एका लग्न सोहळ्याची गोष्ट

This is my first article, from which writing has started hence very special for me......

#एका लग्नसोहळयाची गोष्ट#

तारीख ३० मे २०१९
✍️©स्नेहा किरण नवाळे (पाटील)
हॉलच्या आवारात प्रवेश करताच उजव्या बाजुला दिसला लक्षवेधक सेल्फी पॉइंट, त्या विचारात मग्न असताना डाव्या बाजुला नाश्त्याची चाहूल लागली, जाऊन बघावं तर काय? टीपिकल भारतीय पदार्थ ते म्हणजे इडली, मेदू वडा चहा. चौकशीत कळलं साबुदाणा खिचडी पण होती, अहो आज एकादशी नाही का, तिथेच खूण पटली की जेवण भारीच असणार आहे