अल्बम.. भाग 2

Love story

तिने पुन्हा ओढणी सावरली. ती सायकलवर बसून निघून गेली. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभा राहीला. त्याला हवी तशी मुलगी मिळाली होती. आता तिच्या उत्तरची तो वाट पाहत होता.

    ती होकार देईल याच आशेने तो cultural room मध्ये गेला. इतर जणं नेपथ्याची तयारी करत होती . तो उत्साहाने ओरडला ...

तोगाइज , आपण जिच्या शोधात होतो ती आपल्याला साडलीये..

ग्रुपमधल्या निहारने आतुर होत विचारलं..

निहार कोण आहे मुलगी ? कुठे राहते ? नाव काय तिचं ?

मानस एक क्षण निहारकडे बघत उभा राहीला. मानसला त्या मुलीविषयी कसलीच माहीती नव्हती. तिचं नाव , गाव , पत्ता काहीच त्याला माहित नव्हतं. तो विचारात पडला.

निहार काय रे काय झालं ?

मानस अरे , मी तिला नाव , गाव , पत्ता वगैरे काहीच विचारलं नाही..

निहार वॉट ? वेडा आहेस का तू ?

मानस तिला भेटण्याच्या नादात तिचा बायोडाटा घ्यायचाच विसरलो रे पण डोन्ट वरी.. मी तिला माझा नंबर दिलाय ती करेल मला रात्री कॉल ..

निहार खरंच करेल ? मला नाही वाटत करेल म्हणून..

निहारची नकारघंटा सहन न झाल्यामुळे पल्लवी चिडली..

पल्लवी , प्लीज निगेटिव्ह नको बोलू..

मानस गाइज , मला वाटतं ती कॉल करेल... होकार सुध्दा देईल..

निहार घ्या म्हणजे तिने होकार तुला दिलेलाच नाहीये.

मानस मला नाही रे एकांकिकेसाठी. मी काय प्रपोज नव्हतो करायला गेलो तिला होकार द्यायला. तिने नकार सुध्दा दिलेला नाहीये एकांकिकेत काम करण्यासाठी. पोरगी नवीन आहे पण तीच हा रोल करू शकते.

निहार ओके. ठिक आहे. बघूयात आज रात्री कॉल येतोय का ते ?

     सकाळची रात्र झाली.. मानस घरी येऊन तिच्या कॉलची वाट पाहत होता.. तिचा फोन येईपर्यंत तो अस्वस्थ होता. रात्रीचे 9 वाजले आणि तिचा फोन आलाच..त्याने एका क्षणाचाही विलंब न करता फोन उचलला.

मानस हँलो ...

ती – hello.. मी अनन्या बोलतीये. अनन्या खणकर. ते सकाळी मला तू एकांकिकेत काम करशील का विचारलं होतं ना !

मानसहो येस . बोल अनन्या.. काय ठरलं तुझं ?

अनन्यामी तयार आहे काम करायला .

हे ऐकूनच मानस आनंदाच्या भरात उड्या मारू लागला.

अनन्या – hello

मानस भानावर आला.

मानसहा hello..

अनन्यामी तयार आहे .. असं म्हटलं.

मानसग्रेट thanks .. मग आपण उद्या सकाळी 8 ला practice सुरू करू. भेटू कॉलेजला उद्या .

अनन्या – Ok.  काय करतोय्स ?

मानसकामात आहे... बाय. उद्या बोलू.

त्याने फोन कट केला व एकांकिकेच्या whatsapp group वर त्याने मेसेज टाकला. “ ती हो म्हणाली . उद्यापासून practice सुरू. सगळ्यांनी वेळेत 8 वाजता या..  great , मस्त , good असे रिप्लाय ग्रुपवर येऊ लागले. अनन्या whatsapp वगैरे वापरत नव्हती त्यामुळे तिला ग्रुप मध्ये add करायचा प्रश्न नव्हता. अनन्या घरी उद्याच्या दिवसाची वाट पाहत होती. तिला मानसचा चेहरा दिसत होता. त्याने सकाळी तिला मारलेली हाक अजूनही कानावर घुमत होती..उद्याच्या दिवसाची वाट पाहत ती काही क्षणातच झोपी गेली.

    नवा दिवस उजाडला. ती लवकर तयार झाली. आरशात पाहून केस विंचरत होती. तिला आरशात मानसचा चेहरा दिसला. ती एक क्षण तशीच आरशात पाहत राहीली. तोच तिचा फोन वाजला . भानावर येत तिने फोन कानाला लावला.

ती – hello

तो तुला न्यायला येऊ का मी ?

फोनमधून मानस बोलत होता . ती थोडी ततपप करू लागली..

ती ... .. नाही नको.. कशाला ? येईन मी.

तो ओके. ये वेळेत.

तिने फोन कट केला. व्यवस्थित केस बांधले आणि घरातून निघाली. सायकलवर बसून ती कॉलेजला आली सुध्दा. आल्या आल्या तिने cultural room कडे धावत गेली. तिला 15 मिनिटं उशीर झालेला. सगळे तिची वाट पाहत होते. आजपासून खरंतर तिचं आयुष्य बदलणार होतं..

क्रमशः

लेखक पूर्णानंद मेहेंदळे