अकल्पित...!३

Vijay aaditi cha mitrach aslyane ti relax zali Hoti khari on tyane ya prakarnache he aankhihi pailu ASU shaktat te dakhavale hote.jyacha aaditi me Kashi vicharach Lela navhta.

 राज्यस्तरीय कथा मालिका
शीर्षक - अकल्पित...!३
विषय - रहस्य कथा

      दुसऱ्या दिवशी होणार असलेल्या पोलीस चौकशी चा विचार करतच आदिती बसली होती.उद्या तिचा जबाब तर ती नोंदवणार च होती पण गेल्या तीन चार दिवसांपासून  तिच्या आजूबाजूला सतत सोबत करणाऱ्या, रांत्रंदिन तिची सेवा करणाऱ्या एकानेही तिला त्रास होऊ नये म्हणून" काय झाले होते नेमके त्यादिवशी ?"असं साधं विचारलं सुद्धा नव्हतं.ती कोण,कुठली कशाचाच विचार न करता त्यांनी केलेली मदत तिच्यासाठी अतुलनीय होती.ते नसते तर आज तिचे काय झाले असते?? याचा साधा विचार सुद्धा करवत नव्हता तिला.
सगळे सोपस्कार आटोपले की त्यांच्याशी सगळं बोलायचं असं मनातच पक्कं केलं तिने.


दुसरा दिवस उजाडला..! रात्र आजच्या चौकशी प्रकरणाचा विचार करतच घालवली होती आदिती ने. तिचा मनावरचा ताण ओळखत डॉक्टर तिला रिलॅक्स करायचा प्रयत्न करत होते.
"हे बघ आदिती, पोलीस सुद्धा माणूसच असतात ग, जबाब नोंदवणे हा त्यांच्या कामाचा भाग आहे. आणि ताण न घेता सत्य काय ते सांगत त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे.काय मग करणार ना त्यांना त्यांच्या कामात मदत??" डॉक्टरांनी हसून तिला विचारलं आणि आदितीने सुद्धा हसून होकारार्थी मान हलवली.


थोडा ताण निवळला होता तिच्या मनावरचा.

काही वेळाने इन्स्पेक्टर विजय चौकशी साठी आले. इन्स्पेक्टर विजय म्हणजे एकदम उमदं, हँडसम , स्मार्ट आणि तरुण व्यक्तिमत्व होतं.आल्या आल्या त्यांनी दिलेली स्माईल इतकी आश्वासक होती की आदिती एकदम रिलॅक्स झाली.


"हॅलो, माय सेल्फ इन्स्पेक्टर विजय ." म्हणत त्यांनी सुरुवात केली आणि अगदी एखाद्या समवयस्क मित्राने गप्पा माराव्या इतक्या सहजतेने त्यांचा संवाद सुरू झाला.


"हॅलो, तर काय नाव म्हणालात तुमचं?" विजय

"मी आदिती देशमुख,पुण्याची..!" ती बोलली

"आदिती  मुकुंद देशमुख तर नाही ना तुम्ही??" विजय

"हो!! पण तुम्हाला कसं माहीत इन्स्पेक्टर?? " आदिती


"तुम्ही हायस्कूल ला असतांना पुण्यात शिकलात का?" विजय


" नाही, तेव्हा आम्ही साताऱ्याला होतो. बाबांची नोकरी तिथे होती ना!! पण याचा या केस शी काय संबंध??" आदिती


" या केसचा तपास माझ्याकडे आहे,हाच खूप मोठा संबंध आहे आदिती मॅडम या प्रश्नाशी..!" विजय


इन्स्पेक्टर विजय चं ते विचित्र उत्तर ऐकून आदिती च्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रश्नचिन्ह  उपस्थित झाले होते.


तिच्या चेहऱ्यावरचे ते प्रश्नार्थक भाव न्याहाळत  तो हसला आणि म्हणाला ,"तुम्हाला या काळात तुमच्या सोबत शिकणारा  कुणी विजय जाधव आठवतो का??"


आदिती ने पुन्हा डोक्याला ताण दिला," हो ना हो आठवला मला ,आमच्या वर्गातला हुशार आणि ॲक्टिव  मुलगा...!"


"तोच आता तुमच्यापुढे उभा आहे मॅडम!!" म्हणत तो हसला.

अदिती सुद्धा विस्मयाने डोळे विस्फारून बघतच राहिली.

"पहिल्या दिवसापासून च यांना कुठेतरी पाहिलं अस वाटत होतं पण नेमकं कुठे ते समजेना पण आज तुझं नाव ऐकलं आणि क्लिक झालं बघ...!" विजय

"मी तर ओळखलं च नाही बघ,किती बदल झालाय तुझ्यात." आदिती


आता तर आदिती च्या मनावरचा ताण पूर्ण निवळला होता कारण इन्स्पेक्टर तिचा जुना मित्रच निघाला होता.

गप्पा आटोपल्या अन् आता मात्र गाडी प्रकरणाकडे वळली.


"नेमकं काय घडलं ते सांगू  शकणार काआदिती त्या दिवशी...?"

ट्रेकिंग ला गेल्यावर  वरच्या कड्यावरून चैताली ने तिला धक्का देऊन पाडले,मग पुढे काय झाले हे तिला नीट आठवत नाही  पण मग गावातल्या लोकांनी इथे ॲडमीट केल्याची  जाणीव वगैरे  घडलेलं सगळं जसंच्या तसं कथन करून  तीने सांगितलं.

"तुमचे काही वैयक्तिक मतभेद होते का?,तुला तिने धक्का देऊन कां पाडलं असेल असं तुला वाटतं?" पुन्हा त्याचा प्रश्न...!


"चैताली नी मला ढकलून दिलं हे जेव्हा जेव्हा मला आठवते ना ,मीसुद्धा तेव्हा प्रत्येक  वेळी हाच विचार करत असते की तिनी मला ढकलून  कां द्यावे????"
आदिती.

"खरं तर तुला डोक्याला ताण येईल असं काही विचारायचं नाही असं डॉक्टरांनी बजावून ठेवलंय पण मला असं वाटतं की तू शांतपणे पुन्हा एकदा आठवून बघ. तिनी तुला ढकलून कां द्यावं? कदाचित चुकीने धक्का लागून ,तुझा तोल जाऊन तर पडली नाहीस ना तू...?

माझा विश्वास आहे तुझ्या सांगण्यावर पण जर तिनी तुला  मुद्दाम धक्का द्यावा असं काही कारण नव्हते तर ही गोष्ट सुद्धा पडताळून पाहणे गरजेचे आहे एवढेच मला वाटते." विजय मधला इन्स्पेक्टर स्पष्टीकरण देऊन मोकळा झाला.

 त्याचं बोलणं ऐकून आदिती पुन्हा विचारात पडली." हो खरेच एकदा पडताळून बघायला हवे ना सारे...!"


"तुझ्या सांगण्यानुसार जय आणि चैताली हे दोघेच त्या वेळी तिथे होते. कदाचित जय चा सुद्धा या प्रकरणात सहभाग आहे का याचा सुद्धा विचार करावा लागेल आम्हाला..?"  विजय एक  एक मुद्दा पडताळून बघत होता आणि आदिती सुन्न होऊन विचार करत बसली होती.


आदितीला तसे बघून " रिलॅक्स आदिती, काही घाई नाही याची. शांतपणे सगळं आठव आणि नंतर सांग मला." विजय बोलला.

तितक्यात पोलीस शिपाई हातात काहीतरी घेऊन येतांना दिसला...

"आदिती,  तू पडली होती तिथून काही अंतरावर शोध घेताना आम्हाला ही बॅग सापडली होती. ही तुझी बॅग आहे का?"

"हो ही माझीच बॅग आहे. इथे माझा फोन पण असेल मग मला आई बाबांशी बोलता येईल...!" आनंदातीरेकाने   आदिती बोलत होती.

"हे बघ आदिती,असा उतावळे पणा नकोय. एकतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जर तू म्हणतेस तसं तुला धक्का देऊन पाडलं असेल तर या प्रकरणाला असंच सोडून चालणार नाही.
आधी आम्हाला तुझ्या घरची परिस्थिती काय? तू गायब झाल्याची रिपोर्ट दिली गेली आहे का? तुझ्या सोबतच्या ग्रुप चे जबाब सारेच बघावे लागेल?"  विजय


" बापरे! इतकं कॉम्प्लीकेटेड झालंय सगळं...!" आदिती.


"हो जर ही घातपाताची केस असेल तर अजूनही तुझ्या जिवाला धोका असू शकतो. तुला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाची नोंद असते इथे आणि बाहेर पोलिसांचा पहारा...! त्यामुळे काही दिवस तरी कुणालाही फोन करायचा मोह आवर.
तुझ्या घरचा नंबर आणि तुझा मोबाईल आमच्या कडे सोपव म्हणजे आम्हाला तपासात मदत होईल." विजय


विजय आदिती चा मित्र च असल्याने ती रिलॅक्स झाली होती खरी पण त्याने या प्रकरणाचे जे आणखीही पैलू असू शकतात ते दाखवले होते. ज्याचा आदिती ने कधी विचारही केला नव्हता.

विजय म्हणत होता तसं चैताली चा धक्का लागून सुद्धा ती पडली असावी,ही पण शक्यता होतीच..!
चैताली तीला आवडली नव्हती पण चैताली आणि तिचे मुळात काही वैर नव्हतेच ना..!

विजय म्हणतो तसा जय चा तर या सगळ्याशी काही संबंध नसेल ना? माझे काय झाले? याचा कुणी शोध घ्यायचा प्रयत्न सुद्धा केला नाही हे सारे नवलच!!!!

निदान जय कडून तरी तिला अशी अपेक्षा अजिबात नव्हती. पण खरंच अजूनही कुणी तिचा शोध घेत तिथवर आले नव्हते. आता तर विजय म्हणत होता तसे सावध आणि सजग राहणे गरजेचे झाले होते.

कालच्या रात्री सारखी आजची पण रात्र विचार करण्यातच जाणार होती आदिती ची...!

उद्याच इन्स्पेक्टर विजयला पूर्ण पार्श्वभूमी सांगायची असा विचार करून ती झोपायचा प्रयत्न करू लागली.


खरंच कुणाचा हात असेल या प्रकरणात? की चैताली चा साधा धक्का लागून आदिती पडली असेल हे जाणून घ्यायचं असेल तर वाचा कथेचा पुढचा भाग

टीम - भंडारा

©® मुक्ता बोरकर - आगाशे
        मुक्तमैफल

    

🎭 Series Post

View all