अजब प्रेमाची गहजब गोष्ट भाग ७

This is a love story


         निशांतला कोल्हापूरला जाऊन तीन आठवडे झाले. पण निशांत आणि विनिशाचे बोलणे झाले नाही. विनिशाला त्याची ख्याली खुशाली कधी तिच्या बाबांकडून कळे  तर कधी समिधा कडून विनिशा मात्र त्याच्या आठवणीने झुरत होती. त्याचा  आवाज ही ऐकायला ती तरसली होती. खरं तर आत्ता तिला त्याची किंमत कळत होती.
          एखादे माणूस सतत आपल्या बरोबर असले की त्याला गृहीत धरणे खूप सोपे असते पण तोच माणूस जर आपल्या पासून दूर गेला की आपण किती चुकत होतो व त्या माणसाची गरज आपल्याला ही आहे हे आपल्या लक्षात येते.
        एक दिवस विनिशा समिधा कडे गेली. तिला निशांतला फोन करून तो स्पीकरवर ठेवायला सांगीतला जेणेकरून तिला त्याचा आवाज तरी ऐकू येईल. समिधाचा फोन त्याने उचलला.
समिधा,“ हाय निष, कसा आहेस तब्बेत काय म्हणतेय तुझी?” ती म्हणाली.
निशांत,“ मी ठीक आहे ” तो म्हणाला.
    त्याचा आवाज ऐकून विनिशाच्या मात्र डोळ्यातून अश्रु येऊ लागले कारण तिने तब्बल तीन आठवड्या नंतर त्याचा आवाज ऐकला होता. इतक्या वर्षांमध्ये कधीच निशांत व तिच्यात इतका दुरावा आला नव्हता.
समिधा,“ प्लास्टर काढलं का हाताचे?” ती म्हणाली.
निशांत,“ नाही ना उद्या काढणार आहेत. मला ना कंटाळा आलाय या सर्वाचा”तो म्हणाला.
समिधा,“ आणि कपाळावरची जखम बरी झाली का स्टीचेस   काढले असतील ना?” तिने विचारले.
निशांत,“ हो काढले ना पण ते अजून दुखतात” तो म्हणाला.
      हे ऐकून विनिशाने डोळे पुसले व ती समिधाच्या कानात हळूच म्हणाली.आराम कर म्हणावं त्याला उगीच बोंबलत फिरू नकोस.
समिधा, “ आराम कर उगीच बोंबलत फिरू नकोस” ती म्हणाली.
निशांत,“ तुझ्या बरोबर कोण आहे का तिथे जे आपले बोलणे ऐकते आहे?” हे शब्द ऐकून त्याला संशय आला.
समिधा,“ नाही रे बरं चल बाय take care ” असं म्हणून तिने फोन ठेवला आणि सुटकेचा  निश्वास सोडला  व ती पुढे म्हणाली   काय डेंजर माणूस आहे हा तुझे शब्द माझ्या तोंडून ऐकून लगेच संशय आला त्याला! त्याला जर कळलं असत तर तू इथे आहेस आणि तुझ्याच सांगण्यावरून मी फोन केला तर माझे काही खरे नव्हते” ती म्हणाली.
विनिशा,“ अजून किती दिवस हा शिक्षा देणार आहे मला काय माहीत?”ती तोंड पाडत म्हणाली.
         समिधा मात्र यावर काहीच बोलली नाही.विनिशा घरी गेली असाच एक आठवडा गेला आणि एक दिवस संध्याकाळी समिधाचा फोन आला.समिधा फोन वरून
समिधा,“अग विनिशा निशांत आज पुण्यात आला आहे तो उद्या जॉईन होणार आहे कंपनी मध्ये त्याचा फोन आला होता  मला!” ती आनंदाने सांगत होती.
विनिशा ,“खरच! त्याला जरा समजावं ना समिधा की माझ्याशी बोल म्हणून” खरं तर ती मनातून दुखावली की निशांताने पुण्यात आल्याचे तिला न सांगता समिधाला सांगितले.
समिधा,“हे पहा विनी समजावलं त्याला जात जो चुकतो मला नाही वाटत निशांतच  काही चुकत आहे. त्याचा रुसवा कसा काढायचा ते तुझे तू ठरव मी यात नाही पडणार!” ती म्हणाली.
विनिशा,“ ठीक आहे पण एक मदत तर करशील उद्या त्याला तू डिनरला घेऊन जात आहेस अस सांगून मी सांगते तेथे पाठवशील? प्लिज माझ्या साठी!” ती समिधाला विनंती करत म्हणाली.
समिधा,“ ठीक आहे मला व्हेन्यू मेसेज कर” अस म्हणून तिने फोन ठेवला.
●●●●
       दुसऱ्या दिवशी विनिशाने हेवन ब्लु या गार्डन रेस्टॉरंट मध्ये एक टेबल बुक केला. तिने त्या दिवशी कामावर सुट्टी टाकली व दिवस भर बसून वेगवेगळ्या पेंटिंग्ज काढल्या. त्या प्रत्येक पेंटिंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारे sorry लिहले होते. ती संध्याकाळी सुंदर असा रेड कलरचा वनपीस घालून तयार झाली व सात वाजताच रेस्टॉरंट मध्ये पोहचली. तसे हेवन ब्यु हे रेस्टॉरंट प्रायव्हसी साठी प्रसिद्ध होते. प्रत्येक टेबल हा दुसऱ्या टेबल पासून लांब प्रत्येक टेबलला छान छोटे छोटे झोपडी वजा आडोसे होते. प्रत्येक टेबल पर्यंत जाण्यासाठी वेगवेगळे सुंदर असे झाडीतून जाणारे रस्ते होते.विनिशाने तिच्या टेबल पर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्यावर ठीक ठिकाणी sorry ची तिने तयार केलेली पेंटिंग लावली.
            निशांत आठ वाजता आला व तो समिधाने सांगितलेल्या टेबल कडे जाऊ लागला तर त्याला थोड्या थोड्या  अंतरावर sorry ची पेंटिंग्ज दिसू लागली. त्याला कळायला वेळ नाही लागला की हे विनिशाचेच काम आहे. तो टेबल पर्यंत पोहचला तर विनिशा तिच्या चेहऱ्यासमोर एक सॉरीचा सुंदर असा बोर्ड घेऊन उभी होती.निशांतने पाहिले आणि आल्या पावली परत निघला तसे विनिशाने त्याचा हात धरला व ती म्हणाली. 
विनिशा,“अजून किती दिवस मला शिक्षा देणार आहेस? बरं आला आहेस तर जेवून तरी जा” अस म्हणून तिने त्याला हात धरून खुर्चीवर बसवले.
        विनिशाने जेवणाची ओर्डर दिली.जेवण आले जेवण झाले तरी निशांत तिज्याशी काहीच बोलला नाही. शेवटी विनिशाच म्हणाली.
विनिशा,“ आता तुला मनवायला काय करू अजून हे बघ कान धरले. उटाबशा  मला काढता येणार नाहीत प्लिज काही तरी बोल ना रागव माझ्यावर पण बोल काही तरी एक महिना झाला तुला पाहन तर दूर पण आवाज ही ऐकायला तरसली आहे मी प्लिज निशांत!” असं म्हणून ती रडू लागली.
निशांत,“ by the way तुझा साखरपुडा कधी आहे?” इतका वेळ शांत असलेला निशांत बोलला.
विनिशा,“मोडला तो मी का त्या चोंबड्या समिधाने नाही सांगितले तुला?” ती डोळे पुसत म्हणाली.
निशांत,“ ठीक आहे येतो मी” असं म्हणून तो निघला.
विनिशा,“ तर तू मला माफ नाही करणार ठीक आहे. इथून पुढे माझा त्रास नाही होणार तुला पण आपल्या मैत्रीची एक शेवटची आठवण द्यायची आहे तुला! ” अस म्हणून तिने एक पेंटिंग काढली व त्याच्या समोर धरली व पुढे म्हणाली.“ ही मी स्वतः तयार केलेली आपल्या दोघांची लहानपणाची पेंटिंग तुझ्यासाठी खास तयार केली होती” अस म्हणून ती तिने त्याच्या हातात दिली.

               निशांत पेंटिंग पाहत होता. त्या दोघांची दहा वर्षांचे असतानाची ती सुंदर पेंटिंग होती. दोघे ही वर्गाच्या बाहेर  शाळेच्या गणवेशात बसलेले त्या पेंटिंग मध्ये दिसत होते.विनिशा हसून काही तरी बोलत आहे आणि निशांत तिचे बोलणे ऐकत आहे अशी सुंदर पेंटिंग होती ती! दोघांच्या ही चेहऱ्यावर प्रसन्न भाव विनिशाने खूप छान चितारले होते.निशांतने ती पेंटिंग पाहिली त्याच्या चेहऱ्यावर क्षण भर स्मित  हास्य पसरले पण दुसऱ्याच क्षणी पेंटिंग घेत तो म्हणाला


निशांत,“ बरं ” इतकंच म्हणाला.

        आता मात्र विनिशाचा बांध फुटला व पेंटिंग तिने ठेवली व त्याच्या समोर जाऊन त्याची कॉलर दोन्ही हातांनी धरून बोलू लागली.
विनिशा,“एवढं काय केलं रे मी की मला इतकी मोठी शिक्षा देत आहेस. मी बाकीचे बोलले ते तुला दिसले पण त्यात माझे प्रेम लपले होते ते नाही ना दिसले तुला. त्या दिवशी निघून गेलास पण एक फोन ही नाही करावासा वाटला तुला? आज एक महिना झाला साधा एक फोन नाही एक मेसेज नाही.मी कसा काढला एक महिना मला माहित आणि प्रेम आहे म्हणे माझ्यावर! पण तुला हे कळत  कसे नाही that\"s I love you. I can’t live without you. ”ती त्याला जोर जोरात हलवत रडत बोलत होती.
निशांत, “ इतक्या वेळा sorry लिहिण्या पेक्षा आणि म्हणण्या पेक्षा एकदा I love you  म्हणायचं ना बास” तो तिला मिठी मारत म्हणाला.
विनिशा,“काय?” ती त्याला आश्चर्याने पाहत म्हणाली.
निशांत,“ हो” अगदी सहजपणे म्हणाला.
विनिशा,“ म्हणजे तू मला माफ”ती पुढे बोलणार तेवढ्यात निशांत म्हणाला.
निशांत ,“ केव्हांच केले पण एका अटीवर” तो जरा दूर करून तेचे खांदे धरत म्हणाला.
विनिशा,“आणि एक महिन्याचा अबोला धरून मला सतावले ते काय होते? ती प्रश्नार्थक  नजरेने पाहत म्हणालेत .
निशांत,“ ते होय तुला माझी किंमत कळावी म्हणून तुला जाणीव व्हायला पाहिजे होती की तू माझ्या शिवाय राहू शकत नाहीस म्हणून”  तो तिचा   डोळ्यातील पाण्याने  खराब झालेला चष्मा त्याच्या रूमालाने पुसत व परत तिच्या डोळ्याला लावत म्हणाला.
विनिशा,“ बरं आणि मला माफ करण्याची अट काय आहे मग आता? ” ती त्याला पाहत म्हणाली.
        निशांत तिला जवळ ओढत तिच्या कमरेत हात घालत म्हणाला.
निशांत,“ स्टोबेरी फ्लेवर मला आवडत नाही”तो तिच्या ओठांवर हात फिरवत व लिपस्टिकचा वास घेत म्हणाला.
विनिशा,“ आता हे अजून काय तुझ्या डोक्यावर परिणाम झाला वाटत”त्याच्या गळ्यात दोन्ही हात घालत म्हणाली.
निशांत,“ मला लिपस्टिकचा स्टोबेरी फ्लेवर आवडत नाही त्या दिवशी तू तोच लावला होतास तू रोज फ्लेवर वापर रोज परफ्यूम सारखा.” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.
         विनिशाला त्या दिवशीच्या किसची आठवण आली आणि ती लाजली  व म्हणाली.
विनिशा,“ तुझ्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत असं नाही वाटत तुला!” ती लाजतच म्हणाली.
निशांत,“ पण मी तर काहीच केलं नव्हतं तूच काय कराच ते केलं होतंस ना मी फक्त मला स्टोबेरी फ्लेवरची लिपस्टिक नाही आवडत इतकच म्हणालो पण आज कोणती लावली आहे जरा चाखून पाहीली पाहिजे!” तो तिला आणखीन जवळ ओढत म्हणाला.
विनिशा,“ बास झाला  तुझा चावटपणा कोणी पाहीलं तर?” ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.
निशांत ,“ हे आपलं बरं आहे तू सगळं न बोलता करून मोकळं व्हायचं आणि  नुसतं बोललं तरी मी चावट आणि कोणी नाही इथे पाहायला” तो म्हणाला.
         थोड्या वेळाने ते रेस्टॉरंट मधून एका बागेत बेंचवर जाऊन बसले. विनिशा त्याच्या खांद्यावर डोके ठेवून विसावली होती. त्याच हात हातात घेत ती बोलू लागली.
विनिशा,“ I am really sorry nishant.खरचं माझं चुकलं ”
निशांत,“ sorry ऐकून मी बोअर झालो आता बास विनी. तुला माहिती आहे का जेंव्हा एखाद्या माणसामध्ये एखादी कमी असते म्हणजे कोणती ही या जगात कोणीच परफेक्ट नाही मी सुद्धा! पण जर त्या माणसाच्या मनात त्या कमी बद्दल न्यूनगंड निर्माण झाला की तो माणूस त्या न्यूनगंडाचा चष्म्यातून सगळं जग पाहतो. मग त्याच्या किती ही जवळची माणसे त्याच्या वर प्रेम  करू देत त्याला आपुलकी दाखवून देत तो त्या माणसाच्या प्रेमाला, आपुलकीला दया किंवा कीव समजू लागतो तेच तुझ्या बाबतीत झाले. असे कोणाच्याही बाबतीत होऊ शकते.so its ok पण या मनस्थितीतून तुला बाहेर काढण्यासाठी व तुला हव्या त्या नात्यात मी ऍडजस्ट होणार हे तुझे गृहीतक खोडून काढण्यासाठी  मला तुझ्या पासून काही दिवस लांब राहणे गरजेचे होते.” तो हात हातात गुंफण बोलत होता.
विनिशा,“बरं, एवढं मानसशास्त्र कोणी शिकवलं तुला?” त्याला पाहत म्हणाली.
निशांत,“ गिरीषने डॉक्टर मित्र असण्याचा फायदा! आणि जेंव्हा एखाद्या व्यक्तीला कायमच गमावण्याची भीती माणसाच्या मनात निर्माण होते तेंव्हा तो माणूस आणखीन जवळ जातो त्या माणसाच्या!” तो म्हणाला.
विनिशा,“ बास बास कळले मला! पण परत जर असा पळून गेलास ना तर जिथे कुठे असशील तिथून मारत आणणार तुला!”त्याचा हातला चिमटा घेत म्हणाली.
निशांत, सोड हात आलं लक्षात माझ्या!”  तो हात चोळत म्हणाला.
विनिशा,“ that like a my nishant. I love you!” ती त्याला बिलगत म्हणाली.
निशांत ,“yours?”तो हसत म्हणाला.
विनिशा,“ yes only my”
निशांत,“ ok ok only your. Love you.”तिला घट्ट मिठी मारत म्हणाला.
       
          तर अशा प्रकारे निशांत आणि विनिशा मधले भांडण मिटले व विनिशाने पुन्हा तिच्या प्रेमाची कबुली निशांत समोर दिली.?
      पण आता तर निशांतने अर्धी लढाई जिंकली होती अजून अर्धी लढाई बाकी होती. मी असं का म्हणतेय त्याच उत्तर पुढच्या भागात
क्रमशः
सदरचे लेखन  कॉपी राईट या कायद्या अंतर्गत येत असून  लेखकाच्या नावा शिवाय कोठेही पोस्ट करू नये . साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे)




             

      
  

🎭 Series Post

View all