Login

अलक- ४१

लिपस्टिक लावू न देणाऱ्या वडील व मुलीची छोटी कथा
तिने भडक लिपस्टिक लावलेलं पाहून त्याचे डोके सटकले आणि तो तिच्या थोबाडीत देत म्हणाला, “तू माझी मुलगी आहेस विसरलीस काय?”

“हे वय ना माझं लिपस्टिक लावण्याचं, मग असा काय गुन्हा केला मी?” ती गालाला हात लावत अश्रू गाळतं म्हणाली.

“असं काय सुख मिळेल गं तुला ते लावल्यावर? तुझ्या आईने केलेली चूक तू करू नयेस, या लिपस्टिकमुळे मी तुझ्या आईला गमावून बसलोय, तुला गमवण्याची ताकद नाही माझ्याकडे?” तो हताश होत म्हणाला.