Oct 16, 2021
सामाजिक

आजचा रंग लाल

Read Later
आजचा रंग लाल
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
आजचा रंग लाल...©विवेक वैद्य .लाल साडी नेसुन नववधूच्या रूपात तिने त्याच्या घरी प्रवेश केला. राजाराणीच्या संसारात काही दिवस छान गेले. एके दिवशी तो दारू पिऊन आला.सुरूवातीला दोस्तांबरोबर थोडीफार घेतली असेल म्हणून तिने दुर्लक्ष केले. नंतर ते रोजचेच झाले. तिने गोड बोलून समजूतीने सांगायचा प्रयत्न केला.पण फरक पडला नाही.

एके दिवशी (रात्री)तो असाच लडखडत्या चालीने "ये लाल रंग कब मुझे छोडेगा"म्हणत आला. तिने त्याला आत घेतले व दरवाजाला कुलूप लावले. तो जेवायला बसला. नशेत आज भाजीचा रस्सा जास्तच लाल असल्याचे त्याच्या लक्षातच आले नाही. त्याने पहिला घास तोंडात घालताच त्याला ब्रम्हांड आठवले."पाणी...पाणी" ओरडत तो उठला आणि शेजारी ठेवलेला तांब्या उचलला .तो रिकामा होता.तसाच धडपडत तो माठाजवळ गेला...रिकामा.पींप बघितला ..रिकामा. बाहेर पडण्यासाठी त्याने दरवाज्याकडे धाव घेतली तर दाराला आतून कुलूप. तो रागाने तिच्याकडे वळला.तिने याअगोदरच डोक्याचा पदर कमरेला खोचला होता आणि लाल डोळ्यांनी हातात काठी घेऊन त्याच्याकडे पहात होती.

आता आपले काही खरे नाही हे उमजून त्याने सपशेल शरणागती पत्करली . त्याने कानाला हात लावला आणि तिच्यापुढे जाऊन उभा राहिला.तिनेही लपवलेली पाण्याची बाटली त्याच्यापुढे केली.

त्यानंतर त्यांचा संसार अगदी आनदाने सुरू झाला हे सांगायलाच पाहिजे का?
©®विवेक चंद्रकांत वैद्य .नंदूरबार .
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Vivek Vaidya

Blogger

Nothing Specific