शताब्दी कडे प्रस्थान झाला .
(अखेरीस किती प्रयत्ना नंतर एवढ्या अभ्यासानंतर एवढ्या कष्टाने अर्जुन डॉक्टर झाला होता, आणि त्याचे आवडते रुग्णालय सुद्धा त्याने मिळवले होते.)
"वेलकम, डॉ. श्रीवास्तव.स्वागत आहे... "डॉ. सेन सर्वांकडे बघून बोलले.
"कृपया इकडे लक्ष द्या , आज मला एक आनंदाची बातमी द्याची आहे, तर आज पासून एक नवीन व्यक्ती आपल्या या शताब्दी मध्ये जुळत आहे.
\"डॉ.अर्जुन श्रीवास्तव. एमबीबीएस. एम .एस .\"
आणि तुम्हाला ऐकून आनंद होईल हा आपल्या वडिलांच्या जागी रुजू होत आहे.
(एकदम सर्वांना प्रश्न पडला!)
हो , डॉ. शिरीन श्रीवास्तव यांचा धाकटा सुपुत्र आणि डॉ. नकुल श्रीवास्तव याचा लहान भाऊ.
मित्रानो,श्रीवास्तव परिवाराने नेहमीच आपल्यासाठी विशेष कार्य केले,आशा करतो डॉ.अर्जुन तुम्ही पण विशेष च करणार. डॉ. सेन हसतच बोलले.
"नक्कीच, डॉ. सेन अर्जुन उत्तरला."
आज त्या रुग्णालयात फिरताना अर्जुन इतका आनंदी होता की जणू त्याने जगच जिंकले होते.अगदी लहान मुलासारखा तो एक एक रूम, आय सी यू, ऑपरेशन थिएटर, सर्जरीचे साहित्य, सर्जरीचा गणवेश सर्व काही प्रेमाने स्पर्श करून बघत होता.
"सारंग... अरे कमावलं रे मी सर्व ! सर्व मिळवलं रे! आज माझ्या कष्टाचे चीझ झाले रे! आज दादा बाबा आई असती ना तर मला बघून खूप आनंदी झाले असते रे ! पण असो तू आहे ना ..". चल तू पण ये आता तुला पण उशीर होतोय भेटू सायंकाळी.असे बोलत दोघेही आपापल्या मार्गाने प्रस्थान झाले .
वॉर्डबोय संपूर्ण रुग्णालय अर्जुन ला समजावून सांगत होता.
इतक्यात अर्जुन मध्येच थांबून डावीकडे रोखून बघत बसला.
"थांबा डॉ.! "कुणीतरी अर्जुन ला आवाज दिला.
म्हणून मागे वळून बघणार एवढ्यात वॉर्डबोय डॉ. अर्जुनला आडवा झाला.
डॉ. श्रीवास्तव. इकडे जाण्यास मनाई आहे. हे बघा "प्रतिबंधित क्षेत्र" कृपया इकडून यावे. वॉर्डबोय थोडा रोखूनच बोलला.
अर्जुन ला काही कळले नाही पण त्याला आज पूर्ण
दिवस अगदी आनंदात घालवायचा होता म्हणून त्यानेही काही लक्ष दिले नाही आणि तो वार्डबोय सोबत चालता झाला.
एवढ्यात अर्जुन समोर एक स्त्री हातात पेढे घेऊन आली .
डॉ.साहेब घ्याना माझा मुलगा डॉ.झाला हो! आणि तुमचे पण अभिनंदन,एकदम अर्जुन च्या डोळ्यात पाणी आले.
"आई चल मला शुभेच्छा दे आज मी पेपर खूप छान लिहणार आणि मोठा डॉ. होणार बाबा आणि दादा सारखा आणि शताब्दी मध्ये सेवा करणार.चल बर."
"अर्जुन , अरे ऐक ना नको ना जाऊ अरे नको ना करू असा" अरे काही नाही दिलं या डॉ.पेशाने मला ! उलट माझा सर्व हिरावून घेतलं रे! अरे ते तुझे बाबा बघ आज १० वर्ष झाले पण. तो माणूस माझ्याशी बोलत नाही आणि तो दादा बघ अजून परत नाही आला रे! सर्व हिरावून घेतल रे या पेशाने! आणि या रुग्णालयाने नको ना बाळा नको ना जाऊ का या म्हतरीला जिवंतपणी मरणयातना देतोस,
"अर्जुन...एक पाऊल पुढे उचलला ना तर शप्पथ मला तुझी आयुष्यभर तुझी आई तुझ्याशी बोलणार नाही ."
"अर्जुन.."आणि तेव्हाची ती जी गप झाली ती परत बोललीच नाही .
डॉ. साहेब घ्याना...एकदम अर्जुन त्या काळया दिवसाच्या आठवणीतून बाहेर आला, तो शेवटचा दिवस जेव्हा त्याची आई त्याच्याशी शेवटची बोलली होती... जणू ह्या आईला बघून त्याला त्याच्या आईची आठवण झाली.पण डोळे पुसून त्याने पेढे घेतले आणि त्या स्त्रीला मिठी देऊन तिच्या मुलाला शुभेच्छा देऊन तिथून निघून गेला.
चला डॉ. श्रीवास्तव तुमची सेवा सुरू झाली आता कामाला लागा.हसतच डॉ.सेन बोलले.
क्रमशः
( काय कसा असणार डॉ.अर्जुन चा नवीन प्रवास....अर्जुन ची आई का नाबोलती होती.....आणि प्रतिबंधित क्षेत्र...काय दडले आहे या सरळ कहाणी मागे बघू पुढच्या भागात)

🎭 Series Post

View all