Login

अक्षय कुमार

Information About Actor Akshaykumar

अक्षय कुमार हे बॉलिवूड चित्रपटांतील आघाडीचे अभिनेते आहेत. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९६७ रोजी पंजाब मधील अमृतसर शहरात झाला. त्यांचे मूळ नाव राजीव भाटिया आहे ; पण चित्रपट जगतात त्यांना अक्षय कुमार नावाने ओळखले जाते.
१९९१ मधील \" सॏगंध \" या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर खिलाडी, मै खिलाडी तू अनाडी, मोहरा यांसारखे हिट अॅक्शन चित्रपट करून त्यांनी स्वत : ची अॅक्शन हिरो अशी प्रतिमा तयार केली ; पण पुढे विनोदी ( हेरा फेरी, गरम मसाला, भागम भाग, हे बेबी, हाऊसफुल्ल, वेलकम ), सामाजिक ( ओह माय गॉड, पॅड मॅन, टॉयलेट - एक प्रेमकथा, जॉली एल. एल. बी २ ), देशभक्तीपर ( हॉलिडे, बेबी, मिशन मंगल, बेल बॉटम ) अशा विविध श्रेणीतील चित्रपटात काम करून त्यांनी आपले अभिनयातील अष्टपैलूत्वही सिद्ध केले. आजवर त्यांनी १५० चित्रपट केले आहेत.
अक्षय कुमार यांचे मूळ नाव राजीव भाटिया आहे. वडलांचे नाव हरिओम भाटिया, तर आईंचे अरुणा भाटिया आहे.
१४ जानेवारी २००१ रोजी दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्या कन्या ट्विंकल खन्ना सोबत ते विवाहबद्ध झाले. त्याही ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांच्या मुलाचे नाव आरव आहे.


महत्त्वाचे पुरस्कार :

१. फिल्मफेअर
२००२ - सर्वोत्कृष्ट खलनायक ( चित्रपट अजनबी )

२००६ - सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता ( गरम मसाला )

२. राजीव गांधी पुरस्कार - २००४

३. पद्मश्री पुरस्कार - २००८

४. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार :
२०१६ - सर्वोत्कृष्ट अभिनेता ( रूस्तम, एअरलिफ्ट )

@ प्रथमेश काटे

https://facebook.com/groups/758165158061766/