अलक : प्रसाद

Alak: Prasad He went to the temple and fell down at the feet of God. He also knelt down and put his head on the feet of the priest. The priest said he was happy “Come every evening at eight o'clock. There is a week in the temple, so the

अलक। :   प्रसाद

तो मंदिरात गेला देवाच्या पाया पडल्यानंतर तो पुजाऱ्याचाही गुडघे खाली टेकवून पायावर डोके ठेवले. 

पुजारी ही आनंदी होत म्हणाले  
 “ संध्याकाळी रोज आठ वाजता येत जा. मंदिरात सप्ताह आहे त्यामुळे आठवडाभर महाप्रसाद आहे.”

 त्याला जाणीव झाली की देव आहे. कारण आजच खानावळ चालवणारा मालकाची आई आजारी आसल्यामुळे खानावळ मालक घरी जाणार होता. त्यामुळे आठवडाभर खानावळ बंद राहाणार होती. त्याच्या कडे एक रुपया ही नव्हता. व तो घरीही माघु शकत नव्हता. तो शिक्षणासाठी शहरात राह्यला आला होता.