अजूनही बरसात आहे भाग ८

अजूनही बरसात आहे

अजूनही बरसात आहे.. भाग ८

अर्णव तिच्याकडे पाहतच राहिला. तिचं केतकीच्या रंगाचं आरस्पानी देखणं रूप, झिरझिरी हिरव्या लुगड्यातून दिसणारी तिची मादक काया त्याला संमोहित करत होती. बाहेर पाऊस निनादत होता. देहातला कामाग्नी अधिक तीव्र होत होता. तो भारावल्यासारखा तिच्या मागे गेला. तिच्या कमरेभोवती त्याच्या हातांचा विळखा घट्ट होत गेला. तिला तिच्या खांद्यावर त्याचे श्वास जाणवू लागले. तिचे डोळे आपोआप बंद होऊ लागले. 

“नाही अर्णव.. नको, चुकीचं आहे हे..”

स्वरा त्याला दूर करत म्हणाली पण तिचे शब्द त्याच्या कानापर्यंत पोहचत नव्हते. एक वेगळीच नशा त्याला धुंद करत होती. त्याने पुन्हा तिला जवळ ओढलं. दोघांच्या श्वासांची गती आता वाढू लागली होती. त्याने हलकेच तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर उचलला आणि तिच्या भाळावर आपले ओठ टेकवले. मग डोळ्यांवर, गालांवर आणि शेवटी तिच्या थरथरत्या गुलाबी ओठांच्या पाकळ्यावर त्याने अलगद चुंबन घेतलं. त्याच्या हळुवार स्पर्शाने तिची काया मोहरली. सर्वांगावर रोमांच उभे राहिले. त्याची धुंद नजर तिच्या देहावर स्थिरावली होती. ती लाजेने चूर झाली.

“असं नको ना पाहू अर्णव..”

आपल्या नाजूक हातांच्या ओंजळीने स्वतःचा चेहरा झाकत ती म्हणाली. तो अलगद तिच्या हातांची ओंजळ दूर करत तिच्या कानाजवळ येऊन कुजबुजला.

"काय कमाल दिसतेयस अगं तू.. हे नशिले डोळे आणि हे गुलाबी रसाळ ओठ.. वेड लावतेस अगदी.. आय लव्ह यू स्वरा.. लव्ह यू सो मच..”

स्वरा काही बोलणार इतक्यात त्याने तिच्या नाजूक ओठांवर बोट ठेवून तिला शांत राहायला सांगितलं आणि तिला जवळ ओढून तिच्या मानेवर ओठ टेकवले. तिचं सर्वांग शहारलं.

“नको ना रे.. प्लिज अर्णव..”

त्याच्या कानात ती अस्पष्टपणे पुटपुटली. आता तिचा विरोध मावळत चालला होता. तिने त्याला घट्ट मिठी मारली. 

“आय लव्ह यू टू अर्णव.. लव्ह यू सो मच..”

तिची मिठी अजूनच घट्ट होत होती. त्याचे हात तिच्या सर्वांगाला स्पर्श करत होते. स्वराही त्याच्या प्रेमाच्या आवेगात भान हरपून गेली. तिने आवेगाने अर्णवला आपल्याकडे ओढलं तिचे नाजूक गुलाबी ओठ जणू त्याच्या ओठांच्या स्पर्शासाठी आसुसले होते. तिने त्याच्या ओठांवर तिचे अधीर ओठ टेकवत दीर्घ चुंबन केलं. श्वास श्वासात मिसळला गेला. अर्णव अलवारपणे तिच्या अंगावरची वस्त्रे दूर करत होता. तिनेही अर्णवच्या शर्टाची बटणं काढायला सुरुवात केली. जागा, काळ, वेळ या साऱ्यांचा दोघांनाही विसर पडला. तिची नाजूक बोटं त्याच्या मानेवर रुळणाऱ्या काळ्याभोर केसांत गुंतली होती. आता त्याच्या पाठीवरून तिचे हात फिरू लागले. त्याच्या पाठीवर तिच्या नखांची नक्षी उमटली. तो तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करत होता. तीही कामातूर होऊन त्याला तितक्याच आवेगाने प्रतिसाद देऊ लागली. दोघांच्या देहात पेटलेला वणवा अधिकच भडकला होता. 

ती धुंद पावसाळी रात्र.. रोमांचित काया आसूसलेले क्षण, गंधाळलेले स्पर्श दोघांनाही बेभान करत होते. बेधुंद रात्रीची नशा दोघांच्याही देहात बोलत होती. प्रणयक्रिडेचा आनंद उपभोगण्याची उत्कटता दोघांचाही संयम तोडू पाहत होती. स्वरा त्याच्यात साखरेसारखी विरघळत होती. तिने स्वतःला अर्णवच्या स्वाधीन केलं. आता कोणीच काही बोलत नव्हतं फक्त आसुसलेले स्पर्श बोलत होते. दोघांचे श्वास एकमेकांत मिसळत होते. मिलनाचा स्वर्गीय आनंद दोघेही अनुभवत होते.  स्वर्गीय सुखाचं टोक गाठलेल्या त्या दोन जिवांचे श्वास त्या संपूर्ण खोलीत भरून राहिले होते. मिलनाचा उत्कट आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर पसरला. शेवटी दोघं एकमेकांच्या कुशीत शांतपणे निद्राधीन झाली आणि बाहेर कोसळणारा पाऊस त्यांच्या प्रेमाची साक्ष देत बरसत होता. 

दुसऱ्या दिवशी स्वराला जाग आली. स्वतःला निर्वस्त्र अवस्थेत पाहून तिला कसंतरीच झालं.

“हे काय झालं माझ्या हातून? फार चुकीचं वागले मी..”

स्वराच्या डोळ्यात पच्छाताप दाटू लागला. रात्रीची नशा ओसरली. तिने पटकन अंगावर दोरीवर वाळत टाकलेले तिचे कपडे चढवले. आणि एका कोपऱ्यात जाऊन बसली. भीतीने, शरमेने डोळे आपोआप बरसू लागले. तिच्या मुसमूसण्याच्या आवाजाने अर्णवला जाग आली. तो उठून बसला. तिला रडताना पाहून त्याने विचारलं

“काय झालं शोना? का रडतेस? सांग तरी मला..”

“अर्णव, आपण फार चुकीचं वागलो.. लग्नाआधीच.. आपल्या हातून हे घडायला नको होतं. मला आता स्वतःचीच लाज वाटतेय. काय झालं हे?”

स्वरा डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. अर्णवने स्वराला त्याच्या कुशीत घेतलं. आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत तिचा चेहरा घेऊन तिच्या कपाळावर आपले ओठ ठेकवत तिला जवळ घेतलं. 

“स्वरा.. ऐक माझं.. आपण काहीही चुकीचं वागलो नाही. आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि ही गोष्ट त्याचाच एक भाग आहे. आता आपण खऱ्या अर्थाने एकमेकांचे झालोय. काल रात्री फक्त शरीराचं नव्हे दोन आत्म्याचं मिलन झालंय.. हो.. पण हे सगळं लग्नाच्या आधी झालं इतकंच. तुला माहिती स्वरा, काल आपण एकरूप झालो.. मिलनाचा आनंद उपभोगला हे सुख लग्न करूनही काही जणांच्या नशिबात नसतं. त्या सुखापासून ते कायम वंचित राहतात पण आपल्याला ते सुख मिळालं हे काय कमी आहे का?”

अर्णव भावुकपणे म्हणाला.

“पण.. अर्णव आपलं लग्न?” - स्वरा

“बस इतकंच ना.. तू काळजी करू नको.. आपण घरी गेलो की आपल्या आईबाबांना आपल्या प्रेमाबद्दल सांगून टाकू. ते आपल्याला नक्की समजून घेतील. आपलं लग्न लावून देतील. फार कमवत नसेन पण तुला नक्कीच सुखात ठेवण्याचा प्रयत्न करेन. सगळं ठीक होईल.” - अर्णव

“खरंच अर्णव असं होईल?”

तिने आनंदून त्याचाकडे पाहिलं.

“हो असंच होणार.. आपण असंच करायचं.. तू काळजी करू नकोस. मी आहे ना..”

तिचा हात हातात घेत अर्णव म्हणाला. स्वरा आनंदाने त्याला बिलगली. अर्णवने अंगावर शर्ट चढवला. दोघांनी चेहऱ्यावर पाणी मारलं आणि जाण्याची तयारी करू लागले. इतक्यात ती स्त्री चहा घेऊन आत आली. पाठोपाठ तिचा नवराही आला. सर्वांनी मिळून चहा घेतला. पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता.

“काय पाव्हणं.. कसं करायचं आता.. पाऊस काय थांबेल असं वाटत नाय..पाहिजेल तर थांबा तुमी हिथं..पाऊस जरा थांबला की जावा मग.. पंचगंगेचं पाणी बी वाढलं आसल आता. धोका हाय पुढं.. नगा जाऊ. ”

कोसळणाऱ्या पावसाकडे पाहत तो म्हणाला. 

“नाही ओ.. तुमचं बरोबर आहे पण आम्हाला निघावंच लागेल. इथे मोबाईलला रेंज पण नाही. आमच्याबद्दल आमच्या मित्रांना काहीच माहित नाही.ते काळजी करत असतील. आम्ही निघतो. तुम्ही आम्हाला रात्री आसरा दिलात. जेवण दिलंत. तुमचे कपडे दिलेत. आम्ही दोघे तुमचे हे उपकार आयुष्यात कधीच विसणार नाही. थँक्यू सो मच भावा..”

अर्णव हात जोडून म्हणाला. स्वरानेही त्याच्या बायकोचे आभार मानले. अर्णवने त्याला थोडे जास्तीचे पैसे देऊन बाईक हातात घेतली. गाडी रिपेअर झाली होती. जाताना त्या व्यक्तीने त्याचा रेनकोट स्वराला घालायला दिला. स्वरा आणि अर्णव यांनी आभार मानून त्यांचा निरोप घेतला. अर्णव सावकाश गाडी चालवत होता. बाहेर पडल्यानंतर काही अंतर पार केल्यावर मोबाईलला रेंज मिळताच स्वराने लगेच स्नेहलला कॉल केला आणि सगळा वृत्तांत सांगितला.

“आम्ही सुखरूप आहोत. तुम्ही काळजी करू नका. पाऊस थोडा कमी झालाय आता. आम्ही डायरेक्ट घराच्या दिशेनेच निघालोय. माझं काही सामान राहीलं असेल तर तुझ्या बॅगेत भर आणि तुम्ही पण निघा लवकर नाहीतर पाऊस वाढला तर उगीच अडकून बसाल..”

असं म्हणून तिने कॉल कट केला. इतक्यात पुन्हा मुसळधारा पाऊस सुरू झाला. स्वराने पटकन मोबाईल बॅगेत टाकला. त्याच्या कमरेभोवती दोन्ही हातांचा विळखा घालून ती अर्णवला बिलगून बाईकवर मागे बसली. 

“स्वरा, किती छान होती ना कालची रात्र! खूप रोमँटिक ही ट्रिप कायम माझ्या स्मरणात राहील. खूप सुख दिलंस मला तू स्वरा.. कोणास ठाऊक हे क्षण आयुष्यात पुन्हा येतील की नाही.. उद्या मी असेन, नसेन..”

अर्णवच्या बोलण्याने स्वरा हळवी झाली. डोळ्यात मेघ दाटू लागले.

“असं का बोलतोयस अर्णव? आपण कायम सोबत असणार आहोत. आपण कधीच एकमेकांना सोडून जायचं नाहीये. समजलं तुला?”

आसवांनी पापण्याचा उंबरठा कधीच ओलांडला होता. तिने रागाने तिचे अर्णवच्या कमरेभोवती गुंफलेले हात  बाजूला केले. अर्णवने आवाज दिला तरी ती त्याच्याकडे पाहत नव्हती. रुसून बसली होती. 

“अगं स्वरा, बच्चा.. मस्करी केली मी. किती इमोशनल होतेस. बरं बाबा चुकलो, कान पकडून सॉरी म्हणतो हवं तर.. पण हा नाकावरचा राग घालव यार..मी घाबरतो यार तुझ्या रागाला..”

तो मिश्किलपणे म्हणाला. लटक्या रागाने स्वरा म्हणाली

“मग तू असं सोडून जाण्याच्या गोष्टी करू नको ना.. मला खूप भीती वाटते यार.. ”

बरं बाबा, नाही बोलणार.. कधीच सोडून जाण्याची भाषा करणार नाही.. सॉरी..”

स्वराने मिठी घट्ट केली. पावसाने चांगलाच वेग धरला होता.  

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all