Jan 26, 2022
नारीवादी

अखेरचा प्रवास

Read Later
अखेरचा प्रवास
सगळ्यांना गरम गरम जेवायला वाढून
ती जेवायला बसली तरी तिला उठवणारे आज तिला जेवायचा आग्रह करत होते.
कितीही वेळा घर आवरले तरिही पसारा करणारे, आज मात्र तिच्या वस्तू आवरून ठेवत होते.
रक्षाबंधन, भाऊबीज, पिकनिक यांचे प्लॅनिंग तूच कर म्हणून पाठी लागणारी भावंडे आता ती यापुढे कधीच दिसणार नाही म्हणून रडत होती..
 मॅडम वेळेच्या बाबतीत अगदी काटेकोर आहेत असे म्हणणारे तिने कशी वेळेआधी एक्झिट घेतली या विषयावर चर्चा करत होते...
 भेटायचे, एकत्र सहलीला जायचे असे जोरजोरात प्लॅनिंग करणारे आणि शेवटच्या क्षणी कॅन्सल करणारे सगळे मित्रमैत्रिणी आज मात्र तिथे हजर होते..
   ती आजारी पडल्यावर तिच्या आधी अंथरूण घेणारे सासूसासरे देवाचा कसा हा न्याय असे म्हणत होते..
तिचे आईवडील मात्र काहीच न बोलता मूक अश्रू ढाळत होते.
 प्रत्येक वेळी तिने हाक मारली कि पाच मिनिटे ममा असे म्हणणारी मुले आज मात्र ममा ममा करून रडत होती...
 तिचा नवरा, ती घरात असली कि स्वतःची सगळी जबाबदारी झटकणारा तो आज मात्र सगळीकडे लक्ष देत होता.. तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नाही , कधीतरी माझ्याजवळ बस कि , असे न सांगता ,अधून मधून तिच्या जवळ येऊन बसत होता....
 आणि ती या सगळ्यापासून लांब चालली होती.. जेव्हा हे सगळे ती मागत होती तेव्हा तिला गृहित धरलेल्या सगळ्यांकडे आता हसून पहात होती...
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असे म्हणतात....
ते खरे असल्याचा अनुभव ती आता घेत होती...
ज्या सुखाला ती आयुष्यभर मुकली ते सुख आता मरणान्ती ती उपभोगत होती....सारिका कंदलगांवकर 
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now