Feb 28, 2024
काव्यस्पर्धा

आली नवी पहाट

Read Later
आली नवी पहाट
नवे वर्ष नवी आशा
सरली जुनी वहिवाट.
जुन्या रात्रीच्या काठाशी
आली नवी पहाट.

नवे पर्व नवी आभा
सरली जुनी काजळसांज.
जुन्या वातीच्या दर्पाशी
थांबली नवी प्रकाशवाट.
आली नवी पहाट

नवे हर्ष नवी काया
सरली जुनी भयवाट.
जुन्या निद्रेच्या स्वप्नाशी
उगवली नवी चांदणवाट.
आली नवी पहाट

नवे सर्व नवी माया
सरली जुनी पळवाट.
जुन्या कल्पनेच्या तळाशी
बहरली नवी फुलवाट.
आली नवी पहाट

©® पूनम तावडे लोखंडे
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Punam

Engineer

स्वतंत्र विचार मांडायला आवडतात

//